Monday, July 13, 2026
Home Blog Page 2878

पर्यटकांना खुणावतेय ठोसेघरचे सौंदर्य | पुढारी

0









[adning id=”1976″]

परळी; पुढारी वृत्तसेवा :  पावसामुळे कास-ठोसेघर परिसरातील डोंगरदर्‍यात विलोभनीय निसर्गसौंदर्य अवतरले आहे. संततधार सरींमुळे निर्माण झालेल्या विहंगम निसर्ग सौंदर्याने हा परिसर प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. येथील डोंगरदर्‍यांनी हिरवाईची शाल पांघरून घेतली आहे. परिसरातील निसर्ग हिरवागार बनला आहे. उंच उंच डोंगर जे उन्हाळ्यात वणव्यामुळे काळेकुट्ट पडले होते ते आता हिरवीगार निसर्ग नवलाई दाखवू लागले असून, हा परिसर पर्यटकांना खुणावू लागला आहे.

डोंगररांगांनी रूपडे पालटले… सर्वत्र हिरवा गालिचा…

जून महिना सुरू झाला की पाऊस सुरू होतो आणि निसर्ग बहरू लागतो. यंदा पावसाने ओढ दिल्याने पावसाळी पर्यटनही लांबले होते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून, येथील डोंगररांगा संततधार पावसामुळे आता हिरवळल्या आहेत. सर्व परिसरात हिरवा गालिच्छा पसरू लागला आहे. सर्वत्र रानफुले फुलू लागली आहे. येथील वाराही सुसाट वेगाने मदमस्त बेधुंदपणे वाहू लागला आहे. डोंगर पर्वतांवर धुक्याची शाल पसरली असून हा परिसर तरुणांबरोबरच निसर्गप्रेमींना खुणावत आहे. खास पावसाळ्यातील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नवविवाहित, तरुणांई, निसर्गप्रेमी कास-ठोसेघर येथे येत आहेत.

धबधब्याचे सौंदर्य मोबाईलमध्ये

निसर्गाच्या जादुई कुंचल्याची किमया टिपताना कास-ठोसेघरचे विहंमग रूप पाहण्याची मजा काही औरच असते. उंचावरून कोसळणारे छोटे-मोठे धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. डोंगररांगांमधून फेसाळणार्‍या धबधब्याचे द़ृश्य पाहण्यासाठी दुचाकी तसेच चार चाकीमधून फिरायला येणार्‍यांची संख्या वाढली असून परिसरात भात लावणीच्या कामास वेग धरला आहे.

ठोसेघर धबधब्याकडे पर्यटकांचा कल

निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण, आकाशाशी स्पर्धा करणारे मोठाले वृक्ष, झोेका घेऊन अंगावर रोमांच उभा करणारा खट्याळ वारा, हिरवा शालू परिधान करून पावसाच्या वर्षावाने चिंब चिंब भिजणारा निसर्ग असे विहंगम द़ृश्य महाबळेश्वर-पाचगणी, कास, ठोसेघर, बामणोली परिसरात पाहावयास मिळत असून, ऐन पावसातही अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. परळी खोर्‍यातील पर्यटनस्थळी पर्यटकांची रिघ लागत असून, विकेंडला तुडुंब गर्दी होत आहे. विशेषत: ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी अनेकांचा कल वाढला आहे. येथील गॅलरी तर विकेंडला हाऊसफुल्ल होत आहे.











Source link

किराणा दुकानातही भरता येणार आता वीज बील | पुढारी

0









[adning id=”1976″]

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  वीज बिल भरण्यासाठी आता नागरिकांना महावितरण कार्यालयात अथवा बँकेतील रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ग्राहकांना घरगुती वीज बिल किराणा दुकानातही भरता येणार आहे. परंतु, यासाठी किराणा दुकानदाराला महावितरणकडे अर्ज करून डिजिटल पेमेंट वॉलेट घ्यावे लागणार आहे.

महावितरणने वीज ग्राहकांसाठी ऑनलाईन वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे ग्राहकांना संगणक अथवा मोबाईलवरून हवे तेव्हा वीज बिल भरता येते. मात्र, ज्या नागरिकांना ऑनलाईन प्रणालीचा वापर करता येत नाही, त्यांना महावितरण कार्यालयात अथवा बँकेत जाऊनच वीज बिल भरावे लागते. त्यामुळे मनस्ताप तर होतोच, शिवाय वेळही वाया जातो. ही परवड थांबवण्यासाठी महावितरणने ग्राहकांसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

वीज ग्राहकांना किराणा दुकानात देखील वीज बिल भरता येणार असून यासाठी संबंधित दुकानदाराला डिजिटल पेमेंट वॉलेट घ्यावे लागणार आहे. या वॉलेटमध्ये किमान पाच हजार रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे महावितरणच्या या डिजिटल वॉलेटमध्ये पैसे भरणा करून दुकानदारांना वीज बिल भरून घेता येणार आहे.

असे भरता येणार बिल…

ग्राहकांना महावितरणकडून दर महिन्याला वीज बिल दिले जाते. तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बिलाचा मेसेज पाठवला जातो. हे बिल किंवा मेसेज दाखवल्यास दुकानदाराकडून वीज बिल भरले जाईल, पावतीही दिली जाणार आहे.











Source link

Taapsee Pannu Birthday: तापसीने कोणत्याही अभिनेत्याला डेट केले नाही, काय आहे कारण?

0
Taapsee Pannu Birthday: तापसीने कोणत्याही अभिनेत्याला डेट केले नाही, काय आहे कारण?


कोणताही गॉडफादर नसताना बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तापसी तिच्या अभिनयासोबतच तिच्या बेधडक वक्तव्यासाठी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. कोणतंही वक्तव्य करताना ती मागे पुढे पाहत नाही. चित्रपट असो किंवा वैयक्तिक आयुष्य ती नेहमीच खंबीरपणे तिची भूमिका मांडताना दिसली आहे. आज १ ऑगस्ट रोजी तापसी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. परंतु, आपल्या एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये तिने एकाही बॉलिवूड अभिनेत्याला डेट केलं नाही. यामागील कारणही तिने स्पष्ट केलं होतं. एका अभिनेत्री आणि अभिनेत्यामधलं नातं फारसं टिकू शकत नाही, असं तिने म्हटलं होतं.



Source link

सातारा : भांडण मायलेकराचं; जीव गेला शेजार्‍याचा | पुढारी

0









[adning id=”1976″]

शिवथर; पुढारी वृत्तसेवा :  मायलेकराचं भांडण सोडवायला गेलेल्या वृद्ध शेजार्‍याचा निर्घृण खून झाल्याची घटना वडूथ, ता. सातारा येथे रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. मध्यस्थी करणे जीवावर बेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. संशयिताला अटक केली आहे.
पोपट गुलाब मदने (वय 64) असे मृत वृद्धाचे तर उमेश गुलाब राठोड (वय 29, रा. वडूथ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत पोपट मदने यांच्या शेजारी उमेश राठोड हा कुटुंबासह रहात आहे. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान उमेश त्याच्या आईबरोबर मोठमोठ्याने भांडत होता. पोपट मदने हे त्यांना समजावण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी भांडण न करण्याबाबत सांगितले. ‘तू मोठ्या मोठ्याने ओरडू नकोस आमच्या घरात लहान मुले झोपली आहेत’, असेही मदने यांनी त्यांना सांगितले. मात्र, उमेश राठोड याचा राग अनावर झाला. त्याने पोपट मदने यांच्या छातीवर चाकूने वार केले. हे वार पोपट यांच्या वर्मी लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलीस उपनिरीक्षक फरांदे व त्यांच्या सहकार्‍यांनी संशयिताला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.











Source link

मनोहर कुलकर्णीला पैसे कोण देतो? : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

0


कराड; पुढारी वृत्तसेवा : आरएसएसच्या अनेक हिंदुत्ववादी संघटना आहेत. काही संघटना गुप्तपणे काम करतात, तर काही संघटना उघडपणे. जो कोणी मनोहर कुलकर्णी आहे त्याला पैसे कोण देतो? त्याची सगळी संघटना चालवतो कोण? मला याच्या खोलात जायचं नाही. पण, जो कोणी कायदा मोडेल त्याच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई झालीच पाहिजे. यामध्ये कायदा मोडला आहे की नाही? त्याच्यावर काय कारवाई करणार? हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

कराड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. जाणूनबुजून समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणार्‍यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार आहे. सरकारने एफआयआर दाखल केल्याचे समजले, ही चांगली गोष्ट आहे. पण, एका मागोमाग एक लगातार भावना दुखावणारी वक्तव्ये केली जात आहेत. त्याला मोकळे सोडले तर तो आणखी कुठे कुठे आग लावेल, सगळीकडे पेटवेल असे सांगत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तुला तुझे तत्त्वज्ञान मांडायचे असले, विचार पसरवायचे असतील, मनुस्मृतीबद्दल काही बोलायचं असले तर तू बोलू शकतोस. त्याला आम्ही विचाराने उत्तर देऊ. पण, आमच्या नेत्यांच्या विरुद्ध अशी घाणेरडी वक्तव्ये करू नयेत. आम्ही असे घाणेरडं वक्तव्य केली तर काय होईल? याचा विचार करावा. त्यामुळे असे करणे चुकीचे आहे.

देवेंद फडणवीस यांनी आमचा, भाजपाचा याच्याशी काही संबंध नाही असे विधान केले आहे. परंतु आरएसएसच्या हजारो संघटना आहेत. त्या वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. हे सोयीप्रमाणे म्हणतात आमचा संबंध नाही आणि सोयीप्रमाणे म्हणतात आमचीच संघटना आहे. महात्मा गांधीजींचा खून झाला. तो कोणी केला? त्याचा कोणाशी संबंध होता? आणि आता आमचा काही संबंध नाही, असे म्हणून हात मोकळे करता. मग सरदार पटेल यांनी महात्मा गांधी यांच्या खुनानंतर दुसर्‍याच दिवशी आरएसएसवरती बंदी का आणली होती? सरदार पटेल यांचे आरएसएस बद्दलचे काय विचार होते, हे सांगण्याची गरज नाही.

मुद्दाम कोणी तेलात काडी टाकायचे काम करत असेल तर आपण गप्प बसायचे का? हा एका मागोमाग एक असे गुन्हा करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे याच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी. अन्यथा सांगावे की त्यांनी काहीही गुन्हा केलेला नाही. तो फार साधुसंत माणूस आहे आणि जाऊन त्याच्या पाया पडावे. त्यांनी दोन्हीपैकी काहीतरी एक केले पाहिजे, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

दोघांनी पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली

दोन लोकांनी पाठीत खंजीर खुपसून जी सत्ता मिळवली आहे, त्याबद्दल समाजामध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. सर्व्हेमध्ये दोन गटाला खासदारकीच्या दोन दोन जागा मिळतील असे दाखविले आहे. परंतु दोन जागा मिळतील असेही मला वाटत नाही. या निवडणुकीत देशातील वातावरण सत्ताधार्‍यांच्या विरोधात आहे. ‘इंडिया’ आघाडीची तयारी जोरात चालली आहे. जवळजवळ 28 पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे भाजपाच्या एका उमेदवाराच्या विरोधात एकच उमेदवार द्यायचा असा आमचा प्रयत्न आहे. यातून विरोधकांच्या मतांची विभागणी टळणार आहे. असे असताना महाराष्ट्रात युतीला 24 जागा मिळतील, असे म्हणणे शक्य आहे का? त्यांचे खाते उघडते की नाही येथून त्यांची सुरुवात केली पाहिजे, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.



Source link

पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देणार्‍यास अटक | पुढारी

0









[adning id=”1976″]

कराड; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभेच्या अधिवेशनामध्ये संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केल्यावरुन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देणारा मेल पाठवण्यात आला होता. याप्रकरणातील मेल पाठवणार्‍या संशयित तरुणास पोलिसांनी राजगड येथून अटक केली. अंकुश सवरटे (वय 23, रा. आलेगाव, पो. कावळगाव, ता. पूर्णा, जिल्हा परभणी, सध्या रा. बालाजीनगर धनकवडी पुणे) असे त्याचे नाव आहे.

दरम्यान, यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून या घटनेचा निषेध करत अशा प्रवृत्तीला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार चव्हाण यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी त्यांना धमकी देणारा मेल पाठवण्यात आला होता. हा मेल अंकुश सरवटे याच्या मेलवरून नांदेड येथून पाठविण्यात आला होता. त्यानंतरच्या चौकशीत संशयित पुणे परिसरात असल्याचे समोर आल्यानंतर कराड पोलिसांनी त्यास अटक केली. सोमवारी संशयितास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांपुढे हजर करण्यात आले होते. त्यानंतर जामीन मंजूर झाला.











Source link

सातारा : गतवर्षीपेक्षा पाऊस, पाणीसाठा अन् आवकही जास्त | पुढारी

0









[adning id=”1976″]

गणेशचंद्र पिसाळ

पाटण :  यावर्षी 15 जुलैपर्यंत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांचे डोळे पांढरे करायला लावणार्‍या कोयना धरणात जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात अपेक्षित पाऊस व पाण्याची आवक झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस, पाण्याची आवक व सध्याचा पाणीसाठा जास्त असल्याने सार्वत्रिक समाधान व्यक्त होत आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता 32.44 टीएमसी पाण्याची आवश्यकता असून अजूनही तब्बल दोन ते अडीच महिन्यांचा पावसाचा कालावधी शिल्लक असल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्‍या कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष 1 जून ते 31 मे कालावधीत गणले जाते. या तांत्रिक वर्षारंभाला म्हणजेच 1 जूनला कोयना धरणात 18.09 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही, तर अगदी जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंतही पावसाने पाठ फिरवल्याने कोयना धरणात अपेक्षित पाण्याची आवकही झाली नव्हती. मात्र, 15 जुलैनंतर पावसाने जोरदार हजेरी लावण्यास प्रारंभ केला आणि धरणात अपेक्षित पाणीसाठा होण्यास मदत झाली. त्याचवेळी या दोन महिन्यांत सिंचन व पश्चिम वीज निर्मितीसाठी 11.13 टीएमसी पाणीवापर झाला आहे. तरीही धरणात सध्या उपलब्ध पाणीसाठा 72.81 टीएमसी तर त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 67.81 टीएमसी इतका आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 67.50 टीएमसी पाणी साठा पश्चिम वीज निर्मितीसाठी आरक्षित आहे. गतवर्षी पूर्वेकडे सिंचनासाठी धरण निर्मितीनंतर पहिल्यांदाच ऐतिहासिक असा तब्बल 36.05 टीएमसी पाणीवापर झाला. निश्चितच या पाणी वापरामुळे नव्या वर्षारंभाला तुलनात्मक कमी पाणीसाठा शिल्लक राहिला होत .











Source link

Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’ने दिली हॉलिवूड सिनेमाला टक्कर, ३० दिवसात कमावले इतके कोटी

0
Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’ने दिली हॉलिवूड सिनेमाला टक्कर, ३० दिवसात कमावले इतके कोटी



Baipan Bhari Deva Box Office Collection : हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे.



Source link

Pune Terrorist: धक्कादायक ! बाँब तयार करण्यासाठी दहशतवाद्यांनी बनवली घरातच प्रयोगशाळा; पोलिसांनी जप्त केले साहित्य

0
Pune Terrorist: धक्कादायक ! बाँब तयार करण्यासाठी दहशतवाद्यांनी बनवली घरातच प्रयोगशाळा; पोलिसांनी जप्त केले साहित्य



Pune Terrorist arrest : पुण्यात अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या घरातून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांनी घरातच प्रयोगशाळा बनवल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आले आहे.



Source link

Mrunal Thakur : पत्रकार होताहोता झाली अभिनेत्री, जाणून घ्या मृणाल ठाकूर विषयी काही खास गोष्टी

0
Mrunal Thakur : पत्रकार होताहोता झाली अभिनेत्री, जाणून घ्या मृणाल ठाकूर विषयी काही खास गोष्टी



Mrunal Thakur Birthday: एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मृणाल ठाकूरचा आज वाढदिवस आहे. जाणून घ्या तिच्याविषयी काही खास गोष्टी…



Source link