Saturday, September 19, 2026
Homeसाताराफलटण तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी दिलासा : मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत योजनांचा...

फलटण तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी दिलासा : मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत योजनांचा लाभ देण्याची तयारी

फलटण – फलटण तालुक्यातील बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून, या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांची भेट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे आणि युवा नेते धनंजय साळुंखे पाटील यांनी घेतली.

या भेटीत फलटण तालुक्यात योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत चर्चा झाली. मंत्री फुंडकर यांनी बांधकाम कामगारांना योजनांचे लाभ सुलभतेने मिळावेत यासाठी यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले. “हे सरकार गोरगरीबांचे असून योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले की, लवकरच बांधकाम कामगार संघटना व लाभार्थ्यांसाठी भव्य भांडी वाटप व शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला जाणार आहे.

या बैठकीमुळे फलटण तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments