
Aparna Nair South Actress Death: साऊथ मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अपर्णा नायर यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, अभिनेत्री अपर्णा नायर या त्यांच्या राहत्या घरातच मृतावस्थेत आढळून आल्या आहेत.

Aparna Nair South Actress Death: साऊथ मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अपर्णा नायर यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, अभिनेत्री अपर्णा नायर या त्यांच्या राहत्या घरातच मृतावस्थेत आढळून आल्या आहेत.

Sudhir More Suicide : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कट्टर शिलेदार, माजी नगरसेवक व माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी रेल्वे ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळं मुंबईत खळबळ उडाली असून शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे.

राखी सावंत विमानतळाच्या बाहेर येताच एका व्यक्तीने तिला फुलांचा हार घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आपली पावले मागे घेत तो हार आपल्या हातात घेतला. त्यानंतर तिने एका महिलेच्या हातून गळ्यात ही फुलांची माळ घालून घेतली. यानंतर पापाराझींनी राखी-राखी म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. तेव्हा राखी त्यांना म्हणाली की, ‘मला राखी नाही, मला फातिमा म्हणा.’ त्यानंतर लोक तिला फातिमा म्हणू लागले.

मुंबई : इंडिया (I.N.D.I.A) आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही पक्ष नव्याने आलेले आहेत त्यांना ही सहभागी करुन घेतले जाणार आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, त्यानंतर लोगो फायनल केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे तूर्तास आज तरी लोगोचं अनावरण होणार नाही.
लोगोसाठी एकूण पाच ते सात पर्याय आहेत, हे सर्व लोगो नव्यानं आलेले पक्ष आणि समितीसमोर ठेवले जातील, त्यानंतर यावरती अंतिम निर्णय होईल. त्यामुळे तूर्तास आज तरी लोगोचं अनावरण होणार नाही. प्रत्येक पक्षाला आपलं निवडणूक चिन्ह असताना लोगोचे महत्व एवढं वाढवावं का याबद्दल मतमतांतरे आहेत. लोगो करायचा असेलच तर हा संपूर्ण आघाडीचा असल्यानं त्यावर सगळ्यांचं मत लक्षात घेऊनच निर्णय करावा अशी हालचाल सुरू झाली आहे. काल काही नेते उशिरा पोहोचल्यामुळे सगळ्यांशी याबाबत मंथन झालेलं नाही
इंडिया आघाडीच्या लोगोसाठी नऊ डिझाईन तयार करण्यात आले होते. त्यातील एका डिझाईनला काही महत्त्वाच्या काही प्रमुख पक्षांनी संमती दिली आहे अंतिम झालेल्या लोगोची डिझाईन इंडिया आघाडीतील काही इतर महत्त्वाच्या पक्षांना सुद्धा दाखवून त्यांची संमती घेतली जात आहे. या आघाडीला इंडिया नाव असल्याने या लोगो मध्ये राष्ट्रध्वजाचे तिरंगाची झलक दिसणार आहे.
या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्ष्यांच्या 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.या बैठकीत त्या त्या पक्षाचे प्रत्येकी एक प्रमुख नेता समितीचा सदस्य असेल इंडिया आघाडीचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते या समितीमार्फत घेतले जातील.

KBC 15 Latest Episode 1 September 2023: टीव्हीचा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’चा १५ सीजन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मागील सीझन्सप्रमाणेच यंदाचा सीझन देखील चांगलाच गाजत आहे. अमिताभ बच्चन होस्ट केलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये एकतरी असा स्पर्धक नक्कीच आहे, ज्याने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन इतिहास रचला आहे. यावेळी शोचा १५वा सीझन सुरू झाला आहे. या सीझनमध्ये असे काही स्पर्धक नक्कीच होते, ज्यांनी एक कोटीचा प्रश्न गाठला. पण, सात कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. मात्र, या सीझनमध्ये एक स्पर्धक हा टप्पा गाठणार आहे. ‘केबीसी १५’ला पहिला स्पर्धक मिळाला आहे, ज्याने ७ कोटींच्या प्रश्नाचा टप्पा गाठला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये ईडीने आणखी १४ लोकांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे, प्रसाद सागर, कॉंग्रेस नेते रणजीत देशमुख, सुभाष देशमुख, अरविंद खोतकर यांच्यासह शिंदे गटाच्या एका नेत्याचं नाव असल्याची माहिती आहे. परंतु या प्रकरणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव वगळण्यात आल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांच्या नावावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आणखी १४ लोकांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.

अभिनेत्री गौतमी गाडगीळ आणि अभिनेता राम कपूर यांनी ‘घर एक मंदिर’ या टीव्ही मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान दोघे मनाने एकमेकांच्या जवळ आले होते. हळूहळू राम कपूर गौतमीच्या प्रेमात पडला. यांच्या रिअल लाईफ प्रेमकहाणीमुळे त्यांच्या मालिकेत देखील मोठा ट्वीस्ट आला होता. ‘घर एक मंदिर’ या टीव्ही सीरियलमध्ये गौतमी पहिल्यांदा राम कपूरच्या वहिनीच्या भूमिकेत दिसली होती. पण, नंतर शोमध्ये असा ट्विस्ट आणि टर्न आला की, गौतमी वहिनी नव्हे तर, त्याची पत्नी बनली. मालिकेतील त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यानंतर ते एकमेकांच्या खूप जवळ आले.

शाहरुख खानच्या ‘जवान’चे दिग्दर्शन अॅटली कुमार यांनी केले आहे. तर, तर संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर आणि निर्माता भूषण कुमार आहेत. गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी या चित्रपटातून पदार्पण केले आहे. ‘जवान’ हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘दबंग २’ या चित्रपटात प्रकाश राज खलनायक ‘बच्चा सिंह’च्या भूमिकेत होते. तर, दीपक डोबरियालने बच्चा सिंहचा धाकटा भाऊ ‘गेंदा सिंह’ची भूमिका साकारली होती. गेंदा सिंह, चुलबुल पांडेवर खूप संतापलेला असतो. दीपक डोबरियालने ज्या पद्धतीने राग, मत्सर आणि इतर भावनांचे चित्रण केले, त्यामुळे सगळेच प्रभावित झाले.

Maharashtra Weather Forecast : ऑगस्ट महिना कोरडाच गेल्याने राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळं आता नव्या महिन्याच्या हवामानाचा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे.
Source link