Friday, August 21, 2026
Homeमनोरंजननगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

[ad_1]

पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील केसनंद भागात घडली. ट्रकचालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी ट्रकमालकासह चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रामदास साहेबराव गायकवाड (वय ५२) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत त्यांचे भाऊ यशवंत साहेबराव गायकवाड (वय ४०, रा. दौंड) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रकमालक संतोष आत्माराम भंडारे (वय ४७, रा. शिरूर), तसेच ट्रकचालक जनार्दन बाबुराव चव्हाण (वय ६३, रा. रायकर मळा, यवत) या दोघांविरोधात वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जनार्दन चव्हाण याला अटक केली असून, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास गायकवाड हे रविवारी (१८ मे) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नगर रस्त्यावरील केसनंद परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी ट्रकचालक चव्हाणला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments