Sunday, July 12, 2026
Home Blog Page 227

The PMP administration has set a target प्रवासी वाढविण्याचे उद्दिष्ट

0
The PMP administration has set a target प्रवासी वाढविण्याचे उद्दिष्ट


पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधील प्रवाशांची संख्या पुढील तीन महिन्यांत प्रतिदिवस १५ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ‘पीएमपी’ प्रशासनाने निश्चित केले आहे. सध्या ‘पीएमपी’तून सुमारे साडेबारा लाख प्रवासी रोजचा प्रवास करतात. या उद्दिष्टपूर्तीसाठी ‘आपली सेवा, आपली जबाबदारी’ या धोरणानुसार ‘पीएमपी’च्या व्यवस्थापक संचालक तथा अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्वत: पीएमपीतून प्रवास करून त्रुटी जाणून घेऊन मार्गिकाविस्तार, नवीन मार्गिका आणि अमलात असलेल्या सेवांची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या ‘पीएमपी’तून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीएच्या) हद्दीमध्ये २०२२-२३ पर्यंत प्रतिदिन साडेदहा लाख प्रवासी प्रवास करीत होते. सध्या हा आकडा साडेबारा लाखांपर्यंत गेला आहे. प्रवाशांना अधिकाधिक सेवा देऊन ‘पीएमपी’ला सक्षम करण्यासाठी उपाययोजनांची काटेकाेर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

‘‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्याने एक हजार पर्यावरणपूरक बस दाखल करण्यास टप्प्याटप्याने सुरुवात झाली आहे. या बसचे मार्गिकेवरून संचलन सुरू असताना बसथांब्याची ध्वनिक्षेपकाद्वारे पूर्वसूचना देणारी प्रणाली, दिवसा आणि रात्री दूरवरून दिसेल अशा बसच्या दर्शनी भागावर डिजिटल पाट्या, ई तिकीट, ज्येष्ठ आणि महिलांसाठी विशेष सुविधा, मार्गिकांचा विस्तार, नवीन मार्गिका, बसची वेगमर्यादा, प्रवाशांच्या सूचना- तक्रारींचे निराकरण, तातडीची सेवा आदींबाबत नियोजन सुरू केले आहे,’ अशी माहिती पीएमपीच्या संचलन विभागाचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.

हेही वाचा

प्रत्येक आगारासाठी पालक अधिकारी

पीएमपीचे एकूण १७ आगार असून, प्रत्येक आगाराच्या ठिकाणी ‘पालक अधिकारी’ म्हणून नेमणूक केली आहे. या पालक अधिकाऱ्यांनी मार्गिकांवरील स्थानके आणि थांब्यांची सुधारणा, फलक आणि संचलनादरम्यान वाहक, चालकांकडून पाळण्यात येणारी शिस्त आदींचे स्वत: बसमधून प्रवास करून पाहणीच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

बुधवारी ‘पीएमपी’ने प्रवास

पीएमपीच्या प्रत्येक आगार प्रमुखांसह व्यवस्थापन विभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस पीएमपीतून प्रवास करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. मागील काळातही अनेक संचालक, व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी असा प्रवास केला आहे. मात्र, नवीन परिपत्रकानुसार प्रत्येक अधिकाऱ्याच्या प्रवासाची नोंद ठेवण्यात येणार असून, उद्दिष्टपूर्तीबाबत सूचना अभिप्रायानुसार कामकाज केल्याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पीएमपी’तून प्रवास करताना प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचना जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे. सेवांमध्ये नक्कीच आणखी सुधारणा होतील. येत्या तीन महिन्यात प्रवासी संख्या १५ लाखांपर्यंत झालेली असेल.- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

हेही वाचा





Source link

खासगी क्षेत्राचा विकासवेग १३ महिन्यांच्या उच्चांकी

0
खासगी क्षेत्राचा विकासवेग १३ महिन्यांच्या उच्चांकी



वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सेवा क्षेत्रातील चांगल्या कामगिरीच्या जोरावर, विद्यमान मे महिन्यात भारतातील खासगी क्षेत्रात लक्षणीय सक्रियता दर्शविणाताना, वर्षातील सर्वोच्च गती दर्शविणारी कामगिरी नोंदविली. गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतातील सेवा आणि उत्पादन खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस संयुक्त पीएमआय’ निर्देशांक एप्रिलमधील ५९.७ वरून मे महिन्यात ६१.२ वर पोहोचला. जो उत्पादन आणि सेवा दोन्ही क्षेत्रांमध्ये मजबूत विस्तार सुरू असल्याचे दर्शवितो. मागणीची मजबूत परिस्थिती, नवीन व्यवसायातील वाढ आणि सुधारलेल्या व्यवसाय भावनांमुळे ही वाढ झाली.

एप्रिल २०२४ नंतरची ही वाढ सर्वाधिक वाढ आहे. उत्पादनातील वाढीच्या गतीमध्ये किंचित घट झाली असली तरी सेवा प्रदात्या कंपन्यांनी १४ महिन्यांतील सर्वात जलद वाढ नोंदवली आहे. सेवा क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्रियाकलाप आणि रोजगारात जलद विस्तार झाला. सर्व कंपन्यांनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून नवीन व्यवसायाचा जोरदार प्रवाह नोंदवला आहे.

एचएसबीसी फ्लॅश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय आउटपुट इंडेक्स एप्रिलमधील ६१.९ वरून मे महिन्यात किंचित घसरून ६१.४ वर आला आहे, जो उत्पादन क्षेत्राची कामगिरी किंचित घटल्याचे दर्शवितो. मात्र नवीन कार्यादेश, उत्पादन, रोजगार, पुरवठादारांच्या वितरण वेळा आणि खरेदीच्या साठ्यासाठी जबाबदार असलेला व्यापक एचएसबीसी फ्लॅश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय एप्रिलमधील ५८.२ वरून किंचित वाढून ५८.३ वर पोहोचला, जो या क्षेत्राच्या आरोग्यात निरंतर सुधारणा दर्शविणारा आहे.

याव्यतिरिक्त, जानेवारीनंतर पहिल्यांदाच व्यवसाय आत्मविश्वासात सुधारणा झाली, ज्यामुळे भविष्यातील व्यवसाय संधींबद्दल कंपन्यांमध्ये आशावाद दिसून आला. कंपन्यांनी मागणीची मजबूत परिस्थिती, तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि वाढलेल्या उत्पादन क्षमतांमुळे ही वाढ झाल्याचे सांगितले आहे.

मात्र, विद्यमान महिन्यात किंमत वाढीचा दबाव देखील वाढला. एचएसबीसी फ्लॅश पीएमआय आकडेवारीने २०२४ च्या अखेरीपासून उत्पादन खर्च आणि इतरही शुल्कात वाढ नोंदवली आहे, ज्यामध्ये चलनवाढीची पातळी एप्रिल २०२४ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.



Source link

बजाज ऑटोच्या ताब्यात ‘केटीएम’

0
बजाज ऑटोच्या ताब्यात ‘केटीएम’



लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

पुणे : अनेक वर्षे भागीदारी सुरू असलेल्या प्रीमियम आणि स्पोर्ट्स दुचाकींची ऑस्ट्रियाची नाममुद्रा ‘केटीएम’वर ताबा मिळविण्याचा निर्णय बजाज ऑटोने घेतल्याचे गुरुवारी संकेत दिले. बजाज ऑटोची उपकंपनी बजाज ऑटो इंटरनॅशनल लिमिटेड होल्डिंग्ज बीव्हीकडून हा संपादन व्यवहार होणार आहे.

याबाबत बजाज ऑटोने म्हटले आहे की, जागतिक पातळीवरील केटीएम कंपनीत बजाज ऑटोचा हिस्सा होता. आता संपूर्ण मालकी हिस्सा बजाज ऑटो विकत घेणार आहे. यातूनच्या केटीएमच्या सध्याच्या व्यवसायाला गती दिली जाणार आहे. केटीएम दुचाकींचे उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय हा भारताबाहेरून चालतो. केटीएम नेटवर्कच्या माध्यमातून भारतासोबत जगभरातील ८० देशामंमध्ये या दुचांकीच्या विक्री केली जाते. त्याला यापुढील काळात बळ दिले जाईल.

बजाज ऑटो इंटरनॅशनल लिमिटेड होल्डिंग्ज बीव्ही कंपनीकडून केटीएमला ८० कोटी युरोचा मोबदला दिला जाणार आहे. त्यातून केटीएमच्या कर्जाची पुनर्रनचा केली जाणार आहे. याला ऑस्ट्रियातील न्यायालयाने मंजुरी दिली आहे. कंपनीच्या व्यवसायाचे पुनरूज्जीवन आणि भांडवलासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. या ८० कोटी युरोच्या निधीपैकी २० कोटी युरो आधीच देण्यात आले असून, आता ६० कोटी युरो देण्यात आले, असे बजाज ऑटोने नमूद केले आहे.



Source link

Pune Municipal Corporation has decided to restart पुण्यात हेरिटेज वॉक

0
Pune Municipal Corporation has decided to restart पुण्यात हेरिटेज वॉक


पुणे : शहरातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती पर्यटनासाठी पुण्यात येणाऱ्या पर्यटकांना व्हावी, यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे बंद पडलेला ‘हेरिटेज वॉक’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीमार्फत मुख्य सभेने मंजुरी दिल्याने पुढील काही दिवसांत हा उपक्रम सुरू होणार आहे.

पुणे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. शहरात शनिवार वाडा, लाल महाल, विश्रामबाग वाडा, कसबा गणपती यासह अनेक जुन्या वास्तू आहेत. शहरात पर्यटनासाठी येणाऱ्यांना या वास्तूंबाबत उत्सुकता असते. पुणे शहराचा वारसा नागरिकांना समजावा, यासाठी पुणे महापालिका आणि जनवाणी या संस्थेने ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम २०१२ मध्ये सुरू केला होता. सुरुवातीची दोन वर्षे या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत होता. या उपक्रमात शहरातील १५ ऐतिहासिक वास्तूंची माहिती तज्ज्ञ आणि अभ्यासकांकडून दिली जात होती. यामध्ये शनिवारवाडा, भिडे वाडा ते विश्रामबाग वाडा यांचा समावेश होता. या उपक्रमाकडे महापालिकेने लक्ष न देत त्यामध्ये सातत्य न ठेवल्याने कालांतराने हा उपक्रम बंद पडला.

दोन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर ‘हेरिटेज वॉक’चा उपक्रम वर्षभरासाठी पुन्हा सुरू करण्यात आला होता. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी हा उपक्रम घेतला जात होता. याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर आता खासगी पद्धतीने हेरिटेज वॉक उपक्रम राबविणाऱ्या अजित आपटे यांनी हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दिला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता.

हेही वाचा

स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव दाखल मान्य करण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही हा विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण सभेने त्याला मान्यता दिल्याने आता पुढील काही दिवसांत हा उपक्रम सुरू केला जाणार असून, याद्वारे नागरिकांना आणि पर्यटकांना शहराचा इतिहास, तसेच ऐतिहासिक स्थळे, वारसा यांची माहिती मिळणार आहे.

शनिवार, रविवारी ‘हेरिटेज वॉक’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेने हेरिटेज वॉकच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवारी सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत हा ‘हेरिटेज वॉक’ होणार आहे. यामध्ये पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज पूल, घोरपडे घाट, शनिवार वाडा, कसबा गणपती मंदिर, लाल महाल, भिडे वाडा, बेलबाग मंदिर, पुणे नगरवाचन मंदिर, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, विश्रामबाग वाडा ही ठिकाणे दाखविली जाणार आहेत. सर्वसाधारणपणे अडीच किलोमीटरचा हा वॉक असणार आहे.





Source link

The Shree Shambhutirth area of ​​Karad पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सूचना

0
The Shree Shambhutirth area of ​​Karad पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सूचना


कराड : छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जात असलेल्या कराडच्या श्री शंभूतीर्थ परिसराला विद्युत वाहिन्यांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्युत वाहिन्यांचे जाळे (स्ट्रक्चर) तातडीने स्थलांतरित करावे, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. तिला मान्यता देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.

दोन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या या भव्य स्मारकासाठी आठ कोटींचा निधी दिला. हे काम प्रगतिपथावर आहे. पण, त्याला विद्युत तारांचा अडथळा निर्माण झाल्याने ते रखडल्याची बाब आमदार डॉ. भोसले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. त्यावर पालकमंत्री देसाई यांनी वीज कंपनीच्या देखभाल-दुरुस्ती खर्चातून या विद्युत तारांचे स्थलांतर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे स्मारकाचे काम गतीने पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा

वानरवाडी बंधाऱ्यासाठी संयुक्त बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वानरवाडी बंधाऱ्यांचा प्रश्न आमदार भोसल्यांनी मांडला. बंधाऱ्याचे काम झाले आहे. मात्र, सांडव्याचे काम रखडले असून, त्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील जमीन घ्यावी लागणार आहे. ती तातडीने मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची आमदार भोसल्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिले.





Source link

Drinking water supply to 3 lakh 5 thousand population जिल्ह्यात पाणीपुरवठा

0
Drinking water supply to 3 lakh 5 thousand population जिल्ह्यात पाणीपुरवठा


अहिल्यानगरः गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असला तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात अजूनही १७८ टँकरने ३.५ लाख लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी टँकरची संख्या १८१ होती, ती कमी होऊन १७८ झाली आहे. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठे गेल्या वर्षीच्या तुलनेत काहिसे अधिक आहेत.

हवामान विभाग जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. मात्र, हवेतील उष्मा कमी झालेला नाही. अवकाळीने मात्र जिल्ह्यात भाजीपाल्यासह पिकांचे नुकसान होत आहे. तसेच वादळीवारे व वीजांमुळे मणुष्यहानी व जनावरे दगावत आहेत. गेल्या फेब्रुवारी अखेरपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला आहे. सध्याही गेल्या आठवड्यापासून कमीअधिक स्वरूपाचा मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात कोसळत आहे. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप दिसत नसल्याने टँकरची मागणी कमी झालेली नाही. जिल्ह्यात सध्या १६३ गावे, ८८८ वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. पाथर्डी, पारनेर, अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, शेवगाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी असली तरी तेथे टँकरची संख्याही अधिक आहे.

सध्या पाथर्डीत ५४ टँकरद्वारे ३६ गावे, २०९ वाड्यावस्त्यांवरील ९४ हजार ५१४ लोकांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जामखेडमध्ये सात गावांतील ९ हजार ७३६ लोकांना सात टँकर, कर्जतमधील १६ गाव १०४ वाड्यावस्त्यांना १७ टँकरच्या माध्यमातून ३ हजार ३७६ लोकांची तहान भागवली जात आहे. शेवगावमध्ये ११ टँकरद्वारे १४ गावे ८६ वाड्यावस्त्यातील १९ हजार ४९३ लोकांना, पारनेरमधील ३८ गावे, २९४ वाड्यावस्त्यांवरील ८१ हजार ८०३ लोकांना ३९ टँकरद्वारे, श्रीगोंदा येथील १ गावासाठी २ टँकर सुरू आहेत. तेथे ८ हजार ७६० लोकांची तहान भागवली जात आहे.

हेही वाचा

नेवासामधील ३ गावे, ३० वाड्यावस्त्यांवरील ६ हजार ५९५ लोकांना तीन टँकरद्वारे, अहिल्यानगर तालुक्यातील १९ गावे ७७ वाड्यावस्त्यांना १८ टँकरद्वारे ३७ हजार ६२७ लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अकोले तालुक्यातील ३ गावे २५ वाड्यावस्त्यावरील ९ हजार २३४ लोकांची तहान भागवली जात आहे. संगमनेरमध्ये २६ गावे, ९३ वाड्यावस्त्यांना २० टँकर सुरू आहेत. तेथे ३ हजार ६५१ लोकांना टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील भुजलात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे आढळत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस होऊनही यंदा टँकरची संख्या तुलनेत वाढलेली आहे.

धरणातील जलसाठ्याची टक्केवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्याची तहान भागवणारे ३ मोठे व ६ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीसा अधिक साठा आहे. त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे (कंसात गेल्यावर्षीची टक्केवारी): भंडारदरा २९.५५ (१२.२९), मुळा ३२.७७ (२५.३२), निळवंडे २४.७७ (१३.०४), आढळा ४६.६० (३८.०२), मांडवहोळ १५.१९ (६.३७), पारगाव घाटशीळ ० (०), सीना २६.३८ (१७.२१), खैरी १६.३१ (१३.२४) व विसापूर १४.६९ (४.६९).

हेही वाचा





Source link

Young farmer dies after getting his hand caught तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

0
Young farmer dies after getting his hand caught तरुण शेतकऱ्याचा मृत्यू


अहिल्यानगरः श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे कुट्टी करत असताना यंत्रात हात गेल्याने वैभव सुरेश पवार (३९) तरुण शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

वैभव सुरेश पवार याची पवार वस्तीजवळ शेती व जनावरांचा गोठा आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी कुट्टीचे काम करताना, नजरचुकीने त्यांचा हात यंत्रात अडकला. हात ओढला गेल्याने छातीला जबर मार लागला. हात काढण्यासाठी त्याने प्रयत्न केले; मात्र, मदतीसाठी आसपास कोणीही नसल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शिवम पवार हा तेथून जाताना त्याच्या हा प्रकार लक्षात आला.

हेही वाचा

त्याने नातेवाइकांना आवाज दिला व वैभवची सुटका करून त्याला उपचारासाठी लोणी येथे हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.वैभवने अनेक नवीन प्रयोग शेतात राबविले. परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेतीकामात मदत करीत असे. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, बहीण, दोन मुले असा परिवार आहे.





Source link

satara SP Sameer Sheikh transferred to Mumbai tushar doshi appointed new Satara Superintendent

0
satara SP Sameer Sheikh transferred to Mumbai tushar doshi appointed new Satara Superintendent



satara SP Sameer Sheikh transferred to Mumbai tushar doshi appointed new Satara Superintendent | तुषार दोशी साताराचे नवीन पोलीस अधीक्षक, समीर शेख बृहन्मुंबईचे उपायुक्त





Source link

सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत, शेतीचे मोठे नुकसान

0
सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत, शेतीचे मोठे नुकसान

सोलापूर, प्रतिनिधी – मे अखेरीसच मुसळधार वळिवाने सोलापूर जिल्ह्यावर झडप घातल्याने जनजीवन कोलमडले आहे. अवघ्या एका दिवसात सोलापूर शहरात तब्बल ११० मिमी पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तसेच १३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून फळबागा, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी ३२.८ मिमी पाऊस पडला. उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक ६२.९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर माढा-५२.४, माळशिरस-४५.१, बार्शी-३७.२, करमाळा-३२.७, पंढरपूर-३१.३, मोहोळ-२९.२, दक्षिण सोलापूर-२३.३, अक्कलकोट-२३.२, सांगोला-१७.८ आणि मंगळवेढा-९.७ मिमी पावसाची नोंद झाली.

विशेषत: सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. पहिल्याच पावसात रस्त्यांची झालेली दुरवस्था, नालेसफाईच्या कामांची धिम्या गतीने झालेली पूर्तता, यामुळे महापालिकेच्या यंत्रणेच्या मर्यादा स्पष्टपणे समोर आल्या.

अतिवृष्टी झालेल्या १३ महसूल मंडळांमध्ये उत्तर सोलापूरच्या मार्डी (११० मिमी), माढ्याच्या टेंभुर्णी (९९.३), कुर्डुवाडी (७८), म्हैसगाव (७१.१), रोपळे (७०.५), बार्शीच्या उपळे दुमाला (९९.३), पंढरपूरच्या करकंब व पटवर्धन कुरोली (प्रत्येकी ७१), तसेच करमाळ्याच्या सालसे (७०.५) आणि केम (६९), माळशिरसच्या अकलूज (६५.३) यांचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी हांडे प्लॉट, बाळे परिसरातील पाण्याने ग्रस्त भागांची पाहणी करून तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र पावसाआधी नालेसफाईची कामे पूर्ण झाली नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

vaishnavi hagawane death case actress ashvini mahangade shared angry post on social media

0
vaishnavi hagawane death case actress ashvini mahangade shared angry post on social media



vaishnavi hagawane death case actress ashvini mahangade shared angry post on social media | “आपली लाडकी बहीण…”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली “सुनेला मारहाण करून…”





Source link