Sunday, July 12, 2026
Home Blog Page 228

स्थानिक निवडणुकाही एकत्रित लढणार, सुनील तटकरे

0
स्थानिक निवडणुकाही एकत्रित लढणार, सुनील तटकरे



कराड : मुख्य पक्ष भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) घटक पक्ष असल्याने सार्वत्रिक अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवणे हा विचारही आमच्या कोणाच्या मनात येऊ शकत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाच्या चर्चा आहेत. पण, एकत्रिकरणाचा अधिकृत प्रस्तावच आलेला नसल्याचा खुलासाही त्यांनी या वेळी केला.

माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधीस्थळी तटकरे यांनी अभिवादन केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, उदयसिंह पाटील आदींची उपस्थिती होती.‘महायुती’तील तिन्ही घटक पक्षांमध्ये अन्य पक्षातील लोकांचा सहभागाचा ओघ सुरूच असल्याने आगामी विधानसभा स्वतंत्रपणे लढण्याची ही तयारी आहे का? या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले, की पंडित नेहरूंनंतर नरेंद्र मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपद भूषवण्याची संधी जनतेने दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आम्ही एकत्रित असल्याने लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्रपणे लढवण्याचा विचारही कधी आमच्या कोणाच्या मनात येऊ शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही एकत्रितपणे कसे सामोरे जाता येईल, यावर तिन्ही पक्षप्रमुख एकत्रित बसून चर्चा करतील. स्थानिक राजकीय परिस्थिती वेगवेगळी असल्याने त्याचा विचार केला जाईल. सर्वांना एकत्रित घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ समावेशासंदर्भात ते म्हणाले, भुजबळ यांचा समावेश आणि नाशिकचे पालकमंत्रिपद याचा काहीही संबंध नाही. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचे निर्णय ज्यावेळेला झाले, त्यावेळी त्याला स्थगिती देण्यात आली. यासंदर्भात लवकर निर्णय व्हावा, अशी आमची भूमिका असून, शेवटी सरकारमधील निर्णय एकत्रितपणाने लवकरच होतील, असे तटकरे म्हणाले. अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रिपद स्वीकारूनही, तेथील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न सुटलेला नसल्याकडे लक्ष वेधले असता तटकरे म्हणाले, पालकमंत्री होताच अजित पवारांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. विविध प्रश्न तत्परतेने हाती घेतले. तेथील गुन्हेगारीबाबत गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व अजित पवार कटाक्षाने लक्ष ठेवून असल्याचे तटकरेंनी सांगितले.

शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या विचारांपासून आम्ही तसूभरही बाजूला गेलो नाही. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांपासूनही कदापि बाजूला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.



Source link

साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदावर तुषार दोशी यांची नियुक्ती; समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे वर्णी

0
साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदावर तुषार दोशी यांची नियुक्ती; समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे वर्णी

सातारा |साताऱ्यातील पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता तुषार दोशी हे नवे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. गृह मंत्रालयाने गुरुवारी राज्यातील 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नव्या पदस्थापनेचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवनियुक्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे 2001 मध्ये फिजिक्स विषयात पदवी प्राप्त करून पोलीस दलात दाखल झाले. त्यांनी नाशिकमध्ये पोलीस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पहिली पोस्टिंग मिळवली. राजुरा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी नक्षलप्रभावीत भागातील कर्तव्ये समर्थपणे पार पाडली. पुढे लातूर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई अशा प्रमुख शहरांमध्ये जबाबदारी सांभाळताना त्यांनी विविध गुन्हेगारी प्रकरणे निष्पक्षतेने हाताळली. पुणे पोलिस दलातील सायबर विभागात उपायुक्त असताना त्यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्हे उघडकीस आणण्यावर भर दिला.

दरम्यान, समीर शेख यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये गडचिरोलीहून साताऱ्यात पदभार स्वीकारला होता. तब्बल पावणेतीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात 40 पेक्षा अधिक गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करत सुमारे 176 जणांना ‘मोका’ अंतर्गत गजाआड केले. ‘उंच भरारी’ योजनेच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन दिले तर पोलीस क्रीडा प्रबोधिनीला त्यांनी नवे यश मिळवून दिले. प्रतापसिंहनगर, प्रतापगड व पुसेसावळी दंगलप्रकरणी त्यांनी घेतलेल्या कठोर व संवेदनशील भूमिकेमुळे त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती.

    वक्तृत्व स्पर्धेतून उलगडले मासिक पाळीचे पैलू

    0
    वक्तृत्व स्पर्धेतून उलगडले मासिक पाळीचे पैलू


    ठाणे : महिलांच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा अनेक बाजु असणारा विषय म्हणजे मासिक पाळी. या विषयावर प्रामुख्यान मौन पाळले जाते. मात्र, या विषयावर बोलले जावे या उद्देशाने ‘तिच्यावर बोलू काही…या मासिक पाळीवर मुक्त संवाद साधणाऱ्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मासिक पाळी संदर्भातील विविध विषयांवर स्पर्धेकांनी मुक्तपणे मत मांडले. तसेच या स्पर्धेत पुरूषांचा अधिक सहभाग असल्याचेही दिसून आले.

    मासिक पाळी म्हटले तर मुलीच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच समाज देखील जोडलेला असतो. मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. याबाबत मौन पाळणे पसंत केले जाते. मात्र, मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त (२८ मे) सेवा सहयोग फाउंडेशन आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तिच्यावर बोलू काही…’ या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये मासिक पाळी विषयी खुलेपणाने संवाद घडवणे, त्यांना मानसिक,शारीरिकरित्या सक्षम करणे.

    पाळीसारख्या संवेदनशील विषयावर समाजात मोकळेपणाने संवाद व्हावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ही वक्तृत्व स्पर्धा युवक, युवती, महिला आणि पुरुष अशा विविध वयोगटांतील स्पर्धकांसाठी होती. या स्पर्धेत सॅनिटरी पॅडची भेट, शरीरातील बदल आणि माझे मन, पहिली पाळी, मासिक पाळी आणि शाळा, कळी उमलताना, मासिक पाळी- लाजेची की सन्मानाची?, ‘ती’च्या नवीन भावना, स्त्रीशक्तीची सुरुवात -पाळी, उंच माझा झोका, तारुण्याच्या उंबरठ्यावर अशा विविध विषयांवर आपल्या वैयक्तिक अनुभवांचे, भावनिक गुंतवणुकीचे आणि सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण स्पर्धकांनी केले. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाड, कर्जत, पालघर आणि ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

    मागील वर्षी देखील अशाच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ये लाल रंग, कावळा शिवला, आळी मिळी गुप चिळी, मासिक पाळी आणि पर्यावरण, गर्भ ते गाभारा, ‘क’ कपड्याचा कि ‘क’ कपाचा, बाईपण भारी देवा असे विविध विषय स्पर्धकांनी उलगडले होते. तर, गारद फाऊंडेशन यांच्यावतीने ग्रामीण भाग, आदिवासी पाड्यात जाऊन तेथील स्त्रियांच्या जीवनातील मासिक पाळी हा विषय समजून घेण्यात आला होता.



    Source link

    Kalyan dombivli has 513 dangerous buildings 176 are classified as extremely hazardous

    0
    Kalyan dombivli has 513 dangerous buildings 176 are classified as extremely hazardous


    कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत एकूण ५१३ धोकादायक इमारती आहेत. यामध्ये १७६ इमारती अतिधोकादायक आहेत. या सर्व धोकादायक इमारतींना महिनाभराच्या कालावधीत पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. कल्याण पूर्वेत चिकणीपाडा येथे श्री सप्तश्रृंगी इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याने धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    कल्याण डोंबिवली पालिकेच्या दहा प्रभागांमध्ये ५१३ धोकादायक इमारती आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिका हद्दीतील धोकादायक इमारतींना अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या माध्यमातून सुरक्षिततेचा उपाय म्हणून इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या जातात. या नोटिसीनंतर इमारत मालक धोकादायक इमारत रिकामी करत नाही की तेथील रहिवासी पालिकेची नोटीस आली म्हणून घरे खाली करत नाहीत.

    मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर अशा धोकादायक इमारतीमधील एखादी इमारत दरवर्षी पावसाळ्यात कोसळते. या इमारत दुर्घटनेनंतर पालिकेची काही दिवस धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम सुरू होते. १७६ अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतींमध्ये रहिवास आहे. अशा इमारतींमधील रहिवासी आणि इमारत मालक यांचा भाडे, इमारत रिकामी करणे याविषयांवरून वाद सुरू असतात. काही वाद न्यायप्रविष्ट असतात. या वादामुळे अनेक वेळा इमारत मालक इमारतीची देखभाल करत नाहीत. रहिवाशांनी देखभाल करण्याचा प्रयत्न केला तर त्याला इमारत मालक हरकत घेतो. वर्षानुवर्षाच्या या वादामुळे इमारतीची देखभाल करण्यात आली नाहीतर ती इमारत लवकरच धोकादायक बनते.

    या वादामुळे इमारत मालक रहिवासी जागेचा हक्क सोडत नाही म्हणून ती इमारत धोकादायक होईल, पालिकेकडून तोडली जाईल किंवा पावसात कोसळेल याची वाट पाहतात. अशी इमारत एकदा कोसळली की मग इमारत मालक त्या जागेवर आपला हक्क दाखवून तेथील रहिवाशांना त्या जागेवर पाऊल ठेऊन देत नाहीत, असे प्रकार यापूर्वी डोंबिवली, कल्याणमध्ये घडले आहेत. इमारत धोकादायक झाली तरी अशा इमारतींमधील रहिवासी घराबाहेर पडण्यास तयार होत नसल्याचे सांगण्यात येते.

    हेही वाचा

    मागील २० वर्षापासून कल्याण, डोंबिवलीत बेकायदा इमारतींचे प्रमाण वाढले. या इमारती उभारताना भूमाफिया माती मिश्रित वाळू आणि त्यामध्ये दगडाची भुकटी (ग्रीट) वापरतात. या बांधकामात भूमाफियांकडून सिमेंटचा वापर केला जात नाही. बांधकामानंतर पुरेसे पाणी इमारत बांधकामावर मारले जात नाही. त्यामुळे पालिका हद्दीतील इमारती कमकुवत आणि लवकर धोकादायक होत असल्याचे नगर नियोजनातील एका जाणाकाराने सांगितले.

    पालिका हद्दीत धोकादायक इमारती असल्या तरी काही इमारती या संरचनात्मक अभियंत्यांच्या पाहणीनंतर दुरुस्ती करून सुस्थितीत करता येतात. सी -एक पध्दतीच्या इमारती या अतिधोकादायक असतात. त्या इमारती निष्कासित करणे आवश्यक असते एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

    This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

    पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दहा प्रभाग हद्दीतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. अवधूत तावडे उपायुक्त,अतिक्रमण नियंत्रण विभाग.





    Source link

    फलटण तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी दिलासा : मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत योजनांचा लाभ देण्याची तयारी

    0
    फलटण तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी दिलासा : मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत योजनांचा लाभ देण्याची तयारी

    फलटण – फलटण तालुक्यातील बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून, या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांची भेट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे आणि युवा नेते धनंजय साळुंखे पाटील यांनी घेतली.

    या भेटीत फलटण तालुक्यात योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत चर्चा झाली. मंत्री फुंडकर यांनी बांधकाम कामगारांना योजनांचे लाभ सुलभतेने मिळावेत यासाठी यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले. “हे सरकार गोरगरीबांचे असून योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले की, लवकरच बांधकाम कामगार संघटना व लाभार्थ्यांसाठी भव्य भांडी वाटप व शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला जाणार आहे.

    या बैठकीमुळे फलटण तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

    लोनचे हफ्ते न भरल्यामुळे रिकव्हरी एजंट घरी येऊन त्रास देतोय? अशावेळी तुमचे अधिकार समजून घ्या

    0
    लोनचे हफ्ते न भरल्यामुळे रिकव्हरी एजंट घरी येऊन त्रास देतोय? अशावेळी तुमचे अधिकार समजून घ्या


    आजच्या काळात कर्ज घेणे पूर्वीपेक्षा खूपच सोयीस्कर झाले आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला तातडीने पैशांची गरज असते तेव्हा तो बँकेला आवश्यक कागदपत्रे दाखवून सहजपणे कर्ज घेऊ शकतो. एवढेच नाही तर आता अनेक अ‍ॅप्स लाँच करण्यात आले आहेत ज्यांच्या मदतीने घरी बसून कर्ज घेता येते. पण कधीकधी असे होते की आर्थिक अडचणींमुळे कर्जाचे हप्ते फेडणे कठीण होते. अशा परिस्थितीत, कर्ज वसूल करणारे एजंट कर्जदाराला त्याच्या घरी त्रास देऊ लागतात आणि हप्ता जमा करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणतात.

    वसुली एजंट कधीकधी धमक्या, वारंवार फोन कॉल किंवा घरी दबाव यासारख्या अन्याय्य मार्गांचा अवलंब करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की या सर्व पद्धती बेकायदेशीर आहेत. जर तुम्हीही अशा परिस्थितीचा सामना करत असाल तर घाबरू नका. सर्वप्रथम, तुम्हाला धीर धरावा लागेल आणि मानसिकदृष्ट्या शांत राहावे लागेल. काही कायदेशीर पावले उचलून तुम्ही या समस्येवर सहज मात करू शकता. कर्ज वसुली एजंट तुम्हाला त्रास देत असेल तर तुमचे काय अधिकार आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. 

    वसुली एजंट आपल्याला का त्रास देतात?

    जेव्हा एखादी व्यक्ती वेळेवर कर्जाचे हप्ते फेडण्यात अयशस्वी होते, तेव्हा बँका किंवा वित्तीय संस्था वसुली एजंट नियुक्त करतात. त्यांचे काम थकबाकीची रक्कम वसूल करणे आहे. जरी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने वसुली एजंट्ससाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, परंतु अनेक वेळा हे एजंट नियमांचे उल्लंघन करतात आणि कर्ज घेणाऱ्याला मानसिक त्रास देतात.
    जाहिरात

    आरबीआयच्या नियमांनुसार, वसुली एजंट सकाळी ८ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी ७ नंतर संपर्क साधू शकत नाहीत. तसेच, ते धमक्या किंवा हिंसाचाराचा अवलंब करू शकत नाहीत. जर एजंटने या नियमांचे उल्लंघन केले तर त्याबद्दल बँकेकडे आणि आरबीआयच्या बँकिंग लोकपालाकडे तक्रार करा.

    जर रिकव्हरी एजंट तुम्हाला धमकावत असेल, अपशब्द वापरत असेल किंवा अयोग्य वेळी (जसे की रात्रीच्या वेळी) तुमच्याशी संपर्क साधत असेल, तर ताबडतोब बँकेच्या ग्राहक सेवा विभागाकडे लेखी तक्रार दाखल करा. तक्रारीत एजंटचे नाव, तारीख आणि घटनेचा तपशील समाविष्ट करा.

    एवढेच नाही तर, जर रिकव्हरी एजंट तुम्हाला शारीरिक धमकी देत ​​असेल किंवा तुमच्या घरी अनावश्यक दबाव निर्माण करत असेल तर तुम्ही ताबडतोब जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता. हा कायदेशीर गुन्हा आहे आणि पोलिस कारवाई करू शकतात. शक्य असल्यास, पुराव्यासाठी रिकव्हरी एजंटचे कॉल, मेसेज किंवा कोणत्याही धमक्या रेकॉर्ड करा.

    तसेच, जर तुम्ही कर्ज फेडू शकत नसाल तर बँकेशी संपर्क साधा आणि तुमची परिस्थिती स्पष्ट करा. अनेक बँका कर्ज पुनर्रचना, ईएमआय माफी किंवा नवीन परतफेड योजना असे पर्याय देतात.





    Source link

    ten year old girl hanged herself after argument with sister over watching favorite TV channel

    0
    ten year old girl hanged herself after argument with sister over watching favorite TV channel



    ten year old girl hanged herself after argument with sister over watching favorite TV channel | हृदयद्रावक! आवडते चॅनेल पाहू न दिल्याने १० वर्षीय मुलीने घेतला गळफास, बहिणींमधील भांडण ठरले जिवघेणे…





    Source link

    परिवहन खात्याकडून मॅजिक स्कूल बसला मान्यता, मुलांसाठी काय असणार खास? जाणून घ्या!

    0
    परिवहन खात्याकडून मॅजिक स्कूल बसला मान्यता, मुलांसाठी काय असणार खास? जाणून घ्या!


    Magic School Bus: जूनमध्ये शाळा सुरु होण्याआधी परिवहन खात्याने मॅजिक स्कूल बसला मंजुरी दिलीय. मुलांच्या सुरक्षेसाठी परिवहन खात्याने या नव्या स्कूल बसला मान्यता दिली. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था या मॅजिक स्कूल बसमध्ये करण्यात आल्यात.

    भारतातील पहिली ais 204 धर्तीवर बनवलेली सेफ्टी स्कुल बस तयार झालीय. ही स्कूल बस 9 सीटर असेल. यावर्षीपासून तुम्हाला त्या शाळेच्या बाहेर दिसतील. 

    कशी असेल मॅजिक स्कुल बस?

    याआधी 6 सीटर बस होती आता ही बस 9 सीटर बस असेल. 

    या बसमध्ये सीसीटीव्ही असणार आहेत.

    ही बस पेट्रोल व सीएनजी या दोन्हीवर चालेल. 

    या बसमध्ये एक पॅनिक बटन देण्यात आले आहे. त्या बस मधल्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी ते बटण दाबल्यावर थेट त्याचा अलर्ट आरटीओ कंट्रोल रूम ला मिळणार आहे. त्यामुळे ही बस ट्रेक करू शकतो.

    या बसचा 40 च्या वर स्पीड लॉक आहे.

    या बस मध्ये दरवाजा बंद झाला नाही तर अलार्म सिस्टम वाजणार आहे. 

    या बसमध्ये रिवस गेर कॅमेरा ही लावण्यात आलाय.

    बसमध्ये प्राथमिक उपचार पेटी सहित अग्नी सुरक्षा यंत्रणाही आहेत.

    महाराष्ट्रातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न

    आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी ही घोषणा केलीय. दरम्यान यासाठी शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं देखील दादा भुसे यांनी सांगितलं.. मात्र, सीबीएसईची घोषणा करताना अगोदर सर्व व्यवस्था करणं गरजेचं असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. दादा भूसे यांनी केलेल्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाडांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सीबीएसई पॅटर्नमुळे मराठी मातीचा इतिहास पुसला जात असेल तर या पॅटर्नची गरज काय असा सवाल त्यांनी केला. दरम्यान या सीबीएसई पॅटर्नमुळे मराठी आणि इतिहासासोबत कोणतीही तडजोड केली नसल्याचं आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी म्हटलंय. सीबीएसई पॅटर्नची घोषणा केल्यानंतर शिक्षक आणि पालक देखील संभ्रमात पडले आहेत. अचानक करण्यात आलेला बदल विद्यार्थ्यांना झेपणार का? तसंच शिक्षकांच्या प्रशिक्षणाचं काय? असे अनेक प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येताय.

    दरवर्षी एकेक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाणार

    राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात  70 टक्के – 30% फॉर्म्युला राबवला जाणार आहे. यामध्ये 70 टक्के सीबीएससी तर 30 टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती  शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली.सीबीएससी अभ्याक्रमातील इतिहास विषयात राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील 30% मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावर्षी पहिली इयत्तेला सीबीएससी अभ्यासक्रम असेल त्यानंतर दरवर्षी एकेक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची असणार आहे. 1 जूनला शाळा सुरू झाल्यानंतर लगेच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.





    Source link

    सिंहाव्यतिरिक्त ‘हे’ देखील आहेत जगातील सर्वात आळशी प्राणी; घ्या जाणून…

    0
    सिंहाव्यतिरिक्त ‘हे’ देखील आहेत जगातील सर्वात आळशी प्राणी; घ्या जाणून…


    Laziest Animals: निरोगी जीवनासाठी मानवाला दिवसातून सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. पण, काही प्राण्यांच्या प्रजातींनी विश्रांती घेणे हे जीवनशैलीत बदलले आहे. त्यात झाडांना मिठी मारणाऱ्या मार्सुपियल्सपासून ते पाण्याखाली झोपणाऱ्या प्राण्यांपर्यंतच्या अनेक प्राण्यांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वांत आळशी प्राण्यांबद्दल सांगणार आहोत, जे दिवसातील अनेक तास झोपतात.

    ‘हे’ आहेत जगातील सर्वाधिक झोपाळू प्राणी

    कोआला

    कोआला त्याच्या झोपेच्या सवयींसाठी प्रसिद्ध आहेत, ते दिवसातून २२ तासांपर्यंत झोपतात. ही जास्त विश्रांती त्यांच्या आहारातील निलगिरीच्या पानांमुळे असते, ज्यात पोषक घटक कमी असतात आणि त्यांना पचण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते. कोआला दिवसाचा बराच वेळ झोपून ऊर्जा वाचवतात आणि त्यांच्या पचन प्रक्रियेस मदत करतात.

    आळस

    स्लॉथ असे नाव असलेल्या या प्राण्याला आळस नावानेदेखील ओळखले जाते. हे वृक्षाच्छादित सस्तन प्राणी दररोज १५ ते २० तास झोपतात. त्यांचे चयापचय मंदावते आणि पानांचा कमी ऊर्जायुक्त आहार यांमुळे ते आळशीपणे हालचाल करतात. दिवसाचा बराचसा वेळ ते विश्रांती घेऊन ऊर्जा वाचवतात.

    सिंह

    जंगलाचा राजा म्हणून त्याची ख्याती असूनही सिंह सर्वांत आळशी प्राण्यांपैकी एक आहे. नर सिंह दिवसातून २० तासांपर्यंत झोपू शकतात आणि मादी सरासरी १५ ते १८ तास झोपू शकते. त्यांच्या दीर्घ विश्रांतीच्या कालावधीमुळे शिकार करणे आणि त्यांचा प्रदेश राखणे यांसाठी त्यांना ऊर्जा वाचवण्यास मदत मिळते.

    लहान तपकिरी वटवाघूळ

    लहान तपकिरी वटवाघूळ झोपायला खूप उत्सुक आहे. बहुतेकदा दिवसातून २० तासांपर्यंत विश्रांती घेते. निशाचर असल्याने वटवाघळे रात्री सक्रिय असतात आणि दिवसा झोपतात. रात्रीच्या वेळी अन्न शोधण्याच्या कामांसाठी ते ऊर्जा वाचवतात.

    पाणघोडा

    पाणघोडे हे पाणी आणि झोप यांवर प्रेम करण्यासाठी ओळखले जातात. ते दिवसातून १६ ते २० तास झोपू शकतात. ते बहुतेकदा जमीन किंवा पाण्यात बुडून गटाने झोपतात. उल्लेखनीय बाब म्हणजे पाणघोडे पाण्याखालीही झोपू शकतात.

    पायथॉन

    पायथॉन साप दिवसातून १८ तासांपर्यंत झोपू शकतो. विशेषतः भरपूर जेवण केल्यानंतर. त्यांची ऊर्जा प्रामुख्याने पचनासाठी वापरली जाते, ज्यामुळे ते दीर्घकाळ निष्क्रिय राहतात.

    हेही वाचा

    ओपस्सम

    ओपस्सम त्यांच्या झोपण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. ते दिवसातून १२ ते १६ तास झोपतात. त्यांच्या झोपेच्या पद्धतींमध्ये लहान लहान वेळांचा समावेश असतो, ज्यामुळे त्यांना गरज पडल्यास सतर्क राहता येते. हे वर्तन त्यांच्या शिकारी प्रवृत्तीचे लक्षण आहे. ते शिकार करण्यासाठी ऊर्जा वाचवतात.

    This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

    महाकाय पांडा

    महाकाय पांडा त्यांच्या आरामशीर वर्तनासाठी ओळखले जातात. ते दिवसातून सुमारे १० तास झोपतात आणि उर्वरित वेळ बांबू खाण्यात घालवतात. त्यांचा कमी ऊर्जायुक्त आहार आणि बैठी जीवनशैली यांमुळे तो सर्वांत आळशी प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.





    Source link

    बॉयफ्रेंडला हॉटेलमध्ये पकडलं; मुलीने छातीवर बसून त्याला अर्धनग्न करुन चोपलं; पाहा Video

    0
    बॉयफ्रेंडला हॉटेलमध्ये पकडलं; मुलीने छातीवर बसून त्याला अर्धनग्न करुन चोपलं; पाहा Video



    सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला रस्त्यात त्याच्या छातीवर बसून मारत आहे. 



    Source link