Monday, July 13, 2026
Home Blog Page 2884

वडिलांच्या अपघाती निधनानंतर लेकीवरही काळाचा घाला, साताऱ्यातील यवतेश्वर घाटात भीषण अपघात

0


Satara Car Accident : सातारा (Satara) जिल्ह्यातील यवतेश्वर घाटात कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गायत्री आहेरराव (Gayatri Aherrao) वय 21 असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव होते. होंडा सिटी आणि क्रेटा गाडीचा समोरासमोर धडक होवून हा अपघात झाला. दुर्दैवी बाब म्हणजे  काही गायत्रीचे वडील दिपक आहेरराव यांचेही अपघातामध्येच निधन झाले होते.  

सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात शुक्रवारी रात्री हा भीषण अपघात (Accident) झाला. क्रेटा आणि होंडा सिटी कारची समोरासमोर धडक होवून चार ते पाचजण जखमी झाले. तर गायत्री आहेरराव या तरुणीचा मृत्यू झाला. अपघात जखमी झालेल्या सर्वांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी हलवले. 

मागील दीड वर्षापूर्वी गायत्री आहेरराव  ही सातारा नगरपालिकेत सेवेत रुजू झाली होती. मात्र, अचानक तिच्यावर काळानं घाला घातला आहे. दुर्देवी बाब म्हणजे सातारा नगरपालिकेचे कर्मचारी असलेले तिचे वडील दिपक आहेरराव हे देखील काही वर्षांपूर्वी अपघातामध्ये मृत पावले होते. वडिलांनंतर लेकीवरही काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांची भावनिक पोस्ट

दरम्यान, या घटनेनंतर भाजप खासदार छत्रपती उदनयराजे भोसले यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी  गायत्री आहेररावला भावपूर्ण श्रद्धांजली अप्रण केली आहे. यामध्ये त्यांनी आमचे निकटवर्तीय मित्र कै. दीपक आहेरराव यांची सुकन्या कु. गायत्री दिपक आहेरराव हिचा काल दुर्देवी अपघातात मृत्यू झाला. हे समजल्यानंतर मनाला प्रचंड वेदना झाल्याचे म्हटलं आहे. भूतकाळातील अनेक घटना वेगाने तरळून गेल्या. आहेरराव परिवाराशी आमचा अत्यंत घनिष्ट ऋणानुबंध आहेत. कै दीपक यांचेही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते आणि आज परत हा दुःखाचा डोंगर आहेरराव कुटुंबियांवर आला आहे. वहीनी श्रीमती ज्योती आहेरराव यांनी अतिशय कष्टांने आणि जिद्दीने सर्व अडचणींना सामोरे जाऊन मुलांची शिक्षण व सर्व गोष्टींची पूर्तता केली आज त्यांच्यासाठी काय भावना व्यक्त कराव्यात हेच समजत नाही आम्ही निशब्द असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. नुकतीच नगरपरिषदेच्या सेवेत गायत्री रुजू झाली होती, याचे समाधान होते. परंतू, हे समाधान अल्पकालावधीचे ठरले. तिच्या अचानक एक्झीटची सल मनात कायम टोचत राहील. आहेरराव कुटुंबाच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. कुटुंबियांना, मित्रपरिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. गायत्री च्या आत्म्यास चिरशांती लाभो अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Buldhana Accident : मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू; 25 ते 30 प्रवासी जखमी



Source link

Satara Robbery : वाई तालुक्यात एकाच रात्री 24 घरांवर दरोडा, दरोडेखोरांनी लुटले 34 तोळ्यांचे दागिने

0



<p>सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एकाच रात्री तब्बल २४ घरफोड्या झाल्यात. जवळपास ३४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केलीये. या घटनेमुळे सातारा पोलिस चांगलेच खडबडून जागे झालेत. &nbsp;चोरट्यांनी वाई भागातील पसरणी कुसगाव,ओझर्डे, सिध्दनाथवाडी या भागांतील बंद घरं लक्ष केली आणि डाव साधला. या घटनेमुळे सातारा पोलिसांच्या कार्यतत्पर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. &nbsp;चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.&nbsp;</p>



Source link

Pune Water Supply : पुणेकरांना मोठा दिलासा, पुणे शहरातील पाणीकपात अखेर रद्द, पालकमंत्र्यांची घोषणा

0
Pune Water Supply : पुणेकरांना मोठा दिलासा, पुणे शहरातील पाणीकपात अखेर रद्द, पालकमंत्र्यांची घोषणा


पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याचे ३१ ऑगस्टपर्यंत योग्य नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारने पुणे महापालिकेला दिले होते. त्यापूर्वीच जुलै महिन्यात पुणे शहर तसेच उपनगरांच्या भागात जोरदार पाऊस झाल्याने खडकवासला, पानशेत आणि अन्य धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं पाणीकपात रद्द करण्याची मागणी पुणेकरांकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता धरणांतील पाणीसाठा वाढत असल्याने राज्य सरकारने पुण्यातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यात पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



Source link

आगामी निवडणुकीत अजित पवार कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील; बावनकुळेंचं वक्तव्य

0
आगामी निवडणुकीत अजित पवार कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील; बावनकुळेंचं वक्तव्य


Chandrashekhar Bawankule On  Ajit Pawar : शिवसेनेते झालेल्या बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादीत सुद्धा अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदेच्या पाऊलावर पाऊल ठेवत बंडखोरी करत भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप सोबत असून, आगामी निवडणूक देखील तीनही पक्ष एकत्रच लढवणार असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक महत्वाचं वक्तव्य केले आहे. आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (29 जुलै) परभणीच्या पाथरीतील एका सभेत केले असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले आहे. 

भाजपकडून घर चलो अभियान राबवले जात असून, या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी पाथरी शहरात आले होते. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी भेट घेत संवाद साधला. दरम्यान, यावेळी त्यांची सभा देखील झाली. ज्यात त्यांनी पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. ज्यात बोलताना ते म्हणाले की, “बदलत्या राजकीय गणितात आता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीची महायुती आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपणही घड्याळ चिन्हाचा प्रचार करणार आहोत. भाजपला दिलेले मत विकासरुपाने परतफेड करण्याचा भाजपचा संस्कार आहे. तर आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे देखील कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील. मागील नऊ वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकोपयोगी केलेली कामे पाथरी मतदारसंघातील 60 हजार घरांत कार्यकत्यांनी पोहोचवावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

संभाजी भिडे याचं वक्तव्य तपासले पाहिजे…

संभाजी भिडे भाजपाचं पिल्लू असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यांच्या टीकेला बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. “नाना पटोले यांनी जरा अभ्यास करुन बोलले पाहिजे. भिडे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. भारतीय जनता पार्टीचे ते कोणतेही सदस्य नाहीत. तसेच पक्षाच्या कोणत्याही पदावर ते नाहीत. त्यामुळे त्यांचा संबध भाजपसोबत जोडणे योग्य नाही. राहिला विषय भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा, तर अशा वक्तव्याची चौकशी करण्याची जबाबदारी सरकारची असते. त्यामुळे चौकशी करुन त्याबाबत सरकार विचार करेल. तर वादग्रस्त टिप्पणी करायला नको हवी, जर अशी वादग्रस्त टिपणी केली असेल तर योग्य कारवाई झाली पाहिजे. किंवा या वक्तव्यात काय चुकीचे आहे हे तपासले पाहिजे” असे बावनकुळे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Parbhani : मुख्यमंत्री शिंदेंचा तानाजी सावंतांना मोठा धक्का; ‘त्या’ 150 कोटींच्या कामांना दिली स्थगिती



Source link

लोक – प्रशासन: कामाचा सोयीस्कर वेग

0
लोक – प्रशासन: कामाचा सोयीस्कर वेग


शेखर गायकवाड3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रशासनात सर्वसाधारणपणे सोयीचे, वशिल्याचे काम झटपट, तर सर्वसामान्यांचे काम उशिराने होते. ‘काही माणसे समान असतात, तर काही जरा जास्त समान असतात,’ या जगप्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या वचनाचा प्रत्यय इथे पदोपदी येतो. आपल्या फायद्याच्या, निवडक अशा गोष्टींसाठीच स्वीकारल्या जाणाऱ्या अशा सोयिस्कर वेगामुळे काळ – काम – वेगाची शाळेत शिकलेली सगळी गणिते व्यवहारामध्ये मात्र उलटीसुलटी झाल्याचा अनुभव येऊ लागतो!

सर्वसाधारणपणे कामाच्या दिवशी कधी सायंकाळी पाच वाजता तर सोडाच, पण कार्यालयीन वेळेतही राज्याच्या दुर्गम भागातील शासकीय कार्यालयात कोणीही फोन उचलत नाही. परंतु, चुकून शासनाने पाच टक्के महागाई भत्ता वाढवण्याचे आदेश सायंकाळी साडेसहा वाजता मंत्रालयातून काढले, तर कार्यालयीन वेळेनंतर सुद्धा गडचिरोली, सिरोंचा, राधानगरी, मेळघाटातील धारणी अशा अतिशय दुर्गम भागातही त्याची प्रत वायुवेगानं पोहचते आणि रात्री नऊपर्यंत ट्रेझरीत बिलसुद्धा दाखल होते! पण, ‘दुष्काळी कामासाठी किंवा नैसर्गिक आपत्तीसाठी, मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार कपात करावा,’ असे आदेश शासनाने काढल्यास हे आदेश सहा महिन्यानंतरही अशा भागात पोहचत नाहीत! मूळ प्रत मिळाली नाही, शाईच्या सहीची प्रत मिळाली नाही, अशा सबबी सांगून अशी बिलं ट्रेझरीत टाकली जात नाहीत.

बऱ्याच वेळा साहेबांचं काम अर्ध्या तासात, तर सहकाऱ्यांचं काम आठ दिवसांत पण होत नाही. शासनात असलेल्या या सोयीच्या अतिवेगाचा किंवा गैरसोयींच्या वेगाचा मिनिटा-मिनिटाला प्रत्यय येतो. दौऱ्यावर जाताना ड्रायव्हर गाडी हळू चालवतो आणि मुख्यालयात परतताना जोरात! कडक साहेबाला भेटायला जाताना स्टाफचा स्पीड कमी आणि बाहेर पडल्यावर जास्त!! सोयीच्या ठिकाणी बदली झाल्यावर रुजू होण्याचा कालावधी कमी म्हणजे काही तासांचा आणि गैरसोयीच्या ठिकाणी बदली झाल्यावर जास्त म्हणजे पूर्ण सात दिवसांचा असतो! या ट्रांझिट पिरीयडमध्ये सारी वैयक्तिक आणि कौटुंबिक कामं निवांतपणे उरकून हा काळ सत्कारणी लावला जातो.

साखर कारखान्यांना अनुदान, सूत गिरणीसाठी अनुदान, शाळेसाठी जागा, आश्रमशाळेसाठी शासकीय जागा मिळवण्यासाठीचे प्रस्ताव अर्ज केल्यावर ज्या वेगाने तालुका पातळीवरुन राज्य पातळीवर पोहोचतात, त्याचा वेग एखाद्या पॉवरफुल्ल नेत्याच्या पदाशी सुसंगत असतो. त्याविरुध्द प्रकरण नाकारण्याचा वेग हा ‘सामान्य ’ नागरिक असण्याशी सुसंगत असतो. कधी कधी कामाच्या स्वरुपावरही वेग अवलंबून असतो. एखाद्या कर्मचाऱ्याने फार चांगले काम केले आणि साहेबांनी जर त्याला प्रशस्तिपत्र देण्यास सांगितले, तर कार्यालयीन अधीक्षक लगेच होय म्हणतो, परंतु, पाच-दहा वेळा साहेबांनी सांगितले, तरी प्रशस्तिपत्राचा ड्राफ्ट काही लिहून त्यांच्याकडे पाठवत नाही! कार्यालयातील कोणत्या कर्मचाऱ्याला चांगले म्हणायचे, या पेटंटवर जणू अधीक्षकाचा हक्क असतो. एखाद्या कंत्राटदाराकडून काम करुन घेताना स्पीड जास्त आणि त्याचे बिल मंजूर करताना स्पीड कमी होतो! दुसऱ्या कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करताना स्पीड जास्त आणि हजर करुन घेताना तो कमी असतो! वशिल्याच्या व्यक्तीची नेमणूक होताना स्पीड जास्त, तर त्याला नोकरीतून काढतानाची प्रक्रिया अतिशय हळू असू शकते. ॲडव्हान्स मंजूर करताना स्पीड कमी आणि वसूल करताना जास्त असतो. विभागीय चौकशी सुरू करताना अतिशय संथ गतीने, तर ती बंद करताना घाईघाईने निर्णय होतो. स्पर्धा घेताना घाई, तर पारितोषिक वितरण कार्यक्रम उशिराने होतो. नवीन रस्ता तयार करताना कामाची घाई असते; परंतु भूसंपादन मोबदला शेतकऱ्यांना विलंबाने मिळतो. परीक्षा लवकर येते आणि निकाल उशिरा. शेताची मोजणी लवकर आणि हद्दी दाखवायला विलंब. विहीर लवकर खांदून होते आणि वीज कनेक्शन उशिरा! धरणातील उजव्या कॅनालमधून जास्त वेगाने पाणी वाहते की डाव्या कॅनालमधून, हे पाटबंधारे अभियंते हिशेब करुन सांगू शकत असले, तरी प्रत्यक्षात मात्र पॉवरफुल्ल पुढाऱ्याची जमीन धरणापासून किती अंतरावर आहे, त्यावर पाण्याचा वेग ठरू शकतो, हे अनुभवाने अनेकांना माहीत असते.

पोलिस विभागात गैरसोयीच्या ठिकाणी बदली झाल्यावर काही अधिकारी नव्या पदावर रुजूच होत नाहीत. त्याला ते ‘सिकमध्ये’ आहे, असे म्हणतात. त्याचा अर्थ ‘कागदोपत्री आजारी’ असा आहे. विशेष म्हणजे, आजारी असतानाच ते बदली रद्द करण्यासाठी हेलपाटे मारीत असतात. त्यावेळचा आजारी असतानाचा त्यांचा चपळपणा वाखाणण्यासारखा असतो! आजारी असताना असलेला अंगातील हा चपळपणा आणि बदली इच्छित ठिकाणी करताना केलेली धडपड, पळापळ ही भल्याभल्या पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल ऑफिसरच्या डिग्री व ज्ञानाला मोठे आव्हान वाटावे! विशेष म्हणजे, अशा चपळ अधिकाऱ्याचे ‘गुण’ हेरणारे वरिष्ठही त्याला जागोजागी भेटतात. एकूणच, प्रशासनात सर्वसाधारणपणे सोयीचे, वशिल्याचे काम झटपट, तर सर्वसामान्यांचे काम उशिराने होते. ‘काही माणसे समान असतात, तर काही जरा जास्त समान असतात,’ या जगप्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑर्वेल यांच्या वचनाचा प्रत्यय इथे पदोपदी येतो. आपल्या फायद्याच्या, निवडक अशा गोष्टींसाठीच स्वीकारल्या जाणाऱ्या अशा सोयिस्कर वेगामुळे काळ – काम – वेगाची शाळेत शिकलेली सगळी गणिते व्यवहारामध्ये मात्र उलटीसुलटी झाल्याचा अनुभव येऊ लागतो!

shekharsatbara@gmail.com



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: संजय दत्त : सुनील दत्त – नर्गिस यांनी नावासाठी दिली होती जाहिरात

0
माझ्या हिश्श्याचे किस्से: संजय दत्त : सुनील दत्त – नर्गिस यांनी नावासाठी दिली होती जाहिरात


  • Marathi News
  • Opinion
  • Rumi Jaffrey Article On Sunil Dutt Nargis Gave The Advertisement For The Name Sanjay Dutt

रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

वडील सुनील दत्त आणि आई नर्गिस यांच्यासह संजय दत्त. हा फोटो काही वर्षांपूर्वी संजय दत्तनेच गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. 

साधारण अर्ध्या-पाऊण तासानंतर त्या व्यक्तीच्या मोबाइलवर एक मेसेज आला. तिने तो वाचला. एकाएकी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विचित्र भाव उमटले आणि तिने ‘ओह शिट!’ असे उद्गार काढले. आम्ही सगळ्यांनी एकदमच ‘काय झालं?’ असं विचारलं. त्या व्यक्तीने संजूकडे बघितलं आणि म्हणाला, “बॉस, फाइव्ह ईयर, पांच साल..’ मी त्या स्थितीचे, त्यावेळच्या भावनेचे वर्णन करू शकत नाही.

आज मी माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये संजय दत्तबद्दल सांगणार आहे. काल संजूचा वाढदिवस होता. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आमचे नाते जवळपास ३४ वर्षे जुने आहे आणि तो फक्त माझा मित्रच नाही, तर अगदी भावासारखा आहे. तो नेहमी सर्वांसाठी उभा राहतो. संपूर्ण इंडस्ट्रीला माहीत आहे की, कुणाची कसलीही अडचण असो; संजू आणि सलमान हे दोघेच असे आहेत, जे प्रत्येकाच्या मदतीसाठी सदैव तयार असतात. संजूने बहुतांश चित्रपट मित्रांसाठी, गरजूंसाठी केले. पैसे मिळाले की नाही मिळाले, अर्धे मिळाले वा पूर्ण मिळाले, तरी त्याने कधीही कोणा निर्मात्याला त्रास दिला नाही.

मला आठवतंय, ही बहुधा २० मार्च २०१३ ची ही गोष्ट असावी. उद्या सकाळी सुप्रीम कोर्ट संजय दत्तचा निकाल जाहीर करणार, अशी त्या दिवशी ब्रेकिंग न्यूज सुरू होती. रात्री मला संजूचा फोन आला आणि म्हणाला की, हुजूर उद्या सकाळी १० ला घरी या, निकाल लागणार आहे. मी आणि संजू एकमेकांना ‘हुजूर” म्हणतो. संजय दत्तच्या आवाजात मला ती अस्वस्थता, तो त्रास स्पष्टपणे जाणवत होता. त्याने ती रात्र कशी घालवली असेल, हे मी समजू शकतो. कारण त्या रात्री मीसुद्धा खूप अस्वस्थ होतो. सकाळी दहा-सव्वादहाच्या सुमारास मी संजय दत्तच्या घरी पोहोचलो. सगळ्या गल्लीत गर्दी होती. मीडियाचे लोक उभे होते. पण घरात मात्र अगदी शांतता पसरली होती. संजूने सर्वांना तिथं येण्यास मज्जाव केला होता. घरात एक गोल डायनिंग टेबल होता, तिथे एका खुर्चीवर संजू बसला. मान्यता उजवीकडे आणि मी डावीकडे बसलो. मी संजूचा हात हातात घेऊन बसलो होतो. आमचा आणखी एक मित्र बिट्टूही तिथं बसला होता आणि आणखी एक व्यक्ती बसली होती, तिचे नाव मला माहीत नाही. या व्यक्तीला कोर्टातून सतत मेसेज येत होते. सर्वांचे मोबाइल आणि टीव्हीही बंद होता. वातावरणात एक विचित्र शांतता दाटली होती. जिला वादळापूर्वीची शांतता म्हणतात, अगदी तशीच. जसा त्या व्यक्तीला मेसेज यायचा तसे सगळे चमकून त्यांना विचारायचे, ‘काय झाले?’ ती व्यक्ती म्हणायची, ‘नथिंग..’ साधारण अर्ध्या-पाऊण तासानंतर त्या व्यक्तीच्या मोबाइलवर एक मेसेज आला. तिने तो वाचला. एकाएकी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विचित्र भाव उमटले आणि तिने ‘ओह शिट!’ असे उद्गार काढले. आम्ही सगळ्यांनी एकदमच ‘काय झालं?’ असं विचारलं. त्या व्यक्तीने संजूकडे बघितलं आणि म्हणाला, “बॉस, फाइव्ह ईयर, पांच साल..’ मी त्या स्थितीचे, त्यावेळच्या भावनेचे वर्णन करू शकत नाही. मान्यताच्या डोळ्यांत पाणी तरळले होते. माझेही डोळे आेले झाले. आमच्यात बहादूर तर संजू होता. त्याने मला आणि मान्यताला मिठी मारली, जसे काय तोच आम्हाला धीर देतोय. कुणी काहीच बोलत नव्हते. फक्त शांतताच बोलत होती. तेवढ्यात शारान आणि इकरा ही दोन्ही मुलं आली नि संजूचे पाय धरू लागली, इकडे तिकडे धावू लागली. आपल्या घरात नेमकं काय झालंय, त्यांच्या वडिलांसोबत काय झालंय, हे या मुलांना माहीतही नाही, या विचारानेच माझे हृदय विदीर्ण होत होते.

एवढ्यात तिथं सलमान आणि संजूचा खास मित्र असलेला नदीम डबडबलेल्या डोळ्यांनी आला. मग हळूहळू इतर लोकही यायला लागले आणि संजूला धीर देऊ लागले की, काळजी करू नकोस, आपण अजूनही रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकतो.. संजूने त्याच्या वकिलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन लागत नव्हता. संजू मला म्हणाला, ‘हुजूर, कपिल सिब्बल यांना फोन लाव..’ मी कपिल सिब्बलजींना फोन केला, पण त्यांनी उचलला नाही. दहा मिनिटांत त्यांचा कॉल आला आणि ते म्हणाले, ‘हं, रूमी बोल..’ मी म्हणालो की, आपण अजूनही आपण रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकतो, असं काही जण म्हणताहेत..’ सिब्बल साहेब म्हणाले, ‘जो कुणी असं म्हणतो आहे, तो केवळ खोटा दिलासा देतो आहे..’ मला वाटले, संजूने पाच वर्षांची शिक्षा झाल्याची बातमी ऐकली आणि सहनही केली. पण, रिव्ह्यू पिटिशनही दाखल करता येणार नाही, हे एेकून तो कोलमडेल. म्हणून मी सिब्बलजींना म्हणालो की, हे संजूला जाऊन सांगण्याची माझी हिंमत नाही, कृपया तुम्हीच बोला.. मी फोन घेऊन संजूकडे गेलो आणि म्हणालो, ‘हे कपिल सिब्बल साहेब आहेत, त्यांच्याशी बोल..’ तेव्हा सिब्बल साहेबांनीच संजूला, ‘तुला तुरुंगात जावे लागेल,’ असे सांगितले.

असो. लोक येत-जात राहिले, रिव्ह्यू पिटिशनही फेटाळली गेली आणि संजूला तुरूंगात जावं लागलं. नंतर शिक्षा भोगून तो बाहेर आला, हे आपल्याला माहीत आहेच. आयुष्यात इतके काही घडून गेले तरी तो हसत राहिला. तो अभिनयही करायचा, विनोदही करायचा, व्यायामही करायचा. त्याच्या या गोष्टींमुळेच मी त्याचा फॅन झालो. कोणत्याही माणसाच्या बाबतीत असं घडलं असतं, तर तो हसणं, काम करणं, शरीरयष्टी बनवणं विसरला असता. पण, प्रत्येक संकटाशी दोन हात करुन पुन्हा कसं उभं राहिलं पाहिजे, याची प्रेरणा संजय दत्तकडून मिळते.

संजय दत्तच्या वाढदिवसापासून आपली चर्चा सुरू झाली होती, म्हणून मी तुम्हाला त्याच्या वाढदिवसाचा एक रंजक किस्सा सांगतो. २९ जुलै १९५९ ला संजय दत्तचा जन्म झाला, तेव्हा सुनील दत्त आणि नर्गिसजी यांनी त्या काळातील सर्वांत प्रसिद्ध चित्रपट मासिक “शमा” आणि ‘सुषमा’मध्ये एक जाहिरात दिली होती की, आम्हाला आमच्या मुलाचे नाव आमचे चाहते आणि हितचिंतकांना विचारून ठेवायचे आहे. या प्रकारे सर्वांकडून नावे मागवण्यात आली आणि देशभरातून सुमारे १५ हजारांहून अधिक नावे आली. ‘शमा’ आणि ‘सुषमा’ यांच्या टीमने त्यातून खास नावे निवडली आणि ते दत्त साहेब – नर्गिसजींकडे आले. त्यांनी ती नावे वाचून दाखवली. त्या नावांमध्ये; अनिल, संजय, रोहित कुमार अशी अनेक नावे होती. पण, त्यातून सुनील साहेब आणि नर्गिसजींना आवडलेले नाव होते – संजय. हे नाव ‘पुष्पा अग्रवाल, द्वारा राजनारायण वकील, गोलसराय कोठी, जलेनगंज, आग्रा’ या पत्त्यावरून आले होते. मग हेच नाव निवडले गेले. नंतर नर्गिसजींनी संजूच्या फोटोसह स्वत: लिहिलेले पत्र पुष्पा अग्रवाल यांना पाठवले. तर संजय हे नाव पुष्पा अग्रवाल यांनी ठेवले आहे आणि मला वाटते, एखाद्या स्टारने आपल्या मुलाचे नाव आपल्या चाहत्यांना विचारून ठेवल्याची ही पहिलीच घटना असावी. ही सारी नावे घेऊन आले होते, त्यांचे नाव युसूफ देहलवी. ते या मासिकांचे संपादक होते. नामकरणाचा हा सारा किस्सा १९६० मध्ये ‘शमा’ आणि ‘सुषमा’च्या अंकांत प्रकाशितही झाला होता. संजूच्या या किश्श्यानंतर मला वडील कौसर सिद्दिकी यांनी लिहिलेला एक शेर आठवतो… महफ़िल में जलाते हैं दीया दूसरे लोग, लेते हैं उजाले का मज़ा दूसरे लोग। मुजरिम कभी पकड़े नहीं जाते लेकिन, पाते हैं अदालत से सज़ा दूसरे लोग। यासोबतच संजूच्या ‘रॉकी’ या पहिल्या चित्रपटातील हे गाणे ऐका… क्या यही प्यार हैं.. हां, यही प्यार हैं… स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

रसिक स्पेशल: सम्यक सामर्थ्याला धक्का

0
रसिक स्पेशल: सम्यक सामर्थ्याला धक्का


डॉ. रोहन चौधरी9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मणिपूरमधील घटनेने भारताच्या ‘सम्यक शक्ती’वरच आघात झाला आहे. केंद्रातील सत्ताधारी मणिपूर प्रकरणात बचावात्मक भूमिकेत असताना, अमेरिका आणि युरोपियन देशांनी मात्र तिथल्या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा विरोधाभास भारताच्या जागतिक प्रभावासाठी नक्कीच भूषणावह नाही. भारताच्या सम्यक शक्तीचा प्रभाव देशाच्या अंतर्गत समाजकारण- राजकारणावर आधारित आहे, तो कुठल्या जागतिक पुरस्कारावरुन ठरत नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.

वर्तमान जागतिक राजकारणातील “सामर्थ्य’ म्हणजे नेमके काय? लष्करी किंवा आर्थिक सामर्थ्यापेक्षा देशाची राजकीय संस्कृती, मानवी मूल्ये आणि सर्वसमावेशक धोरणांतून निर्माण होणाऱ्या सुप्त आकर्षणाला ‘सामर्थ्य’ असे म्हणतात. प्रख्यात अमेरिकन विचारवंत जोसेफ नाइ यांनी जागतिक राजकारणात ‘सॉफ्ट पॉवर’ची अर्थात सम्यक सामर्थ्याची ही संकल्पना मांडली. नाइ यांच्या मते, अमेरिकेने आपल्या सम्यक सामर्थ्याच्या बळावरच जगावर अधिपत्य गाजवले आहे. या संकल्पनेने जागतिक राजकारणात इतका आमूलाग्र बदल झाला की, भारतासारखे देश लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या तुलनेने कमी सामर्थ्यवान असूनही जागतिक राजकारणात प्रभावशाली गणले जाऊ लागले. भारतीय लोकशाही, विविधतेतील एकता, युद्धाऐवजी बुद्धाला दिलेले महत्त्व, रक्तरंजित क्रांतीपेक्षा हरितक्रांतीला दिलेले प्राधान्य, गांधींच्या अहिंसेच्या प्रयोगाचे आजही जगभर असणारे आकर्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सामाजिक न्यायाचा केलेला प्रयोग यांमुळे जगात भारताविषयी आजही आकर्षण आहे. परंतु, हिंसाग्रस्त मणिपूरमधील दोन महिलांची जमावाने विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रसारित झालेल्या चित्रफितीने भारतीयांनाच आपल्या या सम्यक सामर्थ्याची जाणीव आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मणिपूरमध्ये जे झाले त्यावरून हा निष्कर्ष काढणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणे, अशी टीका होऊ शकते. भारताची प्रतिमा मलीन करण्यामागे विदेशी शक्तींचा हात आहे, असा आरोप देखील होऊ शकतो. तसेच ही भारताची अंतर्गत बाब आहे, अशी काहींची भावनाही असू शकते. परंतु, मन हेलावून टाकणारी ही घटना भारतात घडली आहे, हे वास्तव कसे नाकारणार? जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि समाज माध्यमांचा प्रभाव यांमुळे सरहद्दीच्या भिंती कोसळून पडल्या आहेत. अवघे जग एक कुटुंब झाले आहे. त्यामुळे हा नारा फक्त ‘जी-२०’च्या जाहिरातींवर लावण्यासाठी नाही, तर तो प्रत्यक्ष जगण्यासाठी आहे, याची जाणीव भारत ही जगातील महत्त्वाची शक्ती आहे, असा प्रचार करणाऱ्यांना असलीच पाहिजे.

मणिपूर प्रकरणात भारतातील राजकीय व्यवस्थेचे तर अक्षरशः धिंडवडे निघत होतेच, परंतु या चित्रफितीमुळे भारताने जगाला दिलेल्या मानवी मूल्यांच्या सोनेरी पानावर अहंकाराच्या, वासनेच्या, विकारांच्या आणि वेदनेच्या छटा उमटल्या आहेत. राजकारणासाठी स्त्रियांचा इतका घृणास्पद वापर स्वातंत्र्योत्तर इतिहासात कदाचित पहिल्यांदाच भारताने अनुभवला असेल. ही इतकी क्रूरता विश्वगुरु होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात का निर्माण झाली असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. २०२४ नंतर भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईलही कदाचित, परंतु भारतीय समाजाच्या अव्यवस्थेचे जे दर्शन जगाला होत आहे, त्याला जबाबदार कोण? नाइ हे ‘सॉफ्ट पॉवर’ या संकल्पनेचे प्रवर्तक असले, तरी बारकाईने निरीक्षण केल्यास भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात याचे प्रतिबिंब आढळून येते. आधी सामाजिक सुधारणा आणि नंतर राजकीय सुधारणा असा आग्रह धरणाऱ्या नेमस्तांचा दृष्टिकोन देखील सामान्य भारतीयांमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही राजकीय मूल्ये बिंबवण्याचा होता. एकदा ही मूल्ये आत्मसात झाली की, राजकीय स्वातंत्र्य उपभोगण्यास समाजमन जास्त सक्षम होईल, अशी त्यांची भावना होती. संविधानाची निर्मिती हा या सम्यक सामर्थ्याचा सर्वोच्च आविष्कार होता. लोकशाही ही निव्वळ शासनप्रणाली नसून ती एक जीवनपद्धती आहे, असे जेव्हा म. गांधी म्हणत तेव्हा त्यांना देखील लोकशाहीवादी अहिंसक समाज अपेक्षित होता. डॉ. आंबेडकरांची सामाजिक न्यायाची संकल्पना ही या सम्यक मूल्यांवरच आधारित होती. पं. नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकाचा हेतू अथवा भारताच्या प्रजासत्ताक दिनी इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावणे यांचा हेतूच मुळी भारताच्या सम्यक सामर्थ्याचे दर्शन जगाला करून देणे हा होता.

आपल्या या सम्यक सामर्थ्याचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न भारताने केला. १९१९ मध्ये पॅरिस शांतता परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचे जागतिक राजकारणातील महत्त्व ठासून सांगण्याचे काम लो. टिळक आणि म. गांधी यांनी केले होते. साम्राज्यवादाला विरोध करण्यासाठी १९२७ मध्ये पं. नेहरू स्वतः ‘काँग्रेस ऑफ ओप्रेस्ड् नॅशनॅलिटीज’मध्ये सहभागी झाले होते. लीग ऑफ नेशनचा आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य म्हणूनही भारत सहभागी झाला होता. पं. नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनावरून १९३८ मध्ये चीन-जपान युद्धात द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये बजावलेली वैद्यकीय सेवा ही भारत-चीन यांच्या दीर्घकालीन शत्रुत्वातही मायेची फुंकर घालत आहे. म. गांधींच्या अहिंसेने मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा यांना कसे प्रभावित केले, हे खुद्द या नेत्यांनीच कथन केले. आफ्रिकेतील वर्णद्वेषीविरोधी संघर्षात भारताने घेतलेली भूमिका, दहशतवादाच्या भीषण अनुभवानंतरही कसाबसारख्या दहशतवाद्याला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे दिलेली शिक्षा, कोणत्याही औपचारिक संस्थेत सहभागी न होता आण्विक शस्त्राचा शांततेसाठी केलेला वापर, संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेमध्ये दिलेले अमूल्य योगदान यांमुळे आज भारताचा झेंडा जगभरात डौलाने फडकत आहे.

मणिपूरमधील घटनेने भारताच्या या सम्यक शक्तीवरच आघात झाला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देश सन्मान देऊन गौरवत आहेत, तर दुसरीकडे भारतातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात, अल्पसंख्याकांचे हक्क आणि मानवी अधिकारांच्या रक्षणासाठी पंतप्रधानांच्या उपस्थितीतच जागतिक समुदाय रस्त्यावर उतरत आहे. केंद्रातील सत्ताधारी मणिपूर प्रकरणात बचावात्मक भूमिकेत असताना, अमेरिका आणि युरोपियन देशांनी मात्र तिथल्या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा विरोधाभास भारताच्या जागतिक प्रभावासाठी नक्कीच भूषणावह नाही. भारताच्या सम्यक शक्तीचा प्रभाव देशाच्या अंतर्गत समाजकारण- राजकारणावर आधारित आहे, तो कुठल्या जागतिक पुरस्कारावरुन ठरत नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.

मणिपूरची घटना फक्त हिमनगाचे टोक असून, भारतातील खेड्यापाड्यात हिंसेची शिकार होणाऱ्या महिलांचे प्रमाण कल्पनेपलीकडचे आहे. कामाच्या ठिकाणी, घरगुती हिंसेचे प्रमाणही तितकेच चिंताजनक आहे. या वर्गाला केवळ प्रवासात सूट देऊन आपण त्यांना ‘मानवी’ विकासाच्या परिघात आणत आहोत, अशी इथल्या राज्यकर्त्यांची भावना असेल, तर ती त्यांना लखलाभ! भारताच्या लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण ४८ टक्के आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येला आपण सामाजिक न्यायाच्या आणि स्वातंत्र्याच्या परिघाबाहेर ठेवणार असू, आपल्या बहुसंख्याक राजकारणात त्यांचा बळी घेणार असू, तर जागतिक राजकारणात आपण कोणाच्या जिवावर नेतृत्व करणार आहोत? इथली राजकीय व्यवस्था, सामाजिक प्रक्रिया आणि आर्थिक संरचना आपल्याला न्याय देत नाही, अशी भावना या वर्गाची झाली तर त्याची जबाबदारी कोणाची असेल?

मणिपूरसारख्या घटना या समाजातील अशा भावनेला बळकटी देत असतात. या वास्तवाबद्दल मौन धारण करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आजच्या पिढीने गंभीरपणे आपल्या राजकीय वर्तणुकीचे अवलोकन न केल्यास जागतिक राजकारणात नेतृत्व करण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहील. नेतृत्वाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि मणिपूरच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी झोपलेल्यांना तर जागे करावेच लागेल; परंतु झोपेचे सोंग घेतलेल्यांना गदागदा हलवावे लागेल.

संपर्क : 9922989006

rohanvyankatesh@gmail.com



Source link

Sonu Nigam Birthday: कधीकाळी वडिलांसोबत लग्नात गाणी गायचा सोनू निगम! आता संपत्ती ऐकून व्हाल हैराण!

0
Sonu Nigam Birthday: कधीकाळी वडिलांसोबत लग्नात गाणी गायचा सोनू निगम! आता संपत्ती ऐकून व्हाल हैराण!


Happy Birthday Sonu Nigam: अवघ्या चौथ्या वर्षी सोनू निगमने वडील आगम निगम यांच्यासोबत स्टेज शो, पार्ट्या आणि फंक्शन्समध्ये गाणे गायला सुरुवात केली होती.



Source link

संपूर्ण विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’

0
संपूर्ण विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’


Maharashtra Rain : राज्याच्या बहुतांश भागात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होताना दिसत आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर कुठं शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसलाय. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भासह कोकणातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.   

रायगडसह रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट 

आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशाशनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जरी चांगला पाऊस झाला असला तरी काही जिल्ह्यात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे.  दरम्यान, काही भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राज्यातील कोकणसह विर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं. तिथे शेती पिकांना मोठा फटका बसलाय. तसेच चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात देखील चांगला पाऊस झाला आहे. 

पालघर जिल्ह्यात  नद्यांना पूर 

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी क्षमता ही पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ, देहरजे त्याचप्रमाणे इतर छोट्या मोठ्या नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. तर ह्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील पालघरसह, जव्हार, डहाणू, विक्रमगड, तलासरी या भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. या भागात पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

बीडमध्ये पावसाची प्रतीक्षा

अर्धा पावसाळा संपला तरी देखील बीड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळं जिल्ह्यातील 143 प्रकल्पापैकी 36 प्रकल्प कोरडे पडले असून 63 प्रकल्पातील पाणी जोत्याखाली आले आहे. जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये फक्त 13 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन प्रकल्पांमध्ये म्हणजेच माजलगाव धरणात फक्त 16 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला असून, बिंदुसरा प्रकल्पामध्ये देखील 23 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळं बीड जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी आता मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Palghar Rain : पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा! भातशेतीसह बागायती शेती आणि घरांचंही नुकसान



Source link

Nashik Video : अंजनेरीवर पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस; हनुमान मंदिरासमोरच तरुणाईचा ‘धांगडधिंगा’

0
Nashik Video : अंजनेरीवर पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस; हनुमान मंदिरासमोरच तरुणाईचा ‘धांगडधिंगा’


Nashik Anjneri : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर परिसराला निसर्गाचे कोंदण लाभलं असून सध्या मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्र्यंबकेश्वरसह पहिने अंजनेरी गडावर भाविकांसह पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळते आहे. मात्र दुसरीकडे पर्यटनाच्या नावाखाली गडाचे पावित्र्य न राखता त्या ठिकाणी हुल्लडबाजी करून धुडगूस घातला जात आहे. थेट हनुमान मंदिराच्या (Hanuman Mandir) समोरच तरुणाईचा धांगडधिंगा पाहायला मिळत आहे. 

नाशिकपासून (Nashik) अवघ्या काही अंतरावर असलेल्या अंजनेरीसह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसर हिरवाईने नटला असून पर्यटकांची पावले नाशिकचे कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकच्या दिशेने वळू लागली आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तसेच आजूबाजूचा परिसर पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. येथील अंजनेरीसह ब्रम्हगिरीच्या डोंगर कड्यांनी हिरवा शालू पांघरल्याचे चित्र दिसून येत आहे. चहुबाजूंनी वेढलेल्या सह्याद्री पर्वत रांगेने हिरवाईचा साज चढवला आहे. फेसाळणारे धबधबे, चिखलाच्या अनवाणी वाटा, फुलांनी बहरलेले डोंगर यामुळे पर्यटकांचे गर्दी होऊ लागली आहे. यात तरुणाईचा अधिक सहभाग असून निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी निसर्ग पायदळी तुडविण्याचे काम पर्यटकांकडून सुरु असल्याचे चित्र आहे. 

नाशिक जवळचा अंजनेरी गड (Anjneri Gad) हा हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात हा परिसराला देखणे स्वरूप प्राप्त होते. पायथ्याला असलेल्या हनुमान मंदिरापासून ते पायऱ्या, निसरड्या वाटांनी दोन तासांचे अंतर कापल्यानंतर सुरवातीला अंजनीमाता माता मंदिर आणि त्यानंतर हनुमान मंदिराजवळ पर्यटक पोहचतात. यात अबालवृद्धांसह पर्यटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यातही तरुणाईची संख्या जास्त असते. अशावेळी तरुणाईकडून धांगडधिंगा केला जात असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. शनिवार रविवारच्या विकेंडला मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींचा गड गडावर जाताना दिसून येतो. मात्र त्यांच्याकडून गडाचे पावित्र्य जपले जात नाही. पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस घातला जातो. 

अंजनेरी गडावर हनुमानाचे मंदिर असून या मंदिराबाहेर तरुणाईकडून नाचगाणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. आजूबाजूच्या स्थानिक दुकानदार देखील याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे हनुमान मंदिर दर्शनासाठी येत असताना दुसरीकडे अशा पद्धतीने मंदिराबाहेरच तरुण तरुणींसह धांगडधिंगा केला जात असल्याने गडाचे पावित्र्य राखले जात आहे का? असं प्रश्न उपस्थित होतो आहे. 

गडावर जाण्यासाठी 30 रुपये आकारणी 

एकीकडे शनिवार रविवार विकेंड म्हटला की मोठ्या प्रमाणावर अंजनेरी गडावर पर्यटकांची गर्दी होत आहे. पायथ्याला असलेल्या पार्किंगसह गडावर जात असताना देखील पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे पहिला टप्पा पार केल्यानंतर देखील वाहन पार्किंग असून या ठिकाणी प्रत्येकी तीस रुपये दर आकारणी केली जात आहे. त्यामुळे दिवसाला हजाराहून अधिक पर्यटकांची गडावर होत असताना अशा पद्धतीने पार्किंग फी घेतली जात असल्याचे चित्र आहे. 

 

ईतर संबंधित बातम्या : 

Nashik Anjneri Hanuman : हनुमान जयंती : अंजनेरी हनुमानाचं जन्मस्थान, गडावर अंजनी मातेचं मंदिरही, काय आहे नेमका इतिहास? 

 





Source link