


Indian Railway Facts : रेल्वे… प्रवास अगदी सुकर करणारं दळणवळणाचं एक कमाल साधन. अनेकजण तर या या रेल्वेची मुळात कल्पनाच ज्या व्यक्तीला सुचली त्या व्यक्तीचं संधी मिळेल तेव्हा कौतुक करण्यास विसरत नाहीत. अशा या रेल्वेचं भारतातील जाळंसुद्धा जगभरात चर्चेचा विषय. देशभरात पसरलेल्या या रेल्वेमुळं एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात सहजपणे प्रवास करता येतो. याच रेल्वे प्रवासातली एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये का?
भारतीय रेल्वेनं दर दिवशी कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. मग तो लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा कमी अंतराचा… रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असते. लांबच्या अंतराला अनुसरून केलेला प्रवास पाहिल्यास सहसा रेल्वे स्थानकामध्ये विविध रंगांच्या आणि प्रामुख्यानं लाल, निळ्या रंगांच्या रेल्वेगाड्या उभ्या दिसतात. पण, या रंगांमधून रेल्वे नेमतं काय सांगू इच्छित असते माहितीये?
भारतीय रेल्वेच्या निळ्या रंगाच्या कोचला इंटीग्रल कोच (ICF) असं म्हणतात. आयसीएफ कोच हे रेल्वेचे पारंपरिक कोच असून, त्यांची रतना आयसीएफ, पेराम्बुर, चेन्नईकडून अर्थात तामिळनाडूत असणाऱ्या इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये तयार करण्यात आलेली आहे. 1952 पासून हे कोच भारतीय रेल्वेसेवत दाखल झाले.
रेल्वेतील लाल रंगाच्या कोचला एलएचबी कोच (LHB Coach) असं म्हणतात. हे कोच जर्मनीतील लिंक-होफमॅन-बुश (Linke Hofmann Busch) कडून तयार केले जात असून, सध्या मात्र त्यांची निर्मिती भारतातच होत आहे. साधारण 2000 पासून हे कोच तयार करण्यात सुरुवात झाली असून मुळच्या जर्मनीतून आलेल्या आराखड्याचे हे कोच सध्या रेल कोच फॅक्ट्री कपूरथला इथं तयार केले जातात.
उपलब्ध माहितीनुसार कोणत्याही दुर्घटनेमध्ये आयसीएफ अर्थात निळ्या रंगाच्या कोचचे डबे एकमेचांवर चढतात कारण त्यामध्ये ‘ड्युअल बफर सिस्टीम’ लावलेली असते. मात्र एचएलबी अर्थात लाल रंगाचे कोच दुर्घटनेमध्ये एकमेकांवर चढत नाहीत. सेंटर बफर प्रणालीमुळं ही क्रिया होत नाही, ज्यामुळं जिवीत आणि वित्ताची कमी हानी होते.
रेल्वेचा आयसीएफ कोच स्टीलपासून तयार केलेला असून त्याचं वजनही जास्त असतं. तर, एचएलबी चोक स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले असल्यानं ते वजनानं अधिक हलके असतात. आयसीएफ कोचच्या तुलनेत त्यांचं वजन साधारण 10 टक्क्यांनी कमी असतं.
राहिला मुद्दा वेगाचा, तर उर्जा निर्माण करण्यासाठी निळ्या रंगांच्या कोचमध्ये डायनेमो लावलेले असतात, ज्याचा परिणाम रेल्वेच्या वेगावर होतो. मात्र हे कोच ताशी 160 किमी इतक्या वेगानं धावतात, असं असलं तरीही त्यांची कमाल वेग मर्यादा मात्र 120 किमी प्रतितास इतकीच ठेवण्यात आली आहे. एलएलबी म्हणजेच लाल रंगाच्या कोचमध्ये मात्र डायनेमो नसल्यानं वेगाच्या बाबतीत निळ्या रंगाचे कोच सरशी करतात. आहे की नाही ही माहिती कमाल?


साहस Times :- दिव (गुजरात) येथील घोगला बिचवर सुरू असलेल्या खेलो इंडिया सागरी जलतरण स्पर्धेत फलटणच्या चैतन्य अजित शिंदे याने महाराष्ट्रासाठी घवघवीत यश मिळवले आहे. चैतन्यने १० किलोमीटर समुद्र जलतरण प्रकारात अवघ्या २ तास १३ मिनिटांत हे अंतर पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकावत ब्राँझ मेडल जिंकले. या कामगिरीमुळे चैतन्यच्या नावाचा झेंडा राज्यभर फडकला असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सध्या चैतन्य शिंदे पुण्यातील क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी येथे प्रशिक्षक बालाजी केंद्रे व विशाल नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली होती.
गुजरातच्या दिव समुद्रात २१ मे रोजी पार पडलेल्या या कठीण सागरी स्पर्धेत चैतन्यने जिद्द, संयम व ताकदीचे दर्शन घडवत राज्यासाठी गौरव मिळवला. या यशामागे राष्ट्रीय जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजू पालकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
चैतन्यच्या या ऐतिहासिक यशाबद्दल विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राजे नाईक निंबाळकर तसेच तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले किंवा ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणा करायची अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक गुरूवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार २४ जूनपासून इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) पुरवणी परीक्षा जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासकमाची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलैदरम्यान होणार आहे. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २४ जून ते ११ जुलैदरम्यान घेण्यात येणार आहेत. तसेच इयत्ता बारावी माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने १५ व १६ जुलै २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
इयत्ता दहावीची लेखी आणि प्रात्याक्षिक व तोंडी परीक्षा २४ जून ते ८ जुलैदरम्यान घेण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा २४ जून ते ४ जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहे. इयत्ता बारावी व दहावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत www mahahsscboard.in या संकेतस्थळावर २२ मे पासून उपलब्ध करण्यात आले आहे.
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांसदर्भात जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे फक्त विद्यार्थ्यांच्या माहितासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेसंदर्भातील अंतिम वेळापत्रक हे परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री विद्यार्थ्यांनी करून परीक्षेची तयारी करून परीक्षेला प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम समाज माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थी व पालकांना करण्यात आले आहे.

पनवेल: पनवेल महापालिका क्षेत्रातील सध्याची १० लाख नागरिकांसाठी आणि २०५१ साली ३५ लाख भविष्यातील नागरिकांसाठी पाणी पुरवठ्यामध्ये भासणारी तूट भागविण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पालिका स्तरावरुन झालेल्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारला पनवेलचा पाणीप्रश्न मान्य करून बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पनवेलसाठी कर्जत येथील शिलार येथे जलप्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पातील पाण्यावर ७५ टक्के आरक्षण पनवेलसाठी ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घ्यावा लागला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे २०३१ पर्यंत प्रत्यक्षात या प्रकल्पातून पनवेल शहर महापालिका क्षेत्राला गुरुत्वाकर्षणाच्या साह्याने २५ किलोमीटर लांबीवरुन कोणतेही मोटारपंपाशिवाय पाणी मिळणार आहे. यामुळे अर्थात मोटारपंपांचा खर्च, त्याची देखभाल आणि त्यासाठी लागणाऱ्या विजेचा कोट्यवधींचा पालिकेचा खर्च वाचणार आहे.
शिलार प्रकल्पासाठी तब्बल ४,८६९ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून ठेव तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी कोकण पाटबंधारे महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिकांमध्ये एक सामंजस्य करार करण्यात येईल.
महापालिकेच्या स्तरावरून शासन दरबारी पाण्याची मागणी सातत्याने मांडण्यात आली. पाताळगंगा नदीवरील न्हावाशेवा टप्पा तीन योजनेमधील पनवेल पालिकेचा पाण्याचा हिस्सा वर्षअखेरीपर्यंत पनवेलकरांन मिळणार आहे. त्यामुळे शिलार येथील जलप्रकल्पाच्या निर्माणापर्यंत पनवेलकरांची पाण्याची सोय करणे शक्य आहे. – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
पनवेल महानगरपालिका – ७५.४२% (रु. ३६७२.७५ कोटी)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण – १५.०८% (रु. ७३४.३५ कोटी)
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नवी मुंबई महानगरपालिका – ९.५०% (रु ४६२.६२ कोटी)

फलटण :- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये.
तालुका प्रशासनातर्फे सूचित करण्यात आले आहे की, कुठेही आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, जेणेकरून आवश्यक ती मदत वेळेवर पोहोचवता येईल.
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे व सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



मुंबई : वरळीमधील गांधी नगर येथील भारत बाजार परिसरातील मार्शल शोरूमच्या गोदामात शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला.वरळी येथील गोदामाला आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सकाळी ५ वाजता अग्निशमन दलाने ही आग क्रमांक १ ची असल्याचे जाहीर केले.
या आगीत विद्युत वाहिन्या, विद्युत यंत्रणा, कागदांचे गठ्ठे, गिफ्ट बॉक्सेस, मेकअप साहित्य, स्टेशनरी, कपडे, संगणक, लाकडी दरवाजे आणि इतर साठवलेले साहित्य भस्मसात झाले. सुमारे ९०० चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या या आगीमुळे मोठे नुकसान झाले. सकाळी ७.१२ वाजता आग पूर्णतः विझवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरू आहे.
या आगीत अग्निशमन दलातील जवान अजिंद्र गणपत सावंत जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्यांना तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.