Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रइन्स्टाग्राम मेसेजचा राग; तरुणाचे अपहरण करून विष पाजून हत्या – कोपरगावात चार...

इन्स्टाग्राम मेसेजचा राग; तरुणाचे अपहरण करून विष पाजून हत्या – कोपरगावात चार अटकेत

कोपरगाव (जिल्हा अहमदनगर) : इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवल्याच्या रागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बहिणीला अश्लील मेसेज पाठवल्याचा राग मनात धरून भावंडांनी मिळून साईनाथ गोरक्षनाथ काकड (वय २४, रा. डोहाळ, ता. राहाता) या युवकाचे अपहरण केले आणि त्याला अमानुष मारहाण करत विष पाजून हत्या केली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील अहिल्यानगर परिसरात घडली.

या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी रुपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने आणि राहुल अशोक चांदर या चौघांना अटक केली असून एक महिला आरोपी फरार आहे. तसेच एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनाथ काकड व रुपाली लोंढे यांच्यात पुण्यात असताना ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर सोशल मीडियावर मेसेजमध्ये झाले. मात्र, काही मेसेजमुळे वाद निर्माण झाला होता. याच रागातून आरोपींनी मिळून हा प्रकार घडवला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपासातून अंदाज आहे.

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. आरोपींनी साईनाथला गाडीतून जबरदस्तीने घेऊन जाऊन कोपरगाव परिसरात ठार केल्याचा आरोप आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments