Saturday, September 12, 2026
Homeसाताराबुद्ध जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यास अभिवादन; आमदार सचिन पाटील  उपस्थिती

बुद्ध जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यास अभिवादन; आमदार सचिन पाटील  उपस्थिती

फलटण, १२ मे २०२५ : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात अभूतपूर्व उत्साहात कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमाला फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. सचिन पाटील (साहेब), युवानेते अभिजित नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा भाजपाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे, नगरसेवक सचिन अहिवळे ,शहराध्यक्ष बापुराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यांच्यासोबत गोविंद भुजबळ, रणजित भुजबळ, बंडू शिंदे, संदीप नेवसे, किरण राऊत, गणेश काळुखे, , प्रशांत काकडे, सुनिल अहिवळे, सनी मोरे, युवराज काकडे, अमोल अहिवळे, विशाल पाटील, प्रवीण कांबळे, नामदेव काकडे, अभिजीत गायकवाड, रोहन काकडे, दादा काकडे, प्रविण घोडके उमेश काकडे, संदेश काकडे , विशाल काकडे, नितीन अहिवळे, विवेक तारळकर, शुभम काकडे,  यांनीही उपस्थिती दर्शवली.

भगवान गौतम बुद्ध जयंती मंडळ २०२५ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात तथागत बुद्ध यांच्या करुणा, शांती व समतेच्या विचारांचा जागर करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांचे विचार आजच्या काळात किती महत्वाचे आहेत, यावर भर दिला.

कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुयोग्यपणे पार पाडण्यात आले. बहुजन समाजात सकारात्मक ऊर्जा देणारा हा अभिवादन सोहळा अनेकांच्या मनात चिरस्थायी ठसा उमटवून गेला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments