Saturday, July 11, 2026
Home Blog Page 214

बाणगंगा धरण 100 टक्के भरले; सांडव्यावरून पाणी वाहू लागले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
बाणगंगा धरण 100 टक्के भरले; सांडव्यावरून पाणी वाहू लागले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

फलटण प्रतिनिधी उमेश काकडे– मागील काही दिवसापासून  सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगा धरण जलसाठा झपाट्याने वाढून आता 100 टक्क्यांपर्यंत भरले आहे. परिणामी, धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू झाला असून बाणगंगा नदी पात्रात व आसपासच्या परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, आवश्यकता नसताना नदी पात्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व स्थानिक यंत्रणा सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

SRH vs KKR: कोलकाताचा IPL इतिहासातील सर्वात मोठा पराभव, रौद्ररूप घेतलेल्या हैदराबादची विजयाने सांगता

0
SRH vs KKR: कोलकाताचा IPL इतिहासातील सर्वात मोठा पराभव, रौद्ररूप घेतलेल्या हैदराबादची विजयाने सांगता


SRH vs KKR Highlights in Marathi: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२५च्या इतिहासातील तिसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारत केकेआरचा मोठा पराभव केला आहे. हैदराबादच्या फलंदाजांनी यंदाच्या मोसमातील अखेरच्या सामन्यात रौद्र रूप धारण करत धावांचा पाऊस पाडला. ट्रॅव्हिस हेड- अभिषेकची सुरूवात आणि हेनरिक क्लासेनच्या शतकासह २७८ धावांचा डोंगर उभारला आणि केकेआरचा ११० धावांनी मोठा विजय नोंदवला.

आयपीएलच्या इतिहासातील ३ वेळचा चॅम्पियन संघ असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा हा धावांच्या अनुषंगाने सर्वात मोठा पराभव आहे. आयपीएल २०२५ चा हंगाम या दोन्ही संघांसाठी खूप वाईट होता, आयपीएलच्या गेल्या हंगामातील विजेते आणि उपविजेते असलेले हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. पण हंगामाच्या शेवटच्या सामन्यात, सनरायझर्सने त्यांची पूर्ण ताकद दाखवली आणि गेल्या हंगामातील विजेत्या कोलकात्याला ११० धावांनी पराभव केला.

दोन्ही संघांसाठी, हंगामाची सुरुवात ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने सांगता झाली. कोलकाता संघाला हंगामातील पहिल्याच सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला होता. आणि शेवटच्या सामन्यातही या संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, सनरायझर्सने आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या पहिल्याच सामन्यात २८६ धावांचा डोंगर उभारला होता. त्या सामन्यात इशान किशनने शानदार शतक झळकावले होते आणि संघाला मोठा विजय मिळाला होता. आता त्यांच्या शेवटच्या सामन्यातही सनरायझर्सने २७८ धावांची मोठी धावसंख्या उभारली, ज्यामध्ये हेनरिक क्लासेनचे वादळी शतक होते आणि नंतर मोठा विजय मिळवला.

हेही वाचा

सनरायझर्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि ट्रॅव्हिस हेडने अभिषेक शर्मासह केवळ ७ षटकांत ९२ धावांची भागीदारी रचली. यानंतर, हेड आणि क्लासेन यांनी कोलकाताच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी मिळून ८३ धावा जोडल्या आणि १३ व्या षटकापर्यंत संघाने १७५ धावा केल्या. क्लासेनची वादळी खेळी पाहायला मिळाली, क्लासेनने प्रथम फक्त १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर ३७ व्या चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हैदराबादने २० षटकांत ३ गडी गमावून २७८ धावा केल्या, जी आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा

प्रत्युत्तरात केकेआरचा संपूर्ण संघ १६८ धावांमध्ये सर्वबाद झाला. सुनील नरेनने चांगली सुरूवात केली. पण तो लवकर बाद झाला. यानंतर मनीष पांडे आणि हर्षित राणा यांनी अर्धशतकी भागीदारी केली संघाला २०० अधिक धावांपेक्षा पराभवापासून वाचवलं. मनीष पांडेने २३ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावा केल्या. तर हर्षित राणाने २१ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३४ धावा केल्या. तर रमणदीप सिंग ५ चेंडूत १३ धावा करत बाद झाला. याशिवाय केकेआरचे इतर सर्व फलंदाज फेल ठरले. हैदराबादकडून हर्ष दुबे, इशान मलिंगा आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतले.





Source link

कांदिवलीमध्ये भर रस्त्यात तरुणीवर हल्ला

0
कांदिवलीमध्ये भर रस्त्यात तरुणीवर हल्ला


मुंबई : एका १९ वर्षीय तरुणीवर भर रस्त्यात हल्ला झाल्याची घटना कांदिवली येथे घडली आहे. कांदिवली पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

पीडित तरुणी १७ वर्षांची असून कांदिवली पश्चिम येथे राहते. ती शनिवारी दुपारी आपल्या मैत्रीणीसह कांदिवलीच्या संजय नगर येथील गोसालिया रस्त्यावरून जात होती. त्यावेळी तिच्या परिचयाचा राहुल सिंग (१९) हा तरूण तिचा पाठलाग करत आला. त्याने भर रस्त्यात तिला शिविगाळ करून मारहाण केली. त्याने रस्त्यात पडलेली वीट उचलून तिच्या डोक्यात घातली. तिचा मोबाईल फोनही आरोपीने आपटून फोडला आहे. या हल्ल्यामुळे पीडित तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्यावर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात कलम ७८, ११८ (१), ११५ (२), ३५२, ३२४ (४) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) च्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी दिली.



Source link

धुवांधार पावसाने महाराष्ट्राची झोडपलं! माण-फलटण तालुक्यांत वाहतूक ठप्प, धुमाळवाडीत रेकॉर्डब्रेक पाऊस

0
धुवांधार पावसाने महाराष्ट्राची झोडपलं! माण-फलटण तालुक्यांत वाहतूक ठप्प, धुमाळवाडीत रेकॉर्डब्रेक पाऊस

सातारा :- महाराष्ट्रात मान्सूनने वेळेआधी हजेरी लावताच राज्यभर मुसळधार पावसाचा कहर सुरु झाला आहे. अनेक भागात नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून, रस्ते जलमय झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील माण व फलटण तालुक्यांमध्ये पावसाने कहर केला आहे.

धुवांधार पावसामुळे दहिवडी-फलटण, शिंगणापूर-फलटण, आंधळी-मलवडी, मलवडी-कुळकजाई, राजवडी-बिजवडी आदी रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेले असून, वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. शिंगणापूर परिसरात ढगफुटीसदृश्य पावसामुळे ओढे-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. ऐतिहासिक पुष्करतीर्थ तलावात पाण्याची मोठी आवक झाली आहे.

दरम्यान, फलटण तालुक्यातील धुमाळवाडीसह अनेक गावांमध्ये तब्बल 251 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या 30 वर्षांत प्रथमच धुमाळवाडी पाझर तलाव भरून वाहू लागला आहे, ज्यामुळे परिसरातील 50 हून अधिक गावांच्या शेतीला पाणीपुरवठा होणार आहे.

दक्षिण कोकण व गोवा किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 36 तासांत राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत शेतीपिकांचे नुकसानही झाल्याचे समोर येत आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन तब्बल 12 दिवस आधी झाल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. उकाड्याने त्रस्त जनतेला या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला असला, तरी काही भागांत आपत्तीजनक परिस्थितीही निर्माण झाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू यादव यांच्या मुलाची पक्षातून हकालपट्टी; जाणून घ्या कोण आहे अनुष्का यादव, कोणाच्या प्रेमात आहे तेज प्रताप यादव?

0
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू यादव यांच्या मुलाची पक्षातून हकालपट्टी; जाणून घ्या कोण आहे अनुष्का यादव, कोणाच्या प्रेमात आहे तेज प्रताप यादव?


लालू प्रसाद यांचा थोरला मुलगा तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी या संदर्भातली माहिती दिलीय. 6 वर्षांसाठी तेजप्रताप यादव यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलंय… पाहुयात यासंदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेजप्रताप यांची कुटुंब आणि पक्षातून हकालपट्टी केलीय. तेजप्रताप यादव यांच्या फेसबुक अकाऊंटवरून त्यांचा एका तरूणीसोबतचा फोटो शेअर करण्यात आला होता. हा फोटो शेअर करत तेजप्रताप यांनी रिलेशेनशिपसंदर्भात भाष्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या याच पोस्टनंतर त्यांची कुटुंब आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तेजप्रताप यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर लगेचच लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली.

राष्ट्रीय जनता दलातून तेजप्रतापांची हकालपट्टी 

वैयक्तिक जीवनात नैतिक मुल्यांकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक न्यायासाठी आम्ही करत असलेला संघर्ष कमकुवत होतो. तेजप्रताप यादव यांचं कृत्यं आणि वागणं हे आमच्या कौटुंबिक मुल्य आणि संस्काराच्याविरोधात आहे. त्यामुळे त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलंय. आता पक्ष आणि कुटुंबात त्यांची कोणतीही भूमिका राहणार नाही. त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून  निलंबित करण्यात येत आहे. तेजप्रताप यांच्या फेसबुक अकाऊंटर पोस्ट करण्यात आलेल्या पोस्टनंतर ते अडचणीत आलेत. आणि त्यामुळेच त्यांच्यावर हीकारवाई करण्यात आलीय.

तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी 

शनिवारी तेजप्रताप यादव यांच्या फेसबुक
अकाउंटवरून एक फोटो शेअर करण्यात
आला

या फोटोत तेजप्रताप हे एका तरूणीसोबत
दिसत आहेत

तेजप्रताप यादव यांच्यासोबत असेलल्या
तरुणीचं नाव अनुष्का यादव असल्याची
माहिती

12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत
असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात
आला होता

दरम्यान काही तासानंतर ही पोस्ट
फेसबुकवरून डिलिट करण्यात
आली

त्यानंतर माझं फेसबुक अकाऊंट हॅक
करण्यात आल्याचं तेजप्रताप यादव
यांनी सांगितलं

फोटो एआयच्या मदतीनं तयार करण्यात
आल्याचं स्पष्टीकरणही तेजप्रताप यांनी
दिलं

लालू प्रसाद यांचे साले म्हणजेच साधू यादव यांनी लालू प्रसाद यांनी घेतलेल्या निर्णयानंतर तेजप्रतापसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर टीका केलीय. तेजप्रताप मागील अनेक दिवसांपासून एका तरुणीसोबत राहत होता. लालू प्रसाद यादव यांना माहिती असूनही त्यांनी तेजप्रतापला 5 करोडचं हॉटेल बूक करून दिल्याचा आरोप साधू यादव यांनी केलाय.लालू प्रसाद यांनी त्यांच्या मुलाला कुटुंब आणि पक्षातून काढलं याच बिहारशी काय संबंध? यादव समाजातील एखादी नेता सक्षम असेल तर त्याला मुख्यमंत्री बनवणार असं लालू प्रसाद यादव म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी तो चेहरा जाहीर करावा जन सुराज पक्ष पाठिंबा देईल असं प्रशांत किशोर यांनी म्हटलंय.

कोण आहे अनुष्का?

तेज प्रताप आणि अनुष्का यादव यांच्यातील नात्यावरून 24 मे पासून सोशल मीडियावर गोंधळ सुरू आहे. अनुष्कासोबतच्या त्याच्या नात्याचा खुलासा झाल्यानंतर, लोक प्रतिक्रिया देत आहेत की जेव्हा ते दोघेही 12 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा त्याने 2018 मध्ये ऐश्वर्या रायशी लग्न का केले? लालू यादव नेहमीच सामाजिक न्यायाबद्दल बोलतात, या नात्यामुळे त्याला दुखापत झाली नाही का? अनेक लोक तर अशी प्रतिक्रिया देत आहेत की ऐश्वर्या राय त्याला तुरुंगात पाठवू शकते. याचे कारण म्हणजे ऐश्वर्या राय ही तेज प्रतापची विवाहित पत्नी आहे आणि हिंदू विवाह कायद्यानुसार दुसरे लग्न बेकायदेशीर आहे. तथापि, अनुष्का यादव आणि तेज प्रताप यादव यांचे नाते कोणत्या प्रकारचे आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही.

बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे तेजप्रताप यांची ही पोस्ट बिहारच्या राजकारणात वादंग निर्माण करू शकते. तसंच विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून लालू प्रसाद यादव यांना घेरलं असतं त्यामुळेच लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेजप्रताप यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची चर्चा आहे.





Source link

कोल्हापूर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अधिवेशन मोठ्या दिमाखात साजरा होणार – सातारा जिल्हाध्यक्ष दिनेश लोंढे

0
कोल्हापूर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अधिवेशन मोठ्या दिमाखात साजरा होणार – सातारा जिल्हाध्यक्ष दिनेश लोंढे

सातारा, दि. २५ :- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने १ जुलै रोजी हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठामध्ये राज्य अधिवेशन सोहळा घेण्याचे ठरले असुन हा सोहळा संपन्न करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याला मिळाली आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संघटनेचे राज्य अधिवेशन आणि राज्यातील सर्वच मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे नियोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. संपुर्ण राज्यातील शहरी, ग्रामीण पत्रकारांनी या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील हजारो पत्रकारांना एकत्रित आणण्याचे तसेच पत्रकारांच्या समस्या त्यांच्या अडीअडचणी संघाच्या माध्यमातून सोडविण्याचे तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघ सदैव तयार असुन कोल्हापुर येथील राज्य अधिवेशन दिमाखात साजरा होणार असल्याचे मत जिल्हाध्यक्ष दिनेश लोंढे यांनी केले आहे.

फलटण परिसरातील प्रमुख रस्ते पावसामुळे वाहतुकीसाठी बंद

0
फलटण परिसरातील प्रमुख रस्ते पावसामुळे वाहतुकीसाठी बंद

फलटण  प्रतिनिधी उमेश काकडे:सध्या फलटण परिसरात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलटण उपविभाग अंतर्गत येणारे काही प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांना पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे. पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, संबंधित ठिकाणी प्रतिबंधक फलक व अडथळे लावण्यात आले असून नागरिकांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आलेली आहे.

या रस्त्यांची सविस्तर यादी संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली असून, सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तहसीलदार फलटण यांनाही सदर बाबत माहिती देण्यात आली आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी समजून घेत मदतीसाठी ‘राजे गट’ सज्ज

0
पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी समजून घेत मदतीसाठी ‘राजे गट’ सज्ज

फलटण प्रतिनिधी उमेश काकडे :- महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार, फलटण शहरातील राजे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आपल्या-आपल्या प्रभागात फिरून पावसामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी समजून घेत आहेत.

शासनाच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत मदत पुरविण्यात येत असून, नागरिकांनी आपापल्या भागातील राजे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांशी संपर्क साधून मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मदत कार्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार श्री. दीपक चव्हाण हे दोघेही प्रत्यक्ष फलटण शहरातील विविध भागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत, तात्काळ मदत उपलब्ध करून देत आहेत.

पावसामुळे निर्माण झालेली कोणतीही अडचण असल्यास नागरिकांनी राजे गटाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपल्या अडचणीचे निराकरण करून घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

पावसामुळे वाढलेला पूर धोका : मदतीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा तत्काळ मदतीचा संदेश

0
पावसामुळे वाढलेला पूर धोका : मदतीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा तत्काळ मदतीचा संदेश

फलटण प्रतिनिधी उमेश काकडे : फलटण तालुक्यात सध्या सततच्या पावसामुळे अनेक भागांत नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्येही पावसाचे पाणी शिरत असल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व अशा आपत्तीजनक परिस्थितीत धैर्य न गमावता तात्काळ मदतीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

तालुक्यातील नागरिकांसाठी खासदार, आमदार, प्रशासन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची खास टीम मदतीसाठी सज्ज आहे.

महत्त्वाचे संपर्क क्रमांक –

मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर – 9689777111
आ. सचिन पाटील – 8208394243
धनंजय साळुंखे पाटील – 9960082150
अमरसिंह नाईक निंबाळकर – 9604622222
अशोकराव जाधव – 7620408002
लक्ष्मण सोनवलकर – 9975921588
विकास (बापुराव) शिंदे – 9822620620
अमित रणवरे – 9923338334
सचिन अहिवाळे – 8668353022
अमोल सस्ते – 9975192626
राहुल निंबाळकर – 9860034666
कलेक्टर विश्वासराव भोसले राजाळे – 9552526722
विक्रमसिंह भोसले (साखरवाडी) – 9421209191
सिराजभाई शेख (तडवळे) – 9524902786
तुकाराम शिंदे (वाखरी) – 9975378044
शुभम नलावडे (आळजापूर) – 9665579441
किरण जाधव (सासवड) – 8669147487
धनंजय पवार (पवारवाडी) – 9881779911
विशाल माने (आसू) – 8530439600
संतोष गावडे (राजुरी) – 9850226113
नाना आडके (दुधेबावी) – 7387549111

फलटण कार्यालय –
जोतीराम घनवट – 8830250199
राजेश शिंदे – 9529309003
ऋषी वादे – 8149447804
लतिफ तांबोळी – 8550927111
रोहित नागटिळे – 8251903111
मनोज कांबळे – 9423499634

आपत्तीच्या या काळात काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि आवश्यक मदतीसाठी या क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधा.

अडकलेल्या गायीची तब्बल दहा तासांनंतर सुटका

0
अडकलेल्या गायीची तब्बल दहा तासांनंतर सुटका


पुणे : शहरातील ताडीवाला रोड येथील एका झोपडपट्टीतील अरुंद गल्लीमध्ये आठ महिन्यांची गरोदर गाय आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अडकल्याची घटना घडली. तब्बल दहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गायीची अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी सुखरूप सुटका केली.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला रोड येथील एका झोपडपट्टीतील अरुंद गल्लीमध्ये गाय अडकली असल्याचा कॉल पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आणि त्याचवेळी वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिम देखील दाखल झाली.

ती गल्ली खूप अरुंद असल्याने तेथील काही लोखंडी जिने, सिमेंटचे कट्टे काढण्यात आल्यानंतर तब्बल दहा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर गायीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर गायीला काही ठिकाणी जखमा झाल्या असून तिच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.





Source link