Monday, July 13, 2026
Home Blog Page 2880

दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

0
दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज


Weather Forecast, Rain Update : देशभरात ऑगस्टमहिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पण पुढील दोन महिने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून मान्सूच्या पुढील दोन महिन्यांसाठीचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव वाढत जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सोडला तर राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे, असे हवामान विभागाने म्हटलेय.

देशात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राज्यात देखील सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव वाढत जाण्याचा अंदाज आहे. मात्र दुसरीकडे आयओडी पॉझिटिव्ह राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अल निनोचा मान्सून मागील दोन महिन्यात कोणताही प्रभाव नाही, आयओडी न्युट्रल आणि पाॅझिटिव्हकडे सरकत असल्याचं मागील दोन महिन्यात चांगला पाऊस आला आहे. 

राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता – 

मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे.  पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये  २, ३ आणि ४ ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सोडला तर राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे, असे हवामान विभागाने म्हटलेय.

विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २ ऑगस्ट रोजी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३ ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिमुसळधारेचा अंदाज आहे. दरम्यान, पुढील पाचही दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस मात्र तीव्रता कमी राहणार आहे. 4 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना आणि परभणीत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 



Source link

Modi In Pune : मोदींच्या कार्यक्रमापूर्वीच वाहतुकीचा बोजवारा; रंगीत तालीम सुरू असल्याने रस्ते बंद, पुणेकरांचा संताप

0
Modi In Pune : मोदींच्या कार्यक्रमापूर्वीच वाहतुकीचा बोजवारा; रंगीत तालीम सुरू असल्याने रस्ते बंद, पुणेकरांचा संताप


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पुणे शहरातील ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर पुणे पोलिसांकडून रंगीत तालीम घेतली जात आहे. परिणामी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. प्रमुख रस्ते तसेच चौकातील रस्त्यांवर बॅरीकेटींग उभारण्यात आले आहे. त्यामुळं शहरातील वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. शहरात अचानक वाहतूक बंद केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शाळेत जाणारे विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय झाल्यामुळं अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय दिवसा रंगीत तालीम घेण्याचं काय कारण होतं?, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.



Source link

Ashok Saraf: अशोक सराफ यांनी सुरु केला नवा उपक्रम, “२० ज्येष्ठ रंगकर्मींना ७५ हजार…”

0
Ashok Saraf: अशोक सराफ यांनी सुरु केला नवा उपक्रम, “२० ज्येष्ठ रंगकर्मींना ७५ हजार…”


याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले, “मला ज्या लोकांनी मदत केली त्यांना मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. माझ्या कुटुंबाकडून या २० ज्येष्ठ कलाकारांना दिलेली ही लहानशी भेट आहे. यामुळे त्यांना मदत झाली तर मला आनंदच आहे. निवेदिताची ही सगळी कल्पना आहे. मी सुरुवातीला एवढ्या गोष्टी जुळून येतील की नाही? म्हणून घाबरलो होतो परंतु, सगळे लोक आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले.”



Source link

साताऱ्यात संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ धारकऱ्यांचा मोर्चा | पुढारी

0









[adning id=”1976″]

सातारा; पुढारी वृत्तसेवा : शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्वत्र टीका केली जात असताना साताऱ्यात भिडे यांच्या समर्थनार्थ आज (दि.३१) हिंदुत्ववादी संघटना आणि धारकऱ्यांनी मोर्चा काढला. समर्थकांकडून पोवई नाक्यावर संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक घालण्यात आला.

माध्यमांनी भिडे यांचा एकेरी उल्लेख टाळावा, अशी आगपाखड देखील भिडे समर्थकांनी यावेळी केली. भिडेंबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार विद्या ठाकूर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भिडेंच्या समर्थनार्थ निघालेल्या या मोर्चाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.

हेही वाचा : 











Source link

भिडे गुरुजींच्या वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक, राज्यभरात काँग्रेसकडून निदर्शने

0
भिडे गुरुजींच्या वक्तव्यामुळे काँग्रेस आक्रमक, राज्यभरात काँग्रेसकडून निदर्शने


Congress Protest against Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेसकडून (Congress) राज्यभरात आंदोलनं (Protest) करण्यात येत आहेत. भिडे गुरुजींनी महात्मा गांधी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे सांगली, अमरावती, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. अमरावतीमध्ये यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले. तर सांगतील पुरोगामी पक्ष आणि संघटनेसोबत काँग्रेसने देखील भिडे गुरुजींच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तसेच काँग्रसेकडून आता भिडे गुरुजींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. 

पुण्यात संभाजी भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी

पुण्यात देखील काँग्रसेच्या वतीने भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व चौकाजवळ काँग्रेसने आंदोलन केले. दरम्यान काँग्रेसच्या या आंदोलनात आमदार विश्वजीत कदम देखील सहभागी झाले. तर यावेळी संभाजी भिडे यांच्याविरोधात काँग्रेसकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. 

सांगलीत काँग्रेस आणि पुरोगामी संघटना आक्रमक

 सांगली जिल्ह्यात काँग्रेस आणि  पुरोगामी संघटना यांच्यावतीने  संभाजी भिडे यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. सांगलीतील स्टेशन चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले.  तसेच महात्मा  गांधीजीच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक देखील यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते यांसह जिल्ह्यातील अनेक पुरोगामी पक्ष आणि संघटना यांनी सहभाग घेतला. 

अहमदनगरमध्ये काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. तर संभाजी भिडे यांच्या फोटोला जोडे मार आंदोनलन करण्यात आले आहे. तर यावर पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार का असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

अमरावतीमध्ये यशोमती ठाकुरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे यशोमती ठाकुर यांनी यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी अल्टिमेट दिला होता. मात्र तरीही त्यांना अटक न केल्याने काँग्रेस झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर र शेकडो कार्यकर्त्यांनी संभीजी भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. 

दरम्यान संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभरात काँग्रसकडून आंदोलनं करण्यात येत असून संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी देखील जोर धरत आहे. त्यामुळे आता संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यांवर कोणती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhagan Bhujbal : भिडेंचा विषय मोदींच्या कानावर घालायला हवा, कारवाई झालीच पाहिजे, मंत्री छगन भुजबळ संतापले  



Source link

Baatein Kuch Ankahee Si: स्टार प्लसवरील म्युझिकल फिक्शन शो ‘बातें कुछ अनकही सी’मध्ये दिसणार मराठमोळी अभिनेत्री

0
Baatein Kuch Ankahee Si: स्टार प्लसवरील म्युझिकल फिक्शन शो ‘बातें कुछ अनकही सी’मध्ये दिसणार मराठमोळी अभिनेत्री


‘बातें कुछ अनकही सी’ चे निर्माते राजन शाही यांची ही आणखी एक प्रगल्भ कथा असून ही एका अनोख्या आवाजाच्या मुलीची कहाणी आहे. अनेक अडथळे पार करत ती संगीत क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते. राजन शाही यांनी स्टार प्लस सोबत अनेक अप्रतिम मालिकांची निर्मिती केली आहे ज्या मध्ये अनुपमा, बिदाई, ये रिश्ते हैं प्यार के, तेरे मेरे शहर, मन की आवाज, प्रतिज्ञा, ये रिश्ता क्या कहलाता है अशा अनेक लोकप्रिय नावांचा समावेश आहे. बातें कुछ अनकही सी सोबत राजन शाही पुन्हा एकदा आणखी एक नवीन रेकॉर्ड तयार करण्यासाठी सज्ज झाले आहेत.



Source link

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने ईशा आणि अनिशची केली कान उघडणी

0
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने ईशा आणि अनिशची केली कान उघडणी


ती म्हणते, “तुम्ही चुकीचा विचार करताय अनिरुद्ध.” तेवढ्यात अप्पा म्हणातात, बास अनिरुद्ध. अरुंधतीला दोष दिल्याशिवाय तुझा एकही दिवस जात नाही. आता या क्षणी आपण या मुलांना समजवणे गरजेचे आहे. आता मालिकेच्या आगामी भागात नेमकं काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. ईशाला तिच्या चुकीची जाणीव होणार का? लग्नानंतर ईशा आणि अनिश कुठे राहणार? आशुतोषही त्यांना घराबाहेर काढणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.



Source link

Marathi Bhasha : ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास नुकसानच होईल’

0
Marathi Bhasha : ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास नुकसानच होईल’


‘अभिजात भाषेची (Classical Language) संकल्पना वेगळी आहे. अस्तंगत झालेल्या व प्राचीन असलेल्या ग्रीक, लॅटिन, संस्कृत सारख्या भाषांचा वारसा जतन करण्यासाठी डॉक्युमेंटेशन करणं ही खरी त्यामागची संकल्पना आहे. त्यामुळं आजच्या भाषांना अभिजात दर्जा देऊन आपण नेमकं काय साध्य करणार आहोत? या भाषांना अस्तंगत करायला आपण निघालो आहोत का? अभिजात दर्जा मिळाल्यानं काही कोटी रुपये आपल्याला मिळतील हे खरं आहे, पण त्याचा फार उपयोग होणार नाही. शेड्युल आठमधील सगळ्याच २२ भाषांना क्लासिकल स्टेटस द्यावा लागेल म्हणून केंद्र सरकारनं काही वर्षांपासून अभिजात भाषेचा दर्जा देणंच बंद केलं आहे. ते योग्यच केलेलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.



Source link

Jaipur Mumbai Express गोळीबारात मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शताब्दी रुग्णालयात : ABP Majha

0
Jaipur Mumbai Express गोळीबारात मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शताब्दी रुग्णालयात : ABP Majha



<p>मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या हवालदारानं गोळीबार केला, यामध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह ३ प्रवाशांचा मृत्यू झालाय. जयपूर एक्सप्रेसच्या एकूण तीन डब्यांमध्ये गोळीबार झाला. B5, S6 आणि पँट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंहनं गोळीबार केला. पहाटे पाच वाजून २३ मिनिटांनी वापी आणि मीरा रोडदरम्यान ही घटना घडली. आरोपी चेतन सिंह सध्या जीआरपीच्या ताब्यात आहे. बोरिवली स्थानकातील आरपीएफ पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू आहे. चारही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस वापी स्थानकाजवळ असताना हवालदार चेतन सिंह आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. यामध्ये चेतनला इतरा राग आला, की त्यानं प्रवाशांवर बंदूक उगारली. हे पाहून आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम मीणा यांनी चेतनला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतन काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता, आणि त्यानं त्याच्या वरिष्ठासह प्रवाशांवरही गोळीबार केला, ज्यामध्ये चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.&nbsp; जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारात मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शताब्दी रुग्णालयात आणण्यात आले आहेत.&nbsp;</p>



Source link

Rocky Aur Rani Ki Prem Kahani:’रॉकी और रानी की प्रेम कहानी’तील या मराठमोळ्या अभिनेत्रीचे होतंय कौतुक

0
Rocky Aur Rani Ki Prem Kahani:’रॉकी और रानी की प्रेम कहानी’तील या मराठमोळ्या अभिनेत्रीचे होतंय कौतुक


या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाल्याबद्दल क्षिती जोग म्हणते, “यापूर्वीही मी हिंदीमध्ये काम केले आहे आणि ते काम मी एन्जॉयही केले आहे. मात्र या चित्रपटात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी विलक्षण आहे. या चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेची इतकी दखल घेतली जात आहे, हे माझ्यासाठी खूप सुखावणारे आहे. मला या चित्रपटात दोन वेगळ्या पिढीतील सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. आपण केलेल्या कामाचे दिग्गजांकडून, चाहत्यांकडून कौतुक होणे, हे एका कलाकारासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मौल्यवान असते. एका कलाकाराला आणखी काय हवे असते. या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. खूप शिकता आले. एकंदरच हा अनुभव माझ्यासाठी कमाल होता.”



Source link