Sunday, July 12, 2026
Home Blog Page 244

बापरे! राजभवनात चोरी, चार महत्त्वाच्या हार्ड डीस्क गायब; हेल्मेट घालून आलेला चोर… घटनाक्रम वाचून ‘जत्रा’ सिनेमातला सीन आठवेल

0
बापरे! राजभवनात चोरी, चार महत्त्वाच्या हार्ड डीस्क गायब; हेल्मेट घालून आलेला चोर… घटनाक्रम वाचून ‘जत्रा’ सिनेमातला सीन आठवेल


Theft at Raj Bhavan: अनेक राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान असणाऱ्या राजभवन या वास्तूला अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त असतं. राज्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती, कायदपत्र आणि इतक अनेक संदर्भांची साठवणही या वास्तूमध्ये अतिशय काळजीपूर्वतरित्या केली जाते. मात्र, सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतानाही राजभवनच सुरक्षित नसल्याची बाब आता खळबळजनकरित्या समोर आली आहे. कारण ठरतंय ती म्हणजे तिथं झालेली फिल्मी स्टाईल चोरी. 

‘जत्रा’ सिनेमातील हेल्मेट घालून बँक लुटणाऱ्या दरोडेखोरांचा तो सीन लक्षात आहे का? अशीच काहीशी चोरी राजभवनात झाली असून, चोर चक्क हेल्मेट घालून आल्याचं पाहायला मिळालं. तेलंगणातील राजभवनात घडलेल्या या घटनेमुळं यंत्रणांनाही धक्का बसला आहे. तेलंगणा राजभवनात असणाऱ्या सुधर्मा भवनातील पहिल्या मजल्यावरील एका दालनातून चार हार्ड डीस्क चोरीला गेल्या आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार 14 मे 2025 रोजी ही घटना घडली आणि आता उघडकीस आली. यामध्ये चोरानं हेल्मेट घालून तो संगणक कक्षात आला आणि तिथं त्यानं हार्ड डिस्क पळवल्या. चोरीला गेलेल्या या हार्ड डीस्कमध्ये महत्त्वाची माहिती, फाईल आणि कैक अहवाल असून यामुळं आता अतिशय गोपनीय माहिती चोरांच्या हाती आहे हीच वस्तूस्थिती समोर आल्यानं राजभवनातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि यंत्रणेवर ताशेरे ओढले जात आहेत. 

सीटीटीव्हा फूटेजमध्ये स्पष्ट दिसतोय चोर… 

राजभवन कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित चोराची माहिती दिली आहे. या फूटेजमध्ये एक हेल्मेट घातलेली व्यक्ती खोलीत येऊन कालांतरानं हार्ड डीस्क घेऊन पळ काढताना दिसत आहे. सदर घटना लक्षात येताच राजभवन कर्मचाऱ्यांनी तातडीनं पंजागुट्टा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली, ज्यानंतर आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध घेत आहेत. 

तेलंगणा राजभवन हे तेथील राज्यपालांचं शासकीय निवासस्थान आणि त्यांचं कार्यालय असून, तिथं सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आले आहेत. पण, यातूनही वाट काढत हा चोर इतक्या आतपर्यंत शिरला कसा हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 





Source link

इंदापूरमधील ‘छत्रपती’ कारखाना पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात

0
इंदापूरमधील ‘छत्रपती’ कारखाना पुन्हा अजित पवारांच्या ताब्यात


बारामती : इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘जय भवानी माता’ पॅनलच्या सर्व २१ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा एकदा अजित पवार यांंच्या ताब्यात राहिला आहे.

पवार यांच्याविरोधात भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने उभ्या केलेल्या ‘श्री छत्रपती बचाव’ पॅनलवर नामुष्कीची वेळ आली. अजित पवार यांंच्या ‘जय भवानी माता’ पॅनलच्या विरोधात भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. कारखान्यासाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीत पहिल्याच फेरीपासून अजित पवारांच्या ‘श्री जय भवानी माता’ पॅनलचे सर्व २१ उमेदवार आघाडीवर राहिले. मतदानाचा कल लक्षात घेता उपमुख्यमंत्री पवार यांचे पॅनल विजयी होण्याच्या मार्गावर होते. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. जिल्हा निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. या कारखान्याच्या २२ हजार ६८१ मतदारांपैकी १६ हजारांहून अधिक मतदारांनी मतदान केले.

मतमोजणीत पहिल्या फेरीपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील ‘जय भवानी माता पॅनल’ने आघाडी घेतली. ‘जय भवानी माता पॅनल’च्या वतीने पुढील सलग पाच वर्षे अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज जाचक यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यांचा गट क्रमांक एक होता. या गटात जाचक यांनी मोठी आघाडी घेतली. सायंकाळी सहापैकी पाच गटांची मतमोजणी झाली. मतमोजणीचा कल लक्षात घेता सभासदांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शेतकरी कृती समितीला दिल्याचे दिसून आले.

हेही वाचा
हेही वाचा

कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, भाजपचे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजी थोरात यांनी ‘श्री छत्रपती बचाव’ पॅनलच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट झाले. या पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत होण्याच्या मार्गावर होते.





Source link

Petrol Diesel Price Today, 20 May 2025: Check here Maharashtra India Petrol and Diesel Price in Marathi

0
Petrol Diesel Price Today, 20 May 2025: Check here Maharashtra India Petrol and Diesel Price in Marathi



Petrol Diesel Price Today, 20 May 2025: Check here Maharashtra India Petrol and Diesel Price in Marathi | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा बदल, पाहा कुठे स्वस्त तर कुठे महाग झालं पेट्रोल





Source link

Jayant Narlikar Passes Away : Astrophysicist Dr Jayant Narlikar Dies in Pune Home at age of 86

0
Jayant Narlikar Passes Away : Astrophysicist Dr Jayant Narlikar Dies in Pune Home at age of 86



Jayant Narlikar Passes Away : Astrophysicist Dr Jayant Narlikar Dies in Pune Home at age of 86 | ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन, ‘आकाशाशी जडले नाते’सह अनेक पुस्तकं लिहिणारी लेखणी शांत





Source link

राज्यातील अंगणवाड्यांत आता नवा अभ्यासक्रम, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार निर्मिती; अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण

0
राज्यातील अंगणवाड्यांत आता नवा अभ्यासक्रम, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार निर्मिती; अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण



New curriculum now available in Anganwadi in Maharashtra, created as per National Education Policy राज्यातील अंगणवाड्यांत आता नवा अभ्यासक्रम, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार निर्मिती; अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण





Source link

धक्कादायक! You Tuber ज्योतीचा दहशतवादी हाफिज सईदच्या तळावर 14 दिवस मुक्काम; प्रशिक्षणानंतर भारतात परतली आणि…

0
धक्कादायक! You Tuber ज्योतीचा दहशतवादी हाफिज सईदच्या तळावर 14 दिवस मुक्काम; प्रशिक्षणानंतर भारतात परतली आणि…


Haryana YouTuber Jyoti Malhotra : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाला शस्त्रसंधीचा युद्धविराम मिळाला आणि संभाव्य युद्धाचं सावट दूर झालं. असं असतं तरीही या दोन्ही देशांमध्ये असणारी तणावाची परिस्थिती मात्र अद्यापही निवळलेली नाही. सध्याच्या घडीला (Pahalgam Terror Attack) पहलगाम हल्ल्याच्या धर्तीवर भारतीय तपास यंत्रणा आणि लष्कराकडून विविध स्तरांवर शक्य त्या सर्व मार्गांनी तपासाला वेग देण्यात आला आहे. नवनवीन गोष्टी याच तपासातून समोर येत असून सध्या तपास यंत्रणांनी (You Tube) युट्यूबर्सवर करडी नजर ठेवली आहे. यातून पुढे आलेलं आणि सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं एक नाव म्हणजे ज्योती मल्होत्रा. 

पाकिस्तानमध्ये या युट्यूबरचं जाणं, भारतात असताना पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाला भेट देणं, तेथील अधिकाऱ्यांसोबतचं तिचं वावरणं हे सारंकाही सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलं असून, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे थेट पाकमधील दहशतवादी तळापर्यंत ज्योतीचं पोचोचणं आणि तिथं मुक्काम करणं. 

पाकिस्तानातील मुरिदकेविषयी गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं ऐकायला मिळत आहे. हे तेच ठिकाण जिथं लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मुख्य तळ असून, कुख्यात दहशतवादी हाफीज सईदचा ठिकाणा इथंच असतो असंही म्हटलं जातं. विविध अंगांनी करण्यात आलेल्या तपासानुसार भारताची युट्यूबर पाकच्या संपर्कात आल्यानंतर याच त लावर पोहोचली होती आणि तिथं तिनं हेरगिरीचं प्रशिक्षणही घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार मुरिदके येथील प्रशिक्षणानंतरच ज्योतीवर पुढील मोहिम सोपवण्यात आली. मात्र, ही मोहिम सुरू होण्याआधीच बिंग फुटलं आणि ती यंत्रणांच्या तावडीत सापडली. पहलगाम हल्ल्यापूर्वी काही दिवस आधीच ज्योती पाकिस्तानात गेली असून, तिथं मुरिदकेमध्ये तिचा 14 दिवसांचा मुक्काम असल्याची खळबळजनक बाब आता पुढे आली आहे. 

पाकिस्तानातील संवेदशनशील भागांमध्ये ज्योतीची ये-जा 

पाकिस्तानात गेली असताना ज्योतीला तिथं अनेक प्रतिबंधीत क्षेत्रांमध्येसुद्धा अगदी सहज प्रवेश मिळत होता, ती तिथं हवं तिथे जात होती इतकंच काय तर तिला तिथं पोलिसांचं संरक्षणही पुरवण्यात आल्याचं तपासातून उघड झालं आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील दानिश नामक व्यक्तीच्या सांगण्यावरून पाकच्या आयएसआय या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करणाऱ्या शाकिर नावाच्या एका व्यक्तीनं तिला या ठिकाणांवरील प्रवेशाची मुभा देऊ केली होती. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : भरदिवसा काळेकुट्ट ढग दाटून येणार; मान्सूनपूर्व पावसाचा मारा ‘या’ भागांना झोडपणार

ज्योतीला सातत्यानं पाकिस्तानी मित्रांचे फोन येत असून, यामध्ये शाकिरचे फोन सर्वाधित होते. जट रंधावा या नावानं तिनं त्याचा नंबर सेव्ह केला होता. दरम्यान, हरियाणा पोलीस सूत्रांचा हवाला देत एका प्रतिष्ठीत माध्यमाच्या वृत्तानुसार ज्योतीनंय याबाबतचा खुलासा तपासादरम्यान केला. मुरिदकेमधून तिला भारतात नेमकं कोणत्या मोहिमेसाठी पाठवण्यात आलं होतं हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. सध्याच्या घडीला ज्योती पाच दिवसांच्या कस्टडी रिमांडवर असून हिसार पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तिची कस्टडी असल्याचं म्हटलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणात ज्योती एकटी नसून भारताविरोधातील या कटात 20 हून अधिक जणांचा समावेश असून त्यातील बरेच सोशल मीडिया इंफ्लुएन्सर आहेत ही बाबही समोर आली आहे. त्यामुळं आता या रॅकेटची पाळंमुळं नेमकी कुठवर पोहोचली आहेत याचाच तपास यंत्रणा घेताना दिसत आहेत. 





Source link

Chhagan Bhujbal First Reaction Before Oath Ceremony he Said Eight Days Before All Things Decided

0
Chhagan Bhujbal First Reaction Before Oath Ceremony he Said Eight Days Before All Things Decided


Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला तेव्हा त्यात अनेक वरिष्ठांची नावं नव्हती त्यापैकी एक नाव होतं ते छगन भुजबळ यांचं. अजित पवारांनी छगन भुजबळ यांचा पत्ता कापला अशीही चर्चा तेव्हा झाली होती. एवढंच नाही तर जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना हा छगन भुजबळांचा डायलॉगही गाजला होता. आता याच भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री होते आहे. जहा नहीं चैनाचा संदर्भ देतच त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी छगन भुजबळ यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं.

काय म्हणाले छगन भुजबळ?

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांचे आभार मानतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानतो. सगळं आठ दिवसांपूर्वीच ठरलं आहे. त्यानंतर आता शपथविधी होतो आहे. ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंचं खातं छगन भुजबळांना मिळणार?

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. छगन भुजबळ यांना हेच दिलं जाईल अशी चर्चा रंगली आहे. आता नेमकं छगन भुजबळांना कुठलं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अखेर भुजबळ यांची नाराजी दूर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असूनही महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी अजित पवारांवरही टीका केल्याचं दिसून आलं. भुजबळांची हीच नाराजी आता दूर करण्यात येणार आहे. अजित पवारांनी मंत्रिपदावरून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. या संयमाचं फळ त्यांना मिळालं आहे असंच म्हणता येईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने खेळी?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुतीकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही खेळी खेळल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. धनंजय मुंडे यांच्या रुपाने ओबीसी नेतृत्व या आधी मंत्रिमंडळात होतं. पण त्यांना संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. आता छगन भुजबळांच्या रुपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात असणार आहे. छगन भुजबळांनी त्यांच्या नाशिकमधील काही निवडक कार्यकर्त्यांना सोमवारी रात्रीच मुंबईत बोलावून घेतलं आहे.





Source link

Nayana Josan Gokul wedding photos

0
Nayana Josan Gokul wedding photos



famous actress Nayana Josan married to longtime boyfriend Gokul photos viral : नयना जोसन गोकुळ लग्नाचे फोटो : अभिनेत्री नयना जोसनचे लग्न : Nayana Josan Gokul wedding photos





Source link

नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू



पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील केसनंद भागात घडली. ट्रकचालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी ट्रकमालकासह चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रामदास साहेबराव गायकवाड (वय ५२) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत त्यांचे भाऊ यशवंत साहेबराव गायकवाड (वय ४०, रा. दौंड) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रकमालक संतोष आत्माराम भंडारे (वय ४७, रा. शिरूर), तसेच ट्रकचालक जनार्दन बाबुराव चव्हाण (वय ६३, रा. रायकर मळा, यवत) या दोघांविरोधात वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जनार्दन चव्हाण याला अटक केली असून, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास गायकवाड हे रविवारी (१८ मे) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नगर रस्त्यावरील केसनंद परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी ट्रकचालक चव्हाणला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.



Source link

तरीही पाकिस्तानी प्रचार ही आपली डोकेदुखी का ठरते?

0
तरीही पाकिस्तानी प्रचार ही आपली डोकेदुखी का ठरते?



तवलीन सिंग

‘ऑपरेशन सिंदूर’च्या दरम्यान पाहिलेलं एक छायाचित्र माझ्या चांगलंच लक्षात राहिलं. ज्या दिवशी आपल्या सरकारनं ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे ठार झालेल्या लष्कर-ए -तय्यबाच्या दहशतवाद्यांची नावं जाहीर केली, त्याच दिवशी हे छायाचित्र ‘व्हायरल’ होऊन समाजमाध्यमांवर फैलावत होतं… पाकिस्तानी लष्करातले वरिष्ठ अधिकारी या मोहिमेत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या अंत्यदर्शनाला उपस्थित आहेत असं ते छायाचित्र! दहशतवाद्याच्या शवपेटीलगत त्याचा कुणी दाढीधारी नातेवाईक किंवा जिहादीच आणि त्याच्या मागे हे अधिकारी. शवपेटी पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळलेली आहे आणि त्यावर गुलाबफुलांचं पुष्पचक्रही आहे. या छायाचित्रातून माझ्या- आणि इतरही अनेकांच्या- लक्षात राहील, तो पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचा बेशरमपणा.

पहलगामच्या हत्याकांडानंतर लगोलग पाकिस्ताननं जुनीच युक्ती पुन्हा वापरली- त्या देशातले लष्करी आणि राजकीय नेते ‘आम्ही काही दहशतवादाचा वापरबिपर आता करत नाही. उलट आम्हालाच दहशतवादाचा त्रास होतो’ वगैरे प्रचारकी रडगाणी एका सुरात गाऊ लागले. यात अर्थातच पाकिस्तानी लष्कराचे अधिकार जरा कमी पडतात, कारण त्यांच्या इंग्रजीचीही बोंबच असते. मग पाकिस्तानातली जी राजकीय घराणी पाश्चात्त्यांना माहीत आहेत त्यांतल्या जरा तरुण, गोऱ्यागोमट्या, परदेशात शिकलेल्या राजकीय नेत्यांना बोलावून त्यांच्याकरवी हाच प्रचार फर्ड्या इंग्रजीतून केला जातो.

हे या वेळी निभावायला होते बिलावल भुत्तो आणि हीना खार (त्याच त्या- भारतात २०११ मध्ये आल्या असताना ज्यांच्या ७ लाख रुपये किमतीच्या हॅण्डबॅगेचाच बोलबाला अधिक झाला होत्या त्याच). बिलावल भुत्तो यांनी ‘कधीतरी जुन्या काळात’ पाकिस्ताननं दिलाही असेल कुणा दहशतवाद्यांना पाठिंबा, पण आता आमचा देश बराच पुढे गेलाय, असा पवित्रा घेताला. हीना मेमसाबना एका ब्रिटिश वृत्तवाहिनीवरल्या चर्चेत संधी मिळाली, तेव्हा आपला भारी लेसचा दुपट्टा सांभाळत त्यांनीसुद्धा बिलावल भुत्तोंसारखीच विधानं केली. अखेर बरखा दत्त यांनी या हिना खार यांना थेटच प्रश्न विचारला : लष्कर- ए- तय्यबा किंवा जैश- ए- मोहम्मद यांना तरी दहशतवादी संघटनाच मानता ना तुम्ही? – त्यावर हिनाबाई काहीच बोलल्या नाहीत. निघूनच गेल्या. त्या चित्रवाणी चर्चेतली हिना यांची खिडकी मग रिकामीच दिसू लागली… पळाल्या त्या!

पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी- म्हणजे लष्करशहा आणि राजकीय नेत्यांनी- नेहमीच ‘अनवधानानं’ का होईना नृशंस/ भ्याड/ धर्मांध शक्तींना पोसलेलं आणि आणि त्यांच्याकरवी निरपराध माणसांना मारलेलं आहे; कारण थेट लष्करी संघर्ष करण्यासाठी मुळात धैर्य लागतं. खरंतर इथंच भारताची जीत होते. तरीही आपल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ आखणं क्रमप्राप्त ठरलं, कारण तुमच्या जिहादी बगलबच्च्यांची गय आता आम्ही करणार नाही, असा सज्जद संदेश पाकिस्तानी लष्कराला द्यायलाच हवा होता. मुरीदके इथलं लष्कर- ए- तय्यबाचं आणि बहावलपूरमधलं जैश- ए- मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त करून आपण हा संदेश दिलाच, पण पाकव्याप्त काश्मीरमधल्या तळांनाही या वेळी आपण धडा शिकवला.

हे सगळं खरं, पण दर वेळी आपण पाकिस्तानला अद्दल घडवतो तरीही पाकिस्तानी नेते/ लष्करशहा काहीच धडा न शिकता त्यांचं म्हणणंच जगापुढे रेटत राहातात, रेटून खोटं कथानक रचत राहातात ही भारतानं खरी डोकेदुखी मानायला हवी; ती अद्यापही वाढतेच आहे असं दिसतं. पाकिस्तान्यांच्या सुरात सूर मिसळणारे काही पाश्चात्त्य विश्लेषकही दिसतात, त्यांना दोष देणं हा आपला निव्वळ त्रागा ठरतो. कारण आपली पावलं पाकिस्तानी कथानकं हाणून पाडण्याच्या हिशेबानंच टाकली पाहिजेत, हे आपण विसरतो. उदाहरणार्थ, पहलगाम हल्ल्याच्या वेळी पाकिस्ताननं ‘पुरावे’ मागितले, तेव्हा आपण ती मागणी धुडकावून लावली. मग पाकिस्तानला ‘आमच्या नावावर उगाच खपवलेला हा प्रकार आहे’, हे हत्याकांड ‘शंकास्पद’ आहे वगैरे कथानकं रचता आली, ती पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांतूनही पोहोचवली गेली. मुळात एखाद्या नृशंस हत्याकांडाला ‘शंकास्पद’ ठरवणं हा काय प्रकार आहे? – ज्या देशात लोकशाही कधीच टिकू शकली नाही आणि लष्करशहांचीच सद्दी बहुतेक काळ राहिली, त्याच देशाला हे सुचू शकतं की राज्यकर्ते आपल्याच देशातली माणसं मारण्याचं राजकारण करतील… जिथं लोकशाही कायम राहिली आहे, जिथले नेते हे नेहमीच लोकप्रतिनिधी असतात, अशा देशात हे होऊ शकतच नाही या निर्विवाद सत्यावर विश्वास ठेवावाच लागेल.

होय, ठेवावाच लागेल विश्वास… कारण जेव्हा केव्हा सत्ताधारीच लोकांच्या जिवावर उठले असल्याची साधार शंका घेण्याइतपत परिस्थिती आपल्याकडे उद्भवली, तेव्हा तेव्हा सरळ आरोप झाले आणि संबंधित सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोडसुद्धा उठली. उदाहरणांची यादी बरीच मोठी असली तरी इथं मेरठजवळची हाशिमपुरा दंगल – १९८७, दिल्लीत १९८४ मध्ये घडलेलं शिखांचं शिरकाण आणि २००२ ची गुजरात दंगल ही तीन मोठी उदाहरणं पाहू- या तीन्ही वेळी न्याय पूर्णपणे मिळाला असेल वा नसेल, पण सत्ताधारीच नरसंहाराला पाठिंबा देताहेत हे सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवणाऱ्या सामान्य भारतीयांना माहीत होतं, प्रसारमाध्यमांनीही आपलं स्वातंत्र्य जपून हेच उघड केलं होतं. त्यामुळेच आपल्यात आणि पाकिस्तानात मोठा फरक उरतो. आपण पाकिस्तान्यांसारखा खोटेपणा नाही करत. पाकिस्तानी लोक समजतात की भारतातलं ‘हिंदुत्व’ ही जणू काही त्यांच्याकडल्या इस्लामी धर्मांधतेचीच हिंदू आवृत्ती आहे. पण तसं असू शकत नाही. मला हिंदुत्वाबद्दल उमाळा नसला तरीसुद्धा सांगते, स्वत:ला ‘गोरक्षक’ म्हणवत दिसला मुस्लीम माणूस जनावरासह की काप त्या माणसाला, असं करणाऱ्यांना हिंदू धर्माची मान्यता असू शकत नाही. हाच आपल्यातला आणि धर्माला राजकीय हत्यार मानू शकणारे पाकिस्तानी यांच्यामधला मूलभूत फरक आहे.

तरीही पाकिस्तान्यांची कथानकबाजी ही आपली डोकेदुखी ठरते आहे, असं का होतंय? एक कारण तर घराघरांतून सर्वांच्या डोळ्यांना दिसतंय, कान किटेपर्यंत ऐकूही येतंय- आपले अतिदेशभक्त ‘न्यूज चॅनेल’वाले! त्यांच्या अक्कलशून्य माकडचाळ्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जो काही ऊत आला, त्यातून त्यांची विश्वासार्हता तर गळपटलीच, पण या लोकांनी आपल्या सरकारच्या विश्वासार्हतेलाही बट्टा लावला. अक्षरश:, एकाच हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता एकाही भारतीय चित्रवाणी- वृत्तवाहिनीवरचे निवेदक (अँकर) आणि वार्ताहर आम्हीच कसे राष्ट्रवादी याचं प्रदर्शन करण्यासाठी काय वाटेल ते बोलत/ दाखवत सुटले होते. राष्ट्रवादाला उकळ्या आणण्यासाठी नव्हे- बातम्या पोहोचवण्यासाठी आपण काम करतो आणि बातमीमध्ये तथ्यपूर्णता असावी लागते, याचाच विसर या लोकांना पडल्याचं दिसलं.

याऐवजी खरोखरज जर बातम्या शोधल्या गेल्या असत्या, जर पत्रकारिता झाली असती तर काय फरक पडला असता, याचा विचार आता संघर्षाला ‘स्थगिती’ मिळाल्यानंतर तरी करायला हरकत नाही. पाकिस्तानची लष्करी कुवत खरोखरच आपल्याएवढी आहे का, आपले लोकप्रतिनिधी गेल्या काही दिवसांत पाकिस्तानला ‘कायमची अद्दल’ घडवण्याची भाषा करत होते तशी आपल्या लष्करी कारवाईतून घडेल का, याचा नेमका अंदाज आपल्याला आपल्या पत्रकारांनी द्यायला हवा होता. स्वतंत्र प्रसारमाध्यमांचं ते काम होतं. तसं काही झालं नसलं तरी अपवाद म्हणजे निवृत्त लेफ्टनंट जनरल एच. एस. पनाग यांनी याच दिवसांत एका लेखामध्ये पाकिस्तानच्या लष्करी क्षमतांचा ऊहापोह केला होता. दोन्ही देशांकडे सध्याच्या घडीला जवळपास एकसारखंच तंत्रज्ञान आहे, यातून आपल्याला पुडे जायचं असेल तर आपल्या सेनादलांच्या कायापालटासाठी ‘भारताचा संरक्षणखर्च दुपटीनं वाढवून तो जीडीपीच्या (सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या) तुलनेत चार टक्क्यांवर नेणं आवश्यक आहे’ या त्यांच्या म्हणण्यावर रास्त विचार व्हावाच, पण युद्ध केवळ शस्त्रांनी नाही- युक्तीनंही लढलं जातं हेही लक्षात राहावं.



Source link