Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 264

पिंपरी चिंचवडमध्ये रक्तरंजित घटना; आर्थिक व वैयक्तिक वादातून १८ वर्षीय तरुणीची हत्या

0
पिंपरी चिंचवडमध्ये रक्तरंजित घटना; आर्थिक व वैयक्तिक वादातून १८ वर्षीय तरुणीची हत्या

पुणे :- पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री घडलेल्या एका खळबळजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. १८ वर्षीय कोमल भरत जाधव या तरुणीचा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने आपल्या भाच्याच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.

कोमल जाधव ही वाल्हेकरवाडीत कृष्णामाई परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिचा शेजारी उदयभान यादव (वय ४५) हा मूळचा उत्तरप्रदेशचा असून कामानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास होता. कोमल व उदयभान यांच्यात वैयक्तिक संबंध व आर्थिक व्यवहार असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

या वादातूनच उदयभानने कोमलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. रविवारी रात्री त्याने आपल्या भाच्याच्या मदतीने हेल्मेट घालून दुचाकीवरून येत कोमलला घराबाहेर बोलावले. ती खाली येताच धारदार शस्त्राने तिच्यावर अचानक हल्ला करून तिचा जागीच खून केला.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत उदयभान यादव आणि त्याच्या भाच्याला अटक केली. या हत्येमागे आर्थिक व भावनिक गुंतवणूक असल्याचं तपासात समोर आलं आहे. सध्या संपूर्ण वाल्हेकरवाडी परिसरात भीतीचं व दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

मेहुणीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याचा वाद – इस्टेट एजंटचा  खून

0
मेहुणीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याचा वाद – इस्टेट एजंटचा  खून

पुणे | प्रतिनिधी – साहस Times कात्रज परिसरात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली असून, मेहुणीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे एका इस्टेट एजंटचा बांबू व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत खून करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

मृत इस्टेट एजंटचे नाव मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, मांगडेवाडी, कात्रज) असे आहे. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२) आणि केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघेही रा. खोपडेनगर, निंबाळकरवाडी) हे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या मेहुणीचे रोहित याच्याशी अनैतिक संबंध होते. मनोहर शिंदे यांनी याला वारंवार विरोध केला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत होते. शुक्रवारी रात्री रोहितने गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे मनोहरला गाठले व साथीदारांच्या मदतीने त्याला बांबूने, लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने तपास सुरु केला. आरोपींचा माग काढण्यासाठी दोन पथके नेमण्यात आली होती. रोहितला पुण्यातून तर केशवला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अटक करण्यात आली आहे.

या खुनाच्या घटनेमुळे कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

इन्स्टाग्राम मेसेजचा राग; तरुणाचे अपहरण करून विष पाजून हत्या – कोपरगावात चार अटकेत

0
इन्स्टाग्राम मेसेजचा राग; तरुणाचे अपहरण करून विष पाजून हत्या – कोपरगावात चार अटकेत

कोपरगाव (जिल्हा अहमदनगर) : इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवल्याच्या रागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बहिणीला अश्लील मेसेज पाठवल्याचा राग मनात धरून भावंडांनी मिळून साईनाथ गोरक्षनाथ काकड (वय २४, रा. डोहाळ, ता. राहाता) या युवकाचे अपहरण केले आणि त्याला अमानुष मारहाण करत विष पाजून हत्या केली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील अहिल्यानगर परिसरात घडली.

या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी रुपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने आणि राहुल अशोक चांदर या चौघांना अटक केली असून एक महिला आरोपी फरार आहे. तसेच एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनाथ काकड व रुपाली लोंढे यांच्यात पुण्यात असताना ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर सोशल मीडियावर मेसेजमध्ये झाले. मात्र, काही मेसेजमुळे वाद निर्माण झाला होता. याच रागातून आरोपींनी मिळून हा प्रकार घडवला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपासातून अंदाज आहे.

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. आरोपींनी साईनाथला गाडीतून जबरदस्तीने घेऊन जाऊन कोपरगाव परिसरात ठार केल्याचा आरोप आहे.

पाकिस्तानविरोधात भारताचे ऑपरेशन ‘केलर’; सर्वात मोठ्या दहशतावद्याचा खात्मा

0
पाकिस्तानविरोधात भारताचे ऑपरेशन ‘केलर’; सर्वात मोठ्या दहशतावद्याचा खात्मा


Operation Keller:   जम्मू – भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविरामची घोषणा करण्यात आलीआहे. यानंतर 48 तासांत दक्षिण काश्मीरातील शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. यात लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.  या ठिकाणी ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा यंत्रणांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. 

13 मे रोजी शोपियानातील केलर इथल्या जंगलात सुरक्षा दलाने ही कारवाई केली. सीमेवरील गोळीबार बंद होताच सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु केले.  शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवान यांच्यात चकमक झाली. यात लश्कर-ए-तोयबाचा कमांडर शाहीद कुट्टे आणि अदनान शफीसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आले.  यातील तिसरा दहशतवादी अहसान-उल-हक शेख हा पुलवामातील रहिवासी आहे. या दहशतवाद्यांकडून दारुगोळा, हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यात एके 47, मॅगजीन, ग्रेनेड आणि अन्य शस्त्रांचा समावेश आहे.

शोपियान जिल्ह्यातील केलर परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि सैन्याचे 20 राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ जवान तिथे दाखल झाले. परिसरात सर्च ऑपरेशन घेण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी वेढा घातलाय समजताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. भारताच्या सुरक्षा जवानांनीही चोख उत्तर दिले. या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचे 3 दहशतवादी मारले गेले.

लश्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि ए श्रेणीतला दहशतवादी होता.   शाहीद कुट्टे शोपियातील चोटीपोरा इथला रहिवासी आहे. मार्च 2023  साली तो लश्कर ए तोयबात सहभागी झाला होता. तो लश्कराचा प्रमुख दहशतवादी होता. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता. 8 एप्रिल 2024 साली दानिश रिसोर्टवर झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता. या दहशतवादी हल्ल्यात जर्मनीचे 2 पर्यटक आणि 1 वाहनचालक जखमी झाला होता. 18 मे 2024 साली हिरपोरामध्ये भाजपा सरपंचाची हत्या करण्यात आली. या कटात त्याचा सहभाग होता.





Source link

Cannes 2025: ऐश्वर्यापासून जान्हवी कपूरपर्यंत, कान्स २०२५ रेड कार्पेटवर वॉक करणार हे सेलेब्स

0
Cannes 2025: ऐश्वर्यापासून जान्हवी कपूरपर्यंत, कान्स २०२५ रेड कार्पेटवर वॉक करणार हे सेलेब्स


यंदा कान्स २०२५ च्या रेड कार्पेटवर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी वॉक करताना दिसणार आहेत, ज्याबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री, चित्रपट निर्मात्यांचा समावेश आहे.



Source link

प्रेमापायी युवकाने घेतला गळफास! ‘इंस्टाग्राम पोस्ट’ने केलं उघड…

0
प्रेमापायी युवकाने घेतला गळफास! ‘इंस्टाग्राम पोस्ट’ने केलं उघड…


बुलढाणा: मेहकर तालुक्यातील एका खेड्यातील तरुणाने प्रेम प्रकरणातून आणि कथित प्रेमिकेचे लग्न ठरल्याने नैराश्या पोटी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या पूर्वी त्याने इंस्टाग्रामवर टाकलेल्या काही ‘पोस्टस’ आणि ‘कॉल रेकॉर्डिंग’ यापरिणामी यामुळे आत्महत्येचे कारण उघडं झाले.पोलिसांनी याप्रकरणी खोलात जाऊन तांत्रिक विश्लेषण करीत तब्बल ११ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणाच्या चुलत्याने याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

राहुल आणि पायल (दोघांची नावे बदलली आहेत) यांचे मागील ३ वर्षांपासून प्रेमसंबंध जुळले होते. राहुल हा मेहकर तालुक्यातील एका गावचा रहिवासी असून पायल सिंदखेड राजा तालुक्यातील एका खेडेगावाची रहिवासी आहे. त्यांच्या लग्नाला मुलीकडच्या लोकांचा विरोध होता. त्यापरिणामी पायलचे लग्न नात्यातीलच एका मुलाशी ठरविण्यात आले होते. राहुल आणि पायलच्या संबंधाबाबत पायलच्या घरच्यांना माहीत झाल्यावर प्रकरणाने वेगळे वळण घेतले. पायलच्या घरातून विरोध सुरू झाला होता.

इंस्टावर पोस्ट आणि शेतात गळफास

दरम्यान राहुल ने काल १३ मे रोजी संध्याकाळी उशिरा शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याआधी त्याने इंस्टाग्राम वर पोस्ट करुन तपशील नमूद करून कुणाच्या दबावात आत्महत्या करीत आहे ते लिहिले. एवढेच नव्हे तर राहुलने गावातील काही रहिवासीयांच्या व्हाट्सअप वर मेसेज करून आपल्या टोकाच्या निर्णयाचे कारणही स्पष्ट केले.

त्यानुसार मुलीच्या आत्याच्या पुतण्याने त्याला आणि त्याच्या आईला ‘नीट राहण्याची’ धमकी दिली. पायलच्या वडिलांनी देखील राहुलला सामूहिक आत्महत्या करण्याची धमकी देत , नाहीतर तू मर असेही सांगितलें.

तक्रारीत आरोपींनी राहुलला वेळोवेळी मारण्याची धमकी दिल्यामुळे तो आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे म्हटले आहे. तक्रारीवरून पायल चे आई वडील, आत्या, आत्याचा नवरा, आत्याचा पुतण्या यांसह एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात खळबळ उडाली आहे.



Source link

चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; TRT वर्ल्डचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक

0
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; TRT वर्ल्डचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक


भारत सरकारने आज एक मोठा निर्णय घेत तुर्कस्तानची सरकारी टीव्ही चॅनेल टीआरटी वर्ल्डचे भारतातील सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव आणि प्रादेशिक सुरक्षेबाबत चुकीची माहिती पसरू नये म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी भारताने चीनचे अधिकृत प्रचार वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे सोशल मीडिया हँडलही ब्लॉक केले होते.त्यानंतर आता तुर्कीच्या टीआरटीवरही कारवाई केली



Source link

‘चिकन नेक’… भारताच्या नकाशावर दिसणारी एक अरुंद वाट; India china तणावात का होतेय या ठिकाणाची चर्चा?

0
‘चिकन नेक’… भारताच्या नकाशावर दिसणारी एक अरुंद वाट; India china तणावात का होतेय या ठिकाणाची चर्चा?


India China Tension : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावात दर दिवशी भर पडत असतानाच शस्त्रसंधी झाली आणि काही अंशी का असेना पण, हा तणाव कमी झाल्याचं दिसून आलं. त्यातच एकिकडे हा तणाव असतानाच दुसरीकडे भारतानं चीनच्या खुरापतींवरही कटाक्ष टाक परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं या शेजारी राष्ट्रालासुद्धा खडे बोल सुनावण्यात आले आहेत. 

अरुणाचल प्रदेशातील काही भागांना चिनी नावं दिल्याबद्दल चीननं हे कितीही प्रयत्न केले तरीही वास्तव बदलणार नाही अशाच शब्दांत भारतानं खडसावलं. यातच एका अका अशा ठिकाणाची चर्चा सुरू झाली, ज्याचं  भारत आणि चीन या दोन्ही देशांसाठी अनन्यसाधारण महत्त्वं आहे. हे ठिकाण म्हणजे, चिकन नेक. 

कुठे आहे चिकन नेक? 

सिलीगुडी कॉरिडोअरचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हा तोच अतिशय संवेदनशील परिसर आहे, ज्याला ‘चिकन नेक’ म्हणूनही संबोधलं जातं. अतिशय चिंचोळा, अरुंद असा हा रस्ता संपूर्ण पूर्वोत्तर भागाला देशाच्या उर्वरित भागाशी जोडण्याचं काम करतो. 

भारतात असणारा हा सिलीगुडी कॉरिडोअर चिकन नेक म्हणून संपूर्ण जगाचं लक्ष वेधतो. कारण, हा भाग अतिशय अरुंद असला तरीही देशाच्या दृष्टीनं मात्र तो प्रचंड महत्त्वाचा आहे. पश्चिम बंगालमध्ये येणारा हा भाग म्हणजे प्रत्यक्षात अरुंद रस्ता असून हा तोच रस्ता आहे ज्यामुळं पूर्वोत्तर 8 राज्य देशाशी जोडली जातात. 

या रस्त्याचा एकंदर आकार आणि त्याचं क्षेत्रफळ पाहता या भागाला चिकन नेक असं नाव देण्यात आलं आहे. हा रस्ता फक्त 26 ते 22 किमी इतक्याच अंतराता असून, तो देशातील अतिशय संवेदनशील भागांपैकी एक ग्राह्य धरला जातो. शत्रू राष्ट्रांच्या वक्रदृष्टीनं जर कधी या भागावर हल्ला होऊन भारतानं चिकन नेक कमावला तर, आठ राज्य देशापासून वेगळी होण्याचा धोका संभवतो. यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.

नकाशावरही स्पष्ट दिसतो हा भाग…

हा भागा सिलीगुडी इथं असून, पश्चिम बंगालच्या उत्तरेला दार्जिलिंग आणि जलपायगुडी इथंच हा भाग आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असणारं पश्चिम बंगालचं हे क्षेत्र 60 किमी लांब आणि 21 ते 26 किमी रुंद क्षेत्र आहे. सिलीगुडी कॉरिडोअर म्हणूनही हा भागा ओळखला जातो, जिथं भारत, बांगलादेश आणि नेपाळच्या सीमा एकत्र येतात. 

सिक्कीम, तिबेटची चुंबी व्हॅली आणि भूटानच्या डोकलामचं ट्राय जंक्शन याच भागात असून, नकाशात व्यवस्थित पाहिल्यास हा भाग पाहताक्षणी कोंबडीच्या मानेसारखा दिसतो. इथून पुढे जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्ग पूर्वोत्तर राज्यांना देशाशी जोडण्याचं ताम करतात. या भागातही सैन्यदलाचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतो. 





Source link

‘हम साथ साथ है’ चित्रपटावेळी सोनाली बेंद्रेपुढे दिग्दर्शकाने ठेवलेली ‘ही’ अट; अभिनेत्री म्हणाली, “तर त्यांनी त्यावर..”

0
‘हम साथ साथ है’ चित्रपटावेळी सोनाली बेंद्रेपुढे दिग्दर्शकाने ठेवलेली ‘ही’ अट; अभिनेत्री म्हणाली, “तर त्यांनी त्यावर..”



Sonali Bendre reveals Sooraj Barjatya cast her in Hum Saath Saath Hai on ONE condition: ‘हम साथ साथ है’ चित्रपटावेळी सोनाली बेंद्रेपुढे दिग्दर्शकाने ठेवलेली ‘ही’ अट; अभिनेत्री म्हणाली, “तर त्यांनी त्यावर..”





Source link

“केरळ-महाराष्ट्र स्वयंपाकाच्या सचिव…”, अमेय वाघची बहिणीसाठी खास पोस्ट; कॅप्शनने वेधले लक्ष म्हणाला, “मोठ्या भावाशी…”

0
“केरळ-महाराष्ट्र स्वयंपाकाच्या सचिव…”, अमेय वाघची बहिणीसाठी खास पोस्ट; कॅप्शनने वेधले लक्ष म्हणाला, “मोठ्या भावाशी…”


अमेय वाघ हा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अमेय त्याच्या मिश्कील स्वभावासाठी ओळखला जातो. अभिनयाच्या बाबतीत अमेय निवडक भूमिका साकारताना दिसतो. त्यामुळे त्याने आजवर साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावली आहे. परंतु, फक्त पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही अमेय त्याच्या सर्व भूमिका उत्तमरीत्या पार पाडताना दिसतो.

अमेय वाघ सोशल मीडियावरही सक्रिय असतो. त्यामार्फत तो अनेकदा त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दलच्या अपडेट्स चाहत्यांसह शेअर करीत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे अमेय नेहमीच सोशल मीडियामार्फत त्याच्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबीयांना त्याच्या स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो. अशातच अमेयने १३ मे रोजी त्याच्या सख्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर बहिणीबरोबरचा फोटो पोस्ट करीत त्याने अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या.

अमेयने या फोटोला ‘जागतिक घोरणे स्पर्धेच्या विजेत्या, सर्वोत्तम घरगडी चॅम्पियनशिप विजेत्या, मोठ्या भावाशी भांडीन; पण थकणार नाही हा बाणा असलेल्या, केरळ – महाराष्ट्र स्वयंपाक कराराच्या सचिव स्मिता वाघ’ अशी कॅप्शन दिली आहे. त्यासह अमेयने याच दिवशी त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचेही सांगितले आहे. यावेळी त्याने आई-वडील, बहीण यांचे फोटो पोस्ट केले आहेत.

अमेयच्या कुटुंबीयांबद्दल बोलायचं झाले, तर अमेयचे आई-बाबा, बहीण व बायको असे कुटुंब आहे. त्याची बहीण लग्नानंतर केरळमध्ये स्थायिक झाली आहे आणि अमेयचे आई-बाबा हे पुण्यात राहत असल्याचे त्याने म्हटले होते. अमेय मूळचा पुण्याचा असून, तो कामामुळे त्याची पत्नी साजिरीसह मुंबईत स्थायिक झाला आहे.

दरम्यान, अमेय वाघचे नुकतेच टेलिव्हिजनवर पुनरागमन झाले असून, सध्या तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासह यामध्ये मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते.



Source link