Monday, July 6, 2026
Home Blog Page 111

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या: SIT तपास सुरू

0
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या: SIT तपास सुरू

फलटण प्रतिनिधी :- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात SIT गठीत करण्यात आली आहे. या SITचे नेतृत्व IPS अधिकारी तेजस्वी सातपुते करणार आहेत. SITला तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

तेजस्वी सातपुते हे 2012 साली आयपीएस अधिकारी झाले असून त्यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करता, या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

फलटण प्रकरणात काही राजकीय नावांचा समावेश असल्यामुळे विरोधकांनी SIT चौकशी करण्याची मागणी केली होती. सातारा पोलिसांकडे तपास झाल्यास दबाव निर्माण होऊ शकतो, म्हणून SIT चौकशीची मागणी करण्यात आली होती.

23 ऑक्टोबर रोजी फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने हातावर सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि सातारा जिल्हा कारागृहात हलवण्यात आले आहे.

महिला डॉक्टरने तिच्यावर वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस यांचा दबाव असल्याची तक्रार केली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी खासदारांच्या दोन पीएंनी दबाव टाकल्याचा उल्लेख तिने केला होता. मात्र तिच्या तक्रारीकडे पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. यामुळे ती शेवटी आत्महत्येस प्रवृत्त झाली.

राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजनेसाठी स्थापन समितीत अविनाश (राजाभाऊ) शिरसाठ यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड

0
राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजनेसाठी स्थापन समितीत अविनाश (राजाभाऊ) शिरसाठ यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड

फलटण प्रतिनिधी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली “राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना” राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) हे सदस्य सचिव असून, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका उपायुक्त, सांस्कृतिक संचालनालयाचे सहाय्यक संचालक आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.

या समितीत अशासकीय सदस्य म्हणून लोकप्रिय जेष्ठ निर्माता आणि निवेदक अविनाश उर्फ राजाभाऊ शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे. ते गेल्या २१ वर्षांपासून आपल्या ऑर्केस्ट्रा संचाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात ३००० हून अधिक कार्यक्रम सादर करत आहेत. आपल्या निर्मिती आणि हृद्यस्पर्शी निवेदनातून त्यांनी लोकमनोरंजनासोबत लोकप्रबोधन घडवून शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची समितीत निवड करण्यात आली आहे.

कोंढव्यात गोळीबारात तरुण ठार — टोळीयुद्धाची शक्यता पोलिस तपासात

0
कोंढव्यात गोळीबारात तरुण ठार — टोळीयुद्धाची शक्यता पोलिस तपासात

पुणे :- कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात आज दुपारी झालेल्या गोळीबारात गणेश काळे (वय अंदाजे ३०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी गणेश काळे याच्यावर सलग सहा गोळ्या झाडून आणि त्यानंतर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

मृत गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दत्ता काळे हा आयुष कोमकर हत्येप्रकरणातील आरोपी असून सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे टोळीयुद्धाची पार्श्वभूमी असल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे तसेच कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

डीसीपी शिंदे यांनी सांगितले, “गणेश काळे या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे CCTV फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी दहा पथके तयार करण्यात आली आहेत. एक दुचाकी घटनास्थळी सापडली असून तिच्या आधारे तपास सुरू आहे.”

गणेश काळे हा येवलेवाडी परिसरात राहणारा रिक्षाचालक असून त्याच्यावर पूर्वी एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या वनराज आंदेकर हत्येच्या पार्श्वभूमीवर ही घटना त्याच टोळीयुद्धाचा भाग असू शकते, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा — फलटणमध्ये कँडल मार्चने जनतेचा आवाज बुलंद

0
डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा — फलटणमध्ये कँडल मार्चने जनतेचा आवाज बुलंद

फलटण प्रतिनिधी  : डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, या मागणीसाठी फलटण शहरात नागरिक व सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य कँडल मार्च काढण्यात आला.

या शांततामय मोर्चात विविध क्षेत्रातील नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी, पत्रकार, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संध्याकाळी महात्मा गांधी चौकातून या कँडल मार्चला सुरुवात झाली. “डॉ. संपदाला न्याय मिळालाच पाहिजे!” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. सहभागी नागरिकांनी मेणबत्त्या पेटवून डॉ. मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

मोर्चाच्या शेवटी दोषींवर कठोर कारवाई, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना, तसेच डॉक्टर समुदायावर वाढत असलेल्या ताणतणावाच्या घटनांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

या कँडल मार्चचे आयोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी केले होते.
यावेळी आमदार सचिन पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिन सूर्यवंशी, सौ. प्रतिभा चेतन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार आणि स्थानिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुकीत शिवसैनिकांचा अपमान सहन केला जाणार नाही, जशास तसं उत्तर देऊ, शंभूराज देसाईंचा इशारा

0



Shamburaj Desai : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व नगरपालिकेच्या निवडणुकंमध्ये शिवसैनिकांचा कुठेही अपमान सहन केला जाणार नाही. शिवसेनेला कुठेही कमी लेखले जाईल असे निदर्शनास आले तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. महायुती म्हणून नक्कीच इतरही दोन पक्षाचा सन्मान केला जाईल. मात्र ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेला व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला तर ते सहन केले जाणार नसल्याचा गंभीर इशारा देसाई यांनी दिला आहे. दरम्यान, पुढच्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. 31 जानेवारी 2026 च्या आधी निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. 

कार्यकर्त्यांना दिली जाणारी अपमान जनक वागणुकीबाबत शंभूराज देसाई आक्रमक

सातारा जिल्ह्यातल्या महायुतीच्या लोकप्रतिनिधींना राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी इशारा दिला आहे. महायुतीमध्येच शंभूराज देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली जाणारी अपमान जनक वागणुकीबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी काळात पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्ष्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांनी दौरे सुरु करुन चाचपणी देखील सुरु केली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग देखील बांदलं आहे. याच पार्श्भूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होणार की स्वंत्र लडणार हे पाहणं देखील महत्वाचं ठारणार आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी केलेलं वक्तव्य यमहत्वाचं मानलं जात आहे. 

फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण!  फलटण शहरात एसआयटीचे अधिकारी दाखल 

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केलेली आहे. या एसआयटीच्या प्रमुख अधिकारी आयपीएस तेजस्विनी सातपुते या फलटणमध्ये स्वतः दाखल झाल्या आहेत.  त्या स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत असे शंभूराज देसाई म्हणाले. या प्रकरणांमध्ये जे जे कोणी दोष असतील ते प्रत्येक घटना प्रत्येक व्यक्तीची या संदर्भातली असणारी तपासणी केली जाईल. त्यामुळं कोणाचीही गय केली जाणार नाही असा खुलासा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला.  

आणखी वाचा



Source link

फलटण डॉक्टर प्रकरणी SIT स्थापन, IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात तपास होणार

0



मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश या एसआयटीला देण्यात आले आहेत.

तेजस्वी सातपुते या 2012 सालच्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेता या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा आहे. 

Satara Doctor Suicide News : एसआयटी चौकशीची मागणी मान्य

फलटण प्रकरणात अनेक राजकीय नावांचा समावेश असल्याने, त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली. सातारा पोलिसांनी याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो, त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात तपास करण्यात येणार आहे. 

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरने 23 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. त्यावेळी तिने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचं समोर आलं. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप करण्यात आला. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना फलटण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यो दोघांचीही सातारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Phaltan Doctor Case : रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप

महिला डॉक्टरने तिच्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याची तक्रार केली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी खासदारांच्या दोन पीएंनी दबाव टाकल्याचा उल्लेख तिने तक्रारीत केला होता. मात्र तिच्या तक्रारीकडे पोलिसांनी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळेच शेवटी तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे नाव घेतलं. फलटणमधील अशा अनेक घटनांमागे निंबाळकर आणि त्यांच्या लोकांचा हात असल्याचा आरोप करत अंधारेंनी काही पुरावेही समोर आणले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

फलटणमध्ये भाडेवाढीचा वाद पेटला! दोन दिवस गाळे बंद; शहर बंदची चेतावणी

0
फलटणमध्ये भाडेवाढीचा वाद पेटला! दोन दिवस गाळे बंद; शहर बंदची चेतावणी

फलटण प्रतिनिधी :- फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे भाडेवाढीविरोधात सुरू असलेले साखळी उपोषण आज १९ व्या दिवशी पोहोचले असून, प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने गाळाधारकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील दोन दिवस सर्व गाळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तरीही न्याय मिळाला नाही तर संपूर्ण फलटण शहर बंद करण्याचा इशारा फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम यांनी दिला आहे.

अधिकारी गृहासमोर गेल्या १९ दिवसांपासून गाळाधारक संविधानिक मार्गाने उपोषण करत आहेत. ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत आंदोलन सुरू ठेवणाऱ्या गाळाधारकांच्या मागण्यांकडे तहसीलदार, प्रांताधिकारी आणि बाजार समिती प्रशासन यांनी अद्याप दुर्लक्ष केल्याची खंत निकम यांनी व्यक्त केली.

निकम म्हणाले, “भाडेवाढ योग्य असल्याचे सांगणारे अधिकारी बायलॉज दाखवू शकत नाहीत. जीएसटी लागू नसतानाही तो आकारला जात आहे. इतर ठिकाणी बाजार समिती भुईभाडे भरते, मात्र फलटणमध्ये हे ओझे गाळाधारकांवर टाकले आहे.”

याचबरोबर त्यांनी बाजार समितीवर गंभीर आरोप करत सांगितले की, “गाळाधारकांची चर्चा घेऊन सह्या घेतल्या आणि त्या सह्यांचा आधार घेत भाडेवाढीचे प्रोसेसिंग केले. म्हणजेच सह्या फसवून घेतल्या गेल्या आहेत.” याबाबत संबंधित तक्रारी प्रशासनाकडे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले..

EPFO: 10 वर्षांच्या नोकरीनंतर आपण पेन्शनसाठी पात्र ठरतो का? 99 टक्के कर्मचाऱ्यांना माहित नाही हा नियम, दर महिन्याला…

0
EPFO: 10 वर्षांच्या नोकरीनंतर आपण पेन्शनसाठी पात्र ठरतो का? 99 टक्के कर्मचाऱ्यांना माहित नाही हा नियम, दर महिन्याला…


EPFO Rules about pension: पगारदार वर्गासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ही केवळ बचत योजना नसून भविष्य सुरक्षित करण्याचा एक पर्याय आहे. दरमहा तुमच्या पगारातून थोडीशी रक्कम कापली जाते आणि तुमच्या कंपनीकडून समान भाग या निधीमध्ये जमा केला जातो. बहुतेक लोक पीएफला एकरकमी रक्कम मानतात जी गरज पडल्यास काढता येते. परंतु या योगदानाचा आणखी एक आणि कदाचित त्याहूनही महत्त्वाचा भाग कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जातो.

Add Zee News as a Preferred Source

EPS म्हणजे निवृत्तीनंतर तुम्हाला निश्चित मासिक पेन्शनची हमी. परंतु सध्याच्या काळात लोक सतत नोकरी बदल असतात. अनेकदा, 10 ते 12 वर्षं काम केल्यानंतर, ते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा इतर काही कारणास्तव नोकरी सोडतात. यावेळी सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे त्या 10-12 वर्षांत पेन्शन फंडात जमा झालेल्या पैशाचं काय होणाप? ते वाया जाणार की तुम्हाला त्याचा फायदा होणार?

काय आहे EPFO चा नियम?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) नियम या बाबतीत अगदी स्पष्ट आहेत. तुमची मासिक पेन्शन पात्रता किमान 10 वर्षांच्या सेवा कालावधीवर अवलंबून असते. जर तुमची एकूण सेवा (एक किंवा अधिक कंपन्यांसह) 10 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला मासिक पेन्शन मिळणार नाही. तथापि, एकदा तुम्ही 10 वर्षांचा टप्पा ओलांडला की, तुम्ही पेन्शनसाठी पात्र ठरता.

समजा तुम्ही 11 वर्षं काम केलं आणि नंतर नोकरी सोडली तर ईपीएफओच्या नियमांनुसार, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात. तुमच्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळातील सेवेमुळे तुमचं पेन्शन ‘लॉक’ झालं आहे. याचा अर्थ असा नाही की 11 वर्षांनंतर नोकरी सोडल्यानंतर तुम्हाला लगेच पेन्शन मिळू लागेल. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचा हक्क सुरक्षित केला आहे.

नियमांनुसार, किमान 10 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर, तुम्ही 58 वर्षांचे झाल्यावर तुमच्या मासिक पेन्शनसाठी अर्ज करू शकता. याचा अर्थ असा की तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी नोकरी सोडली तरीही, तुम्हाला तुमची पेन्शन 58 वर्षं पूर्ण केल्यानंतरच मिळेल. 

हे पैसे वितरित कसे केले जातात?

नियमांनुसार, कर्मचारी त्याच्या पगाराच्या 12 टक्के ईपीएफ फंडात योगदान देतो. त्यानंतर तुमची कंपनी समान रकमेचं योगदान देते. हे पैसे दोन भागांमध्ये विभागले जातात. या योगदानापैकी 8.33 टक्के तुमच्या कर्मचारी पेन्शन योजनेत (ईपीएस) जातात. उर्वरित 3.67 टक्के तुमच्या मुख्य ईपीएफ खात्यात जमा केले जातात.

ईपीएफचा भाग हा तुमचा प्राथमिक बचत आहे, जो तुम्ही घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसारख्या गरजांसाठी नियमांनुसार काढू शकता. तथापि, ईपीएसमध्ये 8.33 टक्के योगदान निवृत्तीनंतर तुमच्या मासिक पेन्शनसाठी पूर्णपणे राखीव आहे. 10 वर्षांची नोकरी नियम या ईपीएस फंडाला लागू होतो.

तुमचे मासिक पेन्शन कसे ठरवले जाते?

जर तुम्ही 10 वर्षांच्या सेवेनंतर 58 व्या वर्षी पेन्शनसाठी अर्ज केला तर तुम्हाला दरमहा किती रक्कम मिळेल? यासाठी EPFO ​​एक निश्चित सूत्र वापरते.

मासिक पेन्शन = (पेन्शनपात्र पगार × पेन्शनपात्र सेवा) / ७०

पेन्शनपात्र सेवा: ही तुमच्या EPS खात्यात योगदान दिलेल्या एकूण वर्षांची संख्या आहे (उदा., 10 वर्षं, 15 वर्षे किंवा 20 वर्षे).

पेन्शनपात्र पगार: हा तुमचा अंतिम पगार नाही. हे तुमच्या गेल्या 60 महिन्यांच्या (म्हणजे 5 वर्षे) सेवेच्या सरासरी पगारावरून ठरवले जाते. तथापि, या पगारावर कमाल मर्यादा आहे, जी सध्या दरमहा 15 हजार रुपये आहे.

उदाहरण द्यायचं झाल्यास समजा तुमची ‘पेन्शनपात्र सेवा’ 10 वर्षं आहे आणि तुमचा ‘पेन्शनपात्र पगार’ (गेल्या 60 महिन्यांचा सरासरी) 15 हजार आहे.

मग तुमचे पेन्शन असे असेल: (15000× 10) / 70= 1,50,000/ 70 = 2143 रुपये (अंदाजे).

याचा अर्थ असा की तुमच्या 10 वर्षांच्या सेवेवर आधारित, तुम्हाला वयाच्या 58 व्या वर्षी 2143 रुपये मासिक पेन्शन मिळेल. जर तुम्ही हीच सेवा 25 वर्षे केली असती, तर तुमचे पेन्शन (15,000 x 25) / 70= 5357 रुपये प्रति महिना झाले असते.





Source link

फलटण महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे

0
फलटण महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे

मुंबई :  फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणाची चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत होणार आहे.

काही दिवसांपूर्वी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त झाला. डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट आणि वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिसांकडून झालेल्या दबावाच्या आरोपांमुळे या प्रकरणाने वादळ निर्माण केले होते.

या आत्महत्येत भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे दोन पीए आणि पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिला डॉक्टरने आपल्या आत्महत्येपूर्वी बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा दावा केला होता. तसेच पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव आणला गेला असल्याचेही नमूद केले होते.

विरोधकांनी या प्रकरणात सातत्याने एसआयटी चौकशीची मागणी केली होती. स्थानिक पोलिसांवर दबाव येऊ शकतो, असा दावा करत स्वतंत्र तपास पथकाकडे चौकशी सोपवावी, अशी मागणी करण्यात आली होती.

शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर थेट आरोप करत हे प्रकरण आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला होता. अखेर सरकारने त्यांच्या मागणीप्रमाणे महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही त्या भगिनीचा आदर करतो, मात्र या प्रकरणातील इतर दोन आरोपींसोबतचे तिचे काही चॅट्स समोर आले, तर एक गंभीर त्रिकोणी संबंध प्रकरण समोर येईल. त्यामुळे पोलीस शांत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

फलटणमध्ये विकासाच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी

0
फलटणमध्ये विकासाच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी

फलटण प्रतिनिधी : शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा रविवार, दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५ वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्र. २, पाचबत्ती चौक येथे नव्याने उभारलेल्या शाळा इमारतीचे उदघाटन तसेच सभापती निवास ते संतोष वेलणकर घर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

याचबरोबर नाबार्ड योजनेअंतर्गत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या बाणगंगा नदीवरील दत्तघाट बॉक्सपुल आणि रिटेनिंग वॉलचे उदघाटनही यावेळी होणार आहे.

या सर्व कामांचे उदघाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार दीपकराव चव्हाण भूषविणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रभाग क्रमांक ०६ चे माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी दिली.

उदघाटन आणि भूमिपूजन सोहळ्यानंतर शनिनगर बाग, फलटण येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून फलटण नगर परिषदेची सत्ता रामराजे यांच्या विचारधारेवर चालत आली असून, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ घातलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रामराजे काय भाष्य करणार याकडे फलटणवासीयांचे लक्ष लागले आहे.

या कार्यक्रमाला फलटण शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर आणि माजी नगरसेविका सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी केले आहे.