Monday, July 13, 2026
Home Blog Page 262

पुण्यात चार महिन्यांत सव्वातीन लाख वाहनचालकांवर कारवाई

0
पुण्यात चार महिन्यांत सव्वातीन लाख वाहनचालकांवर कारवाई



पुणे: शहरात वाहतूक नियमभंगाचे प्रमाण वाढते असून, पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने गेल्या चार महिन्यांत सव्वातीन लाख वाहनचालकांवर कारवाई केली. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ७५ हजार ७१३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. यंदा एप्रिल महिना अखेरीपर्यंत तीन लाख २२ हजार जणांवर वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बेशिस्तांवर करण्यात येणाऱ्या कारवाईत पाचपटींनी वाढ झाली आहे.

विरुद्ध दिशेने, ट्रिपल सीट, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, तसेच मोबाइलवर संभाषण करणे अशा प्रकारच्या वाहतूक नियमभंगाचे प्रमाण वाढते आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे काेंडीत भर पडते. बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिना अखेरीपर्यंत ७५ हजार ७१३ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती.

यंदा एप्रिल महिना अखेरीपर्यंत तीन लाख २२ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोजककुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात बेशिस्तांवरील कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचे प्रमाण वाढतेविरुद्ध दिशेने (नो एंट्री) वाहन चालविण्याचे प्रमाण वाढते आहे. यंदा जानेवारी महिन्यात ५७ हजार ३३ वाहनचालकांवर विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली. फेब्रुवारी महिन्यात ५० हजार ८१८, मार्च महिन्यात ५९ हजार ७३ आणि एप्रिल महिन्यात ४५ हजार २३३ वाहनचालकांविरुद्ध विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. चार महिन्यात दोन १२ हजार १५७ वाहनचालकांवर विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी ही माहिती दिली.



Source link

ओढ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

0
ओढ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू



राहाता: शेतामध्ये खत पांगविल्यानंतर शेजारी असलेल्या ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने, एकमेकांना वाचविण्याच्या नादात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गोगलगाव येथे घडली.

बुधवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.साहिल दत्तात्रय चौधरी (वय १८) व किरण नारायण चौधरी (वय १५ दोघे रा. गोगलगाव, राहाता) असे मृत मुलांची नावे आहेत.

किरण चौधरी हा ९ वी उत्तीर्ण झाला होता तर साहिल चौधरी हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेत होता. किसन तुकाराम तनपुरे (वय ६०, गोगलगाव) हे शेतपिकाला पाणी भरत असताना त्यांच्या शेजारी राहणारी दोन्ही मुले हे त्यांच्या शेतामध्ये खत पांगवत होते. खत पांगविल्यानंतर दोघेजण शेजारील ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेले. त्यावेळी दोघे पाय घसरून पाण्यात पडल्याने तेथील महिलांनी मोठ्याने ओरडण्याचा आवाज केला. आवाज ऐकून किसन तनपुरे तेथे पळत गेले. परंतु पाणी जास्त असल्याने दोघांना त्यांनी पाण्यात बुडताना पाहिले.

तत्काळ रुग्णवाहिकेतून दोन्ही मुलांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच दोघांचे निधन झाल्याचे सांगितले. किसन तनपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.



Source link

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी ७६ टक्के महाविद्यालयांची नोंदणी

0
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी ७६ टक्के महाविद्यालयांची नोंदणी



पुणे: राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी ७६.७५ टक्के कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, कनिष्ठ महाविद्यालयांना गुरुवारपर्यंतची (१५ मे) मुदत देण्यात आली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ११ हजार महाविद्यालयांपैकी आठ हजार ४४३ महाविद्यालयांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. महाविद्यालयांच्या पडताळणीचे आणि प्रमाणीकरणाचे काम सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरून सुरू आहे. अद्याप नोंदणी पूर्ण न केलेल्या किंवा माहिती अद्ययावत न केलेल्या महाविद्यालयांनी कोणत्याही परिस्थितीत अंतिम मुदतीपूर्वी ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना १९ मेपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

नोंदणी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा मार्गदर्शनासाठी महाविद्यालयांनी सहाय्यता क्रमांक ‘८५३०९५५५६४’ अथवा ईमेल ‘support@mahafyjcadmissions.in’ यावर संपर्क साधावा. सर्व संबंधित महाविद्यालयांनी याची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही, असे राज्यस्तर प्रवेश संनियत्रण समितीचे अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी सांगितले.



Source link

Chakan rape case Pimpri Chinchwad police arrested Prakash Bhangre hours after he raped woman

0
Chakan rape case Pimpri Chinchwad police arrested Prakash Bhangre hours after he raped woman



Chakan rape case Pimpri Chinchwad police arrested Prakash Bhangre hours after he raped woman | चाकण: भयंकर! कामावर जाणाऱ्या महिलेचा तोंड दाबून बलात्कार; शंभर पोलीसांची शोधमोहीम…अन आरोपी जाळ्यात





Source link

TMT began repairing buses before monsoon 51 old buses will also be scrapped

0
TMT began repairing buses before monsoon 51 old buses will also be scrapped



TMT began repairing buses before monsoon 51 old buses will also be scrapped | पावसाळ्यापूर्वी टीएमटी बसगाड्यांची डागडुजीला वेग, ५१ जुन्या बसगाड्या भंगारात





Source link

साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी,

0



Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी, “मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा” उपक्रमाद्वारे हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन



Source link

बीडमध्ये इर्टिगा गाडी पलटली होऊन दोघे ठार, तर कराडजवळ टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणी ठार

0


बीड : अंबाजोगाई-आडस रस्त्यावरील उमराई पाटीजवळ बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात इर्टिगा कार पलटून झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील एक कुटुंब विवाहासाठी इर्टिगा कारमधून (एमएच 05 सीव्ही 9186) अंबाजोगाई येथे येत होते. यावेळी उमराई पाटी परिसरातील दत्त मंदिरासमोर एक दुचाकीस्वार अचानक कारसमोर आला. याच दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली.

या अपघातात शौकत अहमद शेख (वय 46) आणि खय्युम अब्बास अत्तार (वय 45) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Karad Accident : कराडजवळ दोन तरुणी ठार 

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळील आटके गावच्या हद्दीत आयशर टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवर असणाऱ्या दोन तरुणी जागीच ठार झाल्याची घटना घडली. करिष्मा कळसे, पूजा कुऱ्हाडे असं अपघातात ठार झालेल्या तरुणींची नावे आहेत. या अपघातानंतर  लोकांनी आयशर टेम्पोवर दगडफेक केली.

नांदुराजवळ मंगळवारी पहाटे अपघात

बुलढाण्यातील नांदुरा शहरात मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हा अपघात घडला. पहाटे साडेचार वाजता नांदुरा शहराजवळ आर्टिगा कार आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

चंद्रपुरातही अपघात, तिघांचा मृत्यू

चंद्रपूर शहरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी टाटा मॅजिक वाहनाला ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात टाटा मॅजिकच्या ड्रायव्हरसह 3 जणांचा मृत्यू झाला असून 14 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चंद्रपूर (Chandrapur) प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. 

अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या अपघातात निर्दोष मोहूर्ले (ड्रायव्हर), मनाबाई सिडाम (65) आणि एक प्रवासी असे एकूण तिघे मृत्यू झाल्याची घटना घडली.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

ulhasnagar municipal administration announced rs 46 lakh tender to repair blocked sewerage pipes

0
ulhasnagar municipal administration announced rs 46 lakh tender to repair blocked sewerage pipes



ulhasnagar municipal administration announced rs 46 lakh tender to repair blocked sewerage pipes | उल्हासनगरातील कुपनलिकांची दुरूस्ती होणार, पालिकेकडून ४६ लाखांची निविदा, पाणी पुरवठ्याला लागणार हातभार





Source link

700 वर्षांपासून शापित आहे भारतातील ‘हे’ गाव; इथे कुणीही बांधत नाही दुमजली घर

0
700 वर्षांपासून शापित आहे भारतातील ‘हे’ गाव; इथे कुणीही बांधत नाही दुमजली घर


भारत हे असंख्य गावांनी बनलेला देश आहे. या देशातील प्रत्येक गावाचं एक वेगळेपण आहे.  प्रत्येक गावाची स्वतःची श्रद्धा आणि संस्कृती असते. असेच एक गाव राजस्थानमध्ये आहे. ते एका खास गोष्टीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. भारतात असंच एक गाव आहे. ज्या गावाला तब्बल 700 वर्षे जुना असा शापित इतिहास आहे. 

चुरु जिल्ह्यातील सरदारशहर तहसीलमधील उदसर गाव एका विचित्र गोष्टींसाठी ओळखले जाते. या गावात गेल्या ७०० वर्षांपासून कोणीही दुमजली घर बांधलेले नाही. गावातील लोक म्हणतात की, या गावाला शाप आहे की जर कोणी येथे दोन मजली घर बांधले तर त्याच्या कुटुंबाला अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. या शापामागे एक कथा सांगितली जाते, जी खूप आश्चर्यकारक आहे. 

या शापामागील कथा पाहूया?

असे मानले जाते की, या गावाला ७०० वर्षांपूर्वी असा शाप मिळाला होता. यामुळे संपूर्ण गावाचे जीवन बदलले. आजही या गावात कोणीही दोन मजली घर बांधण्याचे धाडस करत नाही. कथेनुसार, ७०० वर्षांपूर्वी या गावात भेमिया नावाचा एक माणूस राहत होता. एके दिवशी त्याला कळले की गावात चोर आले आहे

चोरांनी गावकऱ्यांची जनावरे चोरायला सुरुवात केली. चोरांना जनावरे चोरताना पाहून, भेमियाने त्यांच्याशी एकटेच लढा दिला. चोरांनी त्याला गंभीर जखमी केले आणि तो रक्ताने माखला गेला. चोरांपासून वाचण्यासाठी, भेमिया त्याच्या सासरच्या घरी पोहोचला आणि घराच्या दुसऱ्या मजल्यावर लपला. चोरांनी त्याचा पाठलाग केला आणि तिथूनही त्याला पकडले.

यावेळी चोरांनी भेमिया आणि त्याच्या सासरच्यांनाही मारहाण केली. जखमी झाल्यानंतरही, भेमियाने चोरांशी लढा दिला आणि शेवटी चोरांनी भेमियाचा गळा कापला. भेमिया अजूनही लढत राहिला आणि त्याच्या गावाच्या सीमेजवळ आला. शेवटी भेमियाचे धड उदसर गावात पडले.

जेव्हा भेमियाच्या पत्नीला हे कळले तेव्हा ती रागावली आणि तिने गावकऱ्यांना शाप दिला की, जर या गावात कोणी दुसऱ्या मजल्यापर्यंत घर बांधले तर त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होईल.

यानंतर, भेमिया मंदिर बांधले गेले आणि आजपर्यंत कोणीही त्यांचे घर दुमजली केलेले नाही. याचा कोणताही प्रामाणिक पुरावा नाही. पण गावात दुमजली घरे नाहीत ही वस्तुस्थिती या घटनेबद्दल लोकांच्या मनात भीती आणि श्रद्धा दोन्ही असल्याचे दर्शवते.





Source link

Mumbai byculla don arun Gawli serving life for murder was acquitted in 2008 extortion case Wednesday

0
Mumbai byculla don arun Gawli serving life for murder was acquitted in 2008 extortion case Wednesday



Mumbai byculla don arun Gawli serving life for murder was acquitted in 2008 extortion case Wednesday | खंडणी प्रकरणातून अरुण गवळीची निर्दोष सुटका; तरीही कारागृहात राहणार





Source link