
Indias oldest school: चेन्नईतील जॉर्ज अँग्लो-इंडियन उच्च माध्यमिक शाळा ही भारतातील सर्वात जुन्या खासगी शाळांपैकी एक आहे.
Source link

Indias oldest school: चेन्नईतील जॉर्ज अँग्लो-इंडियन उच्च माध्यमिक शाळा ही भारतातील सर्वात जुन्या खासगी शाळांपैकी एक आहे.
Source link


नागपूर : सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौऱ्यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून केली आहे.
सरन्यायाधीश हे संविधानिक संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांचा अवमान हा संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अवमान आहे. हा केवळ एका व्यक्तीच्या दुर्लक्षित वागणुकीपुरता मर्यादित नाही, तर भारतीय संविधानाच्या प्रतिष्ठेवर झालेला थेट आघात म्हणून याकडे पाहावे लागेल. ते आंबेडकरी विचारसरणीचे असल्याने त्यांना अशी वागणूक दिली का? विशेष म्हणजे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून त्यांना मिळालेली उपेक्षात्मक वागणूक ही सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बाब आहे.
सरन्यायाधीशांनी स्वतः आपल्या भाषणात राज्य सरकार व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या विधानामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकाराकडे वळले असून, हा फक्त प्रोटोकॉलचा भंग नव्हे, तर एका विचारधारेचा व संवैधानिक मूल्यांचा अवमान आहे का, हा प्रश्न देखील उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्राद्वारे संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि संविधानिक संस्थांचा सन्मान अबाधित राहील, असे नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश यांचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप यापूर्वी पटोले यांनी केला होता. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष सरन्यायाधीश, यांचा एक विशेष प्रोटोकॉल असतो, त्यांच्या दौऱ्याची माहिती आधिच दिलेली असते पण आम्हाला माहिती नव्हती असे अधिकारी सांगत आहेत हे पटणारे नाही.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारने महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली आहे. सरन्यायाधीश त्यावर गमतीने बोलले, पण तो प्रशासनाला इशारा आहे तो सरकारला कळला नसेल. सरन्यायाधीश गवई हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांच्या महाराष्ट्रात अपमान केला आहे का? का मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले होते? हे समजले पाहिजे. शाहू, फुले आंबेकरांच्या राज्यातून एक आंबेडकरी विचाराचा व्यक्ती सरन्यायाधीश झाला त्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे सरकारमध्ये अनुभवी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही याचे गांभिर्य नाही का? असेही नाना पटोले सोमवारी म्हणाले होते.

मुंबई: टी. एस. चाणक्य परिसरातील तलावाच्या आसपासच्या भागातील रहिवासी सध्या कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त झाला आहेत. मागील काही दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. या परिसरात नियमित साफसफाई करण्यात येत नाही, असा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, टी. एस. चाणक्य तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोंचे आगमन होते. त्यामुळे या परिसरात साचलेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावली नाही तर त्याचा परिणाम फ्लेमिंगोंच्या अधिवासावर होण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.
नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्रात फ्लेमिंगोंना भरपूर खाद्य मिळत असल्याने तेथे त्यांचा अधिक वावर असतो. फ्लेमिंगोना पाहण्यासाठी मुंबई, नवी मुंबई , पनवेल आदी भागांतील नागरिक मोठ्या संख्येने येथे येतात. दरम्यान, सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, निर्माल्य आदींचा समावेश आहे.
तलाव परिसरात साचलेला कचरा फ्लेमिंगो, तसेच इतर पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतो. पाण्यात मिसळणारा प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य हे पाण्याचे नैसर्गिक गुणधर्म बदलतात, त्यामुळे फ्लेमिंगोंना आवश्यक असणारे अन्न विशेषत: शैवाळ व सूक्ष्म जीव नष्ट होण्याची शक्यता वाढते. परिणामी, यामुळे या भागातील फ्लेमिंगो अन्यत्र स्थलांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची अस्वच्छता जैवविविधतेसाठीही धोकादायक ठरू शकते.
टी. एस. चाणक्य तलाव परिसरात कचरा साचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून साफसफाई केली जाते. मात्र, पुन्हा काही दिवसांत परिस्थिती जैसे थे होते. या भागात पर्यावरणप्रेमी वेळोवेळी स्वच्छता मोहिमही राबवितात, तरीदेखील पुन्हा कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याचे पर्यावरणप्रेमी धर्मेश बरई यांनी सांगितले. येथे निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनकेदा निर्माल्य बाहेरच फेकण्यात येत असल्याचे निदर्शनास येते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


RAW Agent Selection Process And Salary: भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणावपूर्ण संबंध कायम असतानाच काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भारतामधील युट्यूबर ज्योती मल्होत्राबरोबरच गजला आणि इतर 11 जणांना पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम करत असल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या सर्वांविरुद्ध काही ना काही प्राथमिक पुरावे सापडल्यानेच त्यांना तपास यंत्रणांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व हेर बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असून त्यांनी देशाच्या सुरक्षेशीसंबंधित महत्त्वाची माहिती शत्रू राष्ट्राला पुरवल्याचा संशय आहे. मात्र अशाप्रकारे केवळ भारतातच हेर आहेत असं नाही. प्रत्येक देशाची एक गुप्तहेर संघटना असते आणि तिथे गुप्तहेर बनण्याची इच्छा असणाऱ्यांना हेर बनून देशाची सेवा करण्याबरोबर चांगल्या कामाईचीही संधी असते.
भारताची गुप्तहेर संघटना म्हणजेच रॉ अर्थात Research and Analysis Wing मधील एजंट्स हे प्रशिक्षित तज्ञ मंडळी असतात. भारताबाहेरील गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्यात या एजंट्सची भूमिका फार महत्त्वाची असते. राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय स्तरावर या एजंट्सच्या माध्यमातून गुप्तपणे कारवाया केल्या जातात. देशाची सुरक्षा अबाधित राहील याची काळजी घेण्याचं मुख्य काम हे या एजंट्सचं असतं. दहशतवादी कारवाया हाणून पाडणे, दहशतवाद्यांपासून देशाचं संरक्षण करणे आणि देशाच्या रजकीय हितांचं संरक्षण करणे हे गुप्तचरांचं मुख्य काम असतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल रॉ एजंट बनण्यासाठी काय शिक्षण घ्यावं लागतं.
तर रॉ एजंट होणं हे सोपं काम नाही. यासाठी यूपीएससी, एसएससी सारख्या कठीण परीक्षा द्यावा लागतात. आता रॉ एजंट झाल्यानंतर किती पगार मिळतो हा प्रश्न पडणंही सहाजिक आहे. रॉ म्हणजेच रिसर्च अॅण्ड अॅनलिसीस विंगमध्ये अधिकारी होण्यासाठी थेट भरती प्रक्रिया राबवली जात नाही. ही खरं तर भारताबाहेर प्रामुख्याने काम करणारी यंत्रणा आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी विशिष्ट योग्यता, कौशल्य आणि प्रक्रियेमधून जावं लागतं.
रॉ एजंट बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी खालीलप्रमाणे: –
नागरिकत्व – रॉ एजंट बनण्यासाठी उमेदवार भारतीय असणं अत्यावश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही क्षेत्रातून पदवीपर्यंतचं किमान शिक्षण आवश्यक आहे. तसेच परदेशी भाषांचं ज्ञान, तंत्रज्ञान, कंप्युटर्सचं ज्ञान, अवलोकन करण्याची क्षमता या प्राथमिक गरजा आहेत.
वयाची मर्यादा किती – उमेदवार हा 56 वर्षांहून कमी वयाचं असणं बंधनकारक आहे.
कोणती वैशिष्ट्यं हवीत – तल्लख बुद्धी, गुप्तता बाळगण्याची क्षमता आणि उत्तम निर्णय घेण्याची क्षमता. परदेशी भाषांचं ज्ञान. खास करुन स्थानिक आणि अंतरराष्ट्रीय भाषांचं ज्ञान असल्यास अतिरिक्त फायदा होतो. तसेच स्ट्रॅटर्जिक थिकिंगचं कौशल्य असणं फायद्याचं असतं.
खालील पद्धतीने रॉ एजंट्सची भरती केली जाते –
1) यूपीएससी आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि आयआरएससारख्या ग्रुप-ए पदावंर भरतीसाठी सिव्हिल सेवा परीक्षा म्हणजेच सीएसई परीक्षा घेतली जाते. ती उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. लाल बहादूर शास्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये फाऊंडेशन कोर्सदरम्यान रॉ अधिकारी होऊ शकतात अशा उमेदवारांची निवड केली जाते. या उमेदवारांना सायकोलॉजिकल चाचण्यांसाठी बोलावलं जातं. हे आवश्यक का आहे? असा प्रश्न पडला असले तर रॉमध्ये जास्तीत जास्त क्लास वन अधिकारी हे सिव्हिल सेवा खास करुन आयपीएस आणि आयएफएस पदावरुन नियुक्त केले जातात.
2) अन्य सरकारी विभागांमधून नियुक्ती – रॉमध्ये भरती करण्यासाठी उमेदवार अन्य संस्थांमधून ज्यामध्ये गुप्तचर यंत्रणा, भारतीय लष्कर, हवाईदल, नौदलाबरोबर मिलेट्री इंटेलिजन्समधील व्यक्तींची निवड केली जाते. मिलेट्री इंटेलिजन्समधील अधिकाऱ्यांना विशेष प्राधान्य दिलं जातं.
3) एसएससी सीजीएल किंवा एसीआयओ परीक्षा – काही दाव्यांनुसार, स्टाफ सिलेक्शन कमीशन म्हणजेच एसएससी, कंबाइण्ड ग्रॅजूएशन लेव्हल म्हणजेच सीजीएल परीक्षांमधून किंवा असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणजेच एसीआयओ परीक्षांच्या माध्यमातून रॉमध्ये प्रवेश मिळवणं शक्य आहे. हा मार्ग तळाशी असलेली कर्मचाऱ्यांची फळी निवडण्यासाठी वापरला जातो. कामगिरीच्या आधारावर या लोकांना बढती मिळत जाते.
4) सीडीएस परीक्षा (लष्करी पार्श्वभूमी) – कंम्बाइण्ड डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजेच सीडीएस परीक्षेच्या माध्यमातून लष्कर, नौदल आणि वायूसेनेत सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांना रॉसाठी पात्र ठरु शकतात. लष्करी पार्श्वभूमी असलेल्यांना विशेष प्रशिक्षणाच्या आधारावर रॉमध्ये सहभागी करुन घेतलं जातं.
रॉ एजंट्स निवडण्याची पद्धत फारच गुप्त आहे. यासंदर्भात सार्वजनिक क्षेत्रात फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळेच या भरतीसंदर्भातील जाहिराती किंवा निवेदनं छापली जात नाहीत. रॉ स्वत: संभाव्य उमेदवारांची निवड करतं. शैक्षणिक पार्श्वभूमी, अनुभव आणि विशेष गुणवैशिष्ट्यं किंवा प्राविण्य म्हणजे उदाहरण घ्यायचं झाल्यास सायबर सुरक्षा, तांत्रिक तज्ज्ञ असल्यास अशा आधारावर निवड केली जाते. यानंतर मानसिक चाचणी आणि फेरतपासणीनंतर निवड केली जाते.
फिल्ड एजंट्स – जे प्रत्यक्षात मोहिम राबवतात.
डेस्क ऑफिसर – जे गुप्त माहितीची पडताळणी करुन धोरणं ठरवतात
तांत्रिक तज्ज्ञ – सायबर तज्ज्ञ, सिग्नल इंटेलिजन्स आणि तांत्रिक देखभाल
भाषा तज्ज्ञ- स्थानिक किंवा अंतरराष्ट्रीय भाषांमधील तज्ज्ञ
राजकीय सल्लागार – निती, धोरणं ठरवणे आणि सरकारला सल्ला देण्याचं काम.
रॉ एजंट्सची माहिती फारच गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे रॉमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगाराबद्दलची कोणतीही आकडेवारी सार्वजनिक जीवनामध्ये उपलब्ध नाही. मात्र आयएएस, आयपीएस आणि इतर मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या पगाराच्या आकड्यांवरुन रॉ एजंट्सच्या पगाराचा अंदाज बांधता येतो. आयएएस अधिकाऱ्याचं वेतन हे साधारणपणे किमान 56 हजार ते जास्तीत जास्त दर महा अडीच लाखांदरम्यान असतं.

मुंबईः वहिनीला भूत मारून टाकेल, अशी भीती दाखवून एका मांत्रिक महिलेने लाखो रुपये रुपयांचे दागिने व रोख रकमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी महिला मेहजबीन रईस खान ऊर्फ हजरत मरियम हिच्याविरोधात खंडणी, फसवणूकीसह महाराष्ट्र जादुटोणा प्रतिबंधक कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेने अशा प्रकारे आणखी काही व्यक्तींची फसवणूक केल्याचा संशय असून त्याबाबत पार्क साईट पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विक्रोळी (प.) परिसरात वास्तव्यास असलेल्या ४८ वर्षीय तक्रारदार मुलुंडमधील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्याच्या शेजारीच भाऊ व वहिनी राहतात. त्यांच्या वहिनीला मानसिक आजार असून गेल्या १० वर्षांपासून त्यांच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण त्यांच्या मानसिक स्थितीत सुधार होत नव्हती. त्यामुळे तक्रारदाराच्या भावाने वहिनीला घाटकोपर येथील मेहजबीन ऊर्फ हजरत मरियम हिच्याकडे नेले. त्यांच्या पत्नीला पाहून तिला भूतबाधा झाली असून ती भूतबाधा घालविण्यासाठी काही खर्च करावा लागेल असे तिने सांगितले. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या वडिलांनी तिला काही सोन्यासह बकर्याचा बळी देण्यासाठी पाच हजार रुपये दिले होते. त्यानंतर तिने तिच्या हातावर एक धागा बांधला. मात्र त्यातूनही त्यांना काहीच फरक पडला नव्हता.
अखेर तक्रारदारांची वहिनी राहत असलेल्या सोसायटीमधील आत्महत्या केलेल्या तरूणाचे भूत त्यांच्या मागे आहे. त्याच्या आई कर्ज फेडावे लागेल, अन्यथा भूत महिलेला मारून टाकेल, अशी भीती आरोपी महिलेने घातली. तसेच घरातील सोने आणायला सांगितले. अशा प्रकारे आरोपी महिलेने भीती दाखवून तक्रारदारांचा भाऊ व पुतणीकडून १५ हजार रोख व तीन लाखांचे दागिने घेतले. हा प्रकार १ सप्टेंबर २०२४ पासून सुरू आहे. पण त्यानंतरही महिलेला बरे वाटत नसल्यामुळे अखेर मांत्रिक महिलेने त्यांची फसवणूक केल्याचे लक्षात आले.त्यानुसार याप्रकरणी पार्क साईट पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
पोलिसांनी तक्रारीची पडताळणी करून मांत्रिक महिलेविरोधात खंडणी, फसवणूक व जादुटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मेहजबीन हिला अटक करण्यात आली. आरोपी महिलेने अशा प्रकारे आणखी व्यक्तींची फसवणूक केल्याचा संशय असून त्याबाबत पार्क साईट पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Youtuber Jyoti Malhotra Arrest: ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत आपल्याला काहीच माहिती नव्हती असा दावा तिचे वडील हरिश मल्होत्रा यांनी केला आहे. तसंच ज्योतीने आपल्याला दिल्लीला जात असल्याचं सांगितलं होतं, तिने पाकिस्तान दौऱ्याचा कधीही उल्लेख केला नाही असंही ते म्हणाले आहेत. ज्योतीला अधिकृत गुपित कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ज्योती मल्होत्राच्या मोबाईल फोन आणि लॅपटॉपवर संशयास्पद सामग्री आढळल्याचा दावा केला आहे.
हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणा पोलिसांनी अटक केलेल्या आपल्या मुलीने यूट्यूब व्हिडिओ बनवले होते आणि पाकिस्तानला भेट दिली होती, असा दावा हरीश मल्होत्रा यांनी केल्यानंतर आता हे विधान केलं आहे. पोलिसांनी जप्त केलेले फोन परत करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्यांनी सांगितलं की, गुरुवारी पोलीस पहिल्यांदा त्यांच्या घरी आले. पोलिसांनी त्यांची बँक कागदपत्रे, फोन, लॅपटॉप आणि पासपोर्ट जप्त केले आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी दिल्लीला येत असे आणि गेल्या चार-पाच दिवसांपासून हिसारमध्ये आहे.
“मला काहीच माहिती नव्हतं. आपण दिल्लीला जात असल्याचं तिने सांगितलं होतं. तिने मला काहीच सांगितलं नाही. तिचे कोणतेही मित्र कधी आमच्या घरी आले नाहीत. काल पोलीस तिला घेऊन आले होते. ती आपले कपडे घेऊन निघून गेली. ती माझ्याशी काहीच बोलली नाही. मलाही काय बोलावं कळत नव्हतं. ती घऱात व्हिडीओ बनवायची. मी कधीच म्हटलं नाही की, ती पाकिस्तानला जायची. ती मला आपण दिल्लीला जात आहोत असं सांगायची. माझ्या काही मागण्या नाहीत. जे काही व्हायचं, ते होणार आहे,” असं ते म्हणाले आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्योती 2023 मध्ये व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. या भेटीदरम्यान, ती मिशनमध्ये काम करणाऱ्या अहसान-उर-रहीम, ज्याला दानिश म्हणूनही ओळखले जाते, अशा एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याचं वृत्त आहे. तपासकर्त्यांचा आरोप आहे की ती त्याच्या संपर्कात राहिली. ती दोन वेळा पाकिस्तानला गेली आणि पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांशी संबंधित व्यक्तींना भेटली.
तिच्या वडिलांनी मात्र ती युट्बूच्या कामानिमित्त परदेशात जात होती असा दावा केला आहे. “लॉकडाउनच्या आधी ती दिल्लीत काम करत होती. माझ्याकडे छोटा फोन असल्याने मी कधी तिचे व्हिडीओ पाहिले नाहीत. माझ्याकडे बोलण्यासारखं नाही. मी स्वत: नाराज असून, गेल्या 3 दिवसांपासून आजारी आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
हरीश मल्होत्रा यांनी यापूर्वी एएनआयला सांगितलं होतं की, त्यांच्या मुलीने तिच्या चॅनेलसाठी पाकिस्तानमध्ये व्हिडिओ बनवले होते आणि प्रवासासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेतल्या होत्या. “तिने यूट्यूब व्हिडिओ बनवले. ती पाकिस्तान आणि इतर ठिकाणी जायची. जर तिचे काही मित्र तिथे असतील तर ती त्यांना फोन करू शकत नाही का?”, अशी विचारणा त्यांनी केली. पोलिसांनी तिचे मोबाईल फोन, पासपोर्ट आणि बँक कागदपत्रे जप्त केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हिसारचे पोलीस अधीक्षक (एसपी) शशांक कुमार सावन यांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा (पीआयओ) तिला अॅसेट बनविण्यासाठी तयार करत आहेत. त्यांनी खुलासा केला की ज्योतीने अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिली होती, ज्यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा एक दौरा आणि चीनलाही प्रवास केला होता.

