Saturday, July 18, 2026
Home Blog Page 2797

सातारा : एलसीबी कारवाईचा डबलबार | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) विविध दोन ठिकाणी कारवाईचा डबलबार उडवला. दोघांकडून लोणंद, ता.खंडाळा येथे 15 किलोचा गांजा व दोन कार तर सातार्‍यात एकाकडून बनावट देशी पिस्तूल जप्त केले. रविवारी केलेल्या या दोन्ही कारवाईत सुमारे 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गांजा प्रकरणात उपलब्ध मंगलेश भोसले (वय 35, रा. सोनगाव, ता. बारामती) व चेतन वामन जाधव (35, रा.जेजुरी, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, लोणंद येथे काही संशयित गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवली. यावेळी पोलिसांना पाहताच कारमधील संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ताब्यात घेऊन कारमध्ये पाहणी केली असता 14 किलो 684 ग्रॅम गांजा आढळला. संशयितांना ताब्यात घेऊन गांजा व दोन्ही कार जप्त करण्यात आले. दरम्यान, यातील उपलब्ध भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द बारामती, करकंब, माळशिरस, नातेपुते येथे गुन्हे दाखल आहेत.

दुसर्‍या कारवाईत पिस्टल प्रकरणी अक्षय सुरेश भोसले (वय 32, रा. तामजाईनगर, सातारा) याला अटक केली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मोळाचा ओढा येथे एकाकडे पिस्टल असून तो थांबलेला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अक्षय भोसले याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 65 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आढळला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेवून त्याच्याकडील पिस्टल जप्त केली.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर पाटील, रविंद्र भोरे, फौजदार पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, विशाल भंडारे, मदन फाळके, पोलिस तानाजी माने, साबीर मुल्ला, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, सचिन ससाणे, मुनीर मुल्ला, प्रवीण कांबळे, हसन तडवी, केतन शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.



Source link

वाहन होताच पंक्चर; मोहितेकाका हजर | पुढारी

0









विशाल गुजर

सातारा : सातारा शहरात वाहन अचानक पंक्चर झाल्याने अनेकांचे वांदे होतात. या अडल्या नडलेल्या वाहन चालकांसाठी मोहितेकाका (रामचंद्र मोहिते) धावून येत आहेत. त्यांचे जुगाड एमएटी गॅरेजसह पंक्चर झालेली दुचाकी जिथे असेल तिथे जाऊन ते पंक्चर काढून देत आहेत. मोहितेकाकांच्या या अफलातून सेवेचे सातारकरांना मोठे अप्रुप आहे.

अडकून पडलेल्या चालकांचे वाहन जाग्यावरच दुरूस्त करत असल्याने मोहिते काकांचे हे जुगाड एम-80 गॅरेज अडल्या नडल्यांसाठी आधारवड ठरू लागले आहे. माफक दरात मोहितेकाका ही सेवा निस्वार्थपणे देत आहेत. मोहितेकाका म्हणजे रामचंद्र माधवराव मोहिते होय. ते 1980 पासून सातार्‍यात राहतात. ट्रक ड्रायव्हर, क्लिनर, सेंट्रिंग, बांधकाम असे कोणते काम त्यांच्या हातून झाले नाही, असे कधी ऐकिवात नाही. मूळचे कराड तालुक्यातील तळबीड आणि आता महादरे तळे येथे राहत असलेले रामचंद्र मोहिते हे मोहितेकाका म्हणूनच परिचित आहेत. मात्र, लॉकडाऊननंतर त्यांचा चेहरा आणि जुगाड एम – 80 गॅरेज सातारकरांच्या नेहमीच लक्षात राहणार आहे.

कोरोनामध्ये त्यांनी सर्वस्व पणाला लावून आपली सेवा मोफत देऊन एक आदर्श निर्माण केला. या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणार्‍यांकडून त्यांनी एकही रूपया घेतला नाही. मोहितेकाकांची जुगाड एम-80 लक्षवेधी ठरते. पंक्चर अथवा अन्य कोणत्याही दुचाकी दुरूस्तीसाठी ती उपयुक्त ठरली आहे. त्यांनी कल्पकतेून या जुगाड गॅरेजची निर्मिती केली.

त्यांचा मोबाईल क्रमांक बर्‍यापैकी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अडीअडचणीच्या वेळेला दुचाकी पंक्चर झाली तर त्यांच्या मोबाईलवर संपर्क करायचा. ते लगेच

तातडीने वाहन पंक्चर झाले असेल तेथे जावून ते पंक्चर काढून देत आहेत. कमी वेळेत व अडचणीच्या काळात ते धावून येत असल्याने त्यांच्या विधायकतेचे कौतुक होत आहे.











Source link

Madhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय करते’च्या ‘अरुंधती’ला चाहतीने दिली सुंदर भेट! व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणते…

0
Madhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय करते’च्या ‘अरुंधती’ला चाहतीने दिली सुंदर भेट! व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणते…


‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अरुंधती’ बनून अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर सगळ्यांच्या मनावर राज्य करत आहे. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळेच ‘अरुंधती’वर भरभरून प्रेम करतात. अनेकदा चाहते ‘अरुंधती’ला अर्थात मधुराणी प्रभुलकरला भेटायला देखील येतात. अगदी दूरवरून येणारे चाहतेही अनेकदा आपल्या लाडक्या अभिनेत्रीसाठी खास भेटवस्तू घेऊन येतात.



Source link

Pune Crime: पुणेकरांनो तुम्ही भेसळयुक्त पनीर खात नाहीत ना? भेसळयुक्त पनीरची सर्रास विक्री

0
Pune Crime: पुणेकरांनो तुम्ही भेसळयुक्त पनीर खात नाहीत ना? भेसळयुक्त पनीरची सर्रास विक्री



Pune Crime: पुण्यात विक्रीसाठी आणलेले तब्बल ५ हजार किलो भेसळ युक्त पनीर जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली.



Source link

Satara Jarandeshwar Sugar Factory :  जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकांना दिलासा : ABP Majha

0



<p>&nbsp;जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकांना दिलासा, &nbsp;संचालकांसह तीन जणांना अटकपूर्व जामीन, मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर.&nbsp;&nbsp;</p>



Source link

Ola UBER Update : ओला, उबरला सरकारचा दणका, बुकींक रद्द केल्यास पैसे ग्राहकाला मिळणार : ABP Majha

0
Ola UBER Update : ओला, उबरला सरकारचा  दणका, बुकींक रद्द  केल्यास पैसे  ग्राहकाला मिळणार  : ABP Majha



आरामदायी प्रवास करायचा असेल वा घाईगर्दी न करता अन्यत्र कुठे जायचे असेल तर ओला, उबर या ॲप आधारित सेवांचा हमखास वापर केला जातो. गाडी बुक केली जाते. मात्र, कधी कधी गाडी येतच नाही. सेवा रद्द केल्याचा मेसेज येतो. अशावेळी मोठी अडचण होते. परंतु, आता ओला, उबरकडे कॅब बुक करूनही एखाद्या चालकाने भाडे नाकारल्यास त्याला ५० ते ७५ रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आलीये. तसेच, विशेष म्हणजे हे पैसे कॅब बुक करणाऱ्या प्रवाशाला मिळणार आहेत. ओला आणि उबर या सेवा नेमक्या कोणत्या नियमांखाली सुरू आहेत आणि त्या ग्राहकाभिमुख धोरणे राबवतात का, याबाबत उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले हाेते.

 



Source link

Vivek Agnihotri: ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक इंडस्ट्री सोडणार? बॉलिवूडविषयी विवेक अग्निहोत्रींचं मोठं वक्तव्य…

0
Vivek Agnihotri: ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक इंडस्ट्री सोडणार? बॉलिवूडविषयी विवेक अग्निहोत्रींचं मोठं वक्तव्य…


नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक यांनी खुलासा केला की, त्यांनी आता व्यावसायिक चित्रपट करणे सोडले आहे. ते म्हणाले, ‘मी ज्या कलाकारांसोबत काम केले, त्यांना या जगाबद्दल फारसे माहीतच नाही. मी हे उद्दामपणाने बोलतोय असे नाही, तर मी खरे सांगतोय. मला आता असे वाटू लागले की, मी ज्या कलाकारांसोबत काम करतो ते शिकलेले नाहीत आणि त्यांना जगाची काहीच समज नाही. मी त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे आणि माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्यापेक्षा खूप वेगळा आणि चांगला आहे.’



Source link

Jawan Trailer: ‘जवान’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघताय? मग शाहरुख खानच्या ‘या’ सरप्राईजने व्हाल खूश!

0
Jawan Trailer: ‘जवान’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघताय? मग शाहरुख खानच्या ‘या’ सरप्राईजने व्हाल खूश!


‘जवान’ चे दिग्दर्शन अॅटलीने केले आहे, तर गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी निर्मितीची बाजू सांभाळली आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, दीपिका पदुकोण कॅमिओ करताना दिसणार आहे. याशिवाय विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा आणि प्रियामणी हे स्टार्सही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.



Source link

सातारा जिल्ह्यातील धरणांचे पाणी पिण्यासाठी राखीव | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी धोम, धोम-बकलवडी, उरमोडी तसेच कण्हेर या प्रमुख धरणांतील ठराविक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश राज्यशासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पिण्यासाठी आवश्यक असलेल्या पाणीसाठ्याची माहिती मागवली असून दोन दिवसांत होणार्‍या कालवा सल्लागार समितीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पावसाळा संपत आला असताना प्रमुख धरणे अद्याप रिती आहेत. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तलाव कोरडे ठाक पडले आहेत. माण, खटाव, फलटण या तालुक्यात बर्‍याच ठिकाणी पिण्यासाठीही लोकांना वणवण भटाकावे लागत आहे. पावासाचे हुकमी दोन महिने संपल्याने राहिलेल्या उर्वरित दोन महिन्यांत तरी पाऊस पडेल याची चिंता भेडसावत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने भविष्यातील टंचाई निवारणाच्या कामात यंत्रणा गुंतली आहे.

सगळी भिस्त मान्सून माघारीवर असली तरी ऐनवेळी लोकांचे हाल होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच भाग म्हणजे राज्य शासनाने सातारा जिल्ह्यातील कोयना धरण वगळता उर्वरित चार धरणांतील काही पाणीसाठा राखीव ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यावर बहुतेक पहिल्यांदाच ही वेळ आली आहे. धोम, धोम-बलकवडी, उरमोडी तसेच कण्हेर धरणातील पाणी पिण्यासाठी जून 2024 पर्यंत राखीव ठेवले जाणार आहे. मात्र या धरणातील किती टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवायचा याचा निर्णय सातारा व सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या कालवा सल्लागार समितीमध्ये होणार आहे.

पाणी नियोजनाचा अहवाल मागवला…

जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा परिषदेकडील ग्रामपंचायत क्षेत्रात वर्षभर पिण्यासाठी किती टीएमसी पाण्याचा वापर होतो. या यंत्रणांना किती टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे करणार, लोकांना व जनावरांना किती पाणी लागणार अशा बारीक सारीक गोष्टींचा विचार करून त्याचा अहवाल या यंत्रणांकडून मागवला आहे.











Source link

Nagarjuna Birthday: आधीच विवाहित असूनही बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीवर फिदा झाला होता नागार्जुन! वाचा…

0
Nagarjuna Birthday: आधीच विवाहित असूनही बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीवर फिदा झाला होता नागार्जुन! वाचा…


Happy Birthday Nagarjuna: नागार्जुनने आपल्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपट केले आहेत. पण, बॉलिवूडमध्ये काम करत असताना नागार्जुन एका सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता.



Source link