Monday, July 13, 2026
Home Blog Page 2879

Meena Kumari: वडिलांचा विरोध अन् दोन तासात लग्न, जाणून घ्या मीना कुमारीविषयी काही खास गोष्टी

0
Meena Kumari: वडिलांचा विरोध अन् दोन तासात लग्न, जाणून घ्या मीना कुमारीविषयी काही खास गोष्टी


दरम्यान, एकत्र काम करत असतानाच मीना कुमारी आणि कमाल यांचे सूत जुळले. मात्र कमाल पूर्वीपासूनच विवाहित असल्यामुळे मीना कुमारी आणि कमाल यांच्या नात्याचा मीना कुमारी यांच्या वडिलांनी विरोध केला होता. कमाल यांच्या मित्राने मीनाकुमारी यांची समजूत काढल्यानंतर कमाल आणि मीनाकुमारी यांनी पळून जाऊन लग्न केले.



Source link

दीड दिवस शाळेत गेले…पण सामाजिक क्रांती साहित्यातून पेटवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ

0
दीड दिवस शाळेत गेले…पण सामाजिक क्रांती साहित्यातून पेटवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ


Anna Bhau Sathe Birth Anniversary :  जाती व्यवस्थेच्या चटक्याने ज्यांना अवघ्या दीड दिवस शाळेत शिक्षण मिळाले. पण, आपल्या लेखणीतून कष्टकरी, सर्वाहारा, उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे आजच्या दिवशी निधन झाले. अण्णाभाऊ 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईतील कम्युनिस्ट नेत्यांच्या नेतृत्त्वात सुरू असणाऱ्या चळवळीकडे अण्णाभाऊ आकर्षित झाले आणि पक्षाचे काम सुरू केले. कम्युनिस्ट पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहित केले. त्याच्या परिणामी अण्णाभाऊ यांनी शिक्षण घेतले. त्यातून त्यांनी आपल्या सभोवतालचे वास्तव आपल्या लेखणीतून मांडले. 

1942  च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर अटक वॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्टालिनग्राडचा पवाडा’ 1943 साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला. त्यांनी 1944 साली शाहीर अमर शेख आणि दत्ता गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना 1947 साली प्रसिद्ध झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्यात छक्कड हा प्रकार रुजवला. 

अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णाभाऊ  हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कॉम्रेड अमर शेख आणि लाल बावटा कलापथकाद्वारे त्यांनी प्रबोधनाचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. 

पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे, असे ऐतिहासिक वक्तव्य त्यांनी 1958 च्या दलित साहित्य संमेलनात काढले होते. मुंबईची लावणी, माझी मैना गावावर राहिली..आदी पोवाडे त्यांचे चांगलेच गाजले. 

इंडियन पीपल्स थिएटर अर्थात इप्टा या सांस्कृतिक संघटनेत अण्णाभाऊ सक्रिय होते. या इप्टामध्ये बलराज सहानी आणि इतर अभिनेते सक्रीय होते. बलराज सहानी आणि अण्णा भाऊ साठे यांच्यात मैत्रीचे संबंध होते. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (1960), चिरानगरची भुतं (1978), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत. तर, फकिरा (1959),  वारणेचा वाघ (1968), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (1963), वैजयंता ह्यांसारख्या 35 कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे.  माझा रशियाचा प्रवास हे त्यांचे प्रवासवर्णन ही गाजले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या 7 कादंबऱ्यांवर चित्रपटांची निर्मिती झाली.



Source link

Samruddhi : समृद्धी महामार्गावर ठाण्यात मोठी दुर्घटना, गर्डरसह क्रेन कोसळली, 15 मजुरांचा मृत्यू

0
Samruddhi : समृद्धी महामार्गावर ठाण्यात मोठी दुर्घटना, गर्डरसह क्रेन कोसळली, 15 मजुरांचा मृत्यू


Samruddhi Mahamarg Third Phase Thane : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली. त्यामुळे 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला आहे. चार ते पाच जण जखमी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधी काही तास ही दुर्देवी घटना घडली आहे. 

समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) दुर्घटना आणि अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला मोठा अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतला आणि त्यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेतून सावरत नाही तोच पुन्हा समृद्धी महामार्गावर शहापूर येथे मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यत 15 ते 20 मजुरांचा मृत्यू झालाय. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही.

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम जोरात सरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडल्याचे समजतेय. शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. सुरक्षेची कोणताही उपाय योजना नसल्यामुळे मजुरांचा दुर्देवी मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांवर कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 15 मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार घेण्यासाठी पुण्याला येणार आहेत. त्याआधीच काही तास ही दुर्देवी घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्घटनास्थळी येणार का?  

देवेंद्र फडणीस यांचा महत्वकांशी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे सुरु झाले आहेत. नागपूर ते इगतपुरीपर्यंत सध्या समृद्धी महामार्ग सुरु आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा आणि तिसरा टप्पा येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.  हा शंभर किलोमीटरचा टप्पा आहे.  डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले.  नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण 600 किमीचा रस्ता खुला झाला आहे.



Source link

Nashik Water Fall Special Report : नाशकात धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी, हुल्लडबाजांना धू धू धुतलं

0
Nashik Water Fall Special Report : नाशकात धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी, हुल्लडबाजांना धू धू धुतलं



<p>Nashik Water Fall Special Report : नाशकात धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी, हुल्लडबाजांना धू धू धुतलं</p>



Source link

भर कार्यक्रमात गायिकेच्या अंगावर चाहतीने फेकले ड्रिंक अन्.. Video Viral

0
भर कार्यक्रमात गायिकेच्या अंगावर चाहतीने फेकले ड्रिंक अन्.. Video Viral


चाहते अनेकदा आपल्या आवडत्या गायकाच्या, रॅपरच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी उत्सुक असतात. लाइव्ह गाण्यांचा आनंद घेण्यासाठी ते तुफान गर्दी करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध रॅपरवर चाहत्याने स्टेजच्या शेजारी उभं राहून रॅपरवर कोल्ड ड्रिंक फेकली आहे. ते पाहून रॅपरने जे काही केले ते पाहून नेटकरी संतापले आहेत.



Source link

Rupali Chakankar On Sambhaji Bhide : ‘बेताल वक्तव्यांप्रकरणी संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी’

0
Rupali Chakankar On Sambhaji Bhide : ‘बेताल वक्तव्यांप्रकरणी संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी’



<p>’बेताल वक्तव्यांप्रकरणी संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी’. रुपाली चाकणकर यांची गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी</p>



Source link

संभाजीनगर हादरलं! भरदिवसा घरात घुसून दाम्पत्यावर गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद

0
संभाजीनगर हादरलं! भरदिवसा घरात घुसून दाम्पत्यावर गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद


मनपात सफाई कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झालेले प्रभू अहिरे हे पत्नीसह नुकतेच हनुमान नगर येथे राहण्यास आले आहेत. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ते पत्नीसह घरात स्वयंपाकाची तयारी करत करत होते. त्यावेळी घराचा दरवाजा उघडाच होता. अचानक चेहऱ्यास रुमाल बांधलेल्या दोघांनी घरात प्रवेश केला. काही कळायच्या आता एकाने अहिरे यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. प्रभू अहिरे प्रसंगावधान राखून खाली बसले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. तेवढ्यात आणखी एक गोळी धाडली त्यातूनही दाम्पत्य बचावले. त्यानंतर दोन्ही हल्लेखोर तेथून पसार झाले. विशेष म्हणजे, हल्लेखोर चालत आले होते. गोळीबारनंतर दोघेही त्याच मार्गे पसार झाले.



Source link

Samruddhi Mahamarg : ‘या’ कारणामुळे आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची होणार डोळे तपासणी!

0
Samruddhi Mahamarg : ‘या’ कारणामुळे आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची  होणार डोळे तपासणी!


समृद्धी महामार्गावर गेल्या पाच महिन्यात ३५८ अपघाताच्या घटना समोर आल्या असून ९५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने विधान परिषदेत दिली आहे.वेग मर्यादेचे उल्लंघन, वाहन चालवताना सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक, लेनची शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहन नसने, नियमबाह्य पद्धतीने वाहनेपार्क करणे, वाहतूक सुरक्षततेविषयी काळजी न घेणे आदि समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची कारणे असल्याचे सरकारने म्हटले आहे.



Source link

Mumbai: मुंबईतील कांदिवली येथे इमारतीवरून खाली पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू

0
Mumbai: मुंबईतील कांदिवली येथे इमारतीवरून खाली पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू


एएनआय वृत्त संस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवली येथील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरातील एका इमारतीवरून खाली पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.



Source link

सातारा : जावळी तालुक्यातील 21 अवैध दारू अड्ड्यांवर धाड, 24 जणांना अटक | पुढारी

0









[adning id=”1976″]

इम्तियाज मुजावर

पाचगणी (जि. सातारा), पुढारी वृत्तसेवा : जावळी तालुक्यातील 21 अवैध दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकल्याचे समोर आले आहे. या कारवाईत 24 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख 15 हजार पाचशे रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची जावळी तालुक्यातील ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे.











Source link