Saturday, July 18, 2026
Home Blog Page 2798

सातारा : गतवर्षी धरणे 94 टक्के, यंदा 80 टक्क्यांवरच | पुढारी

0

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात ऊन- तुरळक पावसाचा खेळ सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणे कधी भरणार? असा प्रश्न शेतकर्‍यांसह नागरिकांना पडला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्येच धरणात 94.35 टक्के पाणीसाठा होता. मात्र यावर्षी ऑगस्ट महिना संपत आला तरी धरणे 80 टक्क्यांवरच आहेत. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची दाट शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यात पावसाने उशिरा सुरुवात केली. मात्र जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली या तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी दरवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव या तालुक्यातील पूर्व भागाला पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पूर्णत: उघडीप दिली आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही तीच परिस्थिती आहे. दरवर्षी 15 ऑगस्टपूर्वी जिल्ह्यातील सर्व धरणे भरतात. 15 ऑगस्टनंतर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते. मात्र पावसानेच उघडीप दिल्याने धरणे भरणार कधी असा प्रश्न आता पडला आहे. नदी, नाले, ओढे, तलाव, बंधारे पाण्याअभावी कोरडे ठणठणीत पडले आहेत. तसेच दिवसेंदिवस भूजल पातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ऐन पावसाळ्यात ऐरणीवर आला आहे.

कोयना धरणात गतवर्षीपेक्षा 14.19 टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात 80.43 टक्के आजचा पाणीसाठा आहे. धोम धरणात आज गतवर्षीपेक्षा 14 टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात 81.95 टक्के आजचा पाणीसाठा आहे. धोम बलकवडी धरणात आज गतवर्षीपेक्षा 4.72 टक्के पाणीसाठा जास्त आहे. धरणात 96.72 टक्के आजचा पाणीसाठा आहे. कण्हेर धरणात गतवर्षीपेक्षा 13.01 टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात 80.08 टक्के आजचा पाणीसाठा आहे. उरमोडी धरणात गतवर्षीपेक्षा 37 टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात 59.79 टक्के आजचा पाणीसाठा आहे. तारळी धरणात गतवर्षीपेक्षा 2.34 टक्के पाणीसाठा कमी आहे. धरणात 91.10 टक्के आजचा पाणीसाठा आहे.

मध्यम प्रकल्प 58.85 टक्क्यांवरच…

सातारा जिल्ह्यात येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, नागेवाडी, मोरणा, उत्तरमांड, महू, हातगेघर, वांग (मराठवाडी) हे मध्यम प्रकल्प आहेत. मात्र राणंद, येरळवाडी व आंधळी धरणात 0 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरण परिसरातील गावामध्ये पाण्याची ओरड सुरू आहे. नेर 15.63 टक्के, नागेवाडी 41.20 टक्के, मोरणा 77.69 टक्के, उत्तरमांड 67.67 टक्के, महू 79.91 टक्के, हातगेघर 46.80 टक्के, वांग 72.35 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 58.85 टक्क्यांवरच आहे.

Source link

Maharashtra Weather update: कोकणात पावसाचा ओसरणार, आज विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी बरसणार; वाचा हवामानाचे अपडेट

0
Maharashtra Weather update: कोकणात पावसाचा ओसरणार, आज विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी बरसणार; वाचा हवामानाचे अपडेट

Maharashtra Rain update: राज्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. आज राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस होणार असून कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे.

Source link

भारतीय हॉकीला सुवर्णयूग दाखवणाऱ्या ध्यानचंद यांचा जन्मदिन, आज ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’

0
भारतीय हॉकीला सुवर्णयूग दाखवणाऱ्या ध्यानचंद यांचा जन्मदिन, आज ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’

नवी दिल्ली : भारतात ज्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळी भारतीय हॉकीचे सुवर्णयुग सुरु होतं. त्यावेळी भारतीय संघात असा एक खेळाडू होती कि ज्याची किर्ती जगभर पसरली होती. या खेळाडूचे हॉकीतील कौशल्य असं होतं की, त्याच्या हॉकी स्टिकला बॉल चिकटला आहे का हे विदेशी लोक तपासायचे. हा खेळाडू म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यान चंद (Major Dhyan Chand). आज त्यांचा जन्म दिवस. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून भारतात आज राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतोय.

भारत देश गुलामीत होता त्यावेळी भारताची विदेशातील ओळख म्हणजे गांधी, हॉकी आणि ध्यानचंद अशीच होती. मेजर ध्यानचंद अर्थात ध्यानचंद सिंग यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रुपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले

भारतीय हॉकीला सुवर्णकाळ मिळवून देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांना जागतिक क्रीडा विश्वात हॉकीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखलं जायचं. त्यांची खेळातली चपळता आणि कौशल्य जबरदस्त होतं. त्यामुळंच त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.

हिटलरने हॉकी स्टिक मागवली

मेजर ध्यानचंद यांच्या जीवनात 1936 चे बर्लिन ऑलिम्पिक हे सर्वात महत्वाचं होतं. या स्पर्धेत भारताचा अंतिम सामना थेट जर्मनीशी होता. हा सामना बघण्यासाठी स्वत: हिटलर हजर होता. पण त्यामुळे ध्यानचंद यांच्या खेळावर कोणताही परिणाम झाला नाही. भारतीय संघाने लागोपाठ गोल करायला सुरु केल्यानंतर हिटलरने ध्यानचंद यांची हॉकी स्टिक तपासण्यासाठी मागितली होती.

जर्मनी संघाचा पराभव होताना हिटलर पाहू शकत नव्हता. त्याने पहिल्या हाफ मध्येच मैदान सोडलं. पण धानचंद यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली. पण ध्यानचंद यांनी ती ऑफर विनम्रपणे नाकारली.

मेजर ध्यानचंद यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत 400 पेक्षा अधिक गोल केले, जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने 1956 साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला.

खेलरत्न पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’

भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव म्हणून या पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं असणार आहे.

Source link

“पवार काका-पुतण्याचं राजकारण देशासाठी, महाराष्ट्रासाठी शुभ अन् मंगल”

0
“पवार काका-पुतण्याचं राजकारण देशासाठी, महाराष्ट्रासाठी शुभ अन् मंगल”

रामदेव बाबा म्हणाले की, प्रादेशिक राजकारणावर मी जास्त काही बोलू शकत नाही. शरद पवार व अजित पवार यांच्या राजकारणाकडे आपण कसं पाहता, या प्रश्नावर रामदेव बाबा म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांचं राजकारण राष्ट्रासाठी आणिमहाराष्ट्राशी शुभ आहे, मंगल आहे. २०२४ मध्ये मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असे म्हणत लोकसभा निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केले.इतकं बोलून यावरबाबा रामदेव यांनीअधिक भाष्य करणं टाळलं.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये… आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर ‘जागतिक हेलियम दिवस’ साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक

राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

विजयदुर्गवर आज साजरा होणार ‘जागतिक हेलियम दिवस’

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी ‘साहेबांचा ओट’ या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस ‘जागतिक हेलियम दिवस’ म्हणून करणार आहेत.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी

कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.

Source link

Accident News : देवदर्शनाहून परताना रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडलं; एकाच कुटूंबातील ४ जण जागीच ठार, ३ गंभीर

0
Accident News : देवदर्शनाहून परताना रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडलं; एकाच कुटूंबातील ४ जण  जागीच ठार, ३ गंभीर

सुनील महादेव जगदाळे (वय ४०, ऑटो चालक) पत्नी प्रमिला सुनील जगदाळे (वय ३५), सुनीलची आई अनुसया महादेव जगदाळे (वय ७०), पूजा विजय जाधव,  (वय १८, भाची)  यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे  कुटुंब मुरुम साखर कारखाना शेजारच्या विठ्ठल मंदिराचे पुजारी आहेत.

Source link

वीट डोक्यात मारून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा; अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल

0
वीट डोक्यात मारून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा; अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल

बीड: बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई  तालुक्यातील सातेफळ शिवारातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराने वीट डोक्यात मारून पत्नीचा खून केला होता. याप्रकरणी निर्दयी पतीस दोषी ठरवून अंबाजोगाई अप्पर सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी आरोपीस आजन्म सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना आणि फिर्यादीसह निम्मे साक्षीदार फितूर होऊनही सरकारी वकील लक्ष्मण फड यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे दोषी पतीला त्याच्या कृत्याची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.

आश्रुबा गुलाब नरसिंगे (वय 35) असं गुन्हेगार पतीचं नाव आहे. आश्रुबा पत्नी दिपाली सह वीटभट्टीवर कामास होता. 31 जुलै रोजी आश्रुबाने दिपालीच्या डोक्यात वीट मारून तिचा खून केला आणि ‘मी दिपाली हीस विटेनं मारलं आहे, ती जिवंत आहे की मेली ते जावून पहा’ असं तिच्या चुलत्यास सांगितलं. विशेष म्हणजे खुनाच्या वेळी आश्रुबाची लहान मुलगी जवळच झोळीत झोपली होती, परंतु त्या चिमुकलीकडे पाहूनही तिच्या आईचा खून करताना निर्दयी आश्रुबाचे हात थरथरले नाहीत. याप्रकरणी दिपालीच्या आईच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात आश्रुबावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. ग्रामीण पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं.

डॉक्टर, पोलिसांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या

प्रकरणात शवविच्छेदन करणारे डॉ. रविकुमार कांबळे आणि तपासी अधिकारी श्रीनिवास भिकाने यांची साक्ष तसेच आरोपीच्या मोबाईल मधील व्हॉईस आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगवरील पो. कॉ. खरटमोल यांची साक्ष  महत्वाची ठरली.

निम्मे साक्षीदार फितूर

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हते. सुनावणी दरम्यान एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले, त्यातील 4 साक्षीदार फितूर झाले. विशेष म्हणजे दिपालीची फिर्यादी असलेली आई आणि घरच्या लोकांनी देखील ऐनवेळी फितूर होत आरोपीच्या बाजूने साक्ष दिली होती. तसेच मयतेचा चुलता आणि पंच, साक्षीदार यांनी देखील साक्ष बदलून सरकार पक्षाच्या विरोधात साक्ष दिली होती.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला प्रभावी

या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी बाजू मांडली. दिपालीचा मृत्यू दणकट आणि बोथट हत्याऱ्याने मारहाण केल्याने झाला आहे. मयतेच्या मरण्याच्या वेळी ती आश्रुबा सोबत विटभट्टीवर कामास होती आणि ते दोघे एकाच रुममध्ये रहात होते, ही बाब सरकार पक्षाने प्रभावीपणे सिद्ध केली. तसेच, दिपालीचा खून कसा झाला याचे आश्रुबाने काहीही स्पष्टीकरण न दिल्याने दिपालीचा खून त्यानेच केला आहे, असा युक्तीवाद केला. हा युक्तिवाद आणि पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आश्रुबा नरसिंगे यास जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रूपये दंड ठोठावला.

हेही वाचा:

Source link

आयआयटीमधून शिक्षण तरीही मातशी नाळ कायम; तरुणाने उभारला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प

0
आयआयटीमधून शिक्षण तरीही मातशी नाळ कायम; तरुणाने उभारला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प

नांदेड :  आयआयटीमधून उच्च शिक्षण घेतलेल्या युवकाने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला असून या खत निर्मिती मधून हा युवक महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे. नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथे  राहणाऱ्या तरुणाने जवळच पिंपळाभत्या येथे हा प्रकल्प सुरू केला आहे. प्रज्ञानंद पोहरे असे या तरुणाचे नाव आहे. बेंगळुरू येथे सध्या तो एका कंपनीमध्ये कार्यरत आहे. नोकरीचे स्वरुप ऑनलाईन असल्याने मिळालेल्या मोकळ्या वेळेत त्याने हा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.

गांडूळ खत प्रकल्पासाठी त्याने हरियाणा राज्यातून ऑस्ट्रेलियन प्रजातीचे गांडूळ मागवले आहेत. या गांडूळाच्या माध्यमातून खत निर्मिती तसेच वर्मीवॉश हे फवारणी औषध तयार करण्यात येते. या गांडूळ खताला मोठी मागणी आहे. या खत निर्मिती सोबतच पिकांवरील कीटकनाशकाचा नायनाट करण्यासाठी वर्मीवॉश या फवारणी औषधाची देखील या ठिकाणी विक्री केली जात आहे. गांडूळ खत आणि वर्मीवॉश या औषधाच्या माध्यमातून प्रज्ञानंद पोहरे हा तरुण लाखो रुपयांची कमाई करीत आहे.

>> गांडुळ खताचे फायदे

> जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.

> जमिनीचे बाष्पीभवन कमी होवून पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.

> जमिनीत गांडुळांची संख्या वाढते, त्यामुळे जमीनी भुसभुशीत होऊन उगावु बनते.

> झाडांची निरोगी वाढ होते, त्यामुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत होते.

> जमिनीत हवा खेळती राहून, मुळांची वाढ चांगली होते. त्यामुळे फळांमध्ये टिकाऊपणा आणि चव येते.

>> वर्मी वॉश चा वापर कसा करावा

प्रज्ञानंदने आइसीनिया फोटिडा नावाचे ऑस्ट्रेलियन प्रजातीचे गांडूळ हरियाणा राज्यातून मागून गांडूळ खत निर्मिती सुरू केली आहे. आइसीनिया फोटिडा नावाचे गांडूळ हे उच्च तापमानात आणि कमी तापमानात, कमी पाण्यावर जगू शकतात.  90 टक्के शेणखत आणि 10 टक्केच माती खातात. त्यामुळे बाजारात या प्रजातीची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे ते गांडूळ निर्मितीसाठी योग्य मानले जातात.

वर्मी वॉश म्हणजे काय?

गांडूळाच्या शरीरापासून जे पाणी निघते त्याला वर्मीवॉश असे म्हणतात. एका ड्रॉप मध्ये गांडूळ आणि शेणखत टाकून दोन महिन्यापर्यंत त्यात पाणी सोडले जाते. गांडूळापासून ते पाणी निघते ते वर्मीवॉश म्हणून वापरले जाते. त्यामुळे पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव दूर होऊन पिकांवरील कीटकांचा नाश होतो. एक लिटर वर्मीवॉश मध्ये आठ लिटर पाणी टाकून शेतीवर सकाळी किंवा सायंकाळी सूर्योदय किंवा सूर्यास्तानंतर फवारल्यास पिकांवरील रोगराई दूर होते.  वर्मीवॉशमध्ये झाडांना, जमिनीला लागणारे  न्यूट्रियन्स म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असतात. तसेच वर्मीवॉशमध्ये मायक्रो न्युट्रियन्स बोरोंनस, झिंक , मॅग्नेशियम असतात. त्यामुळे वर्मीवॉशला ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे प्रचंड मागणी आहे.

Source link

PUNE METRO : एकाच दिवसात पुणेकरांचा मेट्रोतून प्रवासाचा विक्रम, तब्बल इतक्या प्रवाशांनी मेट्रोतून लुटला वीकएंडचा आनंद

0
PUNE METRO : एकाच दिवसात पुणेकरांचा मेट्रोतून प्रवासाचा विक्रम, तब्बल इतक्या प्रवाशांनी मेट्रोतून लुटला वीकएंडचा आनंद

सवलतीचा लाभ घेत पुणेकरांनी रविवार सुट्टीचा दिवस मेट्रोमधून प्रवास करत साजरा केला आहे. रविवारी एकाच दिवसात तब्बल ८० हजार ८६८ लोकांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे. यातून मेट्रोला १ कोटींचे महसूल मिळाले आहे. मेट्रोच्या शिवाजीनगर, वनाज व रुबी हॉल मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत होती.

Source link

Sunny Kaushal: विकी कौशलच्या भावाला डेट करतेय कतरिनाची बहिण?

0
Sunny Kaushal: विकी कौशलच्या भावाला डेट करतेय कतरिनाची बहिण?

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. त्यानंतर आता विकी कौशलचा भाऊ,अभिनेता सनी कौशल आणि कतरिनाची बहिण इजाबेल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघे सतत एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसत आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या वेळीच सनी आणि इजाबेलच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.

Source link