Monday, July 13, 2026
Home Blog Page 2882

Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, काय असणार शेवट?

0
Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, काय असणार शेवट?


काय पाहायला मिळणार शेवट?

काही महिन्यांपूर्वी मालिकेनं १४ वर्षांचा लीप घेतला होता. दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यामध्ये सारंकाही बदलले होते. सध्या कार्तिक खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आयेशाची एण्ट्री झाली. ती पाहून प्रेक्षकांनी तर संताप व्यक्त केला होता. कार्तिक आणि आयेशा एकत्र येऊन दीपाला त्रात देत होते. पण आयेशाची स्मृती गेल्यानंतर मात्र मालिका पुन्हा रटाळ झाली. आता मालिकेच्या शेवटी मात्र आयेशाची स्मृती परत येणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे. तसेच ती तिने केलेल्या चुका मान्य करणार आहे. नंतर आता मालिकेच्या शेवटी पुन्हा एकदा कार्तिक आणि दीपाचा सुखी संसार प्रेक्षकांना पाहायला मिळणार.



Source link

Mumtaz Birthday: मुमताज आणि शम्मी कपूर यांचा ब्रेकअप का झाला? जाणून घ्या कारण

0
Mumtaz Birthday: मुमताज आणि शम्मी कपूर यांचा ब्रेकअप का झाला? जाणून घ्या कारण


‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाने मुमताज यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. चित्रपटसृष्टीत नावारुपास येत असतानाच या सौंदर्यवतीचं नाव काही सहकलाकरांशी जोडलं गेलं. संजय खान, फिरोज खान, देव आनंद आणि शम्मी कपूर या कलाकारांसोबत मुमताज यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. पण, त्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं ते म्हणजे शम्मी कपूरसोबतच्या बहुचर्चित रिलेशनशिपमुळे.



Source link

Maharashtra Rain Update : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस विश्रांती घेणार : ABP Majha

0
Maharashtra Rain Update : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस विश्रांती घेणार : ABP Majha



<p>पावसाबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासूून आठवडाभर पाऊस रजेवर जाणार असल्याचं भाकित हवामान खात्यानं वर्तवलं आहे. मुंबईसह राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील, मुसळधार पाऊस मात्र पडणार नाही, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मॉन्सूनच्या वाऱ्यांचा पश्चिम -पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. दक्षिण छत्तीसगडावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस रजेवर जाणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं.&nbsp;</p>



Source link

Kiara Advani: कियारा आडवाणीचं खरं नाव माहितेय का? या अभिनेत्याच्या सांगण्यावरुन बदलले नाव

0
Kiara Advani: कियारा आडवाणीचं खरं नाव माहितेय का? या अभिनेत्याच्या सांगण्यावरुन बदलले नाव


एका मुलाखतीत कियाराने सांगितले होते की, ‘अंजाना अंजानी’ या सिनेमात प्रियांया चोप्राच्या भूमिकेचे नाव कियारा आहे. हे नाव कियाराला खूप आवडले होते आणि तिने कियारा हे नाव निवडले. कियाराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आजह तिचे आलिया हे नाव पाहायला मिळते. कियाराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘कियारा आलिया आडवाणी’ असे नाव आहे.



Source link

सातारा : दहशतवाद्यांनी चांदोली धरण परिसराची रेकी केल्याने खळबळ | पुढारी

0









[adning id=”1976″]

शित्तूर वारुण; पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांनी अटक केलेल्या त्या दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूरनजीक महामार्गावर एका गावात दोन दिवस वास्तव्य केल्याचे व त्याचदरम्यान चांदोली धरण परिसराची रेकी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने चांदोली धरण परिसरात खळबळ उडाली आहे.

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियामध्ये रविवारी दिवसभर याच वृत्ताच्या पोस्ट परिसरामध्ये फिरत होत्या. दहशतवाद्यांनी या परिसराची रेकी नेमकी का केली असेल? त्या पाठीमागे दहशतवाद्यांचा काय उद्देश असावा? याबाबतीत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. चांदोली धरण परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. हे धरण महाराष्ट्रातील दोन नंबरचे मातीचे धरण आहे.

पाणी साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी आहे. या धरणामुळेच हा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. या धरणावर दहशतवाद्यांची वाकडी नजर पडली आहे. धरण क्षेत्रात काही घातपात घडवण्याचे जर दहशतवाद्यांचे मनसुबे असतील तर ते वेळीच उधळून लावण्यासाठी या टोळीत सामील असलेल्या सगळ्या दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करावी व कडक कारवाई करण्यात यावी, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

 

  हेही वाचा : 

  • पुणे : दहशतवाद्यांनी वापरलेला ड्रोन एटीएसला सापडला
  • 2000 notes back in banking system : २ हजार रुपयांच्या ८० टक्के नोटांची बँकवापसी
  • राहत्या घरात कोब्रा जातीच्या नागाची ५ पिल्ले! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | Cobra Cub

 











Source link

Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 30 जुलै 2023 : रविवार : ABP Majha

0
Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 30 जुलै 2023 : रविवार : ABP Majha



<p>Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 30 जुलै 2023 : रविवार : ABP Majha</p>



Source link

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 30 जुलै 2023 : ABP Majha

0
TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 30 जुलै 2023 : ABP Majha



<p>TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 30 जुलै 2023 : ABP Majha</p>



Source link

Sharad Pawar : ‘आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल’, शरद पवारांचं सूचक विधान

0
Sharad Pawar : ‘आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल’, शरद पवारांचं सूचक विधान


शरद पवार म्हणाले, राज्य सरकारशी बोलणे सध्या जरा अडचणीचे आहे. पण, त्यातून आज किंवा उद्या काहीतरी मार्ग निघेल. मार्ग निघाला की, राज्य सरकारला मदत करणे भाग पडेल. राजकीय गोष्टींपेक्षा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक अशा सगळ्या संस्था आणि त्यांच्याकडील खजिना जतन केला पाहिजे. त्यासाठी सरकारने या संस्थांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. तसेच, अतिशय चांगला असा हा कार्यक्रम आहे. काही पुस्तक वाचली. काही पुस्तकं चाळली. ही पुस्तकं अभ्यासपूर्ण लिहिली गेलेली आहेत, असे शरद पवार म्हणाले.



Source link

“आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून खासदारकी दिली”; शिरसाटांच्याविधानावर प्रियंका चतुर्वेदी संतापल्या, म्हणाल्या..

0
“आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून खासदारकी दिली”; शिरसाटांच्याविधानावर प्रियंका चतुर्वेदी संतापल्या, म्हणाल्या..


Priyanka Chaturvedi on Sanjay shirsat : मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे?&nbsp;हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय शिरसाट यांच्या विधानावर दिली आहे.



Source link

दुर्दैवी! कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली, दोघांचा मृत्यू, एक बेपत्ता

0
दुर्दैवी! कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली, दोघांचा मृत्यू, एक बेपत्ता


Raigad Mahad News :  पावसाळ्यामध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते. याच निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच कोकणामध्ये दाखल होतात. अशाच वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या पुण्यातील पर्यटकांवर काळाने घाला घातला. भोर-महाड येथील वरंधा घाटात शिरगाव येथे निरा देवघर धरणाच्या पाण्यात पर्यटकांची कार कोसळली. त्यात बुडून एका तरुणासह दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी तर एक जण बेपत्ता आहे.

शनिवारी ही दुर्देवी घटना घडली. मागील काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाळ्यात कोकणातील सौंदर्यात आणखीच  भर पडली. त्याची भुरळ पर्यटकांना पडते आणि अनेक पर्यटक कोकणात दाखल होत असतात. अशाच वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी पुण्यात आयटी कंपनीत काम करणारे चौघेजण शनिवारी सकाळी मारुती बलेनो कारने फिरण्यासाठी भोर-महाड येथील वरंधा घाटात शिरगाव निरा देवघर धरणाच्या परिसरात येत होते.
 
धुके आणि पाऊस असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने वळणावर कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार 200 फूट उंचीवरून धरणाच्या पाण्यात कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात बुडून एका दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. तर एक जण बेपत्ता आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस  आणि स्थानिकांसह बचाव कार्य सुरू केले. 

या अपघातात अक्षय रमेश धाडे (रावेत-पुणे), हर्ष प्रीत हरिसिंग बाबा राहणार (पुणे, मूळ जबलपूर मध्य प्रदेश) ही तरुणी अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. स्वप्निल परशुराम शिंदे (हडपसर-पुणे) हा बेपत्ता आहे. तर त्यांच्यासोबत असलेला संकेत वीरेश जोशी हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत जोशी हे बाणेर येथील एका आयटी कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतात. यापूर्वी संकेत जोशी, अक्षय धाडे आणि स्वप्नील शिंदे यांनी दुसऱ्या कंपनीत एकत्र काम केले होते, तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. मूळची मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी असलेली हर्षप्रीत अक्षय धाडेची मैत्रीण आहे. त्यांनी सहलीला जायचे ठरवले आणि जोशींच्या घरी जमले आणि पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सहलीला निघाले. अक्षय धाडे गाडी चालवत होते. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास भोर महाड महामार्गावर वरवंड येथे वळण घेत असताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि नीरा-देवघर धरणाच्या मागील पाण्यात सुमारे 50 फूट खाली कोसळले. 

अपघातानंतर संकेत जोशी कारमधून बाहेर पडण्यास यशस्वी झाले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी भोर पोलिसांना माहिती दिली. लवकरच, शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि टीमने धाडे आणि हर्षप्रीतचे मृतदेह बाहेर काढले. परंतु शेवटचे वृत्त येईपर्यंत शिंदेचा शोध लागला नाही. शिंदेचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 



Source link