Monday, July 13, 2026
Home Blog Page 2877

Shahapur Accident: शहापूरमध्ये गर्डर बसवताना अपघात कसा घडला ?

0
Shahapur Accident: शहापूरमध्ये गर्डर बसवताना अपघात कसा घडला ?



<p>Shahapur Accident: शहापूरमध्ये गर्डर बसवताना अपघात कसा घडला ?</p>



Source link

Hinganghat Crime News : टोमॅटोची उधारी मागितल्याने विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

0
Hinganghat Crime News : टोमॅटोची उधारी मागितल्याने विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला


मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात भाजीविक्रेते असलेल्या शुभम मनोहर टामटे यांनी विलास थुरटकर यांना उधारीवर टोमॅटोची विक्री केली होती. आरोपीने शुभम यांच्याकडून चार कॅरेट टोमॅटो उधारीवर खरेदी केले. त्यानंतर भाजीविक्रेत्या शुभम यांनी विलास यांना पैशांची मागणी करायला सुरुवात केली. त्यावेळी शुभम आणि विलास या दोघांमध्ये वाद झाला. शिवीगाळ झाल्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. आरोपी विलासने शुभमवर धारदार शस्त्राने वार करत त्याला जखमी केलं. सुदैवाने शुभमने तातडीने घटनास्थळावरून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.



Source link

Nava Gadi Nava Rajya: वर्षा व नंदूच लग्न सुरळीत पार पडेल?

0
Nava Gadi Nava Rajya: वर्षा व नंदूच लग्न सुरळीत पार पडेल?



Nava Gadi Nava Rajya Serial Update: माधवरावांच्या म्हणजेच राघवच्या बाबांच्या आजारपणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: ईशाच्या जाण्याने अनिरुद्धची झाली वाईट अवस्था

0
Aai Kuthe Kay Karte: ईशाच्या जाण्याने अनिरुद्धची झाली वाईट अवस्था



Aai Kuthe Kay Karte Serial Update: अनिरुद्धची झालेली अवस्था पाहून कांचन आजी आणि अप्पांना काळजी वाटू लागते.



Source link

पुण्याच्या विकासकामाला पंतप्रधान मोदी नेहमीच साथ देतात, अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

0
पुण्याच्या विकासकामाला पंतप्रधान मोदी नेहमीच साथ देतात, अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक


Ajit Pawar : ‘देशाच्या विकासाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेतृत्व करतात’ असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे. तर पुण्याच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सहकार्य करतात असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. 

पंतप्रधान देशाचे लोकप्रिय नेते : अजित पवार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशाचे लोकप्रिय नेते असा उल्लेख केला आहे. तर या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी हे विकास कामांसाठी पंतप्रधान नेहमी सहकार्य आणि प्रोत्साहन ते नेहमीच देत असतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सर्वांच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. 

‘पंतप्रधान मोदींच्या मदतीचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला’

‘पंतप्रधान मोदी हे राज्याच्या विकाससाठी कायम मदत करत असतात. त्याचा फायदा राज्यातील 14 कोटी जनतेला होत आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. “पंतप्रधान मोदींच्या मदतीचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला पंतप्रधान मोदी हे राज्याच्या विकासासाठी कायम मदत करत असतात. त्याचा फायदा राज्यातील 14 कोटी जनतेला होत आहे,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ‘ही कामं सुरु असताना अनेक अडचणी आल्या आहेत, पण पुणेकरांनी कोणतंही राजकारण न आणता ही कामं पूर्णत्वाला नेण्यासाठी मदत केली आहे,’ असं म्हणत अजित पवारांनी पुणेकरांचे आभार मानले आहेत.  

या सर्व विकासकामांचे काम सुरु असताना पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवडकरांना खूप त्रास सहन करावा लागला पण पुण्याच्या जनतेने हे सर्व सहन केलं, असं म्हणत अजित पवारांनी पुण्याच्या जनतेचे आभार मानले आहेत. पुढे बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आणि मी महाराष्ट्राच्या विकासासाठी वेगाने काम करत आहोत. तसेच आमचं ट्रिपल इंजिनचं सरकार राज्याच्या जनतेच्या हितासाठी काम करत आहे. 

‘अनेकांनी पुण्याच्या विकासकामात मदत केली’ 

‘जिजाऊंनी बालशिवाजीच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुण्याच्या विकासाला सुरुवात केली. त्यानंतर अनेकांनी पुण्याच्या विकास कामांमध्ये अनेकांनी योगदान दिलं आहे. तर जनतेच्या हितासाठी, राज्यातील गरिबी हटवण्यासाठी सरकारकडून हा प्रयत्न करण्यात येत आहे.’ पंतप्रधान आवास योजनेमधून मिळालेली घरं न विकण्याचा सल्ला यावेळी अजित पवार यांनी जनतेला दिला आहे. या कार्यक्रमादरम्यान नागरिकांना एक सुजाण नागरिक होण्याचं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं आहे. 

हेही वाचा : 

Sharad Pawar : देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला, ही गोष्ट कोणी विसरु शकत नाही : शरद पवार 



Source link

Pooja Bhatt: घटस्फोट घेणे म्हणजे मृत्यूला जवळून पाहणे; पूजा भट्टने केला खासगी आयुष्याचा खुलासा

0
Pooja Bhatt: घटस्फोट घेणे म्हणजे मृत्यूला जवळून पाहणे; पूजा भट्टने केला खासगी आयुष्याचा खुलासा



Bigg Boss OTT 2: बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट सध्या बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये तिने खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले आहेत.



Source link

Ved: श्रावणी आणि सत्याची प्रेम कहाणी पाहायला मिळणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे

0
Ved: श्रावणी आणि सत्याची प्रेम कहाणी पाहायला मिळणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे


‘वेड’ या चित्रपटात जिनिलीया आणि रितेश देशमुखसोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. ‘वेड’ या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची कथा तीन व्यक्ती, संसार आणि प्रेम याभोवती गुंफली गेली आहे. या चित्रपटात अॅक्शन आणि रोमान्स अशा दोन्ही गोष्टी पुरेपूर पाहायला मिळाल्या आहेत.



Source link

Rahul Mahajan: तिसऱ्यांदा घटस्फोट घेणार? राहुल महाजनने दिली प्रतिक्रिया

0
Rahul Mahajan: तिसऱ्यांदा घटस्फोट घेणार? राहुल महाजनने दिली प्रतिक्रिया


या सगळ्या प्रकरणावर स्वत: राहुल महाजनने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “मला माझ्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी खासगी ठेवायच्या आहेत. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीवर भाष्य करायचे नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे यावर मी माझ्या मित्रांबरोबरही चर्चा करत नाही”



Source link

Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब; काँग्रेसची मोठी खेळी

0
Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब; काँग्रेसची मोठी खेळी


काँग्रेसमधून विरोधी पक्षनेते पदासाठी अनेक नावं चर्चेत होती. त्यात नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, संग्राम थोपटे यांच्याही नावांची चर्चा होती. मात्र, पटोले हे प्रदेशाध्यक्ष असल्यानं त्यांचं नाव मागे पडल्याचं बोललं जातं. अशोक चव्हाण हे सौम्य स्वभावाचे नेते आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याकडं विधीमंडळ पक्षाचं गटनेते पद आहे. त्यामुळं त्यांची नावं मागे पडल्याचं बोललं जातं. पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे यांनाही पक्षश्रेष्ठींनी या पदासाठी विचार केला नाही. त्याऐवजी आक्रमक स्वभावाच्या व तुलनेनं तरुण नेते असलेल्या वडेट्टीवार यांच्यावर पक्षानं विश्वास दाखवला आहे.



Source link

सत्तानाट्यानंतर मोदी अन् शरद पवार एकाच मंचावर; दोघांच्या भाषणाकडे देशाचं लक्ष

0
सत्तानाट्यानंतर मोदी अन् शरद पवार एकाच मंचावर; दोघांच्या भाषणाकडे देशाचं लक्ष


Sharad pawar and PM Modi राज्यातील सत्तानाट्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad pawar)हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहे. एकीकडे शरद पवारांच्या समर्थकांकडून आणि विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मोदींच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवून आणि आंदोलन करण्यात येत आहे तर दुसरीकडे शरद पवारांच्या उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत आहे. 

या कार्यक्रमात राजकीय नेत्यांची मोठी फळी बघायला मिळणार आहे. मात्र यातच सगळ्यात जास्त लक्ष मोदी आणि शरद पवारांच्या उपस्थितीकडे लागलं आहे. विरोधक मोदींच्या विरोधात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यावर शरद पवार ठाम असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ज्यावेळी मोदींच्या विरोधात एकजूट दाखवण्यात येत होती. त्यावेळी शरद पवारदेखील मोदींच्या विरोधातील एकजुटीत होते. पाटणा आणि बंगळुरु या दोन ठिकाणी बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी मोदींना विरोध केला होता. आता पवार आणि मोदी एकत्र दिसत असल्याने राजकारणात वेगळच चित्र बघायला मिळत आहे.

आज राज्यसभेतलं मतदान होण्याची शक्यता होती. मात्र या मतदानाची वेळ शरद पवारांवर आली नाही. मतदान करायचं की मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं, असा पेच शरद पवारांसमोर निर्माण झाला असता. त्यावेळी शरद पवार नेमकं प्राधान्य कशाला देणार, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला असता. 

इंडिया आघाडीत नाराजी…

एकीकडे शरद पवार इंडिया आघाडीकडून पंतप्रधांनांना विरोध करत असताना दुसरीकडे त्यांच्यासोबतच एकाच मंचावर दिसत असल्याने इंडिया आघाडीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र याच कार्यक्रमात शरद पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यासोबतच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने त्यांच्यात काही टीका टिपण्णी केली जाते का? हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. 

विरोधक मोदींना काळे झेंडे दाखवणार

देशाचं राज्य जळत असताना मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. राज्य जळत असल्याने मोदींच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही मागे हटणार नाही मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणारच, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे. 

हेही वाचा-

PM Modi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, विरोधक दाखवणार काळे झेंडे

 

 

 



Source link