Saturday, July 18, 2026
Home Blog Page 2787

Sharad Pawar : मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचा आदेश गृहमंत्र्यांनीच दिला असावा, पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल

0
Sharad Pawar : मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचा आदेश गृहमंत्र्यांनीच दिला असावा, पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल


एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार म्हणाले की, जालन्यात आंदोलकांवर प्रखर लाठीहल्ला केला. खरं म्हणजे एकदा चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची काहीही गरज नव्हती. मात्र, हल्ली अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कुठलेही प्रश्न असले आणि ते उत्तर न मिळाल्याने रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी, असा आरोप शरद पवारांनी केला.



Source link

Jalna Maratha Andolan : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका! आंदोलकांनी बससह अनेक वाहने पेटवली, तुफान दगडफेक

0
Jalna Maratha Andolan : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका! आंदोलकांनी बससह अनेक वाहने पेटवली, तुफान दगडफेक


जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलिसांच्या लाठीचार्जमुळे मराठा आंदोलन चिघळले आहे. येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. आंदोलकांच्या मंडपात पोलीस घुसले व त्यांनी प्रकृती खालावलेल्या आंदोलकांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळी आंदोलकांकडून दगडफेक झाली, असा आरोप पोलिसांचा आहे. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी आंदोलकांवर मारहाण केल्यानंतर जालन्यातील अंतरवालीमध्ये आंदोलकांनी बस पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याचीही माहिती आहे. यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.



Source link

R Madhavan FTII President : आर. माधवन बनला FTII चा नवा अध्यक्ष

0
R Madhavan FTII President : आर. माधवन  बनला  FTII चा नवा अध्यक्ष


Madhavan Appointed FTII President : बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेता  आर माधवन याला मोठी जबाबदारी मिळाली आहे. Film and Television Institute of India (FTII) चे अध्यक्षपद आर माधवनकडे सोपवण्यात आले आहे. साउथ सुपरस्टार आर माधवन  याला नुकताच फिल्म रॉकेट्रीसाठी राष्ट्रीय अवॉर्ड मिळाला होता.



Source link

Uddhav Thackeray Full PC : चिंध्या..की मिंध्या? एकनाथ शिंदेंचं नाव घेताच उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

0
Uddhav Thackeray Full PC : चिंध्या..की मिंध्या? एकनाथ शिंदेंचं नाव घेताच उद्धव ठाकरेंची टोलेबाजी



<p>Uddhav Thackeray Full PC : चिंध्या..की मिंध्या? एकनाथ शिंदेंचं नाव घेताच उद्धव ठाकरेंची टोलेबाजी</p>



Source link

Maratha Reservation Protest : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं.. पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, हवेत गोळीबार

0
Maratha Reservation Protest : जालन्यात मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं.. पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, हवेत गोळीबार


जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता असून राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. घटनास्थळी दगडांचा खचही असल्याचे दिसून आले आहे. उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला आहे.



Source link

Mallikarjun Kharge on Modi : मराठी म्हणीचा वापर करत खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

0
Mallikarjun Kharge on Modi : मराठी म्हणीचा वापर करत खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल


मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ‘मोदी खोटं बोलतात, पण लोकांना ते खरं वाटतं. मराठीत एक म्हण आहे, खोटं बोला पण रेटून बोला,असं ते करतात, अशा शब्दात मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.



Source link

Rang Maza Vegla: अखेर आयेशा गुन्ह्याची कबुली देणार! ‘रंग माझा वेगळा’चा शेवट गोड होणार?

0
Rang Maza Vegla: अखेर आयेशा गुन्ह्याची कबुली देणार! ‘रंग माझा वेगळा’चा शेवट गोड होणार?


Rang Maza Vegla Latest Episode 1 September 2023: अखेर सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे या मालिकेचा शेवट गोड होणार आहे. अखेर आयेशा आपल्या गुन्ह्याची कबुली देणार असून, तिला तिच्या चुकांची शिक्षा मिळणार आहे.



Source link

शेतकरी बंधुनो! परिस्थितीशी दोन हात करा! धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी रास्ता रोको

0
शेतकरी बंधुनो! परिस्थितीशी दोन हात करा! धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी रास्ता रोको


धुळे : राज्यातील बहुतांश जिल्हे तहानलेले असून ऐन पावसाळयात धरणे (Dams) कोरडेठाक होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिकसह (Nashik) विभागातील जिल्ह्यामध्ये शेतकरी चिंतेत असून धुळे जिल्ह्यातही दुष्काळाची (Maharashtra Drought) परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात केवळ 40 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून तालुक्यात नागरिकांनी एकत्र येत दुष्काळ जाहीर करण्यासाठी रास्ता रोको देखील केला आहे. 

धुळे जिल्ह्यात (Dhule District) जुलैच्या पहिल्या आठवड्याचा अपवाद वगळता अद्याप पावसाची हजेरी (Maharashtra Rain) लागलेली नसून ज्यामुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झालेला नाही. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे ढग गडद होण्यास सुरुवात झाली असून शहरासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये अत्यंत कमी साठा असल्याने सर्वसामान्य नागरिकांना पाणीटंचाईचा (Water Crisis) सामना भविष्यात करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी धुळे तालुक्यातील तरवाडे येथे आज इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान भविष्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या प्रश्नासह खरीप हंगामातील पिकांचा देखील प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचा देखील पिके जगवण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला आहे.

धुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी धुळे तालुक्यातील तरवाडे येथे आज इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने परिस्थिती भीषण आणि भयावह आहे. पिके करपली. जलसाठे आटलेत जनावरांचा चाराही संपलाय. शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करत शेतकरी बंधूंना मदतीचा हात द्यावा. आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करावे. रस्त्यावर उतरुन अजुन तीव्र आंदोलन छेडण्याची वेळ शासनाने आणू नये. तात्काळ दुष्काळ जाहीर न केल्यास धुळे तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चक्का जाम केला जाईल, असा इशारा यावेळी बोरकुंड गावाचे प्रथम माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी दिला.

धुळे जिल्ह्यातील जलसाठा 

धुळे जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे ढग गडद होण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पात केवळ 40 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 25.44 टक्के कमी असून सद्यस्थितीत लघु आणि मध्यम प्रकल्पात 7.4 टीएमसी इतकाच साठा आहे, शहरात यंदा ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण 78 टक्के कमी झाले आहे. शहराला अक्कलपाडा आणि सुलवाडी प्रकल्पातून तर शिरपूर शहराला अनेर करवंद प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. शिंदखेडा शहराला सुलवाडी प्रकल्पातुन पाणीपुरवठा होत असतो. साक्री, पिंपळनेर ची मदार लाटीपाडा जामखेड प्रकल्पावर असून यंदा हे प्रकल्प 100 टक्के भरले आहे तर धुळे शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ऑगस्ट महिन्यात तब्बल 78 टक्के कमी पाऊस झाला असून जिल्ह्यातील 44 लघु प्रकल्पांपैकी 12 लघु प्रकल्प हे पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहे. 

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

धुळे तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी, शेतकरी बंधूंनो हवालदिल न होता परिस्थितीशी दोन हात करा, सर्व पर्याय संपले तरीही टोकाचे पाऊल मात्र उचलू नका, असे भावनिक आवाहनही केले. यावेळी बाळासाहेब भदाणे पुढे बोलताना म्हणाले की, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धुळे तालुक्यासह सर्वदूर बिकट परिस्थिती आहे. शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करत गुरांसाठी चारा छावणी, पाण्याची समस्या असेल तिथे टँकरची सोय, शेतकरींना भरीव मदत आदींचे नियोजन करावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आले. 

इतर महत्वाची बातमी : 



Source link

Kushi Movie Review: समंथा आणि विजय देवरकोंडाची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही आवडली; पाहा काय म्हणाले नेटकरी…

0
Kushi Movie Review: समंथा आणि विजय देवरकोंडाची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही आवडली; पाहा काय म्हणाले नेटकरी…


चाहत्यांना अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांची प्रेमकथा खूप आवडली आहे. ‘कुशी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. चित्रपटाच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहिल्यास दिसते की, चाहते या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.



Source link

विदर्भ वगळता राज्यात तापमानात वाढ, मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरला

0
विदर्भ वगळता राज्यात तापमानात वाढ, मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरला


Maharashtra Weather : सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारल्यानं विविध भागात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची (Farmers) पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशात स्थिती मुंबईसह कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचा पूर्वीचा असलेला जोरदार पावसाचा जोर आता ओसरत चालला आहे. येत्या रविवारपासून (3 सप्टेंबर) पुढील आठवडाभर म्हणजे 10 सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचीच  शक्यता जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. 

सध्या महाराष्ट्रात विदर्भ वगळता दुपारच्या कमाल तापमानातही सरासरी पेक्षा दोन डिग्रीने वाढ झाली आहे. पुढील आठवडाभर म्हणजे कदाचित 10 सप्टेंबरपर्यंत ही स्थिती टिकून राहू शकते. त्यामुळं उष्णतेत झालेली सध्याची अतिवाढ आणि वाऱ्याची शांतता यामुळं खरीप पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची  धडपड सुरु आहे.

 बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती

बैल पोळा सणाच्या आत म्हणजे सप्टेंबर 11 ते 14 दरम्यान पहिल्या आणि अनंत चतुर्दशीच्या आत म्हणजे 25 ते 29 सप्टेंबर दरम्यानच्या दुसऱ्या आणि घटस्थापनेच्या आत म्हणजे 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यानच्या तिसऱ्या अश्या एकूण तीन पावसांच्या आवर्तनापैकी  एखाद्य-दुसऱ्या आवर्तनातून महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. कारण बंगालच्या उपसागरात आज चार विविध ठिकाणी, विविध उंचीच्या पातळीवर चक्रीय वाऱ्यांची स्थिती जाणवत आहे. शिवाय पाच दिवसानंतर म्हणजे चार सप्टेंबर दरम्यान अजून एक चक्रीय वारा प्रणाली स्थिती तिथे तयार होण्याची शक्यता जाणवत आहे. या सर्व घडामोडी देशात सप्टेंबरच्या पावसासाठी अनुकूल ठरु शकतात असे वाटत आहे.

सध्या पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सौराष्ट्र व कच्छ सहीत संपूर्ण वायव्य भारतात लागोपाठ अनेक दिवस पावसाची गैरहजरी आहे. आर्द्रतेच्या टक्केवारीतील होणारी हळूहळू घसरण, आणि निरभ्र आकाश यासारखे वातावरणीय बदल नकळत परतीच्या पावसाचेच वेध दर्शवू लागल्याचे खुळे म्हणाले. पण सध्या राज्यावर एल निनोचे सावट असल्याचे खुळे म्हणाले. 

राज्यातील 15  जिल्ह्यात पावसाची मोठी तूट

राज्यातील 15  जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह  आहेत. 1 जूनपासून जालन्यात फक्त 54 टक्के पाऊस, सांगली जिल्ह्यात फक्त 56 टक्के पाऊस, अमरावतीत सरासरीच्या फक्त 69 टक्के पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिकं माना टाकू लागली आहेत. त्यामुळ आता पावसाची गरज आहे, अन्यथा पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या:

MLA Babandada Shinde : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, उजनीतून पाणी न सोडल्यास दोन हजार कोटींचं नुकसान : बबनदादा शिंदे



Source link