Monday, July 13, 2026
Home Blog Page 2883

पुण्यातील ‘त्या’ दहशतवाद्यांकडे ड्रोनचे चित्रीकरण, अनेक शहरांची रेकी; मुंबईची सुरक्षा वाढवली

0
पुण्यातील ‘त्या’ दहशतवाद्यांकडे ड्रोनचे चित्रीकरण, अनेक शहरांची रेकी; मुंबईची सुरक्षा वाढवली

Mumbai News : पुण्यात पकडलेल्या २ दहशतवाद्यांनी राज्यातील अनेक शहरात रेकी केली होती. ते कोणत्याही हॉटेलमध्ये मुक्काम करण्याऐवजी तंबूत रहात आल्याचे राज्य एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

Source link

‘प्रियांका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून आदित्य ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली’, शिंदे गटातील आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

0
‘प्रियांका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून आदित्य ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली’, शिंदे गटातील आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सडके विचारांचे लोक – आदित्य ठाकरे

संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनीही पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, शिरसाट जे बोलत आहेत, त्यांना त्यांची किंमत कळली आहे. अशा विचारांची लोकं,हे सडक्या विचाराची लोक आहेत. अशा विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे, असा प्रश्न पडतो. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.

Source link

सातारा: खालकरवाडी येथे विजेच्या धक्क्याने तरूण ठार; ३ जण जखमी | पुढारी

0

[adning id=”1976″]

उंब्रज : पुढारी वृत्तसेवा : खालकरवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत देवळपेडा शिवारात विद्युत खांबावर वायर ओढताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले. शनिवारी ही घटना घडली. ऋषिकेश प्रकाश कांबळे (वय २६) (रा. केसे पाडळी, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर संजय रामचंद्र वीर (वय ५१), अमित महादेव कारंडे (वय ३०, दोघे रा. केसे पाडळी, ता. कराड), तन्मय रविंद्र अडकळ (वय २४, रा. अढूळ ता. पाटण) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खालकरवाडीच्या डोंगरात देवळपेडा शिवारात विद्युत खांबावर वायर ओढण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक ऋषिकेश कांबळे याला जोराचा शॉक लागला. यामध्ये तो गंभीररित्या भाजून जखमी झाला. यावेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या अन्य कर्मचा-यांनी गंभीर जखमी कांबळे तसेच अन्य तीन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी ऋषिकेश कांबळे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस नाईक व्ही. डी. डांगरे करत आहेत.

हेही वाचा

Source link

Bhiwandi Eknath Shinde:मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर कामांना वेग,महामार्गावरील खड्डे बुजवण्यास वेग

0
Bhiwandi Eknath Shinde:मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर कामांना वेग,महामार्गावरील खड्डे बुजवण्यास वेग

महामार्गावरील खड्डे बुजवण्यास वेग, मुख्यमंत्री शिंदेंकडून भिवंडीत पाहणी.. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर कामांना वेग

Source link

Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी; कराड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविला | पुढारी

0

[adning id=”1976″]

कराड; पुढारी वृत्तसेवा : ‘गुरुजींना अटक करण्याची भाषा करता तुम्हाला जगायचे आहे का’? अशा धमकीचा ई-मेल माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)  यांना आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून कराड येथील त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नांदेडहून ईमेल आला असल्याचे सांगितले जात असून याबाबत खात्री करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान ज्याने हा मेल केला आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिली.

विधानसभेच्या अधिवेशनामध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)   यांनी भिडे गुरुजींना अटक करा, असे मागणी केली होती. भिडे गुरुजी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी अनुद्गार काढले होते. त्यामुळे त्यांना अटक करावी, अशी मागणी केल्यानंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पृथ्वीराज चव्हाण यांना मेल करून गुरुजींना अटक करा, म्हणून बोलतो काय जिवंत राहायचे आहे का? अशी धमकी देण्यात आली आहे.

रविवारी सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर ईमेल तपासणी करत असताना धमकीचा मेल आला असल्याचे त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना समजले. त्यांनी याबाबतची माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्यानंतर त्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलीस माहिती घेत असून त्यांच्या कराड येथील पाटण कॉलनीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच ई-मेल कोणाच्या मेलवरून आला आहे? ती व्यक्ती कोण आहे? मेल पाठवण्याचा उद्देश काय आहे? कुठून पाठवला आहे? पाठवणारी व्यक्ती ने डुप्लिकेट अकाउंटचा तर वापर केला नाही ना? याची माहिती पोलीस घेत असून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असल्याचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठांशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कार्यालयातून मेल आल्याच्या घटनेला दुजोरा मिळाला. याबाबत पोलीस प्रशासन त्यांचे काम करत आहे.

हेही वाचा

वाशिम: संभाजी भिडे यांच्याविरोधात निदर्शने; कार्यकर्त्यांना अटक

देशाला हुकुमशाहीपासून वाचवणे जनतेच्या हातात : पृथ्वीराज चव्हाण

पुण्यात संभाजी भिडेंविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Source link

Devendra fadnavis: “महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही”, फडणवीसांचा संभाजी भिडेंना इशारा

0
Devendra fadnavis: “महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही”, फडणवीसांचा संभाजी भिडेंना इशारा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला.

Source link

Shirdi Sai Mandir : शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, राज्यभरातून भाविक शिर्डीत दाखल

0
Shirdi Sai Mandir : शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, राज्यभरातून भाविक शिर्डीत दाखल

सध्या पावसामुळं पर्यटन स्थळांवर गर्दी पाहायला मिळते,  पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिकस्थळांवरसुद्धा भाविक गर्दी करू लागलेत. आज सकाळपासूनच शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येतेय.. गर्दीमुळे दर्शनाला जवळपास अडीच ते तीन तास लागत असून भाविकांना रांगांमध्ये तात्कळत उभं राहावं लागतंय.  दर्शन रांगेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी…

Source link

न्यायालयापेक्षा तुम्ही मोठे आहात का? : आमदार शिवेंद्रराजे भोसले | पुढारी

0

[adning id=”1976″]

सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा साताऱ्यात खिंडवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेवर जनावरांचा आठवडी बाजार भरवण्यात आला आहे. याचे उद्घाटन भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.

स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलं  की अडवायचं, काम होऊन द्यायचं नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट पेक्षा तुम्ही मोठे आहात का? देशात लोकशाही आहे. असल्या गोष्टींना कोण भीक घालत नाही. भिडे गुरुजी यांनी केलेले विधान चुकीचे आहे. कोणत्याही महापुरुषांबद्दल विधान करणे चुकीचं आहे. सर्वांनी महापुरुषांबद्दल बोलताना स्वतःला आवरलं पाहिजे असे सांगत भिडे गुरुजींनी केलेल्या विधानावर त्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा :

Source link

Raju Shetti On Maharashtra Government : लोकांच्या समस्या सोडवण्यात सरकार अपयशी – राजू शेट्टी

0
Raju Shetti On Maharashtra Government : लोकांच्या समस्या सोडवण्यात सरकार अपयशी – राजू शेट्टी

लोकांच्या समस्या सोडवण्यात सरकार अपयशी – राजू शेट्टी.. शासन आपल्या दारी कार्यक्रमात घुसण्याचा राजू शेट्टी यांचा इशारा

Source link

Mumbai Weather Update : मुंबईत आज पावसाची स्थिती काय असणार?, पाहा हवामान अंदाज

0
Mumbai Weather Update : मुंबईत आज पावसाची स्थिती काय असणार?, पाहा हवामान अंदाज

मुंबईतील अंधेरी, बोरिवली, वांद्रे, मालाड, शिवाजीनगर, वरळी, कुलाबा आणि गोरेगाव या परिसरात दोन दिवसांपू्र्वीच मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता पुढील २४ तासांत मुंबईसह ठाणे आणि उपनगरांच्या भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय सतत होत असलेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच रुळांवर पाणी साचल्याने अनेक लोकल सेवाही खोळंबली होती.

Source link