Saturday, July 11, 2026
Home Blog Page 224

actress alia bhatt is going to debut in cannes film festival video viral on social media

0
actress alia bhatt is going to debut in cannes film festival video viral on social media



actress alia bhatt is going to debut in cannes film festival video viral on social media | आलिया भट्ट निघाली ‘कान्स’ला; एअरपोर्टवर ‘त्या’ बॅगनं वेधलं लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क…





Source link

मैत्रिणीचा गळा दाबून खून; आरोपी पोलीस ठाण्यात हजर

0
मैत्रिणीचा गळा दाबून खून; आरोपी पोलीस ठाण्यात हजर


पुणे : हडपसर भागात मैत्रिणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीचा खून केल्यानंतर तो पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. अनिता लोंढे (२७) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी राहुल शिवाजी मिसाळ याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील भंडलकरनगर शेवळवाडी येथे ही घटना घडली आहे. अनिता आणि आरोपी राहुल हे एकत्र राहत होते. आरोपी याने त्याची मैत्रीण अनिता हिचा गळा दाबून खून केला आहे. त्यानंतर तो यवत पोलीस ठाण्यात हजर झाला, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिली.





Source link

राज्यावर मुसळधार पावसाचे सावट, वीज पुरावठ्याबाबत महावितरण म्हणते…

0
राज्यावर मुसळधार पावसाचे सावट, वीज पुरावठ्याबाबत महावितरण म्हणते…



Heavy rain loom over maharashtra, Mahavitaran says about power supply… राज्यावर मुसळधार पावसाचे सावट, वीज पुरावठ्याबाबत महावितरण म्हणते…





Source link

Over 42,000 Hajj Pilgrims Left Stranded, Kiren Rijiju Urged to Intervene

0
Over 42,000 Hajj Pilgrims Left Stranded, Kiren Rijiju Urged to Intervene



Over 42,000 Hajj Pilgrims Left Stranded, Kiren Rijiju Urged to Intervene | ४२ हजार हज यात्रेकरूंची मक्का यात्रा अधांतरी; किरेन रिजिजूंना मदतीसाठी साकडे





Source link

How Did Salman Khan Cheer For Sooraj Pancholi Ahead Of Kesari Veer Release

0
How Did Salman Khan Cheer For Sooraj Pancholi Ahead Of Kesari Veer Release



How Did Salman Khan Cheer For Sooraj Pancholi Ahead Of Kesari Veer Release | “उद्याही सूर्य उगवेल…”, सूरज पंचोलीच्या ‘केसरी वीर’ चित्रपटाला सलमान खानचा पाठिंबा, म्हणाला…





Source link

अर्रsss; मोसमी वारे एकाच जागी रेंगाळले; केरळ आणि महाराष्ट्रातील मान्सूनचा आगमनाचा नवा मुहूर्त काय?

0
अर्रsss; मोसमी वारे एकाच जागी रेंगाळले; केरळ आणि महाराष्ट्रातील मान्सूनचा आगमनाचा नवा मुहूर्त काय?


Monsoon Latest Update : अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाच्या माऱ्यानं महाराष्ट्राला झोडपून काढलेलं असतानाच आता प्रत्यक्षाच मान्सूनचे वारे अर्थात नैऋत्य मोसमी वारे नेमके कुठवर पोहोचले हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंदमान आणि निकोबार बेट समुहांवर दाखल झाल्यानंतर मान्सूनचा प्रवास अतिशय समाधानकारक वेगात पुढील रोखानं सुरू झाला. पुढे श्रीलंका, बंगालचा उपसागर असे टप्पेही त्यानं गाठले, ज्यामुळं मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात आणि केरळात दाखल होणार असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला. 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानं मात्र या मोसमी वाऱ्यांच्या वाटेत काही अंशी अडथळा आणल्याची प्राथमिक शक्यता आता वर्तवली जात आहे. कारण, नैऋत्य मोसमी वारे बुधवारपासून एकाच जागी स्थिरावले/ रेंगाळले आहेत. गुरुवारीसुद्धा या वाऱ्यांची फारशी प्रगती झालेली नाही.

असं असलं तरीही मान्सून्या प्रगतीसाठी पोषक वातावरणनिर्मिती होत नाही, अशी परिस्थिती सथ्या उदभवली नाही असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. मान्सून वाऱ्यांचा सध्याचा वेग पाहता 25 ते 27 मे दरम्यान मोसमी वारे करेळमध्ये दाखल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. मान्सूननं मागील 24 तासांमध्ये अपेक्षित प्रगती केली नसली तरीही पुढील 48 तासांमध्ये मात्र तो नक्कीच आगेकूच करण्याची शक्यता आहे. 

पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून करणार प्रगती 

प्राथमिक निरीक्षण आणि अंदाज पाहता पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राच्या दक्षिणेसह इतर काही भागात प्रगती करत मालदीव आणि कोमोरिनचा उर्वरित भागही व्यापतील. ज्यानंतर लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडूसह ईशान्येकडील राज्यांमध्ये हे वार धडकतील. 

गोवा आणि तळकोकणात मान्सूच्या वाऱ्यांच्या प्रभावाअंतर्गत 1 जूनपासून जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यानच्या काळात सागरी हालचालींमुळं आणि वाऱ्यांच्या स्थितीमुळं मासेमारांनी खोल समुद्रता जाऊ नये असाही इशारा जारी करण्यात आला आहे. थोडक्यात महाराष्ट्रात मान्सून आता जून महिन्यातच धडकणार असून, सध्या मान्सूनपूर्व सरींवरच समाधान मानावं लागेल हीच वस्तूस्थिती. 





Source link

‍शिक्षिका बनली सैतान! पतीला संपविण्यासाठी तयार केला विषाचा देशी फॉर्म्युला

0
‍शिक्षिका बनली सैतान! पतीला संपविण्यासाठी तयार केला विषाचा देशी फॉर्म्युला



women Principal murder husband. Incident in Yavatmal. Murdered by poisoning ‍शिक्षिका बनली सैतान! पतीला संपविण्यासाठी तयार केला विषाचा देशी फॉर्म्युला





Source link

Karnataka Gang-Rape accused celebrate with victory procession Roadshow after getting bail video goes viral

0
Karnataka Gang-Rape accused celebrate with victory procession Roadshow after getting bail video goes viral


Crime News : १६ महिन्यांपूर्वी कर्नाटकच्या हवेरी येथे काही जण हॉटेलमधील एका आंतरधर्मीय जोडप्याच्या खोलीत घुसले, त्यानंतर महिलेला जवळच्या जंगलात ओढून घेऊन गेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यानंतर आता या प्रकरणातील आरोपींपैकी ७ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ज्यानंतर तुरूंगातून सुटलेल्या या आरोपींनी रस्त्यावरून घरी जात असताना जल्लोष करत मिरवणूक काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही मिरवणूक हवेरीमधील शहर अक्की अलूर येथे काढण्यात आली होती. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काही कार आणि दुचाकी पाहायला मिळत आहेत. तसेच यामध्ये आरोपी सुटकेचा आनंद व्यक्त करताना आणि ‘व्हिक्टरी साईन’ दाखवताना दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

हवेरी सेशन कोर्टाने नुकतेच सात आरोपींनी जामीन दिला आहे. ज्यामध्ये आफताब चंदनकट्टी, मादर साब मांदाक्की, समीवुल्ला ललनवार, मोहमद सादीक अगासिमानी, शोएब मुल्ला, तौशिक चोटी आणि रियाज साविकेरी यांचा समावेश आहे. या सर्वांना एका २६ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर अनेक महिने न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.

नेमकं काय झालं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडिता ही अल्पसंख्यांक समुदायातील असून ती दीर्घ काळापासून कर्नाटक स्टेट रोड कॉर्पोरेशनच्या एका ४० वर्षीय चालकाबरोबर नात्यात होती. हे दोघे ८ जानेवारी २०२४ मध्ये हवेरी येथील एका खाजगी हॉटेलमध्ये गेले होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला हॉटेलमधून ओढून जवळच्या जंगलात घेऊन गेले आणि तेथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

हेही वाचा

त्यानंतरच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान पीडिता आरोपींची ओळख पटवण्यात अपयशी ठरल्याचे सांगण्यात आले. ज्यामुळे खटला कमकुवत झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात एकूण १९ जणांना अटक करण्यात आली होती, सात मुख्य आरोपींचा समावेश होता. इतर बारा जणांवर गुन्ह्यात मदत करणे किंवा पीडितेवर शारीरिक हल्ला करण्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यापैकी बारा आरोपींना जवळजवळ दहा महिन्यांपूर्वी जामिनावर सोडण्यात आले होते. उर्वरित सात जणांना, ज्यांना मुख्य संशयित मानले जात होते, त्यांना सतत्याने जामीन नाकारला जात होता, मात्र आता कोर्टाने त्यांना देखील जामीन दिला आहे.





Source link

घाबरू नका! आता ‘ही’ चूक असेल तरी, तुमचा PF क्लेम रिजेक्ट होणार नाही; EPFO च्या नियमात मोठा बदल

0
घाबरू नका! आता ‘ही’ चूक असेल तरी, तुमचा PF क्लेम रिजेक्ट होणार नाही; EPFO च्या नियमात मोठा बदल


EPFO New Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) त्या वतीनं सर्वच पगारदार वर्गासाठी (PF) प्रॉव्हिडेंट फंडची सुविधा दिली जाते. कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दर दिवशी जमा होणाऱ्या रकमेतूनच काही रक्कम कापून ते पैसे या खात्यावर जमा केले जातात. जेणेकरून उतारवयात आणि त्याहूनही निवृत्तीनंतर हीच रक्कम कर्मचारी वर्गाला त्यांची आर्थिक गरज भागवण्यासाठी वापरता येईल. 

पीएफ खात्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या वेतनाच्या 12 ट्क्के रक्कम जमा केली जाते. तितकीच रक्कम कंपनीकडूनही खात्यावर जमा केली जाते. निवृत्तीनंतरच नव्हे, तर आर्थिक निकड असल्यासही पीएफ खात्यावर जमा असणारे पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं ही रक्कम काढता येते, जिथं खातेधारकानं प्राथमिक अर्ज देणं गरजेचं असतं. 

मागील काही वर्षांमध्ये पीएफ खात्याशी संबंधित अनेक व्यवहारांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हे व्यवहार शासनानंच अधिक सोपे करण्यावर अधिक भर देत आता त्यातील एका नियमात बदल केला आहे. 

काय आहे नवा नियम? 

पीएफ खात्यासंदर्भातील नव्या नियमानुसार आधीच्या किंवा पुढील नोकरीच्या सर्विस पिरियडमध्ये सर्वसाधारण ओवरलॅपिंग होत असल्यास ईपीएफओकडून पीएफसाठी केलेला अर्ज बाद अर्थात रिजेक्ट केला जात नाही. 20 मे 2025 रोजी ईपीएफओनं यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं असून, या नियमाची माहिती दिली, ज्याचा फायदा हजारो पीएफ खातेधारकांना होणार आहे. 

हेसुद्धा वाचा : उरलीयेत फक्त पाच वर्ष; 2030 पर्यंत 500000000 नागरिकांना ‘या’ गंभीर व्याधीचा विळखा, लँसेट अहवालामुळं चिंता वाढली 

 

EPFO च्या माहितीनुसार दोन कंपन्यांच्या सर्विस डेट्समध्ये ओवरलॅपिंग असल्यास आता पीएफचा क्लेम बाद केला जाणार नाही. ईपीएफओनं दिलेल्या माहितीनुसार ओवरलॅपिंग सर्विसमुळं ट्रान्सफर क्लेम सहजपणे रद्दबातल ठरवला जाऊ नये. अनेकदा इथं काही प्रामाणिक कारणंसुद्धा असू शकतात. 

नव्या परिपत्रकानुसार कोणत्याही निवृत्तीवेतनाच्या दाव्यामध्ये ओवरलॅपिंग तारखा आढळल्यास स्थानिक कार्यालयांकडून हा दावा फेटाळला जाऊ शकत नाही. किंबहुना त्यासाठी क्लेरिफिकेशन मागितलं जाईल. याची जबाबजारी ट्रान्सफर ऑफिसकडे सोपवण्यात आली असून, क्लेम परतवून न लावता ही प्रक्रिया पुढे नेत महत्त्वाच्या प्रकरणांमध्येच स्पष्टीकरण मागवावं आणि गोष्टींची स्पष्टोक्ती झाल्यानंतरच क्लेम सेटल करावा असंही स्पष्ट करण्यात आलं. 





Source link

‘आई मी वेफर चोरले नाहीत, ते दुकानदार काका..,’ 12 वर्षीय मुलाने आईला लिहिलं शेवटचं पत्र, ‘मला माफ कर, पण मी…’

0
‘आई मी वेफर चोरले नाहीत, ते दुकानदार काका..,’ 12 वर्षीय मुलाने आईला लिहिलं शेवटचं पत्र, ‘मला माफ कर, पण मी…’


दुकानातून वेफरचे पाकिट चोरल्याचा आरोप झाल्यानंतर आणि दुकानदाराने उठाबशा काढायला लावल्यानंतर 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने किटकनाशकाचं सेवन करत जीवन संपवलं असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 

कृष्णेंदू दास असं मुलाचं नाव असून गुरुवारी संध्याकाळी तो पानस्कुरा परिसरातील गोसाईबर बाजार येथील एका दुकानात गेला होता. दुकानदार शुभंकर दीक्षित दिसत नसल्याने त्याने चिप्सचे पॅकेट उचलले. त्याने वारंवार ‘काका, मी चिप्स विकत घेईन’ असं ओरडून सांगितलं. यानंतर त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी चिप्सचं एक पॅकेट घेऊन तो दुकानातून निघून गेला, असं अधिकाऱ्याने त्याच्या आईच्या हवाल्याने सांगितलं.

दुकानात परतलेल्या शुभंकर दीक्षितने त्याचा पाठलाग केला. त्याच्या कानाखाली मारली आणि सर्वांसमोर उठाबशा काढायला लावल्या असं कुटुंबाने तक्रारीत सांगितलं आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, कृष्णेंदू दासच्या आईला यानंतर घटनास्थळी बोलावण्यात आलं. त्याची आईही त्याच्यावर ओरडली आणि कानाखाली लावली. मुलगा यावेळी आपण दुकानासमोर ढिगाऱ्यात पडलेले फूड पॅकेट उचलले आणि नंतर पैसे देण्यासाठी येणार होतो असं सांगत होता.

दुकानदाराची परवानगी न घेता पाकिट उचलल्याबद्दल त्याने माफी मागत पैसे देण्याची तयारी दर्शवली. पण दुकानदार त्याच्यावर खोटे बोलल्याचा आरोप करत राहिला. त्यानंतर रागावलेला कृष्णेंदु त्याच्या आईसोबत घरी परतला. त्याने त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला. 

मुलगा दरवाजा उघडत नसल्याने आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता. तसंच त्याच्या शेजारी किटकनाशकाची अर्धी संपलेली बाटली पडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती. 

“आई, मी चोर नाहीये. मी चोरी केली नाही. मी वाट पाहत होते, पण काका (दुकानदार) तिथे नव्हते. परत येताना मला रस्त्यावर पडलेले कुरकुरेचे एक पॅकेट दिसले आणि ते उचलले. मला कुरकुरे खूप आवडतात,” असं त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं. पुढे त्याने म्हटलं होतं की, “जाण्यापूर्वी हे माझे शेवटचे शब्द आहेत. मला या कृत्यासाठी (किटकनाशक पिण्याबद्दल) माफ कर”.

त्याला तामलुक रुग्णालयात नेण्यात आले आणि आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दुकानदाराच्या दुकानाबाहेर गर्दी जमा झाली होती. पण तो सापडला नाही. 





Source link