Monday, July 13, 2026
Home Blog Page 2881

Madhurav: मराठी भाषेचा झेंडा फडकणार दिल्लीत!! रंगणार “मधुरव बोरु ते ब्लॉग”चा प्रयोग

0
Madhurav: मराठी भाषेचा झेंडा फडकणार दिल्लीत!! रंगणार “मधुरव बोरु ते ब्लॉग”चा प्रयोग


ज्या मराठीतून आणि ज्या मराठीसाठी आपण भांडलो, लढलो, एकत्र आलो त्या “मराठी” भाषेवरचा हा एकमेव नाट्यप्रयोग! मराठी भाषेतला किंवा मराठी नाट्य क्षेत्रातला हा एक अभिनव प्रयोग इतक्या मर्यादित दृष्टीने या कार्यक्रमाकडे न पाहता, मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा यासाठी मराठीची माहिती, मराठीची महती कळावी आणि मराठी वरचं प्रेम, मराठीचं कौतुक आणि मराठीचा अभिमान लोकांमध्ये जागृत व्हावा यासाठी उचललेले एक पाऊल आहे आणि ते यशस्वी होत आहे हे गेल्या २४ प्रयोगांच्या अनुभवांवरून दिसून येत आहे. अनेक जणांनी मराठी वाचायला, लिहायला, बोलायला सुरूवात केली आहे हा या कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम.



Source link

Tejashree Pradhan: ठरलं! ‘या’ दिवशी येणार तेजश्री प्रधानची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

0
Tejashree Pradhan: ठरलं! ‘या’ दिवशी येणार तेजश्री प्रधानची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला



Tejashree Pradhan Upcoming Serial: ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत काम केल्यानंतर तेजश्री प्रधान आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे सुरु होणार तिची मालिका



Source link

Mohammed Rafi : शम्मी कपूरच्या अटीमुळे एका श्वासात रफींनी गायले होते गाणे

0
Mohammed Rafi : शम्मी कपूरच्या अटीमुळे एका श्वासात रफींनी गायले होते गाणे



Mohammed Rafi Death Anniversary: आज बॉलिवूडचे लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी. आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करणाऱ्या या गायकाच्या अंत्ययात्रेला जनसमुदाय उसळला होता.



Source link

सातारा : भिवडीत रात्रीत 7 घरे फोडली; घरफोड्यांचे सत्र सुरूच | पुढारी

0









[adning id=”1976″]

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्र दुसर्‍या दिवशीही सुरूच राहिले. वाई तालुक्यानंतर चोरट्यांनी आता जावलीकडे मोर्चा वळवला आहे. भिवडी (ता. जावली) येथे एका रात्रीत सात घरफोड्या झाल्या असून सुमारे 70 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. घरातील फर्निचरचीही तोडफोड करण्यात आली आहे.

किसन चव्हाण यांच्या घरातून दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण, सागर साहेबराव भिसे यांच्या घराची कडी काढून चोरट्यांनी सोन्याची 3 ग्रॅमची अंगठी व रोख 1800 रुपये लंपास केले. चोरट्यांनी संपत तरडे यांच्या घरातील फर्निचरची तोडफोड केली आहे. बबन अण्णा चव्हाण, कृष्णराव परशुराम चव्हाण, रविकांत एकनाथ दरेकर, भरत गोपाळ चव्हाण, संपत यशवंत तरडे यांच्या घरातील वस्तूंचीही तोडफोड चोरट्यांनी केली आहे. रात्री बारा ते तीनच्या दरम्यान चोरट्यांनी घरे फोडली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गावात चोरटे घुसल्याचे लक्षात आल्यानंतर सरपंच श्रीकांत निकम यांनी ग्रामपंचायतीवरील भोंगा वाजवला. भोेंग्याच्या आवाजानंतर सर्व गावकरी उठून एकत्र गोळा झाल्याचे दिसताच चोरट्यांनी पलायन केले. मात्र, या प्रकारामुळे गावात भितीचे वातावरण आहे. याबाबतची फिर्याद किसन दत्तात्रय चव्हाण यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली आहे. भिवडी येथे सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने चोरटे पकडणे कुडाळ पोलिसांसमोरचे आव्हान आहे.











Source link

Siddharth Jadhav: प्रथमेश परब आणि सिद्धार्थ जाधव दिसणार एकत्र, लंडनमध्ये चित्रपटाचे शुटिंग

0
Siddharth Jadhav: प्रथमेश परब आणि सिद्धार्थ जाधव दिसणार एकत्र, लंडनमध्ये चित्रपटाचे शुटिंग



Siddharth Jadhav and Prathamesh Parab: प्रथमेश आणि सिद्धार्थ यांच्या ‘सुस्साट’ चित्रपटाच्या कथेतील अनेक विचित्र योगायोग आणि त्यामुळे उडणारी धम्माल आता पडद्यावर पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.



Source link

सातारा : पोलिस.. जबरी चोरी.. अन् प्रकरण मॅनेज.. | पुढारी

0









[adning id=”1976″]

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  वेळ रात्री साडेनऊची… प्रसंग सातारा शहरानजीक कोरेगाव रोड येथील…. एकजण दुचाकीवरून घरी निघाला होता… अचानक कारमधून तिघेजण येतात आणि दुचाकीस्वाराला अडवतात… दुचाकीस्वाराचे अपहरण होते.. महामार्गावरील खिंडवाडी येथील निर्जनस्थळी कार थांबते.. पुन्हा दुचाकीस्वाराला मारहाण करून त्याच्याकडील सोने लुटले जाते. तपासाला सुरुवात होते आणि पोलिसासह तिघेजण सापडतात. मात्र, काही दिवसांतच तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र तयार केले जाते व त्यात संशयितामध्ये तो पोलिस नसल्याचा साक्षात्कार होतो. यातून एकप्रकारे प्रकरणच मॅनेज करण्याचा प्रयत्न समोर आला आहे.

ही घटना दि. 29 मे 2023 रोजी घडली आहे. या प्रकरणातील संशयितांमध्ये अनिल कदम, आकाश गंगावणे, उज्ज्वल कदम यांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद नीलेश संजय लाड (वय 29, रा. कृष्णानगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
नीलेश लाड हे एसटी स्टँन्डवरुन कृष्णानगर येथील घराकडे दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकी रात्री 9.30 वाजता कोरेगाव रोडला आल्यानंतर अचानक कार आडवी मारुन त्यांना थांबवले. कारमधून तिघेजण उतरले व त्यांनी लाथा- बुक्क्यांनी मारहाण करुन कारमध्ये जबरदस्तीने बसवले.

संशयितांनी अपहरण करुन त्यातील एकाने लाड यांची दुचाकी घेतली. लाड यांना खिंडवाडी ता.सातारा गावच्या हद्दीत निर्जनस्थळी नेले. पुन्हा तेथे संशयितांनी मारहाण करुन सोन्याची चेन, घड्याळ काढून घेतले. यानंतर लाड यांना तेथेच सोडून संशयितांनी पलायन केले. लाड यांनी कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन तसेच लाड यांच्याकडून घेतलेले संशयितांचे वर्णन यावरुन तपासाला सुरुवात केली.

पोलिसांचा तपास सुरु असतानाच त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. संशयितांमध्ये एकजण पोलिस असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संशयितांची लगेचच धरपकड करत अटक केली. न्यायालयात संशयितांना हजर केल्यानंतर त्यांना पोलिस कोठडी व पुढे न्यायालयीन कोठडी मिळाली. दुसरीकडे जबरी चोरी प्रकरणात पोलिस असल्याने पोलिसांनी याची माहिती कोणाच्या हाती लागणार नाही याची खबरदारी घेतली. पोलिसांचा तपास सुरु असताना पुन्हा या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला. लाड यांनी प्रतिज्ञापत्रक तयार करुन जबरी चोरी प्रकरणात पोलिस नसल्याचे म्हटले. सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे.

दोषारोपपत्र लवकरच दाखल होणार?

जबरी चोरी प्रकरणात पोलिसाचाच सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस हादरुन गेले. पोलिसांनी तपास करुन याप्रकरणाचे दोषारोपपत्र तयार केले. दोषारोपपत्र छानणीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडेही पाठवले आहे. दोन महिन्यामध्ये पोलिसांनी तपास करुन प्रकरण स्ट्राँग तयार केले आहे. यामुळे दोषारोपपत्राला मान्यता मिळणार का? न्यायालयात ते कधी जाणार? आणखी यामध्ये काही ट्विस्ट निर्माण होणार का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.











Source link

TMKOC: ‘तारक मेहता…’मध्ये दया बेन परतणार? असित मोदींचा मोठा खुलासा

0
TMKOC: ‘तारक मेहता…’मध्ये दया बेन परतणार? असित मोदींचा मोठा खुलासा


छोट्या पडद्यावरची ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या प्रवासात अनेक कलाकारांनी या मालिकेचा निरोप घेतला होता. मात्र, आता प्रेक्षकांची काही आवडती पात्र या मालिकेत परतून येत आहेत. मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रसूती रजेवर गेलेली ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वाकानी मालिकेत परतणार असण्याच्या चर्चांवर निर्माते असित मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

Dharmendra: वयाच्या ८७ व्या वर्षी धर्मेंद्रने दिला किसिंग सीन, म्हणाले ‘सीन शूट करत असताना…’

0
Dharmendra: वयाच्या ८७ व्या वर्षी धर्मेंद्रने दिला किसिंग सीन, म्हणाले ‘सीन शूट करत असताना…’


शबाना यांच्यासोबतच्या किसिंग सीनविषयी बोलताना धर्मेंद्र म्हणाले, “मी ऐकतोय की प्रेक्षकांना हा सीन पाहून धक्का बसलाय, ते हैराण झालेत. पण काही प्रेक्षकांनी सिनेमाचे कौतुकही केले. खरे सांगू तर असे काय बघायला मिळेल, अशी अपेक्षाच प्रेक्षकांना नव्हती. काही वर्षांपूर्वी मी ‘लाइफ इन अ मेट्रो’ या सिनेमात नफिसा अली हिच्यासोबतही किसिंग सीन दिला होता. त्यावेळीही चर्चा झाली होती. तसेच हा सीन सिनेमासाठी महत्त्वाचा असल्याने आम्ही त्यासाठी होकार दिला. आणि तसेही रोमान्स करायला कोणत्याही वयाची मर्यादा नसते. सीन शूट करत असताना मला किंवा शबानालाही अवघडल्यासारखे वाटले नाही.”



Source link

सावधान… पसरणी घाटात टपून बसलाय कडा; दरडी कोसळण्याचा धोका | पुढारी

0









[adning id=”1976″]

वाई; पुढारी वृत्तसेवा :  पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरा पासून ते दत्तमंदिरापर्यंत अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांसह पर्यटकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे ‘महाबळेश्वर-पाचगणीला जाताय… सावधान’ अशी परिस्थिती ओढवली आहे. याप्रश्नी संबंधीत यंत्रणेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वाईपासून पाचगणीपर्यंत 13 किलोमीटरचा प्रवास घाटातूनच करावा लागतो. वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात नेहमीच दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असते. परंतु, संबंधित बांधकाम विभाग अतिशय तत्परतेने दरडी हटवण्याचे काम करत असतात. ही जमेची बाजू असली तरीही दरडी कोसळण्याची वाट पहात बसणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. सध्या जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः लक्ष घालून दरडी कोसळण्याची ज्या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे तेथील दरड काढून घेण्याचा आदेश संबंधित विभागाला दिला आहे. बांधकाम विभागाने पसरणी घाटात पाच ते सहा ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणची दरड काढून घेण्यात येऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे.

तसेच दररोज या घाटातून शाळेला जाणारे विद्यार्थी, चाकरमानी, बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी करणारे व्यापारी यांची संख्या मोठी आहे. त्यांना व प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. धोकादायक दरडींचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. बांधकाम विभागाने त्वरित राज्य शासनाकडे पाठपुरावा करून दरडी हटविण्यासाठी निधीची मान्यता घ्यावी. विलंब न करता धोकादायक दरडी काढून टाकण्याची मागणी जोर धरत आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

पसरणी घाटातील प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. दरडी कोसळण्याची भीती आहे. मात्र, दुर्घटना घडेपर्यंत यंत्रणेने वाट पाहू नये. केवळ निधी नसल्याचे तुणतुणे वाजवण्यापेक्षा ठोस उपाययोजनांसाठी निर्णायक हालचाली करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री तसेच आ. मकरंद पाटील यांनी याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : 

  • पुणे : दहशतवाद्यांनी वापरलेला ड्रोन एटीएसला सापडला
  • 2000 notes back in banking system : २ हजार रुपयांच्या ८० टक्के नोटांची बँकवापसी
  • राहत्या घरात कोब्रा जातीच्या नागाची ५ पिल्ले! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | Cobra Cub 











Source link

Mumbai local : आठवड्याच्या सुरवातीलाच पश्चिम रेल्वे ढेपाळली; तांत्रिक बिघाडामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा

0
Mumbai local : आठवड्याच्या सुरवातीलाच पश्चिम रेल्वे ढेपाळली; तांत्रिक बिघाडामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा


कामाला जाण्यासाठी अनेक नागरिक हे स्थानकावर आले होते. मात्र, रेल्वे उशिरा असल्याने या मार्गावरच्या स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. या बिघाडामुळे अनेक लोकल या हळू हळू पुढे जात होत्या. तर काही गाड्या काही स्थानकावर उभ्या करण्यात आल्या होत्या.



Source link