Friday, July 17, 2026
Home Blog Page 2814

Satara News | ३०० महिलांनी एकमेकींना हातवारे करत वाहिली शिव्यांची लाखोली; काय आहे ही बोरीच्या बाराची परंपरा? | पुढारी

0









लोणंद; शशिकांत जाधव : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी गावात मंगळवारी सुमारे ३०० महिलांनी एकमेकींना वाजत-गाजत शिव्यांची लाखोली वाहिली. पाऊण तास दोन्ही गावातील महिलांनी डफडे, ताशा, शिंग या वाद्यांच्या निनादात एकमेकींना शिव्या घालून, बोरीच्या बाराची परंपरा कायम ठेवली. यावेळी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी तोबा गर्दी केली होती. (Satara News)

सुखेड व बोरी या गावातील महिला अनेक वर्षांपासून नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी दुपारी बारानंतर दोन्ही गावाच्या दरम्यान जाणार्‍या ओढ्याच्या काठाला येऊन शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालतात. यावर्षी बोरीचा बार कसा होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. दुपारी १२ च्या सुमारास प्रथमत: सुखेड गावातील महिला डफडे, ताशा, शिंग या वाद्यांसह ओढयाच्या तीरावर येऊन हातवारे व टाळ्या वाजवत बार घालू लागल्या. त्यावेळीच बोरी गावातील काही उपस्थित महिलांनीही हातवारे करत बार घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर बोरी गावातील महिला वाजत गाजत येऊन बोरीचा बार घालू लागल्या.

दोन्ही बाजुच्या माहिलांनी एकमेकांना हातवारे करीत शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालण्यास सुरुवात केली. ओढ्यामध्ये धोम-बलकवडीचे पाणी सोडण्यात आले होते. बार घालणार्‍या महिलांबरोबरोबरच बघ्यांना आवरताना पोलीस, ग्रामस्थ यांची मोठी धांदल उडत होती. बार घालणार्‍या महिला हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहत होत्या. यावेळी डफडे, शिंग, तुतारीचा आवाज जसा वाढत जाईल तसा महिलांचा उत्साह वाढून टाळ्या वाजवून त्या एकमेंकींना आव्हान देत होत्या. त्यातच बघ्यांची गर्दी ही महिलांना चिथावणी देत होती. बोरीच्या बारात आबालवृद्धांसह सुमारे ३०० च्यावर महिला सहभागी झाल्या होत्या. सुमारे पाऊण तास पाण्यात उभे राहून बोरीचा बार घालणार्‍या महिलांना मागे ढकलत नेऊन ग्रामस्थ व पोलिस बार कमी वेळ होण्याचा प्रयत्न करत होते. (Satara News)

हेही वाचा : 











Source link

Shiv Thakare: एकीसोबत ब्रेकअप तर दुसरीसोबत अफेअरची चर्चा! लग्नाच्या प्रश्नावर शिव ठाकरे म्हणतो…

0
Shiv Thakare: एकीसोबत ब्रेकअप तर दुसरीसोबत अफेअरची चर्चा! लग्नाच्या प्रश्नावर शिव ठाकरे म्हणतो…


आता शिव ठाकरे याचं नाव बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाहबरोबर जोडलं जात आहे. सध्या दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, आपल्यात तसं काहीच नसल्याचं दोघांनीही म्हटलं आहे. या दरम्यान शिव ठाकरे याला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘लग्न कधी करणार?’ या प्रश्नावर उत्तर देताना शिव ठाकरे म्हणाला की, ‘माझं करिअर आताच सुरू झालं आहे. आता जे हसू माझ्या चेहऱ्यावर आहे, ते तसच राहू द्या. ते नैसर्गिक हसू आहे.’ याचाच अर्थ शिव ठाकरे याने अद्याप लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही.



Source link

Gadar 2: ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘गदर २’, जाणून घ्या कधी आणि कुठे

0
Gadar 2: ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘गदर २’, जाणून घ्या कधी आणि कुठे


पुढे निर्माते म्हणाले की, ‘चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. १० दिवसातच चित्रपटाने ३६० कोटी रुपये कमावले. चित्रपटाचे डिजिटल सॅटेलाइट हक्क अजून विकलेले नाहीत. चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी त्यांनी चित्रपट डिजिटलवर उशिरा प्रदर्शित करणार आहेत. त्यामुळे गदर २च्या चाहत्यांना आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे.’



Source link

Pune snake bite : पुणे जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण घटले तर शहरात वाढले; वर्षभरात केवळ ४३० घटनांची नोंद

0
Pune snake bite : पुणे जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण घटले तर शहरात वाढले; वर्षभरात केवळ ४३० घटनांची नोंद


डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकरणे जुन्नर, बारामती, हवेली यांसारख्या ग्रामीण आणि आदिवासी भागात आढळून येत आहेत. सध्या सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशासाठी लसींचा अतिरिक्त संग्रह आहे. सर्पदंशाच्या केसेस हाताळण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.”



Source link

मराठमोळ्या अभिनेत्याची आई दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर! भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला…

0
मराठमोळ्या अभिनेत्याची आई दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर! भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला…


अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आईच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो शेअर करून एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ चांदेकर याने लिहिले की, ‘हॅप्पी सेकंड इनिंग आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! आय लव्ह यु आई! हॅप्पी मॅरीड लाईफ!’



Source link

Saira Bano Birthday: २२ वर्षांनी मोठ्या असलेल्या दिलीप कुमारांशी लग्न करण्यासाठी सायरा बानोंनी उचललेलं मोठं पाऊल!

0
Saira Bano Birthday: २२ वर्षांनी मोठ्या असलेल्या दिलीप कुमारांशी लग्न करण्यासाठी सायरा बानोंनी उचललेलं मोठं पाऊल!


सायरा बानो यांचे प्रेम पाहून दिलीप कुमार शेवटी विरघळले. त्यानंतर दोघांनी १९९६मध्ये गुपचूप लग्न केले. मात्र, लग्नानंतर दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण, या सगळ्यात दिलीप आणि सायरा नेहमीच एकमेकांची ढाल बनून उभे राहिले. त्यांनी नेहमीच एकमेकांची साथ दिली. आजही बॉलिवूडमध्ये या जोडीला आदर्श जोडी म्हटले जाते.



Source link

EYE conjunctivitis : राज्यात गेल्या 11 दिवसांत डोळे येण्याच्या साथीचे 1  लाख रुग्ण : ABP Majha

0
EYE conjunctivitis : राज्यात गेल्या 11 दिवसांत डोळे येण्याच्या साथीचे 1  लाख रुग्ण  : ABP Majha



<p>राज्यात गेल्या 11 दिवसांत डोळे येण्याच्या साथीचे 1&nbsp; लाख रुग्ण, सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात, प्रशासनाकडून उपाययोजना सुरु.&nbsp;</p>



Source link

शिरवळमधील गोकुळ लॉजवर एलसीबीचा छापा | पुढारी

0









शिरवळ, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ गावच्या हद्दीत शिरवळ पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) च्या पथकाने वेश्या व्यवसाय सुरू असणार्‍या गोकुळ लॉजवर मंगळवारी छापा टाकला. यामध्ये दोन पीडित महिला, चालक महिला व हॉटेल मालक अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाला गोकुळ लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. याची खात्री करण्यासाठी एलसीबीच्या पथकाने लॉजवर एक बनावट ग्राहक पाठवले. या ग्राहकाकरवी लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची विस्तृत माहिती मिळवल्यानंतर मंगळवारी दुपारी एलसीबी आणि शिरवळ पोलिसांनी हा छापा टाकला.

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर लॉजमध्ये एकच कल्लोळ उडाला. पोलिस आले म्हटल्यावर अनेकांनी आपला गाशा गुंडाळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कुणालाही जागचे हलू दिले नाही. या कारवाईत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन पीडित महिला, चालक महिला आणि गोकुळ लॉजचा मालक अशा चौघांचा समावेश आहे. लॉजवर छापा टाकल्याची माहिती पसरल्यानंतर शिरवळमध्ये चौका चौकात चर्चा सुरू होत्या.

एलसीबीने छापा टाकून संशयितांना पकडल्याने शिरवळमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. किती वर्षांपासून लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू होता? यामध्ये आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे? वेश्या व्यवसायासाठी मुली व महिला कोणाकडून येत होत्या? आणखी पीडित महिला आहेत का? असे सवाल या कारवाईमुळे उपस्थित केले जात आहेत.











Source link

सातारा : दोन टोळ्या तडीपार | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यात मारामारी करणे, गंभीर दुखापत करणे आणि कोयत्याचा धाक दाखवणे असे गुन्हे करणार्‍या दोन टोळ्यांना पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दणका देत जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले. यामध्ये पाच संशयितांचा समावेश असून, ते कोरेगाव तालुक्यातील आहेत.

अथर्व अजय पवार (वय 19, रा. कोरेगाव), तौफिक शब्बीर शेख (वय 20), निरज तानाजी बोडरे ऊर्फ फक्की (वय 19, दोघेही रा. केदारेश्वर रोड, ता. कोरेगाव) अशी संशयित तिघांची नावे आहेत. या टोळीने सातारा जिल्हयामध्ये गर्दी मारामारी करून दुखापत करणे, कोयत्या सारखे घातक शस्त्रे बाळगून दुखापत करणे असे गैरप्रकार केले आहेत. यामुळे कोरेगाव पोलिसांनी संशयितांचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठवला.

तसेच दुसरी टोळीही कोरेगाव तालुक्यातील आहे. युवराज भरत जगदाळे (वय 22), अथर्व सुशांत जगदाळे (वय 21, दोघे रा. कुमठे ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांनी सातारा जिल्ह्यामध्ये रस्ता अडवून दुखापत करणे, मारहाण करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, गर्दी मारामारी करुन जातीय तेढ निर्माण करणारे गुन्हे संशयितांवर दाखल आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र संशयितांमध्ये सुधारणा होत नव्हती. उलट त्यांची दिवसेंदिवस दहशत वाढून सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत होता.

यामुळे कोरेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि एस. आर. बिराजदार यांनी दोन्ही टोळ्यांविरुध्द तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठवला. यावेळी हद्दपार प्राधिकरणासमोर सुनावणी होवून तडीपार करण्याचे आदेश करण्यात आले. संशयितांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, नोव्हेंबर 2022 पासून उपद्रवी टोळयांमधील 24 जणांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाई करण्यात येणार आहेत.



Source link

Raju Punjabi Death: तलावात अंघोळ केली, हॉस्पिटलमध्येही गेला! तरीही नाही वाचले राजू पंजाबीचे प्राण

0
Raju Punjabi Death: तलावात अंघोळ केली, हॉस्पिटलमध्येही गेला! तरीही नाही वाचले राजू पंजाबीचे प्राण


Raju Punjabi Death News: गेल्या अनेक दिवसांपासून राजू पंजाबी काविळशी झुंज देत होते. जिंदाल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले होते.



Source link