Monday, July 13, 2026
Home Blog Page 2873

स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या मार्गावर? रविकांत तुपकरांकडून संघटनेवर दावा, म्हणाले…

0
स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या मार्गावर? रविकांत तुपकरांकडून संघटनेवर दावा, म्हणाले…


Maharashtra Politics :  राज्यात शिवसेना (Shiv Sena), त्यानंतर राष्ट्रवादी (NCP) आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) फुटीच्या मार्गावर चालली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याचं कारणही तसा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी काल कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावून  स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर आणलेत. यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

रविकांत तुपकर यांनी काल बुलढाण्यात कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्याकडून त्यांचे नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच रविकांत तुपकर यांनी त्याला दुजोरा दिला आहे. “आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत आहे , माझ्या ऐवजी दुसरे कोणी असतं तर आत्महत्या केली असती” अशा शब्दात तुपकर यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली खंत व्यक्त केली. मला संघटनेतून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आमची आहे. आता महाराष्ट्रभर तरुणांची फौज उभी करणार असून शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. 

रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. काल बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्या बद्दल रोष व्यक्त केला तर रविकांत तुपकर हेच आमचे पक्षश्रेष्ठ आहेत असाही बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर होता. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सारखेच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन गटात विभागली जाईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे.  
विकांत तुपकर यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले होते. रविकांत तुपकर यांना संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून व राजू शेट्टी यांच्याकडून डावलण्यात येत असून रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसाठी लढत असताना त्यांच्या कार्याची दखल मात्र कुणीही घेत नाही .त्यामुळे रविकांत तुपकर हे व्यथित आहे भविष्यात आम्ही रविकांत तुपकर यांच्या सोबतच राहू व त्यांच्यासाठी राज्यभर फिरून कार्यकर्त्यांची आता मोठी फौज तयार करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. 

या नेत्यांनी स्वाभिमानीला केलाय रामराम 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अनेक नेते नाराज होऊन संघटना सोडून गेले आहेत. सदाभाऊ खोत, देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रविकांत तुपकर हे सुद्धा नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघड व्यक्त केली आणि राजू शेट्टींवर आपला रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडते की काय..? रविकांत तुपकर हे वेगळा मार्ग निवडतात की काय…? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे..



Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…


Ganeshotsav 2023 : गणपती मंडपांसाठी रस्ते खणणाऱ्यां परवानगीच का देता? हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला सवाल



Source link

Palghar Wadhwan Port : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा मार्ग मोकळा, नागरिकांंमध्ये संतापाची लाट

0
Palghar Wadhwan Port : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा मार्ग मोकळा, नागरिकांंमध्ये संतापाची लाट



<p>Palghar Wadhwan Port : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा मार्ग मोकळा, नागरिकांंमध्ये संतापाची लाट</p>



Source link

Nitin Desai Death: नितीन देसाईंच्या आत्महत्त्येबाबत नवी माहिती उघडकीस

0
Nitin Desai Death: नितीन देसाईंच्या आत्महत्त्येबाबत नवी माहिती उघडकीस



Nitin Desai Death: नितीन देसाईंच्या आत्महत्त्येबाबत नवी माहिती उघडकीस विख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आयुष्याची अखेर केलीय. कर्जतच्या एनडी स्टुडिओतील त्यांच्या खोलीत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. त्यांच्या मृत्युमुळे संपूर्ण हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी शोकाकूल झालीय. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक समस्यांमुळे तणावाखाली होते असं कळतंय. १९४२-अ लव्ह स्टोअरी हा त्यांचा पहिला गाजलेला चित्रपट. त्यानंतर माचिस, हम दिल दे चुके सनम, लगान, स्वदेस, जोधा अकबर आणि पानिपत हे त्यांत्या कला दिग्दर्शनामुळे सर्वाधिक गाजलेले चित्रपट ठरले. त्याचबरोबर लोकमान्य हा चित्रपट, आणि राजा शिवछत्रपती या मालिकेची त्यांनी निर्मिती केली होती. २००५ साली त्यांनी ए.डी.स्टुडिओ उभारला. कला दिग्दर्शनात त्यांचा हातखंडा होता आणि त्यांची किर्ती जगभरात पोहोचली होती.



Source link

Sambhaji Bhide : संभाजी भिडे हाजिर हो.. ८ दिवसांच्या आत पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस, ऑडिओची होणार फॉरेन्सिक टेस्ट

0
Sambhaji Bhide : संभाजी भिडे हाजिर हो.. ८ दिवसांच्या आत पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस, ऑडिओची होणार फॉरेन्सिक टेस्ट


&nbsp;Sambhaji&nbsp;Bhide Notice : संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. यासाठी अमरावतीतील राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे व आयोजकांना नोटीस जारी केली आहे.



Source link

Forest Guard Exam Scam : वनरक्षक पदाच्या परीक्षेत हायटेक कॉपी, उत्तरं सांगायला १० लाख रुपये

0
Forest Guard Exam Scam : वनरक्षक पदाच्या परीक्षेत हायटेक कॉपी, उत्तरं सांगायला १० लाख रुपये


परीक्षा नागपुरात आणि उत्तरे छत्रपती संभाजी नगरातून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विनोद डोभाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवराणा करिअर अकॅडमीतून हे रॅकेट सक्रीय होते. यामध्ये विनोद डोभाळ, सचिन गोमलाडू यासह अन्य एक व्यक्ती हायटेक यंत्रणेद्वारे परीक्षार्थींना उत्तरे पुरवत होती. पोलिसांना याची गोपनीय माहिती मिळताच छापा टाकून एकाला अटक केली व सर्व सामान हस्तगत केले.



Source link

Nashik : कौतुकास्पद! नाशिकची काठेगल्ली शाळा ‘स्मार्ट स्कूल’मध्ये देशात दुसरी, गोव्यात पुरस्कार

0
Nashik : कौतुकास्पद! नाशिकची काठेगल्ली शाळा ‘स्मार्ट स्कूल’मध्ये देशात दुसरी, गोव्यात पुरस्कार


Nashik NMC School : नाशिककरांसाठी (Nashik) आनंदाची बातमी असून नाशिक महापालिकेच्या शाळेने नाशिकचे नाव देशात उंचावले आहे. स्मार्ट स्कूल (Smart School) प्रकल्पाअंतर्गत कायापालट झालेल्या नाशिक महापालिकेची (Nashik NMC School) काठे गल्ली शाळा क्रमांक 43 चा देशभरात डंका वाजला आहे. केंद्राच्या इकोनाॅमिक्स टाईम्स गव्हर्मेंट डिजिटेकने स्मार्ट स्कूल स्पर्धेतील सर्वेक्षणात काठेगल्ली शाळेला डिजिटल या कॅटेगरीत देशभरात दुसरा क्रमांक मिळाला आहे. येत्या शनिवारी गोव्यात पुरस्कार सोहळा होणार असून नाशिक मनपा  (Nashik NMC) शिक्षण विभागाला रौप्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे.  

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील मनपाच्या शाळा स्मार्ट स्कुल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. यात पालिकेच्या 74 पैकी 457 बिंदूंवर आधारित सर्वेक्षण करण्यात आलेल्या 69 शाळा इमारती येत्या वर्षभरात स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. त्यासाठी मनपा स्तरावर हालचाली सुरु आहेत. नाशिक महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल ही संकल्पना राबविण्यात येत असून ‘स्मार्ट स्कूल’ या महत्वाच्या प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटी मार्फत 69 शाळांचे 656 वर्ग डिजिटलाईज होणार आहेत. येत्या ऑगस्ट अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना स्मार्ट बनविण्याचे काम सुरु आहे. 

दरम्यान शहरातील काठे गल्ली येथील मनपा शाळा क्र. 43 मध्ये आठ स्मार्ट पायलट क्लासरुम सुरु करण्यात आले. एक कोटी रुपयांचा निधी खर्च करुन शाळेला डिजीटल बनवत रुपडे पालटवण्यात आले. याची दखल केंद्र सरकारने घेत इकोनाॅमिक्स टाईम्स गव्हर्मेंट डिजिटेक या संस्थेने देशभरात स्मार्ट स्कूल या उपक्रमात सहभागी झालेल्या शहरांना भेटी दिल्या. या संस्थेच्या पथकाने काठे गल्ली शाळेला भेट देत डिजीटल स्कूलची पाहणी केली. या स्पर्धेत काठे गल्ली शाळेला दुसरा क्रमांक देण्यात आला. येत्या पाच ऑगस्टला गोव्यात ‘गोव्हर्मेंट डिजिटल अवाॅर्ड 2023’ पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यास महापालिका शिक्षणाधिकारी बी.जी.पाटिल उपस्थित राहणार असून सन्मान स्विकारणार आहे.

अशी आहे डिजिटल स्कूल

दरम्यान शहरातील काठे गल्ली शाळेतील क्लासरुममध्ये पारंपरीक फळ्यासोबतच स्मार्ट बोर्ड, नवीन बेंचेस, इंटरनेट कनेक्शन, डीजिटल अभ्यासक्रमाची शैक्षणिक सुविधा आहे. पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. तसेच शाळेत 21 संगणकांचा एक कक्ष विकसीत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट स्कूल उपक्रमाअंतर्गत डिजिटल स्कूल कॅटेगरीत मनपाच्या काठे गल्ली शाळेला दुसरा क्रमांक मिळाला असून रौप्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे. येणार्‍या काळात मनपाच्या शाळांत गुणवत्ता वाढ, विद्यार्थी संख्या वाढवणे व ती टिकवणे या त्रिसुत्रीवर काम केले जाईल, अशी माहिती मनपा शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटिल यांनी दिली. 

 

इतर संबंधित बातम्या : 

Nashik News : नाशिक मनपाच्या शाळा होणार डिजिटल, स्मार्ट सिटी देणार शंभर कोटी



Source link

Chhatrapati Sambhajinagar : नात्याला काळिमा.. बापाकडून वर्षभर मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती

0
Chhatrapati Sambhajinagar : नात्याला काळिमा.. बापाकडून वर्षभर मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तपासाला सहकार्य करत नसल्याने आरोपीचे नाव निष्पन्न होत नव्हते. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने पीडित मुलीच्या सावत्र बापाला अटक केली आहे. आरोपीने गेल्या वर्षभरापासून सावत्र लेकीवर अत्याचार केला. सावत्र बापाच्या अत्याचारात मुलगी पाच महिन्यांची गर्भवती झाली आहे.



Source link

Devendra Fadnavis : संभाजी भिडे हिंदुत्वाचं काम करतात; ते आम्हाला गुरुजी वाटतात – फडणवीस

0
Devendra Fadnavis : संभाजी भिडे हिंदुत्वाचं काम करतात; ते आम्हाला गुरुजी वाटतात – फडणवीस


Devendra Fadnavis praises Sambhaji Bhide : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त संभाजी भिडे यांचं जाहीर कौतुक केलं आहे.



Source link

“सरकार आणखी किती खोटं बोलणार?” फडणवीसांच्या खुलाशानंतर आव्हाडांकडून संभाजी भिडेंबाबतचा थेट पुरावाच सादर, VIDEO

0
“सरकार आणखी किती खोटं बोलणार?” फडणवीसांच्या खुलाशानंतर आव्हाडांकडून संभाजी भिडेंबाबतचा थेट पुरावाच सादर, VIDEO


Sambhaji Bhide Security : देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडेंना अशी कोणतीही सुरक्षा पुरवलेली नाही. जयंत पाटलांची माहिती चुकीची आहे. फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत थेट पुरावाच सादर केला आहे.



Source link