Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2763

Nashik : नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, गंगापूर धरणातून विसर्ग थांबवला, गोदावरीचा पूरही ओसरला!

0
Nashik : नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, गंगापूर धरणातून विसर्ग थांबवला, गोदावरीचा पूरही ओसरला!


नाशिक : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात दोन दिवस धो धो बरसल्यानंतर काल दुपारपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या पावसामुळे गोदावरीला आलेला पूरही ओसरला असून नाशिकसह गंगापूर (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून विसर्गही घटविण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांना दोनच दिवस गोदावरी खळाळून वाहताना पाहायला मिळाली. कालपासून पावसाने पुन्हा उघडीप दिली असून अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे. 

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने (Nashik rain) सुरवात केली. त्यानंतर जवळपास 48 तास नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले, झाडे उन्मळून पडली, गोदावरीला हंगामातील (Godawari) पहिला पूर आला. या पावसाने जिल्हावासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र हा आनंद काही तासांपुरताच ठरला. कारण दोन दिवस मुसळधार हजेरी लावल्यानंतर शनिवारी दुपारपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने गंगापूरसह अन्य धरणांमधील विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला आलेला पुरही ओसरला आहे. गोदाकाठावरील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. 

दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले होते. गंगापूर धरण 95 टक्के भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला होता. गोदावरी नदीकाठी पूरसदृश स्थिती होती. पावसाचा जोर कमी झाला असल्याने गंगापूर धरणातून (Gangapur Dam) विसर्ग कमी करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 9 हजार 88 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. शनिवारी सकाळी 6 वाजता तो कमी करून 5 हजार 432 करण्यात आला. मात्र त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग हळूहळू थेट बंद करण्यात आल्याने गोदावरी पूर परिस्थिती पूर्वपदावर आली. नाशिक शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी पहाटेपासून अचानक पावसाचा जोर कमी झाला. गंगापूर धरण परिसरातही पावसाने चांगलीच उघडीप दिली. यामुळे धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्याने नदीची पूरस्थिती घटल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

गोदाकाठावरील परिस्थिती पूर्वपदावर 

दोन दिवस नाशिक शहरासह सर्वदूर झालेल्या पावसाने सर्वांना मोठा दिलासा मिळाला. शुक्रवारी ऑरेंज अलर्ट असल्यामुळे जोरदार पाऊस झाला. शनिवारी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ होता. यामुळे शहरासह जिल्ह्यातही फारसा जोरदार पाऊस झाला नाही. परिणामी शुक्रवारी वेगाने विविध धरणांमधून वाढविलेला विसर्ग शनिवारी सकाळपासून तितक्याच वेगाने पाटबंधारे खात्याकडून कमी करण्यात आला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होताच गोदावरीची पूरस्थितीही हटली. एकूणच गोदावरीचा पूर रात्रीपर्यंत पूर्णतः ओसरला होता. शनिवारी दुपारनंतर गोदाकाठावरील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले होते. शुक्रवारच्या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची दैनावस्था झाली. भुयारी गटारींचे चेंबरही ठिकठिकाणी तुडुंब भरुन वाहत होते. शनिवारीही काही भागात चेंबरमधून पाणी ओथंबून वाहताना नजरेस पडले.

 

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Rain : गोदामाई पाहुणी आली! नाशिक जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटिंग, डोळे दिपवणार गोदावरीचे विहंगम दृश्य

 



Source link

Ajit Pawar Karad : कराडमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत

0



<p>Ajit Pawar Karad : कराडमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत</p>



Source link

 इंडिया नावाची भीती वाटायला लागली, आम्ही नाव बदलणार नाही, पंतप्रधान बदलणार : उद्धव ठाकरे

0
 इंडिया नावाची भीती वाटायला लागली, आम्ही नाव बदलणार नाही, पंतप्रधान बदलणार : उद्धव ठाकरे


जळगाव : सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाल्यांनतर इंडीया (INDIA) नाव आलं, मात्र यानंतर या नावाची भीती वाटायला लागली. मग आता पक्ष फोडायचे कारभार सुरु केले, त्यानंतर आता इंडिया नावाचं बदलायचा घाट घातला जात आहे. पण आम्ही इंडिया, भारत, हिंदुस्थान बोलणारच, बरं ते भारत तरी म्हणतात. नाहीतर स्वतःचे नाव देऊन टाकतील. पण आम्ही नाव बदलणार नाही, तर पंतप्रधान (PM) बदलणार असा विश्वास शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी व्यक्त केला आहे. 

आज उद्धव ठाकरे हे जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर असून ते जाहीर सभेत बोलत होते. यावेळी इंडिया हे नाव बदलण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, एकीकडे भाजपकडून पक्ष फोडाफोडीचं राजकरण सुरु आहे. सत्तेसाठी पक्षांचे गळे घोटण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर देशात नवी आघाडी निर्माण झाली. या सत्तेला पायउतार करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन इंडियाची निर्मिती झाली, मात्र या इंडिया निर्मितीमुळे अनेकांना पोटदुखी होऊ लागली आहे. थेट देशाचे नावच बदलण्याचा घाट घातला जात आहे. मात्र आम्ही इंडिया, भारत, हिंदुस्थान बोलणारच, बरं ते भारत तरी म्हणतात. देशाला सुद्धा स्वतःच नाव देतात की काय? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

उद्धव ठाकरे बोलत असताना कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात होत्या. देश का नेता कैसा हो, उद्धव ठाकरे जैसा हो. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्येच थांबवत, ‘देश का नेता नाही, देश का नागरिक कैसा हो, या घोषणा देण्याची वेळ आली आहे. ‘देश का नागरिक कैसा हो, शिवाजी महाराज के मावळे जैसा हो, इंडिया आघाडीनंतर केंद्र सरकार घाबरले आहे, कधी पडेल काही सांगता येत नाही. आधी त्यांना वाटत होते, आम्हाला आव्हान कोणी देऊ शकणार नाही’, मात्र सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाल्यांनतर इंडिया नाव आलं, यानंतर त्यांना इंडिया नावाची भीती वाटायला लागली, आता इंडिया आघाडी केली तर नाव बदलून टाकत आहेत. बरं ते भारत तरी म्हणतात. नाहीतर स्वतःचे नाव देऊन टाकतील. देशाला सुद्धा स्वतःच नाव देतात की काय? पण आम्ही नाव बदलणार नाही, पंतप्रधान बदलणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

लोकांचं प्रेम मिळतंय… 

उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर दौऱ्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी अहमदनगर दौरा केला. तेव्हा लोक सांगत होते, तुमच्या पायगुणाने पाऊस आला. मी सांगितले, निसर्गाची कृपा आहे, मी निमित्त मात्र आहे, अनेक माता भगिनी औक्षण करत होत्या, त्यांना थांबवत, आता ओवाळू नका, तुम्ही जेव्हा आनंदी व्हाल, तेव्हा तुमच्या आनंदात सहभागी होईल. त्याच दिवशी एक लहान मुलगा शिदोरी घेऊन आला. त्याचंही कौतुक वाटलं. एवढं सगळं प्रेम लोक देत आहेत. असा कोणता राजकारणी आहे, ज्याला एवढं प्रेम मिळत आहे. मोदी असो कोणीही असो, सर्वजण भाषण करताना उद्धव ठाकरे नाव घेतात. या लोकांनी माझा पक्ष संपवला ना, मग माझे नाव का घेतात.” 

इतर महत्वाची बातमी : 

Udhhav Thackeray : कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना नाही, भाजपचे गुलाम बनू नका, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला 



Source link

अशी कोणती जादूची कांडी फिरली आणि दोन राजे एकत्र आले! साताऱ्यात रंगली चर्चा 

0


सातारा : कालपर्यंत एकमेकांचे शत्रू असलेले साताऱ्यातील (Satara News) भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांच्यातील संघर्ष अवघ्या एका रात्रीत नेमका संपला कसा? असा प्रश्न सध्या सातारकर विचारत आहेत त्याचे कारणही तसेच आहे. साताऱ्यात शिवतीर्थावर ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाला सुरुवात आज साताऱ्यातून (Satara) झाली. या मोहिमेच्या अंतर्गत त्याचे उद्घाटन साताऱ्यातील पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सुरुवात झाली. या शुभारंभाला दोन्ही राजे एकमेकांना खेटून उभे राहिले होते. एवढंच काय उदयनराजे भोसले जेव्हा कार्यक्रमस्थळी आले तेव्हा चक्क उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना वाकून मुजराही केला. 

अवघ्या बारा तासामध्ये भाजप वरिष्ठ नेत्यांनी अशी नेमकी काय जादूची कांडी फिरवली हे मात्र गुलदस्त्यात असले तरी सातारकरांना हायसे वाटले. असा चमत्कार या अगोदर इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांना जमला नाही तो आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या जादूच्या कांडीने दाखवला यात शंका नाही. मात्र, ही जादूची कांडी नेमकी कोणी आणि कोणत्या आश्वासनावर फिरवली याबाबत मात्र नक्कीच चर्चा होणार आहे. 

दोन महिन्यांपूर्वी साताऱ्यात राडा

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी शिवराज ढाब्याजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेच्या भूमिपूजन कार्यक्रमामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावला होता. मात्र, तरी देखील उदयनराजेंचा विरोध झुगारुन शिवेंद्रराजे भोसले यांनी भूमिपूजन केलं होतं. या प्रकारानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. 

शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचं भूमिपूजन होणार असतानाच उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले होते आणि तिथे असलेलं साहित्य फेकून दिलं होतं. तसंच, एक कंटेनरही जेसीबीने नष्ट केला होता. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारुन त्यांच्यासमोर भूमिपूजन केलं. यानंतर उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजेंसह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गर्दी जमवणे, दमदाटी आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

संभाजीराजे छत्रपती यांचा भावी ‘मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख! नाशिकमध्ये झळकले बॅनर! म्हणाले…

0
संभाजीराजे छत्रपती यांचा भावी ‘मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख! नाशिकमध्ये झळकले बॅनर! म्हणाले…


नाशिक : सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक राजकीय नेत्यांचे दौरे सुरु झाले असून जिल्ह्या जिल्ह्यात शक्तिप्रदर्शनासोबत बॅनरबाजी करण्यात येत आहे. याच दौऱ्यांच्या निमित्ताने अनेक नेत्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात येत आहे. अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि आता संभाजीराजे छत्रपती यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. 

स्वराज्य संघटनेचा (Swaraj Sanghatana) उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे आज नाशिकमध्ये (Nashik) उद्घाटन झाले. या प्रसंगी संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) बोलत होते. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करतो, एका चांगल्या जागी उद्घाटन झाले. या कार्यालयाचे माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले जाईल, अपेक्षेपेक्षा जास्त चांगले कार्यालय झाले आहे, नाशिक माझा आवडता जिल्हा असून येथील जनता नेहमीच स्वराज्य पक्षाच्या पाठीशी असल्याने आम्ही देखील जनतेच्या कामांसाठी नेहमीच तत्पर आहे.” 

तसेच नाशिक (Nashik) शहरात स्वराज्य पक्षाचे भव्य कार्यालय सुरु करण्यात आले. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती नाशिकला आले होते, त्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. यात अनेक बॅनर्सवर भावी मुख्यमंत्री म्हणून संभाजीराजे छत्रपती यांचा उल्लेख करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यावरुन संभाजीराजे म्हणाले की, “बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे मी आभारी आहे. बॅनरवर लिहिणे आणि होणे ही गोष्ट वेगळी आहे. माझ्या डोळ्यासमोर एकच अजेंडा असून स्वराजच्या माध्यमातून जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचणे. आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर कोणीच खुश नाही, राज्य सत्तेसाठी काही काही गोष्टी सुरु आहे.”

मनोज जरांगे यांनी तब्येत सांभाळावी 

तसेच मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरु असून मागील काही दिवसांत हे उपोषण चांगलेच चर्चेत आले आहे. या उपोषणस्थळी अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. सरकारच्या दोन तीन शिष्टमंडळांनी भेटी देऊनही अद्याप मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नाही. संभाजीराजे छत्रपती हे देखील उपोषणस्थळी जाऊन आलेले आहेत. यावर ते नाशिकमध्ये म्हणाले की, “मी माझी भूमिका सविस्तर मांडली आहे. भावना आणि न्यायिक या दोन्हींचे समेट कसे करता येईल हे महत्वाचे आहे. मनोज जरांगे यांनी तब्येत सांभाळावी, त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जाता येईल, याबाबत चर्चा करावी. माझ्या दृष्टीकोनातून प्रश्न सोडवत असताना जीव देखील महत्वाचा आहे.” 

सरकारने टिकणारे आरक्षण द्यावे 

आरक्षणासाठी आतापर्यंत मराठा समाजातील 49 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीदेखील सरकारकडून प्रश्न सुटलेला नाही. मनोज जरांगे यांनी त्यांची तब्येत सांभाळून आणि सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जाता येईल, याबाबत चर्चा करावी. भावना आणि न्यायिक मुद्दा या दोन्ही गोष्टींचा समेट कसा करता येईल हे महत्त्वाचे असून सरकारने देखील टिकणारे आरक्षण द्यावे, असे मत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिकमध्ये व्यक्त केले. 

इतर महत्वाची बातमी : 

Sambhajiraje Chhatrapati : …अन्यथा अध्यादेश काढून दिलेले आरक्षण ही मराठ्यांची फसवणूक ठरेल; संभाजीराजे छत्रपती



Source link

Genelia D’Souza: जिनिलीया डिसुझाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’? ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांनी बांधला कयास!

0
Genelia D’Souza: जिनिलीया डिसुझाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’? ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहत्यांनी बांधला कयास!


त्यांना पाहून चाहत्यांनी तिसऱ्या बाळाच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला आहे. एकीकडे अभिनेत्रीच्या लूकची चर्चा आहे, तर दुसरीकडे सोशल मीडिया यूजर्स रितेश आणि जिनिलीयाच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे का, असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ज्या प्रकारे अभिनेत्री पोटावर हात ठेवताना दिसली, त्यावरून लोकांना वाटत आहे की, लवकरच अभिनेत्री ही खुशखबर जाहीर करेल. आता चाहतेही त्या क्षणाची वाट पाहत आहेत.



Source link

Urvashi Rautela: आता ‘बिग बॉस’ विजेत्या एल्विश यादववर फिदा झालीये उर्वशी रौतेला! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

0
Urvashi Rautela: आता ‘बिग बॉस’ विजेत्या एल्विश यादववर फिदा झालीये उर्वशी रौतेला! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…


तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गाण्याची तयारी करताना दिसली आहे. आता तिच्या या गाण्याचे पोस्टर रिलीज झाले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना उर्वशीने लिहिले की, ‘मी माझ्या हिरो एल्विशसाठी गाण्याचे बोल पाठ करत आहे.’ एल्विशने उर्वशीचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे.



Source link

Pappu Shinde Suicide : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची येरवडा जेलमध्ये आत्महत्या

0
Pappu Shinde Suicide : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची येरवडा जेलमध्ये आत्महत्या


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास कोपर्डी प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदेने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने पप्पू शिंदेला दोषी ठरवलं होतं. आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी, जन्मठेप, हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २०१७ साली आरोपी पप्पू शिंदेला शिक्षा सुनावली होती. परंतु याच आरोपीने आत्महत्या केल्याने पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे.



Source link

Maharashtra Politics : बालेकिल्ल्यात पवार विरुद्ध पवार संघर्ष | पुढारी

0









हरिष पाटणे, सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष उफाळणार आहे. राष्ट्रवादीत झालेल्या दुफळीनंतर सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या शरद पवारांचे जसे दणक्यात स्वागत झाले. तसेच स्वागत अजित पवारांचे कोल्हापूरला जाताना सातारा जिल्ह्यात करण्याची तयारी अजित पवार गटाने केल्याने संघर्षाला धार चढणार आहे. दोन्ही पवारांच्या या भांडणात निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र घालमेल वाढली आहे.

सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. काँग्रेस विचारांच्या या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी चांगलेच बस्तान बसवले. राज्यात कुठेही जेवढे यश मिळाले नाही तेवढे यश शरद पवारांना सातारा जिल्ह्यात मिळाले. स्थापनेवेळीच 9 आमदार व 2 खासदार देणारा सातारा जिल्हा पवारांसाठी बालेकिल्ला ठरला. शरद पवार यांनी सातारा जिल्ह्याची धुरा अजित पवार यांच्या हातात दिल्यानंतर त्यांनीही सातारा जिल्ह्यातील 11ही तालुक्यांमध्ये आपला वट निर्माण केला.

अजित पवार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी अत्यंत वेगाने पक्ष संघटना तर वाढवलीच; मात्र विकास कामेही दर्जेदार केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतःचा स्वतंत्र गटही याच कालावधीत अजितदादांनी निर्माण केला, पुढे तो वाढवलाही. अलीकडच्या काही वर्षांत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिरकाव केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बलाढ्य नेते आज सातारा जिल्ह्याची भारतीय जनता पार्टी झाली आहे. एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये सामना रंगला होता तेव्हा अचानक बॉम्बस्फोट झाल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी माजली. सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर कमांड असलेल्या अजितदादांनी थेट सत्तेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातारा जिल्ह्यात उघड- उघड दोन गट पडले. अजितदादा सत्तेत गेल्यानंतर हक्काचा सातारा जिल्हा ताब्यात ठेवण्याच्या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यात जोरदार एंट्री केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधिस्थळावरून स्वकीय व विरोधकांविरोधात एल्गार पुकारला. आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर या तीन माजी मंत्र्यांनी शरद पवारांना साथ दिली. शरद पवारांची जोरदार रॅलीही सातार्‍यातून निघाली. या रॅलीत सहभागी राहिलेले आ. मकरंद पाटील मात्र दुसर्‍याच दिवशी अजितदादा पवार गटात सामील झाले.

सत्तेत सहभागी झाल्यापासून अजितदादा एकदाही सातार्‍यात आलेले नाहीत. दि. 10 सप्टेंबर रोजी त्यांची कोल्हापूर येथे सभा आहे. कोल्हापूर येथे सभेला जाण्यासाठी ते राष्ट्रीय महामार्गावरून सातार्‍यातून जाणार आहेत. अजितदादा प्रथमच सातार्‍यावरून जाणार असल्याने त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यासाठी राष्ट्रवादीचा दुसरा गट सरसावला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर या प्रक्रियेत अग्रभागी आहेत. आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण हेही अजितदादांच्या स्वागताची जय्यत तयारी करत आहेत. महामार्गावर जे स्वागत शरद पवारांचे झाले, तेवढ्याच दणक्यात अजित पवारांचे स्वागत करण्याचे नियोजन आहे. उघड उघड दोन पवार गटांत संघर्षाची चिन्हे आहेत. कोणाचे स्वागत जोरात होणार यासाठीही ईर्ष्या आहे. त्यातून कोणता पवार गट मोठा हे दाखवले जाणार आहे. आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे.











Source link

Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन!

0
Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन!


‘वेलकम ३’ या आगामी चित्रपटाचे अधिकृत शीर्षक ‘वेलकम टू द जंगल’ करण्यात आले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिशा पाटनी, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांसारख्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या चित्रपटात संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची जोडी दिसणार असल्याने चाहत्यांना ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ची झलकही मिळणार आहे. याशिवाय परेश रावलही आपल्या कॉमेडीने लोकांना हसवणार आहे.



Source link