Friday, July 17, 2026
Home Blog Page 2813

Chandrayaan 3 : चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग होताच पुणेकरांचा जल्लोष

0
Chandrayaan 3 : चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग होताच पुणेकरांचा जल्लोष



Chandrayaan 3 makes soft-landing on the moon : भारताचे चंद्रयान यशस्वीरीत्या चंद्रावर उतरत इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक घटनेचे संपूर्ण जग साक्षीदार झाला आहे. पुण्यात देखील भारताच्या या यश जल्लोष करून साजरे करण्यात आले आहे.



Source link

मानवी साखळी ते अंतराळ विषयक कार्यशाळा…राज्यभरात चांद्रयान मोहिमेचा उत्साह; पाहा फोटो…

0
मानवी साखळी ते अंतराळ विषयक कार्यशाळा…राज्यभरात चांद्रयान मोहिमेचा उत्साह; पाहा फोटो…



Chandrayaan-3 : मानवी साखळी…प्रार्थनेपासून ते अंतराळ विषयक कार्यशाळा…राज्यभरात चांद्रयान मोहिमेचा उत्साह; पाहा फोटो



Source link

Chandrayaan 3 live streaming : चंद्रयान ३ चे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी पुणेकर सज्ज; एनएफएआयसह शाळांमध्ये व्यवस्था

0
Chandrayaan 3 live streaming : चंद्रयान ३ चे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी पुणेकर सज्ज; एनएफएआयसह शाळांमध्ये व्यवस्था


पुण्यातील काही शाळा देखील भारतासाठी महत्वाची असलेला हा ऐतिहासिक क्षण मुलांना शाळेत पाहता यावा या साठी तयारी पूर्ण केली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जेआरव्हीजीटीआय आणि न्यू इंग्लिश स्कूल येथे प्रक्षेपणासोबतच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात चंद्राची खगोलशास्त्रीय माहिती, चंद्राच्या कविता सादरीकरण, चांद्रयान 3 मोहीम माहिती, चांद्रयानाची प्रतिकृती, चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्याचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.



Source link

Rebel Moon: नेटफ्लिक्सच्या बहुप्रतीक्षित ‘रिबेल मून’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला! धमाकेदार व्हिडीओ पाहिलात?

0
Rebel Moon: नेटफ्लिक्सच्या बहुप्रतीक्षित ‘रिबेल मून’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला! धमाकेदार व्हिडीओ पाहिलात?


Rebel Moon Teaser Out: हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता झॅक स्नायडर सध्या त्याच्या आगामी ‘रिबेल मून’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. त्याच्या ‘रिबेल मून’ या बहुप्रतीक्षित आगामी चित्रपटाचा धमाकेदार टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. ‘रिबेल मून’ हा चित्रपट येत्या डिसेंबर महिन्यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एड स्क्रिन, चार्ली हुनम, मिशेल ह्यूझमन, डिजीमन हॉन्सॉ, स्टॅझ नायर, बे ड्युना, रे फिशर, अँथनी हॉपकिन्स आणि नवांग्तुक डफी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.



Source link

Palghar Crime News : तरुणींचे फोटो चोरून अश्लील व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडून सख्ख्या भावांना बेड्या

0
Palghar Crime News : तरुणींचे फोटो चोरून अश्लील व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडून सख्ख्या भावांना बेड्या


मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील कळंब या गावात राहणाऱ्या यश आणि जीत निजाई या दोन भावंडांनी परिसरातील तरुणींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटोंची चोरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी तरुणींच्या फोटोंना मॉर्फ करत त्याचे अश्लील व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. याशिवाय आरोपींनी अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल केले. या घटनेची माहिती मिळताच पीडित तरुणींनी आरोपींना जाब विचारला. त्यावेळी आरोपींनी तरुणींना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर पीडित तरुणींनी थेट पोलीस ठाणे गाठत पोलिसांना घडलेला सारा प्रकार सांगितला.



Source link

Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिकचा वाद होणार! इनामदारांच्या डावात श्वेता आणि आयेशा अडकणार?

0
Rang Maza Vegla: दीपा आणि कार्तिकचा वाद होणार! इनामदारांच्या डावात श्वेता आणि आयेशा अडकणार?


आता इनामदारांच्या घरातील महिलावर्गाने आता आयेशा आणि श्वेता विरोधात शड्डू ठोकला आहे. सगळ्या आता एकत्र येऊन आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या लोकांचा बदला घेणार आहेत. त्यांना चांगलीच अद्दल घडवणार आहेत. आता दीपा, सौंदर्या, कार्तिकी आणि दीपिका यांनी ठरवलेल्या प्लॅननुसार कार्तिकी श्वेताचा विश्वास जिंकून तिच्याकडून सत्य परिस्थिती वदवून घेणार आहे. तर, दीपा, कार्तिक आणि सौंदर्या हे लोक आयेशाकडून सत्य परिस्थिती जाणून घेणार आहेत. दोघींचे कटकारस्थान आता ते उघडकीस आणणार आहेत. यात संपूर्ण देशमुख कुटुंबाला यश मिळताना दिसणार आहे.



Source link

‘मी जीव देण्याचं कारण फक्त…’ सिन्नर येथील विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

0
‘मी जीव देण्याचं कारण फक्त…’ सिन्नर येथील विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल


नाशिक : नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन तरुणांच्या टवाळखोरीला कंटाळून एका दहावीतील विद्यार्थिनीने स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील शहा गावात उघडकीस आली आहे. त्यामुळे सिन्नरसह जिल्ह्यात खळबळ उडाली असून तीनही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावातील तीन तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तीने आत्महत्येपूर्वी (Girl Suicide) लिहिलेल्या चिठ्ठित लिहून ठेवल्याचे निर्दशनास आले. 

नाशिक शहरासह जिल्ह्यात (Nashik District) मुलींसह महिलांच्या छेडछाडीच्या अनेक घटना समोर येत असतात. अनेकदा पोलिसांकडून अशा टवाळखोरांना समज देऊन सोडून दिले जाते. मात्र हे प्रकार सतत घडत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. त्यामुळे अनेकदा मुली नैराश्याच्या गर्तेत स्वतःला झोकून देतात, काहीवेळा टोकाचा निर्णय देखील घेतात. असाच काहीसा प्रकार सिन्नर (Sinner) तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील शहा येथील 16 वर्षीय वैष्णवी नवनाथ जाधव या शाळकरी मुलीने आत्महत्या (Girl Suicide) केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्यापूर्वी संशयित आरोपी वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसैंदर व एक अल्पवयीन मुलाचे नाव चिठ्ठीत लिहून ठेवत या तीघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. 

वैष्णवी ही भैरवनाथ हायस्कूलध्ये दहावीत शिकत होती. दोन दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात टवाळखोरी करत मुलींना त्रास देणार्‍या गावातील तिघांसोबत तिचा वाद झाला होता. या तिघांनी तिच्या घरी जाऊन तिला व तिच्या वडिलांना दमदाटी केली होती. तसेच तिच्या वडिलांना धमकावत वैष्णवी तुला जगण्याचा अधिकार नाही. तू जीव दे नाहीतर आम्ही तुझा जीव घेतो, अशी धमकी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलत मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी तीने चिठ्ठी लिहून ठेवत या तीन संशयित आरोपींमुळे आतमहत्या केली. 

वहीत चिठ्ठी आढळून आली…. 

दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले. यानंतर कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी पोलिसांना तपासात वैष्णवीने आत्महत्या केली, त्या खोलीत वहीच्या कागदावर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात तिने गावातीलच वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसुंदर व आणखी एका अल्पवयीन मुलाच्या नावाचा उल्लेख केला आहे. तिघेजण आपल्याला नेहमीच त्रास देत होते. माझ्यासह शाळेतील अनेक मुलींना त्यांनी त्रास दिला आहे. मी विरोध केला म्हणून त्यांनी घरी येवून वडिलांना माझ्याबद्दल वाईट साईट सांगितले. शिवीगाळ करून धक्काबुक्की देखील केली. ते तिघेही वाईट प्रवृत्तीचे असून पुन्हा त्रास देतील व पुन्हा काही झाल्यास घरी वडील मारतील या भीतीने मी आत्महत्या करत आहे, असा उल्लेख या चिठ्ठीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. 

 

इतर महत्वाची बातमी : 

Chitrakote Waterfall: कौटुंबिक वादातून चित्रकोट धबधब्यात आत्महत्या करण्यासाठी तरूणीची उडी



Source link

Subhedar: प्रदर्शनाआधीच ‘सुभेदार’नं रचला नवा विक्रम; ठरला ‘हा’ मान मिळवणारा मराठीतील पहिला चित्रपट!

0
Subhedar: प्रदर्शनाआधीच ‘सुभेदार’नं रचला नवा विक्रम; ठरला ‘हा’ मान मिळवणारा मराठीतील पहिला चित्रपट!


Subhedar Set New Record: अवघ्या २ दिवसांनी प्रदर्शित होणाऱ्या ‘सुभेदार’ या चित्रपटाने रिलीज आधीच एक नवा विक्रम रचला आहे.



Source link

Scam 2003: भरत जाधव दिसणार ‘स्कॅम २००३’, सीरिजचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

0
Scam 2003: भरत जाधव दिसणार ‘स्कॅम २००३’, सीरिजचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?


‘स्कॅम २००३’ सीरिजच्या ट्रेलरमध्ये अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकार दिसत आहेत. अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि प्रेक्षकांचा लाडका भरत जाधव देखील या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता वाढली आहे. हंसल मेहता दिग्दर्शित स्कॅम २००३ ही सीरिज २ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज सोनी लिव्ह या अॅपवर प्रदर्शित होणार आहे. सीरिजचा टीझर पाहाता चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.



Source link

KBC 15: ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?

0
KBC 15: ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?


५० लाख रुपयांसाठी हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला ‘खालील पैकी कोणत्या घोड्याचे नाव नाही, ज्याचा वापर कुरुक्षेत्र युद्धाच्या वेळी भगवान श्री कृष्ण यांनी वापरलेल्या रथाला जोडलेला होता?’ असा प्रश्न विचारण्याच आला होता. या प्रश्नासाठी A. शैव्य B. सुरावन C. बलाहक D. सुग्रीव असे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे स्पर्धकाने खेळ सोडला. त्याने २५ लाख रुपये जिंकले. या प्रश्नाचे योग्य उत्तर B. सुरावन असे आहे.



Source link