Sunday, July 12, 2026
Home Blog Page 243

सातारा जिल्ह्याच्या विकासाला चालना; चालू वर्षासाठी ७४४ कोटींचा निधी मंजूर

0
सातारा जिल्ह्याच्या विकासाला चालना; चालू वर्षासाठी ७४४ कोटींचा निधी मंजूर

सातारा – चालू आर्थिक वर्षात सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तब्बल ७४४ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज पार पडलेल्या आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली.

या बैठकीस पालकमंत्री शंभूराजे देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, माजी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई यांनी जिल्हा नियोजनांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या कामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्णता यावर भर देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल विभागाने सक्रिय भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, आमदारांच्या मागणीनुसार साकव पूल, स्मार्ट आरोग्य केंद्रे, ‘माझी शाळा-आदर्श शाळा’ उपक्रमांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा वार्षिक योजना – ६४७ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना – ९५ कोटी, आदिवासी उपयोजना – २.८ कोटी अशा एकूण ७४४.८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मागील वर्षी मंजूर ६७१ कोटी ६४ लाख रुपयांचा १००% निधी खर्च करण्यात आला आहे.

तसेच, मौजे तळदेव, कळंबे, आंधळी, आणि कवठे येथील प्रमुख देवस्थानांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी दिलेल्या प्रस्तावांना बैठकीत मान्यता देण्यात आली.

बैठकीत विविध आमदारांनी आपल्या भागातील विकासकामांबाबत सूचना केल्या असून, त्या बाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जहाल माओवादी देवसूचे आत्मसमर्पण, मिलिंद तेलतुंबडेचा होता अंगरक्षक

0
जहाल माओवादी देवसूचे आत्मसमर्पण, मिलिंद तेलतुंबडेचा होता अंगरक्षक


गोंदिया : जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी नक्षलविरोधी मोहिमेच्या साखळीत १९ मे २०२५ रोजी आणखी एका जहाल माओवादीने गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे समक्ष ३.५० लाखाचे जाहीर बक्षीस असलेला जहाल माओवादी देवसू उर्फ देसु, मूळ नाव – देवा राजा सोडी, (२४) रा. चीटिंगपारा/ गुंडम, पो. पामेड, पो.स्टे. तर्रेम, ता.उसूर, जि.- बिजापूर (छ. ग.) पद – सदस्य, प्लाटून मेंबर (CC मेंबर दिपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (मृत) याचा अंगरक्षक ) याने आत्मसमर्पण केले. देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत “नक्षल आत्मसमर्पण योजना” राबविली जात आहे.

तसेच जे माओवादी विविध भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले आहेत त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.गोंदिया जिल्हा पोलीसांनी आत्मसमर्पणकरिता केलेले आवाहन, माओवादी संघटनेतील वरिष्ठ नेत्यांच्या पिळवणूक आणि अत्याचारास कंटाळून, तसेच माओवादी संघटनेतील अतिशय कठीण वेदनामयी जीवनाला कंटाळून ३.५ लाखाचे बक्षीस असलेला जहाल माओवादी देवसू उर्फ देसु याने आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला.

देवसू हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गावातील रहिवासी असून त्याचे गावात नक्षल्यांचे नेहमी येणे जाणे होते. नक्षलवादी जल, जंगल, आणि जमिनीच्या लढाई खाली भोळ्या भाबड्या आदिवासी नागरिकांना सरकार विरुद्ध भडकावून, तथाकथित व खोट्या क्रांती चे कथन करून लोकांना नक्षल चळवळीत ओढण्याचा प्रयत्न करायचे.त्यामुळे लहान पणापासून तो नक्षलयांच्या विविध प्रलोभन व भूलथापांना बळी पडून नक्षल विचारसरणीशी प्रभावित होऊन बाल संघटन मध्ये रुजू झाला होता.डिसेंबर २०१७ मध्ये त्याला इतर काही नवीन भरती झालेल्या माओवाद्यांसह एम. एम. सी. झोन मध्ये पाठविण्यात आले. नक्षल दलम सोबत १५ दिवस काम केल्यानंतर त्यास तत्कालीन एम. एम.सी. झोन प्रभारी मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडे याचा अंगरक्षक म्हणून नेमण्यात आले होते. १३ नोव्हेंबर २०१२ रोजी मर्दिनटोला, जि. गडचिरोली येथे नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे याचेसह एकूण २८ नक्षलवादी मारले गेलेत. सदर चकमकीतून माओवादी देवसु व त्याचे काही साथीदार जीव वाचवून पळून गेले.

सदर माओवादी देवसू उर्फ देसू उर्फ देवा याने वर्ष २०१७ ते २०२२ मध्ये माओवादी संघटनेत कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात घडलेल्या विविध गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केले आहे.तो राजनांदगाव, सध्या खैरागड / छत्तीसगड) अंतर्गत तांडा जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीत, कान्हा भोरमदेव एरिया जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीत आणि मर्दीनटोला ( गडचिरोली)जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीत सहभागी होता.

देवसु याचे आत्मसमर्पीत होण्याची महत्वाची कारणे देत सांगितले की १३नोव्हेंबर २०२१ रोजी मर्दिनटोला येथे झालेल्या चकमकीत दीपक तेलतुंबडे याला माझ्यासमोर गोळी लागली व तो मरण पावला. त्यावेळी काही जण तिथून जीव वाचवून पळून गेले. तेव्हापासून मला मृत्यूची व अटकेची सारखी भीती वाटत होती असे देवसु म्हणाला.

पोलीस दलाच्या सततच्या नक्षल विरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे. पोलिसांची सारखी भीती वाटते.
वरिष्ठ कॅडर हे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन निरपराध आदिवासी बांधव, सामान्य नागरिकांना ठार मारायला सांगतात. हे कदापी संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावित होऊन समर्पण करण्याचा निर्णय घेतला, असेही त्याने सांगितले.हे आत्मसमर्पण पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.



Source link

या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट

0
या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट


Movies Release This Week: मे महिन्याचे हे शेवटचे काही दिवस चित्रपट प्रेमींसाठी खास असणार आहेत, कारण या आठवड्यात एक नाही तर ५ नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सूरज पंचोलीचा ‘केसरी वीर’ चित्रपट या आठवड्यात रिलीज होतोय. तो बऱ्याच वर्षांनी बॉलीवूडमध्ये कमबॅक करतोय. तसेच थिएटर प्रदर्शन रद्द झालेला ‘भूल चुक माफ’ अखेर या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या आठवड्यात इतर कोणते नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ते जाणून घेऊयात.

भूल चूक माफ

राजकुमार रावचा बहुप्रतिक्षित ‘भूल चूक माफ’ चित्रपट त्याच्या प्रदर्शनाबाबत वादात सापडला आहे. आधी हा चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मात्यांनी अचानक घोषणा केली की तो ओटीटीवर रिलीज केला जाईल, त्यानंतर पीव्हीआर आयनॉक्सने निर्मात्यांविरुद्ध खटला दाखल केला. आता अखेर हा चित्रपट २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये राजकुमार रावसोबत वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच संजय मिश्रा, सीमा पाहवा, झाकीर हुसैन, रघुबीर यादव, इश्तियाक खान आणि अनुभा फतेहपुरिया देखील या चित्रपटात आहेत.

केसरी वीर

सूरज पंचोली व सुनील शेट्टी यांचा ‘केसरी वीर: लेजेंड ऑफ सोमनाथ’ हा चित्रपट २३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या कलाकारांव्यतिरिक्त, विवेक ओबेरॉय देखील चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. यामध्ये, आकांक्षा शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट १४ व्या शतकात सोमनाथ मंदिराचे रक्षण करणाऱ्या योद्ध्यांच्या कथेवर आधारित आहे.

हेही वाचा

कपकपी

‘गोलमाल ३’ नंतर श्रेयस तळपदे व तुषार कपूर ‘कपकपी’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, जो २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन कलाकारांशिवाय या चित्रपटात दिव्येंदू भट्टाचार्य, इशिता राज शर्मा, साहिल वर्मा आणि मनमीत कौर यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा

मंगलाष्टका रिटर्न्स

‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा योगेश भोसले दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. कमलेश सावंत, प्रसाद ओक आणि प्रसन्न केतकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

लिलो अँड स्टिच

इंग्रजी चित्रपटांची आवड असलेल्यांसाठी या आठवड्यात एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. अमेरिकन सायन्स फिक्शन कॉमेडी ड्रामा चित्रपट ‘लिलो अँड स्टिच’ देखील २३ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होतोय. या चित्रपटात बिली मॅग्नेसेन, हन्ना वॅडिंगहॅम आणि टिया कॅरेरे यांच्या भूमिका आहेत. डीन फ्लेशर कॅम्प यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.





Source link

आग्रीपाड्यात जमिनीच्या वादातून सशस्त्र हल्ला, ४१ जणांना अटक

0
आग्रीपाड्यात जमिनीच्या वादातून सशस्त्र हल्ला, ४१ जणांना अटक



मुंबई: आग्रीपाडा येथे शनिवारी रात्री एका कंपनीच्या जागेवरून झालेल्या वादातून मनी मॅग्नम कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांवर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी रायफलने गोळीबार करीत दगड, विटा फेकून काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मॅग्नम कंपनीचे अनेक कर्मचारी जखमी झाले. आग्रीपाडा पोलिसांनी याप्रकरणी फ्रॅंको कंपनीतील ४१ जणांना अटक केली. त्यात २० महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून चार रायफली, मिरची स्प्रे, तसेच हल्ल्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त केली. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

मुंबईतील आग्रीपाडा येथे मनी मॅग्नस या कंपनीच्या मालकी जागेवरून वाद आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. फ्रॅंको कंपनीचे मालक पास्कल पोस्टेल याने कंपनीच्या जागेवर कब्जा मिळवून एक प्रवेशद्वार बंद केले. प्रवेशद्वार क्रमांक १ येथे खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले होते. प्रवेशद्वार क्रमांक २ येथे मॅग्नस कंपनीचे सुरक्षा रक्षक आहेत. शनिवारी रात्री १० च्या सुमारास फ्रॅंको कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी अचानक मॅग्नस कंपनीचे सुरक्षा रक्षक आणि कर्मचार्यांवर मिरची पावडरच्या स्प्रेने फवारणी केली. यामुळे कर्मचार्याचे डोळे चुरचुरायला लागले. त्याच वेळेला फ्रॅंको कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी सशस्त्र हल्ला केला. रायफलने गोळीबार केला तसेच दगड, विटांचा मारा केला. काठ्यांनी मारहाण केली. गोळीबारात कुणी जखमी झाले नाही. मात्र हल्ल्यात मनी मॅग्नस कंपनीचे अनेक जण जखमी झाले. काही वेळात आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

मनी मॅग्नस कंपनीचा सुरक्षा रक्षक गणेश साळुंखे (४८) याने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आग्रीपाडा पोलिसांनी हल्ला केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम १८१ (१), १८९ (२), १८९, १८९ (४), १०९, १२६ (२), ११८ (१), १९१ (२), १९१ (३), ६१ (२) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम २५, २७, ३० अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एकूण ४१ जणांना अटक केली. त्यात २० महिलांचा समावेश आहे. फ्रॅंको कंपनीचा मालक पास्कल पोस्टेल यांच्यासह १५ जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

वाद काय आहे?

सातरस्ता येथील जेकब सर्कल जवळील जागा २००५ पासून मनी मॅग्नस नेस्ट प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वीची एव्हरेस्ट) कंपनीच्या नावावर आहे. फ्रॅंको इंडियन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने येथील काही जागेवर बेकायदेशीरपण अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मॅग्नम आणि फ्रॅंको कंपनीत वाद आहे. सध्या हे प्रकरण मुंबईच्या दिवाणी न्यायालयात आहे. न्यायालायाने या दाव्याचा निकाल देताना अतिक्रमण बेकायदेशीर असल्याचे सांगितले. त्यामुळे फ्रॅंको कंपनीविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र फ्रॅंको कंपनीने या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर या वादाला ‘स्टेटस को’ देण्यात आला आहे.



Source link

पुढील ४-५ दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

0
पुढील ४-५ दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज


नैर्ऋत्य मोसमी वारे येत्या चार ते पाच दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, मान्सून जर वेळेपूर्वी केरळमध्ये दाखल झाला, तर २००९ नंतर भारतीय मुख्य भूमीवर मान्सून सर्वात लवकर दाखल होईल. हवामान खात्याने यापूर्वी २७ मेपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.



Source link

Rohit Sharma gives away his prized Lamborghini Urus to one of the fantasy cricket contest winners

0
Rohit Sharma gives away his prized Lamborghini Urus to one of the fantasy cricket contest winners



Rohit Sharma gives away his prized Lamborghini Urus to one of the fantasy cricket contest winners | हिटमॅन रोहित शर्माने महाराष्ट्राच्या तरुणाला दिलेल्या कारचे फीचर्स तुम्हाला माहितीये?





Source link

इमारतीच्या गच्चीवरून पडून तरुणीचा मृत्यू

0
इमारतीच्या गच्चीवरून पडून तरुणीचा मृत्यू


मुंबई : इमारतीच्या गच्चीवरून छायाचित्र काढताना तोल जाऊन पडल्याने १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. दहिसर येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली. जान्हवी चावला असे या मुलीचे नाव आहे.

दहीसर पूर्व येथील मिस्किटा नगरमधील परिचय इमारतीच्या सातव्या मजल्यावर जान्हवी राहत होती. नुकतीच तिने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा दिली होती. रविवारी सायंकाळी पावसाळी वातावरण तयार झाल्याने ती इमारतीच्या गच्चीवर आकाशातील छटांची छायाचित्रे काढण्यासाठी गेली होती. सायंकाळी ७ च्या सुमारास छायाचित्रे काढत असताना अचानक तिचा तोल जाऊन ती गच्चीवरून खाली पडली. तिला उपचारासाठी दहिसरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा जानवीचे वडील इमारतीच्या खाली बसले होते. दहिसर पोलिसांनी तिच्या पालकांचा जबाब नोंदवला आहे.

जान्हवी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकत होती. नुकतीच तिने दहावीची परीक्षा दिली होती. ती चावला दाम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. या घटनेत कसलाही संशयास्पद प्रकार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.





Source link

Hera Pheri 3: अक्षय कुमारने परेश रावलला पाठवली लीगल नोटीस, निर्मात्यांना झाले इतके कोटींचे नुकसान

0
Hera Pheri 3: अक्षय कुमारने परेश रावलला पाठवली लीगल नोटीस, निर्मात्यांना झाले इतके कोटींचे नुकसान


अभिनेता अक्षय कुमारने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. खरं तर ‘हेरा फेरी ३’चं शूटिंग सुरू झालं होतं, बाबू भैय्याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि मग परशा रावल यांनी ही कल्ट कॉमेडी मध्येच सोडली. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार यांनी परेश रावल यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दंड मागितला आहे.



Source link

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण जयंत नारळीकर यांचे निधन

0
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण जयंत नारळीकर यांचे निधन


प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान संप्रेषक आणि पद्मविभूषण विजेते डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत. त्यांच्या कुटुंबातील घडामोडींची माहिती असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.



Source link

OBC समीकरण मिटवण्याचा जुगार? छगन भुजबळ पुन्हा फडणवीस सरकारमध्ये मंत्री; मुंडेंचे घेतले स्थान

0
OBC समीकरण मिटवण्याचा जुगार? छगन भुजबळ पुन्हा फडणवीस सरकारमध्ये मंत्री; मुंडेंचे घेतले स्थान



राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ते धनंजय मुंडे यांची जागा घेतील.



Source link