Saturday, July 18, 2026
Home Blog Page 2790

Tula Shikvin Changlach Dhada: अखेर अक्षरा बांधणार अधिपतीशी लग्नगाठ; आठवडाभर रंगणार साखरपुड्याचा सोहळा!

0
Tula Shikvin Changlach Dhada: अखेर अक्षरा बांधणार अधिपतीशी लग्नगाठ; आठवडाभर रंगणार साखरपुड्याचा सोहळा!


Tula Shikvin Changlach Dhada latest episode 31 August 2023: प्रेक्षकांची आवडती मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये आता अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यात एक नवे आणि रोमांचक वळण येणार आहे.



Source link

पाटण येथील ‘ते’ वादग्रस्त शिल्प हटवले | पुढारी

0









पाटण (सातारा) : पुढारी वृत्तसेवा – पाटण येथील एका विद्यालयामध्ये असलेले दादोजी कोंडदेव यांचे वादग्रस्त शिल्प हटवण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडचे पाटण तालुकाध्यक्ष नितीन भिसे-नाईक आणि पाटण शहराध्यक्ष गणेश जाधव यांनी हे शिल्प हटवण्याची मागणी संस्थेकडे केली होती. त्यानंतर संस्थेचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर यांनी पुढाकार घेऊन संबंधित शिल्प हटवल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाटणकर यांचे आभार मानण्यात आले असल्याची माहिती नितीन भिसे नाईक यांनी दिली.

याबाबत नितीन भिसे नाईक यांनी सांगितले की, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु अथवा मार्गदर्शक असल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसल्याचा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या इतिहास संशोधक समितीने काही वर्षांपूर्वी दिला होता. त्यानंतर राज्य शासनाने दादोजी कोंडदेव यांच्या नावे असणारा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार रद्द केला होता, तसेच चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून संबंधित मजकूर वगळला होता. पुणे महापालिकेने देखील लालमहालातील जिजाऊ-बालशिवबा यांच्या सोन्याच्या फाळाने जमीन नांगरात असल्याच्या समूहशिल्पातूनही दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवले होते.

त्यानंतर पाटण येथील एका विद्यालयात असलेल्या या शिल्पाबाबत संस्थेचे मुख्याध्यापक व अमरसिंह पाटणकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिल्प हटवण्याबाबत चर्चा केली होती. त्यांनीही आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला, असल्याचेही नितीन भिसे नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, संबंधित शिल्प खूप जुने असून त्याला काही प्रमाणात चिरा पडल्या होत्या. त्यामुळे ते शिल्प तशा परिस्थितीमध्ये ठेवणे शक्य नसल्याने ते शिल्प हटवून त्या ठिकाणी संस्थेने संस्थेचा सिम्बॉल असलेले शिल्प उभारले असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

त्या विद्यालयात बालशिवबा आणि दादोजी कोंडदेव यांचे सोन्याच्या फाळाने जमीन नांगरत असतानाचे समूहशिल्प होते. संभाजी ब्रिगेडने हे वादग्रस्त शिल्प हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. संस्थेच्या संचालक मंडळाशी चर्चा केल्यानंतर संचालक मंडळाने हे शिल्प हटवण्याचा निर्णय घेतला, असेही नितीन भिसे नाईक यांनी सांगितले.











Source link

Crime: सेक्स्टॉर्शनच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, चिपळूण तालुक्यात खळबळ, आरोपींना पकडण्यात यश

0
Crime: सेक्स्टॉर्शनच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, चिपळूण तालुक्यात खळबळ, आरोपींना पकडण्यात यश


Ratnagiri sextortion News: रत्नागिरीच्या चिपळून तालुक्यातील तेवरे गावात सेक्सटॉर्शनला कंटाळून एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.



Source link

Dada Kondke: नाव कृष्णा असूनही ‘दादा’ का बनले? दादा कोंडकेंच्या आयुष्यातील ‘हा’ किस्सा ऐकलात का?

0
Dada Kondke: नाव कृष्णा असूनही ‘दादा’ का बनले? दादा कोंडकेंच्या आयुष्यातील ‘हा’ किस्सा ऐकलात का?


दादा कोंडके यांचा जन्म मुंबईतल्या नायगावात कृष्णाष्टमीच्या दिवशीच झाला. सहाजिकच आईवडीलांनी बाळाचे नाव कृष्णा ठेवले. पण, या नावाने त्यांना ना आई वडीलांनी कधी हाक मारली, ना त्यांच्या चाहत्यांनी… दादांचा जन्म झाला तेव्हापासून त्यांची शरीरयष्टी फारच किरकोळ होती. दिवस उजाडला की, काही ना काही कारणाने हा चिमुकला कृष्णा आजारी पडायचा. दादांच्या भावाचे आरोग्यही फार काही चांगले नव्हते. यामुळे कृष्णाची आई प्रचंड काळजीत पडली होती. गिरणी कामगार असलेल्या कृष्णाच्या वडीलांनाही काही सुचेना. मग, कुणीतरी त्यांना सांगितले की मुलाला नावाने हाक मारू नका, त्याला तात्या, सोन्या, दादा, आण्णा असं काहीतरी नाव द्या.



Source link

Aaditya Thackeray PC : त्यांनी सांगावं गुवाहाटीचा खर्च कुणी केलेला, सामंतांना आदित्य ठाकरेंचं उत्तर

0
Aaditya Thackeray PC : त्यांनी सांगावं गुवाहाटीचा खर्च कुणी केलेला, सामंतांना आदित्य ठाकरेंचं उत्तर


Uday Samant : ‘जेवणाची एक प्लेट साडेचार हजार रुपयांची, 45 हजारांच्या 65 खुर्च्या’, इंडिया आघाडीच्या बैठकीचा उदय सामंतांनी मांडला खर्च



Source link

Jawan Trailer: ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप…’; शाहरुख खानच्या ‘जवान’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

0
Jawan Trailer: ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप…’; शाहरुख खानच्या ‘जवान’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?


शाहरुख खान ‘जवान’मध्ये खूपच डॅशिंग दिसला आहे. ट्रेलरमध्ये एकाच वेळी अनेक फ्लेवर्स पाहायला मिळत आहेत. शाहरुखच्या ‘पठान’नंतर चाहते ‘जवान’ची वाट पाहत होते. ‘जवान’चा २ मिनिट ४५ सेकंदाचा अधिकृत ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हर आणि सान्या मल्होत्रा यांचे लूक्स पाहायला मिळाले आहेत. यात शाहरुख खानचे अनेक न पाहिलेले अवतारही पाहायला मिळाले आहेत. तर, अनेक दमदार डायलॉग्सही ऐकायला मिळाले आहेत. ट्रेलरमध्ये शाहरुख खान जबरदस्त स्टाईलमध्ये दिसत आहे. त्याचा जबरदस्त अॅक्शन अवतार दाखवण्यात आला आहे.



Source link

Bollywood Nostalgia: ‘डर’च्या सेटवर सनी देओल इतका चिडला की पँटचे खिसेच फाटले! शाहरुख होता रागाचं कारण!

0
Bollywood Nostalgia: ‘डर’च्या सेटवर सनी देओल इतका चिडला की पँटचे खिसेच फाटले! शाहरुख होता रागाचं कारण!


सेटवर वाद झाल्यानंतर त्यावेळी सनी देओल इतका संतापला होता की, त्याने आपले दोन्ही हात खिशात ठेवल्याने त्यांच्या पँटचे खिसेच फाटले होते. अर्थात त्याने रागाने आपल्या हाताच्या मुठी इतक्या जोराने आवळल्या की, खिसे आणि पँटचं फाटली. सनीचा राग पाहून सगळ्यांनीच सेटवरून काढता पाय घेतला होता. खलनायक हा चित्रपटाचा हिरो कसा ठरू शकतो, असा मुद्दा सनी देओलने उपस्थित केला होता. मात्र, चित्रपट तसाच शूट झाल्यानंतर सनीने शाहरुखशी बोलणे टाकलेच. मात्र, त्याने नंतर यशराजचा एकही चित्रपट केला नाही.



Source link

अहमदनगर जिल्हा लम्पिबाधित क्षेत्र म्हणून घोषित, जनावरांच्या वाहतुकीस बंदी;413 गावात प्रादुर्भाव

0
अहमदनगर जिल्हा लम्पिबाधित क्षेत्र म्हणून घोषित, जनावरांच्या वाहतुकीस बंदी;413 गावात प्रादुर्भाव


Lumpy skin Disease : राज्यात पुन्हा लम्पी स्कीन आजारानं (Lumpy skin Disease) डोकं वार काढलं आहे. त्यामुळं राज्यातील पशुपालक चिंतेत आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनावरानी लम्पी स्कीन आजाराची लागण होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 413 गावातील जनावरांनी लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे.  जिल्ह्यात सध्या 930 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा लम्पिबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. लम्पिग्रस्त जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

जिल्ह्यात 413 गावातील 930 जनावरांना लम्पीची लागण 

लसीकरणामुळे कमी झालेला जनावरांमधील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात वाढू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात 413 गावातील 930 जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यातील काही जनावरे गंभीर अवस्थेत असल्याची माहिती देखील मिळाली आहे. राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळं अहमदनगर जिल्हा लम्पिबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच लम्पिग्रस्त जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी

लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी, पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरणाची मोहीम सुरू केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली आहे. पावसाळा सुरू झाला तसा, 15 जूननंतर लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढता वाढू लागला आहे. पावसाळ्यात कीटक, चिलटे, डास माशांचे प्रमाण वाढू लागले तसे जनावरातील लम्पीचा आजार बळावत चालला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:



Source link

Rang Maza Vegla: ‘आयेशा’कडून कोणता गुण घेशील? ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री विदिशा म्हणते…

0
Rang Maza Vegla: ‘आयेशा’कडून कोणता गुण घेशील? ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री विदिशा म्हणते…


मालिकेत खलनायिका साकारात असल्याने विदिशा म्हणाली की, आयेशाकडून शिकावं किंवा तिच्याकडून एखादा गुण घ्यावा असं काहीच नाही. पण, जर मी आयेशाकडून काही गुण घेतले तर माझ्या आयुष्यातील सगळी माणसंच उद्ध्वस्त होतील. पण, आयेशाकडून घ्यावा असा एक गुण आहे. एखाद्यावर जीवापाड प्रेम करणं हा गुण मी आयेशाकडून नक्की घेईन. कारण, आयेशा कार्तिकवर जितकं प्रेम करते, तेव्हढं प्रेम मी खऱ्या आयुष्यात कुणावरही केलेले नाही. त्यामुळे मी तिच्यासारखं प्रेम करायला नक्की शिकेन.’



Source link

Ganpati Special Train : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, कोकणात जाण्यासाठी २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या

0
Ganpati Special Train : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, कोकणात जाण्यासाठी २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सीएसटी ते मडगाव आणि सीएसटी ते सावंतवाडी या दोन्ही गणपती विशेष रेल्वेगाड्यांमध्ये प्रत्येकी दोन डब्यांची वाढ करण्यात येत असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची बुकिंग फुल्ल झाली असून वेटिंग लिस्ट अद्यापही शेकडोंच्या घरात आहे. त्यामुळं प्रवाशांचे आणखी हाल होऊ नये, यासाठी रेल्वेने कोकणात जाणाऱ्या रेल्वेंना अधिकचे दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मुंबई-मडगाव आणि मुंबई-सावंतवाडी रोड या रेल्वेतील डब्यांची संख्या २० हून २२ वर पोहचणार आहे.



Source link