Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2886

Nana Patole On Sambhaji bhide : संभाजी भिडंना दोन ते तीन दिवसांत अटक करा – नाना पटोले

0
Nana Patole On Sambhaji bhide : संभाजी भिडंना दोन ते तीन दिवसांत अटक करा – नाना पटोले



<p>संभाजी भिडंना दोन ते तीन दिवसांत अटक करा … असं नाना पटोले यांनी म्हंटलंय..&nbsp;</p>



Source link

Nirav Modi Property : नीरव मोदी महाराष्ट्रात जमीनखरेदी करतोय, भाजपा आमदाराच्या दाव्याने खळबळ

0
Nirav Modi Property : नीरव मोदी महाराष्ट्रात जमीनखरेदी करतोय, भाजपा आमदाराच्या दाव्याने खळबळ


कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी प्रकल्पासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळ परिसरात आंदोलन केलं आहे. त्याचवेळी एमआयडीसीच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडमध्ये नीरव मोदी स्वस्त दराने जमीन खरेदी करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय कर्जतमध्ये शेतकऱ्यांची जमीन कुणी कवडीमोल भावाने विकली जातेय का?, तसेच नीरव मोदी हा स्थानिक आहे की आर्थिक गुन्हेगार?, याची चौकशी केली जाणार असल्याचंही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.



Source link

Sushma Andhare : आरक्षणावर खोचक टिप्पणी करणाऱ्या शरद पोंक्षेंना सुषमा अंधारेंनी सुनावलं, म्हणाल्या…

0
Sushma Andhare : आरक्षणावर खोचक टिप्पणी करणाऱ्या शरद पोंक्षेंना सुषमा अंधारेंनी सुनावलं, म्हणाल्या…


तुम्ही दुर्धर आजारातून बरे झालात, तुम्ही रुग्णालयात असताना रक्त लघवी तपासण्याचं ठिकाण असेल, मेडिकल स्टोअरवर काम करणारी मुलं असतील, शस्त्रक्रिया दरम्यान आवश्यकता असणारे भुलतज्ञ , केमोथेरपी देणारे डॉक्टर्स, रक्ताची गरजच पडली असेल तर रक्तपेढीत काम करणारे कर्मचारी किंवा दिवस रात्र सेवा करणाऱ्या नर्सेस यांच्या कोणत्या जाती होत्या?, हे तुम्हाला माहितीय का?, असाही खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी शरद पोंक्षेंना केला आहे.



Source link

Dada Kondke News : दादा कोंडकेंच्या १२ चित्रपटांची मालकी एव्हरेस्ट कंपनीकडे; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

0
Dada Kondke News : दादा कोंडकेंच्या १२ चित्रपटांची मालकी एव्हरेस्ट कंपनीकडे; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय


प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात चित्रपटांवरील हक्क व अधिकार माणिक मोरे यांना दिल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर माणिक मोरे यांनी संबंधित कॉपीराईट अधिकार एव्हरेस्ट या कंपनीकडे हस्तांतरीत केले. त्यानंतर दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांवर एव्हरेस्ट या मीडिया कंपनीने दावा ठोकत थेट न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने ‘सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, बोट लावीन तिथे गुदगुल्या, आली अंगावर, सासरचे धोतर, मुका घ्या मुका आणि अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’, या चित्रपटांची मालकी एव्हरेस्टकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मालकी हक्क सांगणाऱ्या शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानच्या हृदयनाथ कडू देशमुख आणि अभिनेत्री उषा चव्हाण या दोन विश्वस्तांना एव्हरेस्टने अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली आहे.



Source link

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावगुंडांनी गमावला जीव

0
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावगुंडांनी गमावला जीव



<p>&nbsp;नागपूर जिल्ह्यातील बेला पोलीस ठाण्याच्य हद्दीत गावगुंडांनी गमावला जीव..&nbsp;</p>



Source link

Shiv Thakare : शिव ठाकरे आणि डेजी शाहचा ‘वेड लावलंय’ गाण्यावर कल्ला, व्हिडिओ व्हायरल

0
Shiv Thakare : शिव ठाकरे आणि डेजी शाहचा ‘वेड लावलंय’ गाण्यावर कल्ला, व्हिडिओ व्हायरल


विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच, एक व्हिडीओदेखील समोर आला होता. जो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये फोटोग्राफर्सना पाहून शिव कारची काच खाली करतो आणि काहीतरी बोलणार तेवढ्यात डेझी त्याच्या तोंडावर हात ठेवते, यानंतर सगळे हसायला लागतात.



Source link

Sanjay Dutt: बी ग्रेड सिनेमात काम करणाऱ्या मान्यताच्या प्रेमात कसा पडला संजूबाबा?

0
Sanjay Dutt: बी ग्रेड सिनेमात काम करणाऱ्या मान्यताच्या प्रेमात कसा पडला संजूबाबा?


संजयला भेटण्यासाठी मॉडेस रिया पल्लई तुरुंगात जायची. एका मंदिरात जाऊन संजय दत्तने तिच्याशी लग्न केले होते. पण नंतर संजय दत्त नाडिया दुरानीच्या प्रेमात पडला. त्यामुळे संजय दत्तची दुसरी पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली. संजय परत एकटा पडला होता. त्यानंतर संजय दत्तचा एका मुलीसोबतचा व्हिडीओ समोर आला होता. पण त्यामध्ये त्या मुलीचा चेहरा नीट दिसत नव्हता. स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये संजय दत्त याच मुलीला म्हणजे मान्यताला घेऊन गेला होता. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. नोव्हेंबर २००६मध्ये संजय दत्त आणि मान्यताने लग्न केल्याचे समोर आले होते. मान्यताने काही बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले.



Source link

Malkapur Accident : मलकापूर नजीक ट्रॅव्हल्सला भीषण अपघात; सहा प्रवाशांचा मृत्यू, ३० प्रवासी गंभीर जखमी

0
Malkapur Accident : मलकापूर नजीक ट्रॅव्हल्सला भीषण अपघात; सहा प्रवाशांचा मृत्यू, ३० प्रवासी गंभीर जखमी


मलकापूर येथे झालेल्या अपघातानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही. त्यामुळं पोलिसांच्याच वाहनातून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना बुलढाण्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी, ग्रामीण पोलीस निरीक्षक एफसी मिर्झा हे घटनास्थळी दाखल झाले आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून अपघाताचं कारण पोलिसांकडून शोधण्यात येत असल्याची माहिती आहे.



Source link

Anup Jalota Birthday: ‘भजन सम्राट’ अनूप जलोटा यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

0
Anup Jalota Birthday: ‘भजन सम्राट’ अनूप जलोटा यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?


संगीताच्या दुनियेत नाव कमावलेल्या अनूप जलोटा यांना गेल्या ३० वर्षांपासून श्रोते ऐकत आहेत. नेहमी गझल आणि भजन गाण्यासाठी ओळखले जाणारे अनूप जलोटा यांच्या आयुष्यातही तो दिवस आला, जेव्हा त्यांना मोठ्या वादाला सामोरे जावे लागले होते. ‘बिग बॉस १२’मध्ये एन्ट्री घेतल्यानंतर अनूप जलोटा यांचे नाव ३० वर्षीय जसलीन मथारूशी जोडले गेले होते. या शोमध्ये एन्ट्री होताच जसलीनने ती अनूप जलोटा यांची गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले होते. मात्र, शोमधून बाहेर पडल्यानंतर अनूप यांनी ही गोष्ट फेटाळून लावली. जसलीन आपल्याकडून संगीत शिकते आणि दोघांचे नाते गुरु-शिष्याचे असल्याचे त्यांनी म्हटले होते.



Source link

मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू; 25 ते 30 प्रवासी जखमी

0
मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू; 25 ते 30 प्रवासी जखमी


Buldhana Accident : मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती भीषण अपघात (Accident) झाला आहे. दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज पहाटे ( 29 जुलै) तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली. 

दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्यानं अपघात

मिळालेल्या माहितीनुसार एम एच 08. 9458 ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तातडीनं मदत कार्य सुरू केले आहे.

जखमींची प्रकृती चिंताजनक 

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळं पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी, ग्रामीण पो.नी. एफ.सी. मिर्झा यांनी भेट दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली, पूजेमुळे अपघात होणार नसल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल



Source link