Friday, July 17, 2026
Home Blog Page 2812

Alia Bhatt: आलिया भट्टने सोडली ‘रामायण’ चित्रपटात ‘सीता’ साकारण्याची संधी! नेमकं झालं तरी काय?

0
Alia Bhatt: आलिया भट्टने सोडली ‘रामायण’ चित्रपटात ‘सीता’ साकारण्याची संधी! नेमकं झालं तरी काय?

गेल्या अनेक महिन्यांपासून ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची तगडीड स्टारकास्ट. रणबीर आणि आलिया या चित्रपटात ‘राम’ आणि ‘सीते’च्या भूमिकेत, तर दाक्षिणात्य अभिनेता यश ‘रावणा’च्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले गेले होते. पण, आता आलिया भट्टने या चित्रपटाला अलविदा म्हटलं आहे. आता आलिया ‘रामायण’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार नाहीये. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि केजीएफ स्टार यश दिसणार होते. जुलैच्या अखेरीस फिल्मसिटीमध्ये शूट करण्याचे नियोजन देखील करण्यात आले होते. मात्र, आता सगळेच नियोजन रखडणार आहे.

Source link

Prakash Raj: आधी उडवली खिल्ली, आता केलं कौतुक! ‘चांद्रयान ३’च्या यशावर काय म्हणाले प्रकाश राज?

0
Prakash Raj: आधी उडवली खिल्ली, आता केलं कौतुक! ‘चांद्रयान ३’च्या यशावर काय म्हणाले प्रकाश राज?

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अर्थात इस्रो अभिनंदन करताना प्रकाश राज यांनी हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये प्रकाश राज म्हणाले की, ‘चांद्रयान-३चे यशस्वी ‘लँडिंग’ हा प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाचा क्षण आहे. देशाला हा आनंद देणार्‍या इस्रोचे खूप खूप अभिनंदन आणि आभार.’ यासोबतच त्यांनी इस्रोच्या संपूर्ण टीमचेही अभिनंदन केले आहे. हे मिशन पूर्ण करून दाखवल्याबद्दल त्यांनी कौतुक केले आहे.

Source link

KBC 15: पोलिओमुक्त भारत अभियानासाठी का झाली अमिताभ बच्चन यांची निवड? ‘केबीसी’च्या मंचावर झाला खुलासा!

0
KBC 15: पोलिओमुक्त भारत अभियानासाठी का झाली अमिताभ बच्चन यांची निवड? ‘केबीसी’च्या मंचावर झाला खुलासा!

नेहमीप्रमाणेच यावेळीही ‘कौन बनेगा करोडपती सीझन १५’ मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील एक खास किस्सा शेअर केला. अमिताभ बच्चन ‘केबीसी १५’च्या मंचावर नेहमीच त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि कामाबद्दलचे किस्से शेअर करत राहतात. यावेळी अमिताभ बच्चन यांनी ते भारताच्या पोलिओ मोहिमेत कसे आणि का सामील झाले, याचा किस्सा शेअर केला आहे. ‘पोलिओमुक्त भारत अभियाना’चा किस्सा सांगताना त्यांनी म्हटले की, की या मोहिमेच्या दिग्दर्शकाने त्यांना केवळ त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ इमेजमुळे यात सामील करून घेतले होते. कारण, त्यावेळी लोक त्यांच्या मुलांना पोलिओ लसीकरण करण्याची विनंती ऐकतच नव्हते.

Source link

Chandrayaan 3: शाहरुखने म्हटलं गाणं, तर अक्षयने केलं कौतुक! चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेनं बॉलिवूडही आनंदलं!

0
Chandrayaan 3: शाहरुखने म्हटलं गाणं, तर अक्षयने केलं कौतुक! चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेनं बॉलिवूडही आनंदलं!

Chandrayaan 3 Bollywood Reactions: ‘बॉलिवूड किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान याने गाणं म्हणत भारताचं आणि इस्रोचं कौतुक केलं आहे.

Source link

Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्र कोकण, मुंबईत आज बरसणार; वाचा हवामानाचे अपडेट

0
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्र कोकण, मुंबईत आज बरसणार; वाचा हवामानाचे अपडेट

Maharashtra Rain Updates : आज राज्यावर कोणतीही स्ट्रॉंग सिस्टिम नाही. पश्चिमी वाऱ्याचा वेगही कमी आहे. दक्षिण गुजरातवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून याचा परिमाण म्हणून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रात आज तसेच पुढील काही दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या पुणे वेधशालेने वर्तवली आहे. २५ तारखेपासून राज्यावर येणाऱ्या पश्चिमी वाऱ्याची तीव्रता वाढणार असून यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

Source link

लम्पी स्कीनचा वाढता धोका, कशी घ्याल जनावरांची काळजी? वाचा सविस्तर

0
लम्पी स्कीनचा वाढता धोका, कशी घ्याल जनावरांची काळजी? वाचा सविस्तर

Lumpy Skin Disease : गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) वाढू लागला आहे. त्यामुळं पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेऊन त्यांची योग्य सुश्रुषा करणे गरजेचे आहे.  20 टक्के औषधोपचार आणि 80 टक्के सुश्रुषा या सुत्रानुसार लम्पी चर्मरोगावर मात करता येते. पशुपालकांनी आपल्या पशुधनाची योग्य काळजी घेऊन उपचार घेतल्यास लम्पी चर्मरोगापासून पशुधन वाचवण्यात यश मिळेल, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलीय.

आहारविषयक काळजी

रोगी जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित देण्यात यावा. त्याचप्रमाणे जनावरांचा आहार व पाणी पिणे उच्चतम राहील यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी. आजारी जनावरांना हिरवा, मऊ व लुसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीचा प्रथिने व ऊर्जायुक्त खुराक (ढेप/ मका आदी) द्यावा. पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात वारंवार उपलब्ध करून द्यावे. पाण्यामध्ये मीठ व गूळ टाकून दिल्यास जनावर पाणी आवडीने पितात. तसेच त्यांना खनिजक्षार व ऊर्जा मिळेल. थंडीच्या काळात हलके कोमट पाणी दिल्यास जनावर आवडीने पाणी पितात. पाणी पिणे चालू राहिल्यास अत्यवस्थ जनावरसुद्धा तंदुरुस्त होते.

ज्या बाधित जनावरांना मान, पाय, छातीवरील सुजेमुळे मान खाली करता येत नाही, अशा जनावरांना चारा व पाणी तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून देण्यात यावे. गरजेप्रमाणे चारा हाताने खाऊ घातल्यास रोगी जनावर चारा खात असल्याचे दिसून आले आहे.

पूरक खाद्यपदार्थांचा अंतर्भाव

आजारी जनावरांनी चारा खाने कमी केले असेल तर अशा जनावरांना ऊर्जावर्धक (प्रोपायलीन, ग्लायकॉल) औषधे तोंडावाटे देण्यात यावीत. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे जीवनसत्वे, खनिजक्षार मिश्रण, प्रतिकारशक्ती वर्धक तसेच यकृतवर्धक औषधे देण्यात यावीत. रक्तशय झालेल्या जनावरांना रक्तवर्धक औषधे सकाळी, संध्याकाळी किमान 21 दिवस देण्यात यावीत. ओटीपोटातील पचनासाठी आवश्यक जीवजंतू सुस्थितीत राहण्यासाठी प्रि व प्रोबायोटिक औषधे त्याचप्रमाणे भूक वाढीसाठी औषधे देण्यात यावीत.

जनावरांना कोरडा आणि ऊबदार निवारा करा

जनावरांचे पाऊस आणि थंडीपासून संरक्षण करावे. जनावरे उघड्यावर बांधू नयेत. जनावरांना योग्य तो कोरडा आणि ऊबदार निवारा उपलब्ध करुन द्यावा. त्यांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करावे. लहान वासरांना अंगावरती ऊबदार कपडे पांघरावीत. गोठ्यात अधिक वॅटेजचे बल्ब लावावेत जेणेकरुन उष्णता निर्माण होईल. प्रतिकूल वातावरणामुळं येणारा ताण टाळता येईल.

पोळी पायावरील सुजेवर शेक देणे

ज्या जनावरांना पाया समोरील लसीका ग्रंथीवर, पायावर किंवा छातीवर सूज आहे, अशा जनावरांना बसताना त्रास होतो म्हणून ती कित्येक दिवस उभी राहतात. अशा जनावरांना मीठाच्या संतृप्त गरम द्रावणाचा सुती कापडाच्या सहाय्याने दिवसातून 2 वेळा उत्तम शेक द्यावा. तसेच मॅग्नेशियम सल्फेट (बारीक पावडर) आणि ग्लीसरीन या संयुगाचा लेप सुजेवर सकाळ संध्याकाळी लावल्यास सूज कमी होण्यास मदत मिळते. अंगावरील गाठी आणि सूज कमी करण्यासाठी उन्हाच्या  वेळेत गरम पाण्याची अंघोळ  (शेकत / अंग चोळत) घालावी आणि अंग कापडाने कोरडे करावे म्हणजे सर्दी होणार नाही. लहान वासरांना चेहऱ्यावरील दुखऱ्या गाठीमुळे तोंडाची हालचाल करण्यास अवघड झाल्याने दुध पिता येत नाही. त्यासाठी चेहऱ्यावर गरम पाण्याने दिवसातून 2 वेळा शेक द्यावा. बसून राहणाऱ्या जनावरांना सिमेंट काँक्रीटची जमीन टाळावी. अंगाखाली मऊ गवत / तुसाची गादी करावी. अशा बसून राहणाऱ्या जनावरांना दर दोन तीन तासांनी बाजू बदलावी. दिवसातून दोन वेळा मदतीने उभे करावे.

तोंडातील व्रणोपचार

जनावरांच्या विशेषत: लहान वासरांच्या तोंडात जखमा आढळून आल्यास, तोंड पोटेशियम परम्यांगनेटच्या द्रावणाने धुवून दिवसातून तीन ते चार ळेस बोरोग्लोसरीनचे द्रावण तोंडातील जखमांवर लावावे. त्यामुळं जनावराला चारा खाण्यास, वासरांना दुध पिण्यास त्रास होणार नाही.

नाकाची स्वच्छता

लहान वासरांच्या नाकामध्ये काही वेळा अल्सर, जखमा निर्माण होतात. नाक चिकट स्त्रावांनी भरलेले असते. काही वेळा तो घट्ट आणि कडक होतो. त्यामुळं श्वसनास त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्यांनी नाकपुडी नियमितपणे स्वच्छ करावी तसेच दोन्ही नाकपुड्यात बोरोग्लोसरीन अथवा कोमट खोबरेल व बोरीक पावडरचे मिश्रण चार-चार थेंब टाकावे. जेणेकरुन मऊपणा टिकून राहील. जखमा भरुन येतील. सर्दी असेल तर निलगीरीच्या तेलाची किंवा विक्सची वाफ दिली तर चांगला फायदा होतो.

डोळ्यांची निगा

डोळ्यात व्रण असतील तर डोळ्यातून पाणी येते व पूढे पांढरेपणा येतो. त्यासाठी डोळे बोरिक पावडरच्या द्रावणाने नियमीत धुवून घ्यावेत किंवा कोमट पाण्याने साफ करावेत. रोगातून बरे झालेल्या बैलांना कामास जुंपल्यामुळे रोग प्रकोप होऊन दगावत आहेत म्हणून प्रकृती ठणठणीत होईपर्यंत त्यांना कामास लावू नये.

जखमांचे व्यवस्थापन

बाधित जनावरांमध्ये दोन तीन आठवड्यानंतर प्रामुख्याने सूज आलेल्या भागात विशेषतः पायावरती जखमा होतात. त्याचप्रमाणे शरीरावरील गाठी फुटून जखमा होतात. त्या जखमांवर उपचार करावा. यामध्ये जखमा 0.1 टक्के पोटेशियम परम्यागनेटच्या द्रावणाने धुवून घेतल्यानंतर त्यावर पोव्होडीन आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीन लावावे. त्यानंतर जखमेवर मॅग्नेशियम सल्फेट व ग्लिसरीनचे मिश्रण लावून बँडेजने हळुवारपणे बांधावी. जखमांवर माश्या आणि इतर बाह्यपरजीवी बसू नयेत यासाठी दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे जखम परिसरात फवारण्यात यावा. जखमेमध्ये अळ्या पडल्यास अशा जखमेत टर्पेंटाईनच्या तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा आणि त्यानंतर मृत अळ्या बाहेर काढून घ्याव्यात. अशा जखमांवर दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे फवारण्यात यावा. जखमा जास्त खोल व दुषित प्रकारच्या असल्यास हायड्रोजन पिरॉक्साईडचा वापर करून अशा जखमांचा उपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घ्यावा. जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी नियमित ड्रेसिंग करणे गरजेचे आहे.

गोमाशांचा त्रास कमी करण्यासाठी औषधांची फवारणी

जनावरांच्या अंगावर जखमा झाल्यानं माश्या बसतात, त्यामुळं जनावरे त्रस्त होतात. रोगी जनावरांना गोचीड-गोमाश्या यांचा त्रास कमी होण्यासाठी गोठ्यात दर तीन ते चार दिवसांनी कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी. तसेच अंगावरती हर्बल आणि वनस्पतीजन्य कीटकनाशक औषधांचा नियमित वापर करावा. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये 10 मिली निंबोळी तेल, 10 मिली करंज तेल, 10 मिली निलगीरी तेल आणि 2 ग्रॅम अंगाचा साबण मिसळावे व हे मिश्रण फवारणीसाठी वापरावे.

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik Lumpy : नाशिक जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढतोय, 257 जनावरे बाधित, 13 दगावली, 198 पशुधनावर उपचार

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये… आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर ‘जागतिक हेलियम दिवस’ साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक

राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

विजयदुर्गवर आज साजरा होणार ‘जागतिक हेलियम दिवस’

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी ‘साहेबांचा ओट’ या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस ‘जागतिक हेलियम दिवस’ म्हणून करणार आहेत.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी

कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.

Source link

Maharashtra Rain Update : सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता

0
Maharashtra Rain Update : सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता

राज्यात जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसानं बळीराजा सुखावला होता. पण ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिली आणि बळीराजासमोर चिंता उभी राहिली. गेल्या १५-२० दिवसांपासून पावसानं राज्यात विश्रांती घेतलीय. आणखी चिंतेची बाब म्हणजे तर उर्वरीत नऊ दिवसांमध्येही राज्यात पाऊस ओढ देणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. पण सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Source link

Mumbai Zika virus: मुंबईत झिका विषाणूचा रुग्ण आढळला, महापालिका अलर्ट मोडवर! ‘ही’ आहेत लक्षणे

0
Mumbai Zika virus: मुंबईत झिका विषाणूचा रुग्ण आढळला, महापालिका अलर्ट मोडवर! ‘ही’ आहेत लक्षणे

लक्षणे

झिका हा एडिस इजिप्ती डासामुळे होणारा सौम्य आजार आहे. झिका विषाणू एडिस डासाच्या चाव्याव्दारे मानवी शरीरात प्रवेश करतो. या आजाराच्या 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तर इतर संक्रमित लोकांमध्ये ताप, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलट्या होणे, शरीरावर लाल पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात.

Source link

‘फोन टॅपिंग’ प्रकरणाला कायमचा पूर्णविराम; रश्मी शुक्लांना दिलासा, खडसे म्हणतात…

0
‘फोन टॅपिंग’ प्रकरणाला कायमचा पूर्णविराम; रश्मी शुक्लांना दिलासा, खडसे म्हणतात…

Rashmi Shukla Phone Tapping: महाराष्ट्रात गाजलेल्या नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना (Rashmi Shukla) दिलासा मिळाला आहे, यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) टीका केली आहे. शासनाने रश्मी शुक्ला यांच्या बाबतचा क्लोजर रिपोर्ट (Closure Report) स्वीकारला, या विषयावर बोलताना एकनाथ खडसेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. रश्मी शुक्ला तुमच्या आश्रयाला आल्या म्हणून त्यांना भाजपच्या वॉशिंग मशिनकडून दिलासा मिळाल्याचं खडसे म्हणाले.

एकनाथ खडसेंचा सरकारला सवाल

अपेक्षेप्रमाणे सरकारने रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, असं खडसे म्हणाले. पुढे ते म्हणाले, “माझा फोन टॅप केला, त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना अधिवेशनातून प्रश्न विचारला, मात्र त्याचे उत्तर मला दिलं नाही. वास्तविक अजूनही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसतानाही सरकारने क्लोजर  रिपोर्ट दिला. उलट रश्मी शुक्लांना क्लीन चीट मिळाली. आमचं म्हणणं न ऐकता आणि आम्हाला उत्तर न देता सरकारने परस्पर क्लोजर रिपोर्ट सादर केला. आग्रहपूर्वक रश्मी शुक्लांना निर्दोष केलं.”

एकनाथ खडसेंचा क्लोजर रिपोर्ट गृहमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. मग तो क्लोजर रिपोर्ट सुद्धा कोर्टाला स्वीकारायला लावा, उलट चौकशी का लावतात? असा सवाल एकनाथ खडसेंनी केला.

नक्की प्रकरण काय?

भाजपला धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची स्थापन केली होती. याच दरम्यान आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते, हे फोन टॅपिंग प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या IPS रश्मी शुक्लांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारल्याने फोन टॅपिंग प्रकरण कायमचं बंद झालं आहे. फोन टॅपिंग प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याच्या आरोप रश्‍मी शुक्ला यांच्यावर आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये रश्मी शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा:

Jalgaon News : ‘अकेला ही एकनाथ खडसे भारी था’, उभं राहून कामं केली, तीन तीन मंत्री असूनही… एकनाथ खडसेंची टीका

Source link