सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? मग बातमी आपल्यासाठी; धरणे, कास पठारसह महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत बंदी
Source link
सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी जाताय? मग बातमी आपल्यासाठी; धरणे, कास पठारसह महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर 19 ऑगस्टपर्यंत बंदी
Twitter Review: सितारे जमीन पर आहे ‘मास्टरपीस’, आमिरच्या फिल्मचे एक्स युजर्सकडून भरभरून कौतुक

बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट आज म्हणजेच २० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आमीर खानच्या या चित्रपटाचे काल म्हणजेच १९ जून रोजी स्पेशल स्क्रिनिंग झाले होते. आता चाहते आज हा चित्रपट पाहत आहेत आणि एक्स हँडलवर चित्रपटाचा रिव्ह्यू देत आहेत. एक्स युजर्सचे म्हणणे आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांना हसवेल, रडवेल आणि अभिमान वाटेल. एका युजरने म्हटले की, सितारे जमीन परला स्टार्सने मोजता येत नाहीत, हा इतका उत्तम चित्रपट आहे. अनेकांनी या चित्रपटाचे वर्णन एक उत्कृष्ट कलाकृती, मास्टरपीस म्हणून केले आहे.
सताऱ्यातील पश्चिम भागातील पर्यटनस्थळे तब्बल दोन महिने बंद; आंबेनळी घाट ‘या’ वेळी असणार बंद
Maharashtra Weather Update: सातारा आणि जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. आंबेनळी घाट संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे महाबळेश्वर ते पोलादपूरला जोडणारा आंबेनळी घाट बंद राहणार आहे. रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात दोन ठिकाणी दरड पडल्याची घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कडून हा निर्णय घेण्यात आलाय. महाबळेश्वर ते पोलादपूर घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर धुके असल्यामुळे त्याचबरोबर मागील दोन ते तीन दिवसापासून सलग मुसळधार पाऊस या ठिकाणी पडत असल्यामुळे दरड पडण्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी हा घाट पुढच्या आदेशापर्यंत संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत बंद राहणार आहे.
दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेच्या अजब कारभाराचा अजब आदेश बघायला मिळतोय. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पर्यटनस्थळे तब्बल दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 20 जून ते 19 ऑगस्टपर्यंत हा बंदचा आदेश लागू असणार आहे.
निर्बंध लावलेली ठिकाणे कोणती?
अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केरळली सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कासपुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव , बामनोली, सडा वाघापूर उलटा धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा, तसेच महाबळेश्वर आणि पाचगणी पर्यटन स्थळ त्याचबरोबर धरण अशा पर्यटन स्थळाच्या परिसरामध्ये पर्यटक गर्दी होत असते. त्यावर पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निर्बंध घातले आहेत. तर या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असेही सांगण्यात आले आहे.
आंबेनळी घाटात तीन ठिकाणी कोसळली दरड
रायगडमध्ये दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात मोठा फटका बसला . त्यानंतर आता पोलादपूर आंबेनळी घाटामध्ये देखील तीन ठिकाणी दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे. या दरडीसोबत रस्त्यावर माती देखील मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने आंबेनळी घाटातील वाहतूक जवळपास दोन तासांहून अधिक वेळ बंद आहे. प्रशासनाकडून तीनही ठिकाणी दरड बाजूला घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरड बाजूला होईपर्यंत आंबेनळी घाटातील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पहिल्याच पावसात सहा महिन्यापूर्वी तयार केलेला डांबरी रस्ता गेला वाहून
नांदुरा तालुक्यातील चांदुर बिस्वा ते भिलवडी असा रस्ता सहा महिन्यापूर्वीच डांबरीकरण करून नवीनच बनवायला होता. मात्र रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे पहिल्याच पावसात हा रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने आता या परिसरात वाहतूक ठप्प झाली आहे . सध्या पेरणीचे दिवस असल्याने मात्र या परिसरातील जवळपास १० गावातील नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचं चित्र आहे. पहिल्याच पावसात रस्ता वाहूनच गेला नाही तर रस्त्यात मोठे भगदाड पडल्याने वाहतूक बंद पडली आहे.
हे ही वाचा
आणखी वाचा
Yoga Day 2025 : सकाळी की संध्याकाळी कधी योगा करणं आरोग्यासाठी फायदेशीर? प्रेमानंद महाराज काय सांगतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अगदी डॉक्टर्सपर्यंत सगळेच हेल्दी राहण्यासाठी योग करण्याचा सल्ला देतात. दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योगा दिवस साजरा केला जातो. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर लवकरच तुमच्या दैनंदिन दिनचर्येत त्याचा समावेश करा. योग म्हणजे काही अशा आसनं ज्यामुळे शरीर आणि मन निरोगी राहते. हवामान काहीही असो, त्याची आसने आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.प्रेमानंद महाराज सांगतात की, योग कधी करावा.
आता हवामान बदलत आहे, तेव्हा प्रश्न उद्भवतो की, पावसाच्या काळात आपण करत असलेली आसने आणि प्राणायाम चालू ठेवावीत की योग असेही म्हणतात की बदलत्या हवामानाबरोबर वर्तन बदलणे आवश्यक आहे! बदलत्या हवामानाबरोबर योग आसने देखील बदलतात.
प्रेमानंद महाराज सांगतात की, सकाळी सगळ्यात आधी कोमट पाणी प्या. नंतर थोडं चाला आणि मग शौचाला जाऊन आंघोळ करा. यानंतर व्यायाम किंवा योग करा. याचा एक क्रम असतो. असं नाही की, उठलं आणि मग योगा केलं. पोट साफ झाल्याशिवाय योग करु नये. हा क्रम फॉलो केल्यावर शरीरावर चांगला परिणाम होतो?
प्रश्न उद्भवतो की मन आणि शरीर थंड वाटावे म्हणून कोणता योग करावा. प्रेमानंद महाराज सांगतात की हवामानानुसार आसने निवडणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात तुमचे मन आणि शरीर थंड ठेवणारी अशी आसने. ज्याप्रमाणे आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे, तसेच व्यायाम देखील आवश्यक आहे.
योगासन, योगसूत्र आणि योगभाष्य यावर लिहिलेल्या प्रमुख ग्रंथांमध्ये आसन आणि प्राणायामचा उल्लेख आहे. सरावात शीतली, शीतकारी, भ्रामरी आणि शवासन समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. ही आसने तुमच्या दैनंदिन सरावाचा भाग बनवण्यापूर्वी, एखाद्या कुशल योगगुरूचा सल्ला नक्कीच घ्यावा.
वय, रोग आणि लिंगानुसार काही विशेष खबरदारी घेतली पाहिजे आणि बदलांनुसार ती समाविष्ट केली पाहिजेत. नियमांकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. उदाहरणार्थ, चांगल्या परिणामांसाठी सकाळची वेळ सर्वात योग्य आहे. रिकाम्या पोटी आसने करणे चांगले आणि जर सकाळी ते शक्य नसेल, तर सराव करण्यापूर्वी 3 तास काहीही खाऊ नका किंवा पोट रिकामे ठेवू नका.
“सभासदांच्या पैशाला हात न लावता कारखान्याचा कायापालट करणार” उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

फलटण :“माळेगाव कारखान्याचं चेअरमनपद मी स्वीकारणार म्हटल्यावर विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. पण माझा हेतू स्पष्ट आहे – सभासदांच्या पैशाला हात न लावता कारखाना उत्तम चालवून दाखवायचा आहे,” अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी येथे निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. “माझ्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था बारामतीत कशा प्रगती करत आहेत, हे विरोधकांनी बघावं. खासगीकरणाच्या आरोपांमध्ये तथ्य नाही,” असं स्पष्ट करत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
“मी चेअरमन झाल्यानंतर कारखान्याच्या कोणत्याही सुविधा स्वतः वापरणार नाही. त्यामुळे इतर संचालकही तसंच करतील आणि खर्चात मोठी बचत होईल. ती बचत सभासदांना अधिक दर देण्यासाठी वापरण्यात येईल. हे माझं वचन आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
“सध्या इतर तीन पॅनल्सनी त्यांच्या चेअरमनपदाच्या दावेदारांची घोषणा केलेली नाही. आम्ही स्पष्टपणे सांगतो – आमच्या पॅनलची सत्ता आली तर चेअरमन मीच होणार. पारदर्शक भरती, ऊसतोडणीचं काटेकोर नियोजन, आणि तालुक्याबाहेरील शेतकऱ्यांची गैरसोय न होऊ देणं, ही आमची बांधिलकी असेल,” असं सांगत अजित पवार यांनी मतदारांना विश्वासाने मतदान करण्याचं आवाहन केलं.
“ज्ञानेश्वरी पालखीचा प्रस्थान सोहळा संपन्न, पण फलटणमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रवास अद्याप सुरुच !”

फलटण – लाखो वारकऱ्यांचा श्रद्धेचा सोहळा असलेला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आळंदीतून मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात निघाला असला तरी माऊलींची वाट मात्र फलटण शहरात अद्यापही खड्ड्यांनी भरलेलीच आहे.
गेल्या काही दिवसांत ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरजन यांनी पालखी मार्गाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या होत्या.
त्यावेळी ना. गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखी प्रस्थानाच्या आत सर्व खड्डे बुजवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु, आजही शहरातील अंतर्गत पालखी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांची संख्या लक्षावधींच्या घरात असते, त्यात अशा रस्त्यांमुळे अपघात आणि गैरसोयीची शक्यता नाकारता येत नाही.
फलटण शहरातील पालखी मार्गाचा बहुतांश भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असूनही, केवळ सूचना फलक (पाट्या) लावून काम उरकल्याचा आभास निर्माण केला जात आहे. अधिकारी पाट्यांपुरतेच मर्यादित राहून, प्रत्यक्ष खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे.
संतांचे नाव घेतले जाते, पण त्यांच्या वाटेचा विचार मात्र उरतो कागदावरच – अशी खंत वारकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
किडनीत झालेल्या मुतखड्याचा भुगा करेल ‘हे’ पाणी; फक्त सेवन करताना विशेष काळजी घ्या

भारतीय धर्मात तुळशीला वेगळे स्थान दिले जाते. हिंदूंच्या घरात त्याची पूजा केली जाते आणि ती पूजा साहित्य म्हणून किंवा कोणत्याही पूजेत देखील वापरली जाते. पण या सर्वांसोबतच, तुळशी तिच्या औषधी गुणधर्मांसाठी देखील ओळखली जाते. त्यात आढळणाऱ्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर, तुळशीमध्ये जीवनसत्त्वे, सोडियम, लोह, कॅल्शियम असे अनेक फायदेशीर घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ते सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का की तुळशीचे सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होण्यास देखील मदत होते. चला जाणून घेऊया तुळशीचे सेवन कसे करावे आणि किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी ते कसे फायदेशीर आहे.
किडनी स्टोनवर घरगुती उपाय
आजच्या काळात किडनी स्टोन खूप सामान्य मानले जाऊ शकते. याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे तुमचा आहार. किडनीमध्ये स्टोन झाल्यावर वेदना अचानक वाढते आणि ती असह्य होते. किडनी स्टोनच्या लक्षणांमध्ये खालच्या पाठ, पोट किंवा मूत्रमार्गात तीव्र वेदना समाविष्ट आहेत. त्याच वेळी, काही लोकांना उलट्या किंवा मळमळ, वारंवार लघवी होणे, थंडी वाजणे किंवा जास्त घाम येणे यासारख्या समस्या देखील असू शकतात.
जर मुतखड्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर त्याचा आकार वाढू शकतो. म्हणून, वेळेवर उपचार करणे खूप महत्वाचे आहे. दगड काढण्यासाठी औषधे घेण्यासोबतच शस्त्रक्रिया देखील एक पर्याय आहे. परंतु घरगुती उपचारांच्या मदतीने, मूत्रपिंडातील दगड विरघळवून मूत्रमार्गे बाहेर काढता येतात. तुळशीचा वापर मूत्रपिंडातील दगडांची समस्या दूर करण्यास देखील मदत करतो.
जर तुम्हाला मूत्रपिंडात दगडांची समस्या असेल तर तुम्ही तुळशीच्या चहाचे सेवन करू शकता. तुळशीच्या चहामध्ये अॅसिटिक अॅसिड आढळते, जे एक घटक आहे जे दगडांमुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत करू शकते. त्याच वेळी, हा घटक लहान मूत्रपिंडातील दगड विरघळण्यास मदत करू शकतो, म्हणजेच, जर तुमच्या दगडाचा आकार खूप मोठा नसेल तर ते विरघळण्यास आणि काढून टाकण्यास मदत करू शकतो. तुळशीचे अँटी-लिथियासिस गुणधर्म दगडांचा आकार तोडण्यास आणि आकुंचन करण्यास तसेच त्यांची निर्मिती रोखण्यास मदत करतात.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
दोन वेळा कॅन्सर, दोन्ही किडनी फेल अन् डायबिटिस.. तरीही कशी फिट आहे 80 वर्षांची ‘ही’ अभिनेत्री?

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री जीने आयुष्यात अनेक अडचणी येऊनही त्यावर मात केली आहे. या अभिनेत्रीला एकदा नाही दोनदा ब्रेस्ट कॅन्सर झाला. दोन्ही किडन्या फेल झाल्या. तरीही ही अभिनेत्री आज इतकी फिट कशी आहे. अरुणा ईरानी यांच्या जीवनाबद्दल आपण समजून घेणार आहोत.
किमो केला नव्हता
अरुणा ईरानी यांनी लहरे रेट्रोशी बातचीत करताना सांगितलंकी, त्यांना दोन वेळा ब्रेस्ट कॅन्सर झाला. पहिल्यांदा त्यांनी लंप हाताला जाणवल्यावर लगेच गाठ काढून दिली. पुन्हा कोविड दरम्यान त्यांना कॅन्सर झाला तेव्हा त्यांनी रेडियेशन घेतलं. अरुणा ईरानी यांनी म्हटलं की, त्या कोणत्याच आजाराशी झुंजत नाहीत. काही दुखापत झाली तर उपचार केले की झालं.
किडनी फेल तरीही फिट
एवढंच नव्हे तर अरुणा या अनेकदा आजारी पडल्या. एकदा त्या इतक्या आजारी होत्या की, त्या रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी त्यांच्या दोन्ही किडन्या डॅमेज झाल्याच सांगितलं. यानंतर त्यांनी कोणतीच प्रोसेस केली नाही किंवा औषध घेतली नाहीत. तसेच त्यांनी डायलिसिस करण्यासही नकार दिला. पण आजपर्यंत त्यांना याबाबत कोणताच त्रास झालेला नाही. एवढंच नव्हे तर त्यांना मधुमेह देखील आहे. हा मधुमेह अनुवंशिक असल्याच म्हटलं जात आहे. कुटुंबातील इतर लोकांना देखील याचा त्रास लवकर झाला पण त्यांना हा त्रास 60 मध्ये झाला.
चालणे महत्त्वाचे
अरुणा ईरानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, त्या दररोज सकाळी एक तास चालतात. त्या कुठेही असो त्यांचा वॉक हा कायम असतो. त्या योगा, मेडिटेशन, ध्यान, प्राणायाम सगळं आवर्जून करतात.
रात्रीचं जेवण घेत नाहीत
जेवणाबाबत अरुणा ईरानी यांनी सांगितलं की, त्या दिवसा वेळेत जेवण घेतात. तसेच त्यांचं जेवण बॅलेन्स असतं. ज्यामध्ये सलाड घेतात. तसेच एकाचवेळी पोटभर जेवून त्यांचा आहार थोडा हलका असतो. तसेच दुपारचं जेवण योग्य प्रकारे आणि पोटभर करतात. तसेच त्या फळं आणि सुकामेवा देखील खातात.
साताऱ्यातील पाटणमध्ये बसचा भीषण अपघात, विद्यार्थ्यांसह 30 जण जखमी जखमी, 4 जण गंभीर
Satara Bus Accident : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पाटण तालुक्यात जानुगडेवाडी येथे एसटी बसचा अपघात झाला आहे. समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हलला वाचवताना चालकाचा ताबा सुटून एसटी बस झाडाला धडकली. यामुळं अपघात झाला. या अपघातात एसटी बसमधील विद्यार्थ्यांसह 30 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
चार जण गंभीर जखमी, कराड येथे उपचारासाठी दाखल
जानूगडेवाडी नजीक एका धोकादायक वळणावर हा अपघात झाला आहे. एसटी बसच्या अपघातामध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. अपघातातील चार जण गंभीर जखमी असल्याने त्यांना कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pune Accident: कारची चावी तशीच राहिली अन् पुढे नको ते घडलं, पुण्यात 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक, पुण्यातील सदाशिव पेठेत काय घडलं?
आणखी वाचा


