Saturday, July 18, 2026
Home Blog Page 2789

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, दारुच्या नशेत केलं कृत्य

0
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, दारुच्या नशेत केलं कृत्य


Mantralaya Bomb Threat: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी (Mantralaya Bomb Threat) देणाऱ्याला अहमदनगर पोलिसांनी (Ahmednagar Police) ताब्यात घेतलं आहे. शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील बाळकृष्ण ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. बाळकृष्ण ढाकणे याने गुरुवारी (31 ऑगस्ट)  दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास 112 वर फोन करून मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, असं म्हणत मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली.

दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती

दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. हा कॉल बाळकृष्ण ढाकणे याने केल्याची माहिती समोर आल्यानंतर शेवगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, ढाकणे याने पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फोन केल्याने त्याला पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बाळकृष्ण ढाकणे याने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ढाकणे हा स्पर्धा परीक्षा देत असल्याचीही माहिती आहे. त्याने हे कृत्य का केले याबाबत पोलीस तपासात सत्य समोर येणार आहे. मात्र, त्याने केलेल्या कृत्यामुळं एकच खळबळ उडाली होती.

पोलीस प्रशासन सतर्क

गेल्या 15 दिवसापूर्वी देखील असाच निनावे फोन आला होता. 15 दिवसात दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. निनावी फोन करणाऱ्याने मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन देण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन दिलं नाही तर मंत्रालयात ठेवलेल्या बॅाम्बने मंत्रालय उडवून देईल, अशी धमकी निनावी कॉल करुन दिली होती. दरम्यान, या घटनेनंतर मंत्रालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. सर्व पोलीस प्रशासन सतर्क झालं होतं. निनावी कॉल आल्याच्या काही वेळातच पोलिसांनी मंत्रालयात शोधमोहीम सुरू केली होती. मंत्रालयामध्ये डॉग स्क्वॉड द्वारे पोलीसानी मंत्रालयातील कानाकोपरा तपासाला. तपासाअंती बॉम्ब ठेवल्याची माहिती अफवा असल्याचे निष्पन्न झाले.मंत्रालयात धमकीचा कॉल करणारा व्यक्ती हा मूळचा अहमदनगरचा आहे. या व्यक्तीला काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ न शकल्याने त्याने त्रस्त होऊन ही धमकी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

Mumbai: मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या, नाहीतर…; गेल्या 15 दिवसांत मंत्रालय उडवून देण्याची दुसऱ्यांदा धमकी



Source link

On The Spot : राहुल गांधींचा अदानींवर हल्लाबोल, INDIA Allianceची बैठक ते राज्यातील पाऊस : ऑन द स्पॉट

0
On The Spot : राहुल गांधींचा अदानींवर हल्लाबोल, INDIA Allianceची बैठक ते राज्यातील पाऊस : ऑन द स्पॉट



<p>On The Spot : राहुल गांधींचा अदानींवर हल्लाबोल, INDIA Allianceची बैठक ते राज्यातील पाऊस&nbsp;: ऑन द स्पॉट</p>



Source link

Eknath Shinde : राहुल गांधी परदेशात देशाची बदनामी करतात, कसलं देशप्रेम?

0
Eknath Shinde : राहुल गांधी परदेशात देशाची बदनामी करतात, कसलं देशप्रेम?


ABP Majha Batmya

22 Aug, 11:56 PM (IST)

Eknath Shinde : पडलेला पाऊस, पिकांची परिस्थिती चाऱ्याची परिस्थिती यावर सविस्तर चर्चा



Source link

Nagpur crime : पतीचा मृतदेह मूळगावी पोहोचवला अन् इकडं महिलेचं घरही लुटलं, रुग्णवाहिका चालकाची करामत

0
Nagpur crime : पतीचा मृतदेह मूळगावी पोहोचवला अन् इकडं महिलेचं घरही लुटलं, रुग्णवाहिका चालकाची करामत


एका महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह त्याच्या मूळगावी नेला जात होता. पतीच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच पत्नीवर आणखी एक मोठा आघात झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवून आरोपींना गजाआड केले आहे. ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेला होता, त्या गाडीच्या चालकानेच चोरीचा डाव रचल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रुग्णवाहिका चालक अश्वजित विश्वजित वानखेडे याला अटक करण्यात आली आहे.



Source link

India Alliance Meet : ‘इंडिया’ च्या संयोजकपदी कुणाची वर्णी? महाराष्ट्रातील ‘या’ दोन नेत्यांची नावे आघाडीवर

0
India Alliance Meet : ‘इंडिया’ च्या संयोजकपदी कुणाची वर्णी? महाराष्ट्रातील ‘या’ दोन नेत्यांची नावे आघाडीवर


महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे संयोजकपदासाठी आघाडीवर – 
इंडिया आघाडीसाठी पुढाकार घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव संयोजक पदासाठी आघाडीवर होते. काँग्रेससह लालूप्रसाद यादव, उद्धव ठाकरेंनीही संयोजकपदासाठी नितीशकुमारांचे नाव पुढे केले होते. मात्र नितीशकुमार यांनी संयोजक बनण्यास नकार दिल्याने संयोजकपदासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या नावाची चर्चा आहे. यात पवार आणि ठाकरेंचं नाव आघाडीवर असल्याचं दिसत आहे. 



Source link

Ganpati Festival : 2 हजार दिवे, 20 विसर्जनस्थळे, 9 कृत्रिम तलाव; गणेशोत्सवासाठी शासन सज्ज

0
Ganpati Festival : 2 हजार दिवे,  20 विसर्जनस्थळे, 9 कृत्रिम तलाव; गणेशोत्सवासाठी शासन सज्ज



<p>Ganpati Festival : 2 हजार दिवे, &nbsp;20 विसर्जनस्थळे, 9 कृत्रिम तलाव; गणेशोत्सवासाठी शासन सज्ज</p>



Source link

Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर उद्या दोन तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणता?

0
Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर उद्या दोन तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणता?


पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग उद्या १  सप्टेंबर दोन तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे. यामुळे या  मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी थोडी गैरसोय होणार आहे. महामार्ग दुरुस्ती तसेच सीसीटीव्ही साठी ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.



Source link

मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई शेतकरी संकटात

0
मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई शेतकरी संकटात


Marathwada Fodder Issue : यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीत आणले आहे. पाऊस पडला नसल्याने शेतकरी राजा प्रचंड प्रमाणात संकटात सापडला आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच मराठवाड्यात सुरुवातीलाच पाऊस एक महिना उशिराने सुरू झाला आणि त्यानंतर देखील जवळपास मागील 28 दिवसापासून पाऊस न पडल्याने शेतकरी संकटात आहे. कारण  शेतातील जनावराच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात धडपडत आहे. 

मराठवाड्यामध्ये 48 लाख 61 हजार एवढी लहान मोठी जनावरे आहेत.  यामध्ये गोवंशीय सर्व लहान मोठ्या जनावरांचा समावेश होतो. या जनावरांना दर दिवशी पंचवीस हजार पाचशे टन इतका चारा लागतो. आता मराठवाड्यात फक्त 21 लाख 77 हजार 200 इतकाच चारा उपलब्ध आहे  या सर्व चाऱ्यांचा अंदाज लक्षात घेता हा चारा फक्त पुढील 85 दिवस पुरेल इतकाच चारा आहे. अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे झालेल्या कृषी मंत्र्यांच्या बैठकीत समोर आली होती.  त्यामुळे शेतातील पिकाबरोबरच शेतात असलेले जनावरे कशी जगवायची असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर सध्याच्या घडीला उभा आहे. शेतीला  जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला पसंती दिली आहे. आता दुग्ध व्यवसाय सुद्धा बुडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शेतकऱ्यांकडे असणाऱ्या गाई म्हशींना चारण्यासाठी लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे.  त्यामुळे  शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे गेल्यावर्षीचा सुका चारा होता तो आजपर्यंत ते पुरवत आले आहेत. परंतु आता इथून पुढे जनावरांना खायला काय द्यायचे  काय असा प्रश्न निर्माण होतोय कारण 
आतापर्यंत शेतात लागवड केलेला चाऱ्याची वाढ होन अपेक्षित होतं आणि त्यानुसार शेतकरी जनावरांच्या चाऱ्याच नियोजन करत असतात परंतु अपेक्षेप्रमाणे पाऊसच न झाल्याने  चारा वाढला नाही आता शेतातील जनावरांना काय खाऊ घालायचे आसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती किती चारा उपलब्ध

छत्रपती संभाजी नगर  2,22,700  टन इतका चारा शिल्लक आहे तर  हा चारा  पुढील 67 दिवस पुरेल. जालना जिल्ह्यात  1,58,849 टन इतका चारा शिल्लक आहे हा चारा पुढील 56 दिवस पुरेल. परभणी जिल्ह्यात 1,79,117 टन चारा शिल्लक आहे हा चारा पुढील 61 दिवस पुरेल. बीड जिल्ह्यात 6,72,891 टन चारा आहे तो चारा पुढील 166 दिवस पुरेल. लातूर जिल्ह्यात 2,34,846 टन  चारा आहे हा चारा पुढील 90 दिवस पुरेल. तर धाराशिव मध्ये 3,62,142 टन चारा आहे पुढील 90 दिवस चारा पुरेल. नांदेड  जिल्ह्यात 2,45,598 टन चारा आहे पुढील 60 दिवस पुरेल. हिंगोली जिल्ह्यात 1,01,088 टन इतका चारा आहे तो पुढील 60 दिवस पुरेल 

 

इतर महत्वाच्या बातम्या

उद्यापासून देशात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल; तुमच्या महिन्याच्या बजेटवर होणार थेट परिणाम



Source link

Rang Maza Vegla: श्वेताला सगळा डाव कळणार! दीपा कार्तिकचा प्लॅन फसणार? मालिकेत येणार ट्विस्ट

0
Rang Maza Vegla: श्वेताला सगळा डाव कळणार! दीपा कार्तिकचा प्लॅन फसणार? मालिकेत येणार ट्विस्ट


सगळे प्रयत्न करून देखील आयेशा खरं सांगत नाहीये हे कळल्यावर आता दीपा कार्तिकच्या मृत्यूचा डाव रचणार आहे. यादरम्यान आता ती इनामदारांच्य घरात मोठा तमाशा करणार आहे. दीपा आयेशाला घराबाहेर निघून जायला सांगणार आहे. मात्र, यावेळी कार्तिक आयेशाच्या बचावासाठी पुढे येण्याचं नाटक करणार आहे. आयेशा या घरातून कुठेही जाणार नाही, असे कार्तिक म्हणणार आहे. तर, मी तुला घटस्फोट देऊन आयेशाशी लग्न करणार, असे देखील तो बोलणार आहे. तर, यावेळी दीपा त्याला जीवे मारण्याची धमकी देणार आहे.



Source link

Mantralaya : मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा वर्षाव.. इमारतीच्या व अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, काय आहे प्रकार?

0
Mantralaya  : मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा वर्षाव.. इमारतीच्या व अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, काय आहे प्रकार?


मेट्रो कामाच्या ब्लास्टमुळेअनेक दगड मंत्रालयाच्या दिशेनेजोरात उडून आल्याने मंत्रालयासमोर पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या. तसेच इमारतीच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्याचे दिसत आहेत. दुपारच्या सुमारास बाहेर सहसा कुणी नसल्याने सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.



Source link