Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 263

Accident involving motorcycle and container on Palghar Mahim Road accident news

0
Accident involving motorcycle and container on Palghar Mahim Road accident news


पालघर: पालघर माहीम रोडवर असलेल्या अतिक्रमणामुळे मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात बहिण भावाच्या जागीच मृत्यू झाला. जेवण झाल्यानंतर पालघर येथे आइस्क्रीम खाऊन आपल्या मोटरसायकल वरून घराकडे परत असताना त्यांच्या मोटरसायकल ला ट्रेलरने दिलेल्या जोरदार धडकेत दोघा भावंडांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रेलर चालक पसार झाला आहे. काल रात्री पालघर माहीम मार्गावर ताशी हॉटेलच्या जवळ मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले मंगेश विश्वकर्मा (२२)आणि पूजा विश्वकर्मा (२५) जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाण्यासाठी दुचाकी वर घराबाहेर पडले होते. आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या कंटेनर ने धडक दिली. या धडकेत त्या दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भयानक होती की त्या दोन्ही भावंडाच्या शरीराचे तुकडे रस्त्यालगत इतरत्र पसरले होते.

या अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पालघर पोलिसांनी एक टीम गठित केली आहे. या प्रकरणाचा तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार थोरात हे करत आहेत. या प्रकरणी ट्रेलर चालका विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर माहीम रस्त्यावरील अतिक्रमण अपघातास कारणीभूत

पालघर माहीम रोडवर नगरपरिषदेच्या हळदीलगत व माहीम ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल, बार उभारण्यात आले असून या बहुतांश हॉटेल चे रस्त्यालगत अतिक्रमण झालेले आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला हॉटेलमध्ये येणारे नागरिक वाहने पार्किंग करत असल्याने रस्त्याच्या बाजूला मोकळी जागा उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत भरधाव येणाऱ्या वाहनांना या परिसरातील हॉटेल व्यवसायिकांची माहिती नसल्याने तसेच मद्यपान केलेले नागरिक योग्य पद्धतीने वाहन चालवत असल्याने अपघात व असतात. या अतिक्रमणाविरुद्ध अनेकदा तक्रारी झाल्यानंतर देखील माहीम ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई केली नसल्याने वीर सावरकर चौक ते वागुळसार गावापर्यंत नियमित अपघात होत असतात.

याशिवाय पालघर माहीम रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. या रस्त्यावर झालेले अतिक्रमण, सतत या भागातील उघड्यावर सोडण्यात येणारे सांडपाणी, रस्त्यावर जनावरांचा सकाळ संध्याकाळ वावर तसेच गतिरोधक नसल्याने भरधाव येणारी वाहने हे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातास कारणीभूत आहे.

या अपघातांना आळा बसण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग,माहीम ग्रामपंचायत, पालघर नगरपरिषद यासह वाहतूक विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी यांनी पालघर शहराच्या या महत्त्वपूर्ण रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या होत्या. मात्र हे काम स्थानिक स्वराज्य संस्थेने करावे की सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत एकमत होत असल्याने कारवाई मध्ये दिरंगाई होत असल्याचे दिसून आले आहे.





Source link

पाकिस्तानला मदत करणाऱ्या तूर्कीएला दणका! भारताने केला मार्बल स्ट्राईक

0
पाकिस्तानला मदत करणाऱ्या तूर्कीएला दणका! भारताने केला मार्बल स्ट्राईक



व्यापा-यांनी टाकलेल्या बहिष्कारानंतर आता तूर्कीएमधून मार्बल भारतात येणार नाही
 



Source link

‘या’ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी खासदाराच्या पत्राची दखलच घेत नाही, खासदार किरसान यांची खंत

0
‘या’ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी खासदाराच्या पत्राची दखलच घेत नाही, खासदार किरसान यांची खंत



Chandrapur District Collectors are not taking any notice of the MP letter| ‘या’ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी खासदाराच्या पत्राची दखलच घेत नाही, खासदार किरसान यांची खंत





Source link

Unique Baby Names : नवजात बाळाला दिलं ‘सिंदूर’ हे नाव; पालकांनी अशी व्यक्त केली जवानांची कृतज्ञता

0
Unique Baby Names : नवजात बाळाला दिलं ‘सिंदूर’ हे नाव; पालकांनी अशी व्यक्त केली जवानांची कृतज्ञता



‘ऑपरेशन सिंदूर’ ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आपल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पालकांनी नवजात बाळाला दिलं ‘सिंदूर’ हे नाव. 



Source link

नागपूर मेट्रोची ५० टक्के तिकीट विक्री ऑनलाईन

0
नागपूर मेट्रोची ५० टक्के तिकीट विक्री ऑनलाईन



नागपूर : प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि सहजपणे प्रवाश्यांना तिकीट उपलब्ध व्हावा याकरीता मेट्रो प्रशासनाच्या वतीने तिकीट खरेदी करण्याकरता अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या प्रयत्नांना मेट्रो प्रवाशाची देखील पसंती मिळत आहे. दररोज ५० टक्के प्रवासी ऑनलाइन तिकीट घेऊन मेट्रोने प्रवास करीत आहेत.

दररोज व नियमित पणे मेट्रो प्रवाश्याची संख्या वाढत असून या वाढत्या रायडरशिप मध्ये कॅशलेस व्यवहारला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ५० टक्के तिकटी विक्री ऑनलाइन माध्यमाने होत आहे; प्रत्येक दोन पैकी एक प्रवासी ऑनलाइन माध्यमाने तिकीट घेत आहे महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. याकरिता महा कार्ड,तिकीट व्हेंडिंग मशीन, व्हॉट्सऍप तिकीट,ऑनलाईन पेमेंट मोबाइल ऍप पर्याय प्रवा्शांना उपलब्ध करून दिले. आतापर्यंत १ लाख ९ हजार,२६१ कार्ड विकल्या गेले आहेत. महा कार्ड मेट्रो भाड्यांवर १० टक्के सवलत प्रदान करते.

ऑनलाईन तिकीटमधील हिस्सा

१) महाकार्ड -२८ टक्के २) तिकीट व्हेंडिंग मशीन -७ .५०% ,३) व्हॉट्सऍप : ७.५०% , ३) ऑनलाईन पेमेंट – ६.५०% ,४) मोबाइल ऍप – १%

या सर्व ऑनलाइन प्रणाली मध्ये प्रवासी महा कार्डचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात मेट्रोने प्रवास करत असतात. या प्रणालीच्या माध्यामाने प्रवाश्यांना ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट्सवर फक्त त्यांचे महा कार्ड टॅप करावे लागते आणि त्या माध्यमाने प्रवासी भाडे कार्डमधून कापल्या जाते. महा कार्ड आणि अत्याधुनिक एएफसी प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक असून जेवढा प्रवास केला असेल तेवढेच भाडे कार्ड मधून वजा केले जाते.

महा मेट्रोने आजपर्यंत प्रवाश्यांच्या दृष्टीने अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात विशेषत्वाने विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात ३० टक्के सवलत, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी वीकएंड सवलत, दैनिक पास फक्त १००रुपयात आणि महाकार्डने प्रवास केल्यास प्रत्येक प्रवासावर १० टक्के सवलत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.



Source link

हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका इंजिनिअर तरुणाचा मृत्यू, एकाच महिला डॉक्टरने केली होती थेरेपी, आता फरार

0
हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका इंजिनिअर तरुणाचा मृत्यू, एकाच महिला डॉक्टरने केली होती थेरेपी, आता फरार


यूपीच्या कानपूरमध्ये हेअर ट्रान्सप्लांटमुळे इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. पनकी पॉवर प्लांटमध्ये कार्यरत अभियंत्याचा केस प्रत्यारोपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी कुटुंबीयांनी तीन दिवसांपूर्वी महिला डॉक्टरविरोधात एफआयआर दाखल केला होता. दोन्ही अभियंत्यांवर एकाच महिला डॉक्टरने उपचार केले. तक्रार दाखल करूनही पोलिसांना महिला डॉक्टरचा शोध लागलेला नाही. हे नवे प्रकरण फर्रुखाबाद येथील एका अभियंत्याचे आहे. मात्र, पनकी अभियंत्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये या अभियंत्याचा मृत्यू झाला. पनकी प्रकरण उघडकीस आल्यानंतर या अभियंत्याचे कुटुंबीयही पुढे आले आणि त्यांनी महिला डॉक्टरच्या गैरकृत्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली.



Source link

अकोल्यात प्राप्तिकर विभागाचे सराफा व्यावसायिकांवर छापासत्र

0
अकोल्यात प्राप्तिकर विभागाचे सराफा व्यावसायिकांवर छापासत्र


अकोला : शहरातील मोठ्या चार सराफा पेढ्यांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी बुधवारी छापा टाकला. सराफा पेढ्यांमधील आर्थिक व्यवहार व कागदपत्रांची पडताळणी पथकाकडून केली जात आहे. प्राप्तिकर विभागाने एकाचवेळी अनेक पेढ्यांवर छापा टाकून पडताळणी सुरू केल्याने सराफा व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सोने व चांदीच्या दराने गेल्या काही दिवसांपासून नवनवे उच्चांक गाठले. सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. सराफा बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होते. दरम्यान, या व्यवहारांवर प्राप्तिकर विभागाची नजर असते. सराफा व्यवसायातून होणाऱ्या उलाढालीतून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर योग्य पद्धतीने प्राप्तिकर भरला जातो की नाही याची पडताळणी प्राप्तिकर विभागाकडून केली जाते. दरम्यान, अकोला शहरातील गांधी मार्गासह विविध ठिकाणच्या चार सराफा पेढ्यांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला.

आज सकाळपासूनच ही कारवाई सुरू झाली. शहरातील चार नामांकित सराफा पेढी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत. त्या सराफा पेढ्यांवर छापा कारवाई करण्यात आली आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकांतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सराफा पेढ्यांवर एकच वेळी छापा कारवाई केली. या कारवाईदरम्यान प्राप्तिकर विभागाने पोलिसांची मदत घेऊन बंदोबस्त देखील तैनात केला आहे. या कारवाईने अकोल्यातील सराफा वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उलटसूलट चर्चा सुरू आहे. या कारवाईतून नेमके काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

हेही वाचा

कर कायद्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी

प्राप्तिकर विभाग ही भारत सरकारची प्रत्यक्ष कर संकलन करणारी सरकारी संस्था आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत ती कार्य करते. प्राप्तिकर विभाग हे सर्वोच्च संस्था केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या नेतृत्वाखाली आहे. प्राप्तिकर विभागाची मुख्य जबाबदारी म्हणजे विविध प्रत्यक्ष कर कायद्यांची अंमलबजावणी करणे, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राप्तिकर नियम, १९६१, भारत सरकारसाठी महसूल गोळा करणे आहे. बेनामी व्यवहार (प्रतिबंध) नियम, १९८८ आणि काळा पैसा नियम, २०१५ सारखे इतर आर्थिक कायदे देखील लागू करते. प्राप्तिकर नियम १९६१ मध्ये विस्तृत व्याप्ती आहे. त्यांना व्यक्ती, फर्म, कंपन्या, स्थानिक अधिकारी, सहकारी संस्था किंवा इतर कृत्रिम न्यायिक व्यक्तींच्या उत्पन्नावर कर आकारण्याचा अधिकार दिला. त्यामुळे प्राप्तिकर नियम व्यवसाय, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था, उत्पन्न कमावणारे नागरिक आणि स्थानिक अधिकारी यांच्यावर प्रभाव टाकतो.





Source link

बुद्ध जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यास अभिवादन; आमदार सचिन पाटील  उपस्थिती

0
बुद्ध जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यास अभिवादन; आमदार सचिन पाटील  उपस्थिती

फलटण, १२ मे २०२५ : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात अभूतपूर्व उत्साहात कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमाला फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. सचिन पाटील (साहेब), युवानेते अभिजित नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा भाजपाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे, नगरसेवक सचिन अहिवळे ,शहराध्यक्ष बापुराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यांच्यासोबत गोविंद भुजबळ, रणजित भुजबळ, बंडू शिंदे, संदीप नेवसे, किरण राऊत, गणेश काळुखे, , प्रशांत काकडे, सुनिल अहिवळे, सनी मोरे, युवराज काकडे, अमोल अहिवळे, विशाल पाटील, प्रवीण कांबळे, नामदेव काकडे, अभिजीत गायकवाड, रोहन काकडे, दादा काकडे, प्रविण घोडके उमेश काकडे, संदेश काकडे , विशाल काकडे, नितीन अहिवळे, विवेक तारळकर, शुभम काकडे,  यांनीही उपस्थिती दर्शवली.

भगवान गौतम बुद्ध जयंती मंडळ २०२५ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात तथागत बुद्ध यांच्या करुणा, शांती व समतेच्या विचारांचा जागर करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांचे विचार आजच्या काळात किती महत्वाचे आहेत, यावर भर दिला.

कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुयोग्यपणे पार पाडण्यात आले. बहुजन समाजात सकारात्मक ऊर्जा देणारा हा अभिवादन सोहळा अनेकांच्या मनात चिरस्थायी ठसा उमटवून गेला.

Big blow for delhi capitals jake fraser mcgurk ruled out of ipl 2025 mustafizur rahman has joined squad for 6 cr

0
Big blow for delhi capitals jake fraser mcgurk ruled out of ipl 2025 mustafizur rahman has joined squad for 6 cr



Big blow for delhi capitals jake fraser mcgurk ruled out of ipl 2025 mustafizur rahman has joined squad for 6 cr | दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूचा भारतात परतण्यास नकार! ६ कोटी मोजून बांगलादेशच्या ‘या’ खेळाडूला दिलं संघात स्थान





Source link

पिंपरी चिंचवडमध्ये रक्तरंजित घटना; आर्थिक व वैयक्तिक वादातून १८ वर्षीय तरुणीची हत्या

0
पिंपरी चिंचवडमध्ये रक्तरंजित घटना; आर्थिक व वैयक्तिक वादातून १८ वर्षीय तरुणीची हत्या

पुणे :- पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री घडलेल्या एका खळबळजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. १८ वर्षीय कोमल भरत जाधव या तरुणीचा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने आपल्या भाच्याच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.

कोमल जाधव ही वाल्हेकरवाडीत कृष्णामाई परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिचा शेजारी उदयभान यादव (वय ४५) हा मूळचा उत्तरप्रदेशचा असून कामानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास होता. कोमल व उदयभान यांच्यात वैयक्तिक संबंध व आर्थिक व्यवहार असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

या वादातूनच उदयभानने कोमलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. रविवारी रात्री त्याने आपल्या भाच्याच्या मदतीने हेल्मेट घालून दुचाकीवरून येत कोमलला घराबाहेर बोलावले. ती खाली येताच धारदार शस्त्राने तिच्यावर अचानक हल्ला करून तिचा जागीच खून केला.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत उदयभान यादव आणि त्याच्या भाच्याला अटक केली. या हत्येमागे आर्थिक व भावनिक गुंतवणूक असल्याचं तपासात समोर आलं आहे. सध्या संपूर्ण वाल्हेकरवाडी परिसरात भीतीचं व दहशतीचं वातावरण पसरलं आहे.