Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2737

मुंबईच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा, रायगड किल्ल्याची प्रतिकृती केली साकार

0
मुंबईच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा, रायगड किल्ल्याची प्रतिकृती केली साकार


मुंबई : मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध गणेश गल्ली अर्थातच मुंबईच्या राजाचा (Mumbai Raja) प्रथम दर्शन सोहळा रविवार (17 सप्टेंबर) रोजी पार पडला. गणेश गल्लीच्या मंडळाचं यंदाचं हे 96 वं वर्ष आहे. तर यंदाच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा मुंबईच्या राजाच्या दरबारात साकारण्यात आला आहे. त्यामुळे बाप्पाच्या पाहुणचारासाठी आता संपूर्ण मुंबईनगरी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.  गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात माहित आहे.

‘हे’ आहे देखाव्याचं वैशिष्ट्य

यंदा मुंबईच्या राजाच्या दरबारात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकार करण्यात आला आहे. पुढील वर्षी 350 शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईचा राजाचा दरबार हा सजवण्यात आलाय. तर याचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे यासाठी थेट रायगडावरुन माती आणून तिचं पूजन करण्यात आलं आहे. मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी गणेश गल्ली अर्थातच मुंबईच्या राजाचा मान हा पहिला आहे. त्यामुळे हा गणपती देखील मुंबईकरांसाठी तितकाच विशेष आहे.

कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

दरम्यान गणेश भक्तांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मानाच्या या पहिल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी बरीच गर्दी केली होती. तर यावेळी मंडळाच्या वतीने  सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, हॉस्पिटल इमर्जन्सी, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सोयी सुविधा याठिकाणी उपलब्ध केल्या आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्याआधी मुंबईच्या राजाची पहिली झलक ही गणेश भक्तांना पाहायला मिळाली. 

मुंबईतील गणेशोत्सव 

मुंबापुरीसाठी गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा सण असतो. मुंबईतर त्यांच्या लाडक्या बाप्पाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे या दहा दिवसांमध्ये मुंबईकरांचा उत्साह हा वाखाडण्याजोगा असतो. त्यातच मुंबईतील मानाच्या गणपतींची शान काही औरच असते. शुक्रवार (15 सप्टेंबर) रोजी लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शन सोहळा पार पडला. लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी लालबाग परिसरामध्ये तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान तीच गर्दी आज मुंबईच्या राजाच्या ठिकाणी देखील पाहायला मिळाली. 

यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दर्शन हे दोन्ही मंडळांकडून साकारण्यात आलं आहे. त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासोबत शिवराज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव देखील भक्तांना घेता येईल. तर यासाठी मंडळांकडून विशेष तयारी देखील करण्यात आली आहे. मुंबईतील या परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलाय. त्यामुळे मुंबईकरांचा गणेशोत्सव यंदाही धुमधडाक्यात होणार यात शंका नाही. 

हेही वाचा : 

Lalbaugcha Raja : ‘ही शान कोणाची…’ लालबागच्या राजाची पहिली झलक, राजाचं 90व्या वर्षात पदार्पण; पाहा व्हिडिओ



Source link

सातारा: अजित पवारांचा दंगलग्रस्त पुसेसावळी गावाचा दौरा, मृताच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

0


पुसेसावळी, सातारा:  एका व्हायरल पोस्टमुळे साताऱ्यातील पुसेसावळी (Pusesawali) गावात अचानक हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात एकाचा बळी गेला होता. गावातील स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुसेसावळी गावाचा दौरा केला. यावेळी अजित पवारांनी हिंसाचारात मृत झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. 

सोशल मीडियावरील पोस्टमुळे भावना दुखावल्याचे सांगत जमाव आक्रमक झाला होता. पुसेसावळी या गावातील एका समूहाने धार्मिक स्थळावर हल्ला चढवला आणि यात एकाचा बळी गेला. या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या गावात दोन्ही समूहातील लोकांची गाठ भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शांततेबाबत त्यांनी आवाहन केले. 

यावेळी अजित पवारांनी दंगलीत मयत झालेले नुरन हसन लियाकत शेख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. नुरन यांच्या पत्नीने हिंसाचार कसा झाला, याची माहिती दिली. अजित पवारांनी यावेळी सविस्तरपणे ऐकून घेतले. कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर स्थानिकांशी चर्चा करताना अजित पवारांनी म्हटले की, या प्रकरणात लक्ष घालणार आहे. दोषींवर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अनेक लोक पिढ्यानपिढ्या एकत्रिपणे गावात राहत आहेत…कधीही दंगल झाली नाही.. आता पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घ्या असेही आवाहन अजित पवारांनी केले.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाल्याने 10 सप्टेंबर रोजी जाळपोळ झाल्याची घटना घडली.  या प्रकरणात सातारा पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्टवर दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांकडे विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. हिंसाचारात धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली होती. 

या घटनेनंतर सातारा पोलिसांनी तात्काळ पावले उचलत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तीन दिवस जिल्ह्यात इंटरनेट बंदी करण्यात आली. त्याशिवाय, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी हिंसाचार प्रकरणात 34 जणांना अटक केली असून  काही आरोपींचा शोध सुरू आहे. 

 



Source link

Jacky Shroff: जॅकी श्रॉफ यांची मराठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी

0
Jacky Shroff: जॅकी श्रॉफ यांची मराठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी


‘वेड’ चित्रपटातील ‘सुख कळले’ हे गीत आणि ‘महाराष्ट्र शाही’र चित्रपट सर्वोत्कृष्ट संगीतासाठी गौरविण्यात आला. या दोन्ही चित्रपटांसाठी अजय आणि अतुल यांना सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून श्रेया घोषाल(‘वेड’) आनंदी जोशी (तमाशा LIVE) आणि सर्वोत्कृष्ट गायक म्हणून आदर्श शिंदे(रावरंभा)पुरस्काराचे मानकरी ठरले.’घर बंदूक बिरयानी’ सर्वोत्कृष्ट कथा (नागराज मंजुळे, हेमंत अवताडे), ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट पटकथा(मधुगंधा कुलकर्णी-परेश मोकाशी) तर सर्वोत्कृष्ट संवादाचा मान ‘घर बंदूक बिरयानी’ (नागराज मंजुळे, हेमंत अवताडे) ने पटकावला.



Source link

Sara Kahi Tichyasathi: निशीसोबत ओवीलाही मिळणार खोतांच्या घरच्या लेकीचा मान! मालिकेत पुढे काय घडणार?

0
Sara Kahi Tichyasathi: निशीसोबत ओवीलाही मिळणार खोतांच्या घरच्या लेकीचा मान! मालिकेत पुढे काय घडणार?


सध्या ओवी उमासोबत खोतांच्या घरात राहत आहे. मात्र, आता सुटक संपलं, कार्यही झालं आता पाहुण्यांनी त्यांच्या घरी परत जावं, असं फर्मान खोतांनी काढलं आहे. परंतु, ओवी आता इथेच राहणार हे खोतांना कसं समजवावं या पेचात उमा अडकली आहे. मात्र, आता ती धीर एकवटून आपली ही मागणी घरात बोलून दाखवणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार, हे येत्या भागांमध्ये कळणार आहे.



Source link

Asia Cup 2023: ६ विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजवर अभिनेत्री नाराज, केले सवाल

0
Asia Cup 2023: ६ विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजवर अभिनेत्री नाराज, केले सवाल


आशिया कपच्या फायनलमध्ये २९ वर्षीय सिराजने एकाच षटकात ४ विकेट घेतल्या. या सामन्यात त्याने ७ षटकांत २१ धावा देऊन ६ बळी घेतले. सिराजने ५ विकेट घेण्यासाठी केवळ १६ चेंडू घेतले. त्याने चमिंडा वासची बरोबरी केली. २००३ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या चामिंडा वासनेही अशी कामगिरी केली होती. सामन्यानंतर मोहम्मद सिराज त्याच्या कामगिरीवर खूप खूश दिसत होता.



Source link

Bhau Kadam: भाऊ कदम आणि ओंकार भोजने येणार एकत्र, दिसणार या चित्रपटात

0
Bhau Kadam: भाऊ कदम आणि ओंकार भोजने येणार एकत्र, दिसणार या चित्रपटात


विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे. येत्या २४ नोव्हेंबरला ‘एकदा येऊन तर बघा’ ही मनोरंजनाची सुपरफास्ट एक्स्प्रेस आपल्या भेटीला येणार आहे.



Source link

Nava Gadi Nava Rajya: अखेर योजनाला झाली चुकांची उपरती! राघववरील आरोप मागे घेत म्हणाली…

0
Nava Gadi Nava Rajya: अखेर योजनाला झाली चुकांची उपरती! राघववरील आरोप मागे घेत म्हणाली…


यानंतर योजनाने थेट टीव्ही मुलाखत देत आपले आरोप खोटे असल्याचे म्हटले. आपण हे केवळ सूड भावनेने केल्याचे देखील तिने स्पष्ट केले. याशिवाय तिने लावलेले सगळे आरोप देखील मागे घेतली. यावेळी ती म्हणाली की, ‘राघव कर्णिक यांनी आपल्याला अगदी लहान बहिणीप्रमाणे प्रेम दिले होते. त्यांनी मला नेहमीच खूप मदत केली होती. मात्र, मीच सूड भावनेतून राघवविरोधात एक व्हिडीओ बनवला, ज्यात त्यांनी आपल्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोपही केला. मात्र, आता मी स्वतः माझी चूक मान्य करून त्यांची जाहीर माफी मागत आहे.’ यानंतर आता सगळेच कर्णिक खूश झाले असून, त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.



Source link

Uday Samant: रस्त्यांचं प्रलंबित काम पुर्ण करण्याचे रवींद्र चव्हाण यांचे प्रयत्न- उदय सामंत

0
Uday Samant: रस्त्यांचं प्रलंबित काम पुर्ण करण्याचे रवींद्र चव्हाण यांचे प्रयत्न- उदय सामंत



<p>Uday Samant: रस्त्यांचं प्रलंबित काम पुर्ण करण्याचे रवींद्र चव्हाण यांचे प्रयत्न- उदय सामंत&nbsp;</p>



Source link

Premachi Goshta: सईमुळे पुन्हा एकदा मुक्ता-सागर आमनेसामने, काय घडणार आजच्या भागात?

0
Premachi Goshta: सईमुळे पुन्हा एकदा मुक्ता-सागर आमनेसामने, काय घडणार आजच्या भागात?



Premachi Goshta serial Update: ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या मालिकेत मुक्ता पात्र तेजश्री प्रधान साकारताना दिसत आहे.



Source link

Ganesh Chaturthi 2023: धमाकेदार गाण्यांसोबत करा गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन! ‘ही’ प्लेलिस्ट तुमच्यासाठी…

0
Ganesh Chaturthi 2023: धमाकेदार गाण्यांसोबत करा गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन! ‘ही’ प्लेलिस्ट तुमच्यासाठी…


Ganesh Chaturthi 2023: आता गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची तयारी पूर्ण होत आली आहे. बाप्पाचा मखर, वेगवेगळा प्रसाद, मोदक सगळ्याचीच लगबग सुरू झाली आहे. अवघ्या देशभरात हा सण जल्लोषात साजरा केला जातो. आता गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जवळपास पूर्ण होत आलीच असेल. आता बाप्पाला आणायला जाताय आणि गाणी नाही, हे कसं शक्य आहे बरं.. पण, आता अशा खास गाण्यांची शोधाशोध करत असला तर, ही यादी खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या गाण्यांसह तुम्ही जल्लोषात बाप्पाचं आगमन करू शकता.



Source link