Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2885

Pune ISIS Special Report : दहशतवाद्यांची ठीकठिकाणी रेकी; टार्गेट मुंबई ?

0
Pune ISIS Special Report : दहशतवाद्यांची ठीकठिकाणी रेकी; टार्गेट मुंबई ?



<p>Pune ISIS Special Report : दहशतवाद्यांची ठीकठिकाणी रेकी; टार्गेट मुंबई ? पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोथरुडमधून दुचाकी चोरताना दोन संशयितांना अटक केली.जेव्हा चौकशी केली.तेव्हा पोलिसांना काही तरी मोठ्या कटाची कुणकुण लागली.पोलिसांनी एटीएसला पाचारण केलं.एटीएस या दोघांना त्यांच्या कोंढव्यातल्या घरी घेऊन गेली. आणि तिथेच या कटाचा भांडाफोड झाला.</p>



Source link

Lok Sabha 2024 : भाजपाला महाराष्ट्र-बंगालमध्ये बसणार फटका, शिंदे गट आणि अजित पवार गटाचा होणार ‘गेम’!

0
Lok Sabha 2024 : भाजपाला महाराष्ट्र-बंगालमध्ये बसणार फटका, शिंदे गट आणि अजित पवार गटाचा होणार ‘गेम’!


जर देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातील ४८ पैकी २० जागांवर भाजपचा विजय होईल असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे. भाजपनंतर काँग्रेसला ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटला फक्त २ जागा तर शिवसेना ठाकरे गटाला ११ जागा मिळू शकतील. शिवसेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा पाच जागा कमी मिळणार आहे. राष्ट्रवादीत अजित पवार गटाला फक्त २ तर शरद पवार गटाला ४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे अजित पवार गटाला काका भारी पडणार आहेत.

या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक २० जागा मिळत असल्या तरी त्यांच्या जागा तीन ने कमी होणार आहेत. तसेच राज्यात शिंदे गट व अजित पवार गटाला सोबत घेऊनही महायुतीला केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.  दुसरीकडे महाविकास आघाडीलाही २४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 



Source link

Uddhav Thackeray : ‘..त्यामुळेच मी फोटोग्राफी थांबवली’, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

0
Uddhav Thackeray : ‘..त्यामुळेच मी फोटोग्राफी थांबवली’, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण


बऱ्याच दिवसांनी माहेरची माणसं भेटली. सध्या जे काही चाललं आहे, त्यामुळे कोणाचा फोटो कधी कोणासोबत येईल, हे सांगता येत नाही. तसेच फोटो मधला एखादा कधी कोण गायब होईल, हेही सांगता येत नाही, म्हणूनच मी फोटोग्राफी थांबवली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.



Source link

Nashik News : सटाण्यातील मोर्चाला हिंसक वळण; आंदोलकांकडून रास्ता रोको करत वाहनांवर दगडफेक

0
Nashik News : सटाण्यातील मोर्चाला हिंसक वळण; आंदोलकांकडून रास्ता रोको करत वाहनांवर दगडफेक


Satana Morcha Violence : मणिपूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात आदिवासी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला गालबोट लागले असून जमावाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.



Source link

Varandha Ghat Accident : वरंधा घाटात भीषण अपघात, कार नीरा देवधर धरणात कोसळली; तरुणीसह तीन जण ठार

0
Varandha Ghat Accident : वरंधा घाटात भीषण अपघात, कार नीरा देवधर धरणात कोसळली;  तरुणीसह तीन जण ठार


Car Collapse into nira deodhar dam : पुण्यातून वरांधा घाट मार्गे कोकणात जाणारी एक कार नीरा देवधर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळली. &nbsp;हा घाट प्रवासास बंद असतानाही प्रवास करणं तिघांच्या जीवावर बेतलं आहे.



Source link

Uddhav Thackeray Melawa : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत गडकरी रंगायतनमध्ये मेळावा

0
Uddhav Thackeray Melawa : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत गडकरी रंगायतनमध्ये मेळावा



<p>&nbsp;मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्याच्या दिशेनं रवाना झालेत. तर मेळाव्यासाठी उत्तर भारतीय पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहेत. &nbsp;उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत गडकरी रंगायतनमध्ये मेळावा</p>



Source link

Uddhav Thackeray : “दर आठवड्याला माझा एक माणूस फोडा, त्यामुळे..” उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदे सरकारवर हल्लाबोल

0
Uddhav Thackeray : “दर आठवड्याला माझा एक माणूस फोडा, त्यामुळे..” उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदे सरकारवर हल्लाबोल


उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे. त्यामुळे मी शिंदे आणि भाजपला सांगतो की, दर आठवड्याला एक माणूस फोडा, यामुळे जे कामाचे नाहीत ते जातील.  त्यामुळे शिथिलता आलेले शिवसैनिक पेटून उठतील. एक एक जण फोडण्यापेक्षा निवडणुका घ्या. पक्ष सोडून गेलेल्यांना माझा जय महाराष्ट्र.



Source link

इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी कुठे केला बाँम्ब स्फोटाचा सराव?; तपासात धक्कादायक माहिती समोर

0
इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी कुठे केला बाँम्ब स्फोटाचा सराव?; तपासात धक्कादायक माहिती समोर


Pune NIA News : पुणे पोलिसांनी पकडलेल्या इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी (NIA) पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये जावून बॉंब स्फोटांचा सराव केल्याच समोर आलं आहे. त्यासाठी हे दहशतवादी जंगलात तंबू ठोकून काही दिवस राहिले देखील होते. पुण्याजवळच्या पानशेत जवळच्या दाट झाडींमध्ये, त्याचबरोबर सातारा शहराच्या जवळ असलेल्या झाडींमध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात या दहशतवाद्यांनी हा सराव केल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी हे दहशतवादी महाराष्ट्र – बेळगाव सीमाभागातील निपाणी आणि संकेश्वरमध्ये काही दिवस मुक्कामाला देखील होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते राज्यात विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचा संशय आहे.

पोलिसांनी या जंगलांमध्ये जाऊन या दहशतवाद्यांनी केलेल्या सरावानंतर त्या ठिकाणी मागे राहिलेले अवशेष जप्त केले आहे. त्याचबरोबर जंगलात राहण्यासाठी वापरण्यात आलेले तंबूदेखील पोलिसांनी जप्त केले आहेत. पुणे पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबल्सनी पुण्यातील कोथरूड भागात मध्यरात्री तिघांना संशयावरून ताब्यात घेतलं होत आणि त्यांची नावं विचारली. त्यांच्याकडील मोबाईलवरून पोलिसांनी स्वतःच्या मोबाईलवर फोन करून ट्रू कॉलरवर नावं तपासली असता ती वेगळी दिसल्याने पोलिस मोहम्मद युसूफ खान, मोहम्मद युनूस साकी आणि मोहम्मद शाहनवाज आलम या दहशतवाद्यांना घेऊन कोंढव्यातील त्यांच्या फ्लॅटवर गेले. फ्लॅटमध्ये पोलिसांना इसिस संबंधी साहित्य आणि स्फोटकांची पावडर सापडली. मात्र मोहम्मद शाहनवाज आलम हा तिसरा दहशतवादी यावेळी पळून जाण्यात यशस्वी ठरला. मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनूस साकी यांच्या चौकशीनंतर या प्रकरणात आणखी दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते…

‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबंधित मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24 वर्षे), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळलं आहे. खान, साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळय़ा, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  हे दोघं 15 महिन्यापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचं साहित्य जप्त केलं आहे. यात शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचंदेखील समोर आलं आहे. या चित्रीकरणात नेमकं काय आहे? पुण्यातील कोणत्या परिसरातील चित्रीकरण केलं आहे आणि यात पुण्यातील बाहेरचं चित्रीकरण केलं आहे का?, या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत. 

हेही वाचा-

Pune NIA Adnan ali : उपचार करायचा की विचार पेरायचा? SISI मध्ये भरती करणारा पुण्यातील डॉ.अदनान अली नेमका आहे तरी कोण?

 



Source link

“घरात कचरा असला तरी, द्वेषाच्या कॅन्सरवर..” किरण मानेंची शरद पोंक्षेंच्या वैमानिक मुलीसाठी खास पोस्ट

0
“घरात कचरा असला तरी, द्वेषाच्या कॅन्सरवर..” किरण मानेंची शरद पोंक्षेंच्या वैमानिक मुलीसाठी खास पोस्ट


Kiran mane on sharad ponkshe : अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट करून आरक्षणावर टिप्पणी करणाऱ्या पोंक्षे यांना टोला लगावला आहे. त्यात त्यांनी शरद पोंक्षे किंवा त्यांच्या मुलीचं नाव घेतलेलं नाही पण अप्रत्यक्ष त्यांच्याबद्दलच ती पोस्ट आहे.



Source link

सातारा : किल्ले जरंडेश्वर भाविकांनी गजबजला | पुढारी

0









[adning id=”1976″]

परळी; सोमनाथ राऊत : श्रावणी शनिवार म्हटलं की सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाविकांची पाऊले वळतात ती किल्ले जरंडेश्वर. निसर्गरम्य वातावरण, दाट धुके, पक्षांचा किलबिलाट, निम्म्या रस्त्यापर्यंत पायऱ्या तिथून पुढे जंगल सफर असा ट्रेक अन् त्यातून होणारे मारुतीरायांचे दर्शन यासाठी भाविकांची गर्दी जरंडेश्वरवर अगदी भल्या पहाटेपासून होत असते.

सातारा कोरेगाव रस्त्यावरील जांब, त्रिपुटी येथून जरंडेश्वरवर जाता येते. तसेच अन्यही दोन मार्ग जरंडेश्वरवर जाण्यासाठी आहेत. श्रावणी शनिवार म्हटलं की जरंडेश्वर हाउस फुल होतो. पहाटेची काकड आरती त्यानंतर होणारा खिचडीचा प्रसाद यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. गडावर प्रभू श्रीरामाचे व मारुतीरायाच्या नामाचा जयघोष सुरू असतो. पायऱ्यांवरून तसेच या मार्गावरून येता जाता भाविक “जय श्रीराम” असा जयघोष करीत असतात. गडावर प्रभू श्रीराम पंचायतन, मारुती रायाचे मंदिर, श्री शंकर महादेव मंदिर, अशा मूर्ती आणि दीपमाळ आहे. या गडावरील घंटा सर्वांचे आकर्षण ठरते.

हेही वाचा : 











Source link