Sunday, July 12, 2026
Home Blog Page 226

वीज कोसळलेल्या ‘त्या’ Indigo विमानाच्या पायलटनं मदतीसाठी पाकिस्तानशी केला होता संपर्क; पण…

0
वीज कोसळलेल्या ‘त्या’ Indigo विमानाच्या पायलटनं मदतीसाठी पाकिस्तानशी केला होता संपर्क; पण…


Indigo Emergency Landing: मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. जिथं उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतच्या राज्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर या हवामानाचा थेट परिणाम होत असून, एका अतिशय भीषण प्रसंगाचा व्हिडीओ याचदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाला. थोडक्यात संकट टळलं अथवा अनर्थ झाला असता हेत समोर आलेलं दृश्य पाहताक्षणी अनेकजण म्हणाले. हा प्रसंग होता इंडिगोच्या विमानाच्या आपात्कालीन लँडिंगचा. 

मृत्यू दाखवणारा प्रवास…

दिल्लीहून श्रीनगरला (Delhi to Srinagar Flights) जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E2142 मध्ये त्या क्षणी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली, जेव्हा अचानकच वातावरण बिघडलं, विमान वादळात सापडलं आणि वीजांच्या कडकडाटानं विमानालाही हादरा बसला. प्रवास करणाऱ्या 220 प्रवाशांनी किंकाळ्या ठोकल्या, देवाचा धावासुक्धा केला. या प्रसंगी सर्व नियंत्रण वैमानिकाच्या हाती असल्यानं प्रसंगावधान राखत त्यानं एअर ट्रॅफिक कंट्रोककडून काही वेळासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्प अर्थात एअरबेसमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मागितली होती. 

सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या एअरबेसनं मात्र भारतीय वैमानिकाची ही विनंती धुडकावून लावली. ज्यानंतर आता नागरी उड्डयन महानिदेशालय (डीजीसीए) उड्डाण क्रमांक 6E 2142 सोबत घटलेल्या या दुर्घटनेची चौकशी करत आहे. या विमानानं काही नेत्यांसह जवळपास 220 प्रवासी एकाच वेळी प्रवास करत होते. 

विमानाचं उड्डाण झालं मात्र, अचानक गारपीट, पाऊस सुरू झाल्यामुळं वैमानिकानं श्रीनगरच्या विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमला ‘इमरजंन्सी’ घोषित करण्याच्या सूचना केल्या आणि बुधवारी हे विमान अतिशय सुरक्षितरित्य धावपट्टीवर लँड करण्यात आलं. अमृतसरवरून उड्डाणासमयी वैमानिकाला खराब हवामानामुळं एकाएकी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीमध्ये वैमानिकानं तातडीनं लाहोर एअर ट्रॅफिक रुमकडे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रामध्ये जाण्याची परवानगी मागितली. मात्र लाहोर एटीसीनं ही विनंती स्वीकारली नाही. 

ही परवानगी न मिळाल्यानं नाईलाजानं वैमानिकाला मूळ उड्डाणपथावरच टिकून रहावं लागलं आणि परिणामी गंभीर परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागला. जिथं विमानावर वीज कोसळून विमानाच्या पुढील टोकापाशी असणाऱ्या भागाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. वैमानिकानं अतिशय सावधगिरीनं इमरजंन्सी लँडिंग करत सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली आणि मोठा अनर्थ टळला. 

दरम्याम पहलगाम हल्ला, त्यानंतरचं ऑपरेशन सिंदूर या सर्व परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण नात्यातील तेढ आणखी वाढली. ज्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी आणि भारतानं पाकिस्तानधील विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.





Source link

Entertainment News Live Updates in Marathi: cannes 2025 aishwarya rai new look

0
Entertainment News Live Updates in Marathi: cannes 2025 aishwarya rai new look


Entertainment News LIVE 23 May 2025

जगभरात सध्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ची जोरदार चर्चा चालू आहे. यंदा या कार्यक्रमाला अनेक बॉलीवूड स्टार्सनी उपस्थिती लावली होती. तर, आलिया भट्ट या महोत्सवासाठी नुकतीच रवाना झाली आहे. आता तिचा रेड कार्पेट लूक काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





Source link

माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास :२२ मजली सहा पुनर्वसित इमारतींच्या बांधकामासाठी शनिवारी निविदा,१४५० कोटी रुपये खर्च करून ४०५३ घरांची बांधणी

0
माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास :२२ मजली सहा पुनर्वसित इमारतींच्या बांधकामासाठी शनिवारी निविदा,१४५० कोटी रुपये खर्च करून ४०५३ घरांची बांधणी



मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ४०५३ घरांच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शनिवारी निविदा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २२ मजली सहा पुनर्वसित इमारतींचे बांधकाम करण्यात येणार असून या इमारतींमध्ये ३०० चौरस फुटांच्या ४०५३ घरांचा समावेश असणार आहेत. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून शक्य तितक्या लवकर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असणार आहे. दरम्यान, या बांधकामासाठी अंदाजे १४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पूर्वमूक्त मार्गाच्या घाटकोपर – ठाणे विस्तारीकरणासाठी थेट बाधित होणाऱ्या १६९४ घरांसह रमाबाई नगर आणि कामराज नगरमधील अंदाजे १४ हजार झोपड्यांचा पुनर्विकास एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून संयुक्त भागीदारी तत्त्वावर करण्यात येत आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणाने चार हजारांहून अधिक झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करून पात्र झोपडीधारकांना दोन वर्षांचे घरभाडे देऊन घरे रिकामी करून घेतली आहेत.

अंदाजे १७ एकर जागा रिकामी करण्यात आली असून झोपु प्राधिकरण लवकरच ही जागा एमएमआरडीएला वर्ग करणार आहे. जागा ताब्यात येणार असल्याने आणि पुनर्वसित इमारतींचा आराखडा पूर्ण झाल्याने आता पहिल्या टप्प्यातील १७ एकर जागेवर पुनर्वसित इमारतींचे बांधकाम करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार सहा पुनर्वसित इमारतींच्या बांधकामासाठी शनिवारी (२४ मे) निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात सहा पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार असून प्रत्येक इमारत दोन विंग्जची असणार आहे. तर प्रत्येक माळ्यावर ३०० चौरस फुटांची एकूण ३२ घरे असणार आहेत. सहा पुनर्वसित इमारती २२ मजली असणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४०५३ घरे बांधण्यात येणार असून बांधकामाचा दर्जा आणि इमारतीतील सोयी-सुविधांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे मुखर्जी यांनी यावेळी सांगितले. शक्य तितक्या लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या ४०५२ घरांच्या बांधकामासाठी सुमारे १४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.



Source link

Sun-Varun creates powerful Raja Yoga The luck of people of these zodiac signs will brighten their bank balance will increase instantly

0
Sun-Varun creates powerful Raja Yoga The luck of people of these zodiac signs will brighten their bank balance will increase instantly



Sun-Varun creates powerful Raja Yoga The luck of people of these zodiac signs will brighten their bank balance will increase instantly | सूर्य-वरुणने निर्माण केला शक्तिशाली राजयोग! या राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, झटपट वाढणार बँक बॅलन्स





Source link

Supreme Court decides to declare scrub forests as forest areas in six districts of Vidarbha

0
Supreme Court decides to declare scrub forests as forest areas in six districts of Vidarbha



Supreme Court decides to declare scrub forests as forest areas in six districts of Vidarbha | सहा जिल्ह्यांतील ‘झुडपी जंगल’ वनक्षेत्र; १९८० नंतरची अतिक्रमणे हटविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश





Source link

नीता अंबानींच्या NMACC ची किमया; लिंकन सेंटरमध्ये ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन’ साऱ्या जगाचे डोळे दिपवणार

0
नीता अंबानींच्या NMACC ची किमया; लिंकन सेंटरमध्ये ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन’ साऱ्या जगाचे डोळे दिपवणार


Nita Ambanis NMACC : रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी 2023 मध्ये त्यांच्या आवडत्या ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC)’ चं उद्धाटन केलं आणि जागतिक स्तरावर एक भारतीय कलाक्षेत्र, संस्कृतीची जबरदस्त मोहोर उमटवली. अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गजांनी उत्साहाने रेड कार्पेटवर येत या सुरेख उपक्रमाच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली आणि संपूर्ण जगान या क्षणाला ‘इंडियाज मेट गाला’ असं नाव दिलं. शाहरुख खान, गिगी हदीद, प्रियांका चोप्रा, निक जोनास आणि झेंडिया यांच्यासह अनेकांनीच भारतीय संस्कृती आणि कलाक्षेत्रासह कलेच्या आणि कलाकारांच्या प्रत्येक रुपाचं कौतुक केलं. 

“नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंड पहिल्यांदाच न्यू यॉर्क शहरात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे! हे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे – आमच्या कला, हस्तकला, ​​संगीत, नृत्य, फॅशन आणि अन्नाचे – जागतिक उत्सव म्हणून डिझाइन केले आहे. NMACC मध्ये, आमचे ध्येय नेहमीच जगातील सर्वोत्तम गोष्टी भारतात प्रदर्शित करणे आणि भारतातील सर्वोत्तम गोष्टी जगासमोर आणणे हे राहिले आहे. हा खास वीकेंड हा त्या प्रवासातील पहिले पाऊल आहे, जगातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठांपैकी एक – लिंकन सेंटरवर भारताच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करत आहे. न्यू यॉर्क शहर आणि जगासोबत आमच्या समृद्ध परंपरा आणि वारसा शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे,” असंच नीता अंबानी सध्या म्हणताना दिसत आहेत. 

कसं असेल कार्यक्रमाचं स्वरुप? 

आमंत्रितांसाठी प्रवेश असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध भारतीय डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी क्युरेट केलेले अंबानी यांचे हँडलूम एम्पोरियम, ‘स्वदेश’ स्वागत प्रदर्शनात सादर केले जाईल. मिशेलिन-स्टार भारतीय शेफ विकास खन्ना यांच्याकडे इथं संपूर्ण खानपानाची जबाबदारी असेल. 

एनएमएसीसी इंडिया वीकेंडमध्ये ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन’ हा भारतातील सर्वात मोठा नाट्यप्रयोग सादर होईल जो भारताच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याला – नृत्य, कला, फॅशन आणि संगीत यांचे मिश्रण – एक अद्भुत मानवंदना असेल. यामध्ये ईसवीसनपूर्व 5000 पासून 1947 अर्थात स्वातंत्र्यापर्यंत देशाच्या इतिहासाचा प्रवास दाखवला जाणार आहे.

‘ग्रेट इंडियन बाजार’ इथं प्रमुख आकर्षण असेल – जिथे पाहुण्यांना सर्वोत्तम भारतीय फॅशन आणि कापड, अस्सल भारतीय चव, तसेच नृत्य, योग आणि संगीत अनुभवांची ओळख करून दिली जाईल. हे संगीतमय प्रदर्शन NMACC द्वारे सादर केलं जाणार असून त्याची  संकल्पना आणि दिग्दर्शन फिरोज अब्बास खान यांनी केलं आहे, अजय-अतुल यांचे संगीत, मयुरी उपाध्याय, वैभवी मर्चंट, समीर आणि अर्श तन्ना यांचे नृत्यदिग्दर्शन आणि मनीष मल्होत्रा ​​यांचे पोशाख आहेत.

सादरीकरणासाठी अपेक्षित सेलिब्रिटींची यादी

दिग्दर्शक फिरोज अब्बास खान एनएमएसीसीच्या भव्य निर्मितीचा शुभारंभ करतील. या निर्मितीमध्ये 100 हून अधिक कलाकार, भव्य सेटसह सुमारे 7000 वर्षांचा भारतीय इतिहास सादर केला जाईल. या भव्य निर्मितीमध्ये अजय-अतुल (संगीत), मयुरी उपाध्याय, वैभवी मर्चंट, समीर आणि अर्श तन्ना (नृत्यदिग्दर्शन), डोनाल्ड होल्डर (प्रकाश), नील पटेल (सुंदर डिझाइन), गॅरेथ ओवेन (ध्वनी डिझाइन), जॉन नरुण (प्रोजेक्शन डिझाइन), रेणुका पिल्लई (मेकअप डिझायनर) यांसारख्या महान कलाकारांचे सहकार्य असेल. तसेच, भारतातील आघाडीच्या नृत्य नृत्यदिग्दर्शकांपैकी एक, श्यामक दावर आणि त्यांची टीम सिग्नेचर बॉलीवूड डान्स वर्कशॉप आयोजित करतील.

रिटेल आणि वेलनेस थेरपी

भारतातील सर्वोत्तम हस्तकला आणि लक्झरी यांचे अत्यंत क्युरेटेड मिश्रण – भारतात खरेदी करताना तुम्हाला जे काही आवडते ते न्यूयॉर्क शहरात येते. रिटेल थेरपीशिवाय, प्रसिद्ध वेलनेस तज्ज्ञ एडी स्टर्न हे दररोज इथं योग कार्यशाळांचं नेतृत्व करतील.





Source link

pune Vaishnavi suicide case Rajendra hagawane finally arrested

0
pune Vaishnavi suicide case Rajendra hagawane finally arrested



pune Vaishnavi suicide case Rajendra hagawane finally arrested | वैष्णवी आत्महत्या प्रकरण: पुण्यातून राजेंद्र हगवणे आणि मुलाला पोलिसांनी केली अटक





Source link

Ajit Pawar said that he will announce the name of the candidate for the post of factory अजित पवार यांची माहिती

0
Ajit Pawar said that he will announce the name of the candidate for the post of factory अजित पवार यांची माहिती


बारामती : ‘माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पॅनेलमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. १३ जून रोजी कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहे’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.पवार म्हणाले, ‘या कारखान्याच्या पॅनेलमध्ये सर्वपक्षीय उमेदवार उभे केले जाणार आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. ही निवडणूक लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासारखी नसेल. माझ्या हातात असलेल्या सर्व यंत्रणांचा वापर करणार आहे. कारखाना सर्वोत्तम पद्धतीने चालविण्यासाठी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. १३ जून रोजी कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहे.’

‘ते हट्टी, तर मी दुप्पट हट्टी’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ते हट्टी असतील, तर मीही दुप्पट हट्टी आहे. अनेक वर्षे काम केल्यावर आता नव्या लोकांना काम करू दिले पाहिजे. वयाचा विचार करून नवीन युवकांना संधी द्यायला हवी. काही जण संचालक मंडळाच्या बैठकीलाही फिरकले नाहीत’ अशा शब्दात चंद्रराव तावरे यांचा नामोल्लेख टाळत अजित पवार यांनी टीका केली.

हेही वाचा





Source link

It has been revealed that cyber thieves have created a fake website बनावट संकेतस्थळावरून पदभरती

0
It has been revealed that cyber thieves have created a fake website बनावट संकेतस्थळावरून पदभरती


पुणे : सायबर चोरट्यांनी ‘महावितरण’चे बनावट संकेतस्थळ तयार करून विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्याचे समोर आले आहे. महावितरणने सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार केली असून, नागरिकांनी अशा बनावट जाहिरातीला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

फसवणुकीच्या उद्देशाने सायबर चोरट्यांनी http://www.mahavitaranmaharashtra.com हे बनावट संकेतस्थळ तयार करून शिपाई, वॉचमन, वाहतूक कामगार व साफसफाई कामगार इत्यादी सुमारे ४,३०० पदांच्या थेट भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. ‘महावितरण महाराष्ट्र – अधिकृत सेवा’ या शीर्षकांतर्गत जाहिरात प्रसिद्ध करत सातवी आणि १० वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना महावितरणच्या विविध पदांवर थेट भरतीचे आमिष देण्यात आले आहे.

चोरट्यांनी अर्ज करण्यासाठी ‘गुगल फॉर्म’ची सोय केली असून, रविवारी (२५ मे) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मागासवर्गीय उमेदवारांना ८०० आणि सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांनी ९०० रुपये शुल्क ‘यूपीआय – क्यूआर कोड’द्वारे भरण्याचे आवाहन केले आहे. अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा





Source link

A case has been registered against Nilesh Ramchandra Chavan पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
A case has been registered against Nilesh Ramchandra Chavan पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


पुणे : वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या कस्पटे कुटुंबीयांना धमकविल्याप्रकरणी कर्वेनगर येथील नीलेश रामचंद्र चव्हाण याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चव्हाणने कस्पटे कुटुंबीयांना पिस्तूल दाखवले होते. त्यानुसार चव्हाणवर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत वैष्णवी हगवणे यांचे काका मोहन कस्पटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नीलेश रामचंद्र चव्हाण ( रा. कर्वेनगर) याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५१(३) आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी कलम ३० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैष्णवी हगवणे यांनी १६ मे रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. वैष्णवी यांना विवाह झाल्यापासून हगवणे कुटुंबीयांकडून त्रास देण्यात येत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत वैष्णवी यांची मैत्रिणीबरोबरच्या संभाषणाची ध्वनिफीत प्रसारित झाल्यानंतर राज्यभरात हे प्रकरण गाजले. वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या दहा महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी कस्पटे कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू होते. ते बाळ नीलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते. कस्पटे कुटुंबीय चव्हाणच्या कर्वेनगर येथील घरी गेले होते. मात्र, त्याने त्यांच्याशी वाद घातला. त्याच्याकडील पिस्तूल दाखवले. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चव्हाण याच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याची माहिती वारजे पोलिसांनी दिली. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा

मूल वैष्णवी यांच्या आई-वडिलांकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैष्णवी आणि शशांक यांना दहा महिन्यांचे मूल आहे. हे मूल शशांक याच्या वारजे माळवाडी येथील नातेवाइकांकडे होते. ते गुरुवारी वैष्णवी यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केल्याचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले.





Source link