Thursday, July 9, 2026
Home Blog Page 200

बेडरुममधील ‘या’ ५ गोष्टी कॅन्सरला कारणीभूत, आताच बाहेर फेका

0
बेडरुममधील ‘या’ ५ गोष्टी कॅन्सरला कारणीभूत, आताच बाहेर फेका


बेडरुम ही जागा प्रत्येकासाठी खास असते. आरामासाठी किंवा Me Time बेडरुम अतिशय खास असतो. पण तुम्हाला माहित आहे का, बेडरुममधील काही गोष्टी तुमच्या शरीरात कॅन्सरला शिरकाव करण्यास मदत करतात. आपल्याला शोभेच्या वाटणाऱ्या किंवा झोपेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कॅन्सरला कारणीभूत असतात. आपल्याला अनेकदा याबाबत माहितीही नसते. 

काय आहेत या ५ गोष्टी

बेडरूममध्ये असलेल्या काही सामान्य गोष्टी शरीराला हळूहळू आतून पोखरुन टाकतात. कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका देखील वाढवू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची बेडरूम पूर्णपणे सुरक्षित आहे, तर पुन्हा विचार करा. तुमच्या बेडरूममधून ताबडतोब काढून टाकण्यासाठी येथे 5 धोकादायक गोष्टी आहेत.

बरेच लोक त्यांच्या बेडरूमचा सुगंध चांगला येण्यासाठी सुगंधित मेणबत्त्या किंवा सुगंधी स्प्रे वापरतात. परंतु त्यामध्ये असलेले वाष्पशील सेंद्रिय संयुगे (VOCs) श्वासोच्छवासाद्वारे सतत शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे फुफ्फुसांचा आणि दीर्घकाळात कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो.

रंगीबेरंगी आणि चमकदार दिसणारे बेडशीट आणि पडदे बहुतेकदा फॉर्मल्डिहाइड सारख्या रसायनांनी हाताळले जातात. ही रसायने हळूहळू हवेत विरघळतात आणि त्वचेद्वारे किंवा श्वासाद्वारे शरीरात पोहोचतात. हे ऍलर्जी, डोकेदुखी आणि कर्करोगाच्या जोखमीशी संबंधित असू शकते.

रात्रभर उशाजवळ मोबाईल किंवा लॅपटॉप ठेवणे सामान्य झाले आहे, परंतु त्यांच्याद्वारे उत्सर्जित होणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन झोपेवर परिणाम करू शकते तसेच पेशींमध्ये असामान्य बदल घडवून आणू शकते. अनेक अभ्यासांनी ते संभाव्य कर्करोग घटक मानले आहे.

बेडरूममध्ये साचलेली धूळ आणि कार्पेटमध्ये लपलेले धुळीचे कण यामुळे दीर्घकाळात श्वसनाच्या समस्या, त्वचेची ऍलर्जी आणि जुनाट जळजळ होऊ शकते, ज्यामुळे शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्याची शक्यता वाढते.

बिस्फेनॉल-ए (बीपीए) आणि इतर विषारी रसायने बहुतेकदा स्वस्त प्लास्टिक कंटेनर, फर्निचर किंवा रंगवलेल्या लाकडात आढळतात, जी हार्मोनल असंतुलन आणि कर्करोगासाठी जबाबदार मानली जातात.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

‘दररोज मी या दुखण्यांशी लढतोय?’ 59 वर्षीय सलमान खान पहिल्यांदाच आजारपणांबद्दल बोलला? भाईजानला नेमकं काय होतंय?

0
‘दररोज मी या दुखण्यांशी लढतोय?’ 59 वर्षीय सलमान खान पहिल्यांदाच आजारपणांबद्दल बोलला? भाईजानला नेमकं काय होतंय?


बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान नुकताच कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा एकदा आला होता. यावेळी सलमान खानने आपल्या खासगी आयुष्याबद्दल खास करुन आजारपणाबद्दल मोठा खुलासा केला आहे. शोच्या स्टेजवर सलमानने खुलासा केला की, तो ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ब्रेन एन्युरिझम आणि एव्ही मॅलफॉर्मेशन सारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त आहे. या वेदना इतक्या असह्य असतात पण तरीही तो आपलं अभिनय.

या आजारांचा शरीरावर काय होतो परिणाम?

ट्रायजेमिनल न्यूराल्जियाबद्दल बोलायचे झाले तर, याला “सुसाइड डिजिज” असेही म्हणतात कारण त्यामुळे चेहऱ्यावर तीक्ष्ण विद्युत शॉकसारखी वेदना होतात. ब्रेन एन्युरिझम म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनीत फुगवटा असतो, जो फुटल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. दुसरीकडे, एव्ही विकृती म्हणजे मेंदूतील रक्तवाहिन्यांची एक असामान्य नेटवर्क असते, ज्यामुळे झटके आणि मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. हे सगळे आजार रक्तवाहिन्या आणि मेंदूशी संबंधित आहे.

सलमान काय म्हणाला?

हे आजार इतके जिवघेणे आहेत पण तरीही मी काम करत आहे.” सलमानने सांगितले की, या आजारांचा दैनंदिन जीवनावर खूप परिणाम होतो, परंतु तो कामाकडे कधीच त्याने दुर्लक्ष केले नाही. तो म्हणाला, “दररोज वेदना होतात, पण मी लढत आहे.” अशा गंभीर आरोग्य समस्या असूनही, सलमान त्याच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित आहे. तो म्हणाला की जर हे आजार आधी झाले असते तर तो पुन्हा सर्वकाही सुरू करू शकला असता, परंतु आता या वयात सर्वकाही अधिक कठीण झाले आहे. तुम्हाला सांगतो की सलमान खान शेवटचा रश्मिका मंदानासोबत ‘सिकंदर’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात काजल अग्रवाल, संजय कपूर, शर्मन जोशी आणि जतिन सरना सारखे कलाकार देखील होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.

सलमान खानने लग्नाबद्दल काय सांगितलं?

सलमान खानच्या आयुष्यात मुलगी आहे का? असे विचारले असता, सलमानने हलक्याफुलक्या पद्धतीने उत्तर दिले, “माझ्या आयुष्यात कोणीही नाही आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर, इतके त्याग करण्याची आणि पती-पत्नीमधील भांडणे सहन करण्याची माझ्यात धैर्य नाही. मी अशा टप्प्यावर आहे जिथे मला माझी स्पेस हवी आहे. आणि मला माझीच कंपनी आवडते.जी मी कोणासोबतही शेअर करू इच्छित नाही.”





Source link

सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या बंदीवर जिल्हाधिकाऱ्यांचा यु टर्न; पर्यटन बंदीचा आदेश मागे

0


Satara News: नुकताच सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या अजब कारभाराचा अजब आदेश बघायला मिळाला होता. यात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पर्यटनस्थळे तब्बल दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. काल म्हणजेच 20 जून ते 19 ऑगस्टपर्यंत हा बंदचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र यावर ABP माझाने आवाज उठवल्यानंतर ही बंदी आता मागे घेण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पर्यटन बंदीवर आता स्वत: जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यु-टर्न घेतल्याचे बघायला मिळाले आहे. 

दरम्यान, दोन महिने पर्यटन बंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आला होता. मात्र आता सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळाचा आनंद घेता यावा यासाठी कोणत्याही स्वरूपाची बंदी नाही, असा आदेश काढण्यात आला आहे. पर्यटन करताना जीवावर बेतणार नाही. याची पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सातारा हा पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या जिल्हा असून त्यांच्या जिल्ह्यातच पर्यटनाला बंदी घालण्यात आली होती. मात्र ABP माझाने यावेर आवाज उठवल्यानंतर ही बंदी मागे घेण्यात आली आहे.

कोणती होती निर्बंध लावलेली ठिकाणे ?

अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केरळली सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कासपुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव , बामनोली, सडा वाघापूर उलटा धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा, तसेच महाबळेश्वर आणि पाचगणी पर्यटन स्थळ त्याचबरोबर धरण अशा पर्यटन स्थळाच्या परिसरामध्ये पर्यटक गर्दी होत असते. त्यावर पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निर्बंध घातले आहेत. तर या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असेही सांगण्यात आले आहे. 

साताऱ्यातील पर्यटन बंदीमुळे स्थानिक व्यवसायिकांमध्ये नाराजी

सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी साताऱ्यातील पर्यटन क्षेत्रात 19 ऑगस्टपर्यंत पर्यटनावर बंदी घातली होती. साताऱ्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत. या मुळेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बंदी घालण्यात आली असल्याचे बोलल्या जात आहे. परंतु या निर्णयाबाबत स्थानिक व्यवसायकांनी नाराजी व्यक्त करत एबीपी माझासमोर आपल्या व्यथा मांडली आहे. मात्र आता प्रशासनाने हा निर्णय मागे घेतल्याने पर्यटक आणि स्थानिक व्यवसायीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या  

आणखी वाचा



Source link

“रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका!” — माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा

0
“रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका!” — माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा

माळेगाव | साहस Times प्रतिनिधी :- माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराची सांगता आज भव्य सभेच्या माध्यमातून करण्यात आली. या प्रचारसभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आणि सावधगिरीचा संदेश देण्यात आला.

“प्रचार संपला म्हणजे आपलं काम संपलं नाही. रात्र वैऱ्याची आहे. गाफील राहू नका,” असा स्पष्ट इशारा अजितदादांनी दिला. याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी दोन दिवस अधिक मेहनतीने काम करण्याचे आवाहन केले.

या सभेला राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सभेस मोठी गर्दी उसळल्याने विजयी सभेचीच अनुभूती निर्माण झाली.

अजित पवार म्हणाले, “कोणालाही आमचा पराभव करणं शक्य नाही. पण आमच्याच लोकांमुळे अनेकदा पराभव होतो, हा माझा अनुभव आहे. संधी मिळाली नाही म्हणून नाराज होणाऱ्यांना आम्ही इतर संस्थांमध्ये संधी देतोच. त्यामुळे चांगल्या मनाने काम करा. सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होण्यासाठी शेवटचे दोन दिवस निर्णायक ठरणार आहेत.”

ते पुढे म्हणाले, “मी कधीही फुशारकी मारत नाही. जनतेच्या हिताचं काम करत राहतो. बारामतीत सहकारी संस्था कशा पारदर्शक आणि यशस्वीपणे चालवतो हे सर्वांना माहिती आहे. सहकारात राजकारण येऊ नये, याबाबत माझं मत ठाम आहे. त्यामुळे या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलला मतदान करून कारखान्याच्या भवितव्याला दिशा द्या.”

फलटण राजकारणात नवा कलाटणी बिंदू; ‘राजे गट’ निळकंठेश्वर पॅनलसोबत

0
फलटण राजकारणात नवा कलाटणी बिंदू; ‘राजे गट’ निळकंठेश्वर पॅनलसोबत

फलटण, 20 जून : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या राज्यभर गाजणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील राजकारणाला नवे वळण लागले आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या ‘निळकंठेश्वर पॅनल’ला राजे गटाचा जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी गोखळी येथे झालेल्या कोपरा प्रचार सभेत या पाठिंब्याची घोषणा केली. या निर्णयामुळे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलला फलटण तालुक्यातील मतांची मोठी साथ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पाठिंब्यामुळे फक्त कारखान्याच्या निवडणुकीवरच नाही, तर आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

 

National Reading Day: २१ राज्यांतील १० लाख नागरिकांनी साजरा केला वाचनाचा उत्सव

0
National Reading Day: २१ राज्यांतील १० लाख नागरिकांनी साजरा केला वाचनाचा उत्सव


रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामीण रिलेशन्स मूव्हमेंट अंतर्गत ज्ञान की फिट की या स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेला भक्कम पाठिंबा दिला. एकत्रितपणे त्यांनी ही वाचन चळवळ २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोचवली. या भागांत गुजरात, महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, पंजाब, ओडिशा, नागालँड, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, केरळ, झारखंड, हरियाणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, जम्मू-कश्मीर व लडाख यांचा समावेश आहे.



Source link

फलटण बस स्थानक होणार आधुनिक रूपात – आमदार सचिन पाटील यांची माहिती

0
फलटण बस स्थानक होणार आधुनिक रूपात – आमदार सचिन पाटील यांची माहिती

फलटण : फलटण शहरातील नागरिकांची दीर्घकालीन प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. फलटण शहरात नूतन अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यास राज्य सरकारने अधिकृत मान्यता दिली असून, लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार सचिन पाटील यांनी दिली आहे.

पंढरपूर पालखी महामार्गावर वसलेले आणि सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे फलटण शहराची व्याप्ती वाढत आहे. प्रवाशांची वाढती संख्या, बस स्थानकावरील कमी सुविधा आणि नागरिकांच्या सातत्याने होणाऱ्या मागणीनंतर अखेर शासनाच्या संबंधित यंत्रणेकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आमदार सचिन पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी सहभाग (PPP) तत्वावर उभारण्यात येणार असून, बसस्थानकासह एक आधुनिक व्यापारी संकुलदेखील तयार होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक व्यावसायिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. लवकरच या प्रकल्पासाठी निधी वितरीत होणार असून, त्यानंतर कामास गती दिली जाणार आहे.

आमदार सचिन पाटील यांनी या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत.

स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन युवक-युवतीची आत्महत्या; ‘आम्ही भाऊ-बहीण आहोत’ अशी चिठ्ठी सापडली

0
स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन युवक-युवतीची आत्महत्या; ‘आम्ही भाऊ-बहीण आहोत’ अशी चिठ्ठी सापडली

सोलापूर, 20 जून – सोलापूर शहरातील कर्णिकनगर परिसरात एका युवक आणि युवतीने स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोघांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून, “आम्ही दोघे भाऊ-बहीण आहोत, आमच्या मृत्यूनंतर नात्यावर कुठलीही शंका घेऊ नये,” असा स्पष्ट उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे.

आत्महत्या केलेल्यांची नावे रोहित ठणकेदार आणि अश्विनी केशापुरे अशी आहेत. रोहित हा चालक म्हणून काम करत होता तर अश्विनी हिने बी. फार्मसीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी ही रोहितची मानलेली बहीण होती आणि त्यांच्यात भावनिक जिव्हाळ्याचं नातं होतं.

दोघांचे मृतदेह कर्णिकनगर येथील एका बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर आढळून आले. प्राथमिक तपासात, दोघांनी स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलीस तपासादरम्यान आत्महत्येसंदर्भात एक चिठ्ठी आढळून आली असून, त्या चिठ्ठीत लिहिले आहे की, “आम्ही एकमेकांसोबत शेवटपर्यंत आहोत. आमच्या नात्यावर कोणतीही शंका घेऊ नये.” विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी दोघांनी आपल्या मोबाईल स्टेटसवरही ‘भाऊ-बहीण’ असा उल्लेख केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, दोघांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.

दरम्यान, या प्रकरणी सोलापूर सिव्हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आत्महत्येमागील नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.

काय आहे स्लीप टूरिझम? या जागांवर एन्जॉय करु शकता Napcations

0
काय आहे स्लीप टूरिझम? या जागांवर एन्जॉय करु शकता Napcations


Benefits of Sleep Tourism : हल्ली धावपळीच्या जगात सगळेच तणावात असतात. या तणावापासून थोडा काळ का होईना मुक्त राहण्यासाठी एका लांब सुट्टीचा विचार करतात. ज्यासाठी ते स्वतः बाहेर जाऊन फ्रेश होण्याचा विचार करतात. पण सध्या स्लीपिंग टुरिझम सध्या खूप चर्चेत आहे. काय आहे हे टुरिझम आणि लोकांना याचा काय फायदा होतो जाणून घ्या. 

स्लीप टुरिझम म्हणजे काय?

Sleep Tourism म्हणजे अशा सहली किंवा सुट्ट्या जिथे मुख्य लक्ष चांगल्या झोपेवर असते. पूर्वी हॉटेल्स असा दावा करत असत की तुम्हाला येथे चांगली झोप मिळेल, परंतु स्लीप टुरिझम यापेक्षा खूप जास्त महत्त्वाचे आहे. आता असा दावू करु शकतात ज्यामुळे तुमची झोप सुधारू शकते. ज्यामध्ये आठवडाभराचा रिट्रीट समाविष्ट असू शकतो. जिथे झोप सुधारण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय, वैद्यकीय चाचण्या आणि उपचार किंवा असे स्पा उपचार दिले जातात जे झोप आणण्यास मदत करतात.

एका अहवालानुसार, २०२४ मध्ये हा उद्योग सुमारे ६९० अब्ज डॉलर्सचा झाला आहे आणि २०२८ पर्यंत त्यात आणखी ४०० अब्ज डॉलर्सची वाढ होण्याची अपेक्षा आहे.

हा ट्रेंड का वाढत आहे?

आता लोक उत्तम आरोग्यासाठी केवळ आहार आणि व्यायामा सोबातच झोपेलाही तितकंच महत्त्व देऊ लागले आहेत. असेही दिसून येत आहे की, आता जेव्हा लोक सुट्टीवर जातात तेव्हा ते कामापासून दूर राहतात आणि मुलांसोबत काही वेळ घालवतात आणि त्यानंतर झोपेला प्राधान्य देऊ इच्छितात. म्हणूनच हॉटेल्स देखील झोपेसाठी नवीन ऑप्शन देत आहेत. 

अशी झोपेची सुट्टी कुठे मिळू शकते?

या ट्रेंडमध्ये, जगभरातील अनेक प्रकारच्या झोपेवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. याला स्लीप फोकस्ड ट्रिप्स म्हटलं जात आहे. स्पेनच्या SHA वेलनेस क्लिनिकमध्ये मेडिकल स्लीप प्रोग्राम असतो. येथे डॉक्टर तुमच्या झोपेची तपासणी करतात. जसे की, झोपेत किती घोरता, श्वास कसा घेता तसेच सतत झोपमोड होते का? तसेच त्या व्यक्तीची लाइफस्टाइल, डाएटस आणि काही इतर समस्या आहेत का याचा देखील विचार केला जातो. 

झोपेवर केंद्रित सहली उपलब्ध आहेत. स्पेनचे एसएचए वेलनेस क्लिनिक वैद्यकीय झोप कार्यक्रम देते. येथे डॉक्टर प्रथम तुमची झोप तपासतात. जसे की घोरणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा वारंवार जागे होणे. नंतर ते तुमची जीवनशैली, आहार आणि काही तंत्रांसह तुमची झोप सुधारण्याची योजना आखतात.

जर्सीमधील लॉन्गव्हिल मॅनर आणि कॅलिफोर्नियामधील पोस्ट रॅंच इन सारख्या हॉटेल्सनी झोप तज्ञांच्या सहकार्याने विशेष कार्यक्रम तयार केले आहेत. मालदीवमधील सोनेवा सारख्या रिसॉर्ट्समध्ये, ध्यान, योग, हर्बल बाथ आणि सूर्यप्रकाश यासारख्या गोष्टींनी ग्राहकांचे शरीर आणि मन आरामशीर होते.

इटलीचा लेफे रिसॉर्ट पारंपारिक चिनी औषधांसह झोप सुधारण्यास मदत करतो.

श्रीलंकेचा सांतानी वेलनेस कॅंडी आयुर्वेदिक पद्धतींनी झोप सुधारण्यासाठी कार्यक्रम चालवतो.

Napcations साठी ही सर्वोत्तम ठिकाणे 

जर तुम्हाला झोपेचा आनंद सुंदर नजारा बघत घेता आलं तर. भारतातील ही ठिकाणे नॅपकेशनसाठी सर्वोत्तम मानली जातात. यामध्ये गोवा, कूर्ग, मनाली, ऋषिकेश आणि म्हैसूर यांचा समावेश आहे.





Source link

सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? मग बातमी आपल्यासाठी; धरणे, कास पठारसह महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत बंदी

0



सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? मग बातमी आपल्यासाठी; धरणे, कास पठारसह महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत बंदी



Source link