Sunday, July 5, 2026
Home Blog Page 110

महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली अन् दुग्धाभिषेक केला; रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर

0



सातारा : आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे मास्टरमाईंडच्या सांगण्यावरुन करण्यात आले आहेत, मी नार्को टेस्टला तयार आहे, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तयार व्हावं नाहीतर निंबाळकर नाही असं जाहीर करावं असं आव्हान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी (Ranjeetsinh Nimbalkar) रामराजे निंबाळकरांना (Ramraje Naik Nimbalkar) दिलं. मला गोळी घातली तरी चाललं असतं, पण किती बदनामी करता? असा सवालही त्यांनी विचारला. फटलणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर (Phaltan Doctor Suicide)सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप केले. त्याला रणजितसिंह निंबाळकरांनी जाहीर सभेतून उत्तर दिलं.

यावेळी उपस्थित महिलांनी रणजितसिंह निंबाळकरांचे पाय धुतले, त्यांची दृष्ट काढली आणि नंतर त्यांचे दुग्धाभिषेक केलं. या कृत्याने भारावलेल्या रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. तालुक्यातील 60 टक्के जनता आपल्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांना कोणत्याही रिपोर्टची गरज नव्हती. मी त्यांना मातीसाठी भेटलो, काही वैयक्तिक मागितले नाही. चॅलेंज दिल म्हणून मी बोलत आहे. चॅलेंज कुणाला देताय? विधान परिषदेच्या आमदारामुळे तालुक्याची बदनामी झाली. शेर को धमका सकते हो, डरा नहीं सकते. मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. माझ्यावर आरोप करणारे तयार आहेत का?

ज्या मुकादमावर आम्ही गुन्हा नोंद केला, त्याचे मेडिकल हे संपदा मुंडे यांनी केलं नाही. आता तो सगळ्यांना सांगतोय की त्याचे मेडिकल मुंडेंनी केलं म्हणून असा आरोप निंबाळकरांनी केला.

Ranjeetsinh Nimbalkar On Ramraje Nimbalkar : मास्टरमाईंडच्या सांगण्यावरुन आरोप

रणजीतसिंह नाईक निंबाळकर काही महिन्यांपूर्वी चांगला होता. मग आता काय झालं? आपण मनोमिलन करू असं म्हणत रामराजे यांचे 50 फोन आले. सुषमा ताईंनी 277 केसेस असल्याचं सांगितले. ताईंचा दोष नाही. त्यांनी मास्टरमाईंडच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

माझा खून झाला असता तरी चाललं असतं, पण मास्टरमाईंडने मला लोकसभेत तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केले. आगवणे यांच्या मुलीला आत्महत्या करण्याचं नाटक करायला लावलं आणि स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांना अॅडमिट केलं. मला गोळी घातली असती तरी चाललं असत, पण किती बदनाम करायचं? असा प्रश्न निंबाळकरांनी विचारला.

तुम्ही म्हणता पुतळा बांधणार, आम्ही बांधू लागतो. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, साईबाई यांचे पुतळे बांधले का? पण हे मगरमच्छचे अश्रू आहेत. त्या कुटुंबीयांबद्दल यांना कोणतीही सहानुभूती नाही असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

Ranjeetsinh Nimbalkar Phaltan Speech : तीन भावांनी फलटणचे नाव खराब केलं

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, बहिणीच्या चारित्र्यावर संशय नको म्हणून मी बोललो नाही. तीन-चार दिवस झालं काहीच बोललो नाही म्हणून मी म्हटलं की आपण बोललं पाहिजे. नाहीतर माझ्यावर संशय वाढायचा. तिन्ही भावांनी फलटणचे नाव खराब केलं. आम्ही बापजाद्यांच्या पैशावर जगलो नाही. या तिघांनाही बोलवा आणि आमच्या चौघांचीही नार्को टेस्ट करा. तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल तो डॉक्टर. सगळ्यांची लाईव्ह डिटेक्टर चाचणी करा, पैसे मी भरायला तयार आहे. मेहबूब शेख आणि सुषमा अंधारे यांनाही बोलवा. मी जर दोषी असेन तर तुरुंगात जाईन.

Ranjeetsinh Nimbalkar Speech : पीडितेला न्याय मिळवून देणार

माझं जाहीर आमंत्रण आहे, कधी येताय? जर हे आले नाहीतर काय करायचं? आज दिलेलं आव्हान स्वीकारा, नाहीतर नाईक निंबाळकर नाही म्हणून सांगा असं आव्हान रणजितसिंह निबाळकर यांनी दिलं. माफीच्या आडून जर पुन्हा आरोप झाले तर मी तुम्हाला 277 केसेस करून दाखवतो. 78 व्या वर्षी मी त्यांना जेलमध्ये बसवणार नाही. त्यांना चक्की पिसिंग करून देणार नाही. पीडितेला न्याय मिळाला पाहिजे ही माझी कालही भूमिका होती आणि आजही आहे. हीच भूमिका उद्याही असणार आहे असंही ते म्हणाले

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

फलटण येथील काकडे परिवारातील सून व निंबुतची कन्या सुनंदा रमेश काकडे यांचे हृदयविकाराने निधन

0
फलटण येथील काकडे परिवारातील सून व निंबुतची कन्या सुनंदा रमेश काकडे यांचे हृदयविकाराने निधन

आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुम्हीची येत राहिल.. भावपूर्ण श्रद्धांजली.

निंबुत (ता. बारामती) – निंबुत गावच्या बबईबाई बनसोडे यांच्या प्रथम कन्या आणि निंबुत गावाचे माजी शिक्षक भिमराव बनसोडे तसेच सरपंच राजू बनसोडे यांची थोरली बहीण, फलटण येथील काकडे परिवारातील सून आणि सध्या पुणे (धायरी) येथे वास्तव्यास असलेल्या कालकथित सुनंदा रमेश काकडे यांचे रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ३ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात तिन्ही मुले विशाल, प्रविण आणि अमोल, तिन्ही सुना निलम, वैशाली आणि स्नेहा तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम निंबुत येथे मंगळवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार आहे. त्यानंतर पुण्यअनुमोदन कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता निंबुत येथील राजगृह या निवासस्थानी होईल.

कुटुंबातील सर्व  नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना उपस्थित राहावे

साहस टाईम्स परिवार तर्फे विनम्र अभिवादन

रुपाली चाकणकरांबद्दल अजित पवार नाराज, पण सुनील तटकरेंना त्यांना पदावर ठेवायचंय: सुषमा अंधारे

0



Phaltan Doctor girl suicide news: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास समिती (एसआयटी) नेमल्याचे वृत्त खोटे आहे. राज्य सरकारने याप्रकरणात केवळ देरखेख करण्यासाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejasvi Satpute) यांची नेमणूक केली आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केले. सुषमा अंधारे सोमवारी फलटण पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणाची माहिती घेणार आहेत. तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Satara News)

मला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत कोणताही वैयक्तिक आकस नाही. ते आज संध्याकाळी सभा घेऊन उत्तर देणार आहेत. पण त्याऐवजी त्यांनी माझ्यासोबत पोलीस ठाण्यात येऊन आरोपपत्र दाखल करण्यास मदत करावी. मी तुमची बहीण आहे, तुमच्या गावची पाहुणी आहे. तुमच्या सभ्यपणावर माझा विश्वास आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. यावेळी सुषमा अंधारे यांनी डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आल्याचाही दावा फेटाळून लावला. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेमणुकीचे पत्र वाचा. त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, याप्रकरणात तपासावर देखरेख ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल, असे म्हटले आहे. काल भाजपचा एक बोलघेवडा नेता मला म्हणत होता, अहो तुम्हाला कळत नाही. पण माझ्याकडे सरकारने केलेल्या नियुक्तीचे पत्र आहे. खरंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आम्ही त्यासाठी न्यायालयात रिट याचिका दाखल करणार आहोत. हे आत्महत्या प्रकरणात राजकारणापासून प्रभावमुक्त होऊ शकत नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. यावर आता भाजपचे नेते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

मी फलटण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेली नाही. माझी भूमिका मी आधी मांडली आहे. जे पत्र लिहले आहे ते सुसाईड नोट म्हणून ग्राह्य धरण्यात यावे. पीडितेच्या नातेवाईक यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. याप्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून करावी. जेणेकरुन याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.

Rupali Chakankar news: रुपाली चाकणकरांवर मला बोलायचं नाही: सुषमा अंधारे

फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतील रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या वक्तव्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनीही फारकत घेतली होती. सुषमा अंधारे यांनी याबाबत मोजक्या शब्दांत भाष्य केले. रुपाली चाकणकर यांच्यावर आम्हाला बोलायचे नाही. अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पण सुनील तटकरे यांना चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवायचे आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

Ranjitsingh Naik Nimbalkar: फलटण डॉक्टर तरुणी मृत्यूप्रकरणावर प्रत्युत्तर देण्यासाठी आज रणजितसिंह नाईक निंबाळकरांची सभा

फलटणधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले होते. या आरोपांचे खंडन करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटण नगरीमध्ये सभा होत आहे . आज संध्याकाळी सहा वाजता फलटणी मधील ऐतिहासिक अशा गजानन चौकात ही सभा पार पडणार आहे. या सभेत रणजीतसिंह नाईक निंबाळकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. 

Chhatrapati Sambhajinagar news: संभाजीनगरमध्ये डॉक्टरांचं काम बंद आंदोलन

फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून मार्ड संघटना आक्रमक झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मार्ड डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. डॉ संपदा मुंडे यांना न्याय द्या या मागणीसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. एकच वेळी वेगवेगळ्या विभागातील डॉक्टर संपावर गेल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा



Source link

हैदराबादला जाणाऱ्या बसचा अत्यंत भयानक अपघात! 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू; 20 पेक्षा अधिक जखमी

0
हैदराबादला जाणाऱ्या बसचा अत्यंत भयानक अपघात! 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू; 20 पेक्षा अधिक जखमी



तेलंगणातील रंगारेड्डी येथून एका भीषण रस्ते अपघात झाला आहे. या अपघातात 20 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. 



Source link

शेतकरी पुन्हा कर्जबाजारी का होतो?: शेतकरी आत्महत्या का करतो, एवढे अनर्थ कोणत्या कायद्याने केले? वाचा अमर हबीबांचा लेख

0
शेतकरी पुन्हा कर्जबाजारी का होतो?:  शेतकरी आत्महत्या का करतो, एवढे अनर्थ कोणत्या कायद्याने केले? वाचा अमर हबीबांचा लेख


  • Marathi News
  • Opinion
  • Why Do Farmers Fall Into Debt Again?: Why Do Farmers Commit Suicide, Which Law Caused Such A Disaster? Read Amar Habib’s Article

23 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

शेतकरी पुन्हा पुन्हा कर्जबाजारी का होतो? या प्रश्नाचे उत्तरही तेच आहे जे शेतकरी आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे आहे. शेतकऱ्यांच्या दररोज आत्महत्या होतात, त्याची तुम्ही दखल घेतली नाही. असो, कर्जमाफीच्या निमित्ताने का होईना त्याचा विचार करायचे म्हणतात. हेही नसे थोडके. शेतकरी पुन्हा पुन्हा कर्जबाजारी होतो, याला शेतकरी कारणीभूत नसून खुद्द सरकार कारणीभूत आहे हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. कमाल शेतजमीन धारणा कायद्यामुळे जमिनीचे विखंडन झाये आहे. आज सरासरी धारणा (होल्डिंग) 2 एकर पेक्षा कमी झाली आहे. हे क्षेत्र आजच्या शेती पद्धतीत ‘अन-इकॉनॉमिक] मानले जाते. हा सीलिंगचा कायदा कालबाह्य झाला आहे. तो आणला होता सरकारने, राबवविला सरकारने, रद्द कोण करणार? सरकारलाच रद्द करावा लागेल. हा कायदा रद्द करणे राज्य सरकारच्या अधिकारात आहे. केवळ सीलिंग कायदाच नव्हे, त्याच्या जोडीला आवश्यक वस्तू कायदा ही तेवढाच राक्षसी आहे.

आवश्यक वस्तू कायदा

आवश्यक वस्तू कायदा- 1955 हा कायदा जनतेला ‘आवश्यक वस्तू’ वाजवी दरात मिळाव्यात म्हणून आणला, असे सरकार तर्फे सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्षात त्याचा लाभ गोरगरिबांना कधीच मिळाला नाही. उलट या कायद्याचा लाभ उठवून पुढारी व अधिकारी मात्र गब्बर झाले.

आवश्यक वस्तू कायद्याचा वापर करून शेतमालाच्या किंमती पाडण्यात आल्या, या कायद्याच्या धास्तीने साठवणुकीच्या व्यवस्था निर्माण होऊ शकल्या नाहीत. या कायद्याचा आधार घेऊन नोकरशाहीने भरपूर भ्रष्टाचार केला, कृत्रिम टंचाईमुळे महागाई वाढली, बाजाराचे ‘मागणी आणि पुरवठ्याचे’ तत्व पायदळी तुडवले केले, बचत न राहिल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागले, म्हणून शेतकरी वारंवार कर्जबाजारी होतो. एवढे अनर्थ एका कायद्याने केले. आवश्यक वस्तू कायद्याने अनेक अनर्थ केले आहेत. त्यांचा आढावा पुढे घेण्यात आला आहे.

1. शेतमालाच्या किंमतींवर नियंत्रण-

सरकार या कायद्याखाली धान्य, डाळी, तेलबिया, साखर इत्यादी वस्तूंवर साठवणूक, वाहतूक, दर नियंत्रण यासाठी सक्ती करू शकते. त्यामुळे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांकडून योग्य दराने खरेदी करत नाहीत. परिणामत: शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य बाजारभाव मिळत नाही आणि तोटा होतो. वारंवार तोटा होत राहिल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागले.

2. गुंतवणुक आणि साठवणुकीवर प्रतिकूल परिणाम-

उद्योगपतींना भीती वाटते की, सरकार केव्हाही साठा “जप्त” करू शकते. त्यामुळे कोल्ड स्टोरेज, वेअरहाउसिंग आणि अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करीत नाहीत. परिणामत: कृषी विपणन साखळी नीटपणे बनू शकली नाही आणि शेतमालाची नासाडी वाढली. शेती व्यावसाय अडचणीत आला.

3. बाजारात अनिश्चितता आणि भ्रष्टाचार-

आवश्यक वस्तू कायद्यामुळे सरकारी अधिकारी वर्गाला साठेबाजी विरोधी व अन्य बाबतीत कारवाईचे अमर्याद अधिकार मिळाले आहेत, हे अधिकार मनमानी, भ्रष्टाचार आणि दडपशाहीसाठी वापरले गेले. परिणामत: प्रामाणिक व्यापारी व शेतकरी दोघेही त्रस्त झाले.

4. कृत्रिम तुटवडा आणि महागाई-

जेव्हा सरकार बंधन घालते तेव्हा व्यापारी आपला माल बाजारात आणत नाहीत. पुरवठा कमी होतो, आणि कृत्रिम टंचाईतून कृत्रिम महागाई निर्माण होते. त्यामुळे जनतेला वस्तू महाग मिळतात — ज्या वस्तू ‘स्वस्त मिळाव्यात’ म्हणून कायदा बनवला गेला, असे सरकार म्हणत होते, त्याच कायद्यामुळे महागाई वाढू लागली. ही विपरीत परिस्थिती अनेकदा दिसून आली तरी कोणतेच सरकार त्याबाबत पुनर्विचार करीत नाही..

5. कृषी बाजार व्यवस्थेतील हस्तक्षेप व विकृती

बाजारात मागणी-पुरवठ्याच्या नैसर्गिक संतुलनावर सरकारी हस्तक्षेपामुळे दुष्परिणाम होतो. त्यामुळे शेतकरी उत्पादनाच्या योजना आखू शकत नाहीत — कोणते पीक पेरावे, किती उत्पादन घ्यावे, याबाबत अनिश्चितता वाढते. हा कायदा लोकहितासाठी आहे, असा सरकारचा दावा असला तरी दीर्घकाळात त्याने शेतकऱ्यांच्या व्यावसाय स्वातंत्र्यावर, कृषी बाजारावर आणि गुंतवणुकीवर विपरीत परिणाम केला आहे, असे दिसून येते.

_देशाचे नुकसान करणारा कायदा_

आवश्यक वस्तू कायद्याने देशाला दुबळे बनवले आहे. या कायद्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली.

1) कायम दुरुपयोग- या कायद्याने सरकारला मिळालेल्या अधिकाराचा सातत्याने दुरुपयोग केला. ज्या कायद्याचा कायम दुरुपयोगच झाला असेल तर असा कायदा का कायम ठेवायचा? या दुरुपयोगाने देश क्षीण झाला आहे.

2) एक चाक रुतले- या कायद्याचा सर्वात जास्त फटका शेतकाऱ्यांना बसला. वाजवी भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्याकडे ‘बचत’ राहिली नाही. बचत न राहिल्यामुळे तो ‘ग्राहक’ बनू शकला नाही. शेतकाऱ्यांची क्रयशक्ती क्षीण राहिल्यामुळे, देशी बाजार पेठेत मागणी कमी राहिली. मोठा ग्राहक वर्ग क्रयशक्ती अभावी बाजारापासून दूर राहिला. त्याचा भारतीय उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला. भारतीय अर्थ व्यवस्थेचे एक चाक कायम रुतलेले राहिले म्हणून विकासाचा वेग मंदावला.

3) मूल्यवृद्धीपासून वंचित- आवश्यक वस्तू कायद्यातील बंधनांमुळे ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग निर्माण झाले नाहीत. त्यामुळे शेतीमालाची नासाडी होत राहिली. शेतमालावर प्रक्रिया केल्याने होणाऱ्या मूल्यवृद्धीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकला नाही.

4) किसानपुत्रांची बेरोजगारी- आवश्यक वस्तू कायद्याने ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात मोठा अडथळा निर्माण केला. त्यामुळे किसानपुत्रांना रोजगार मिळू शकले नाही. ग्रामीण भागातील लोकांना सक्तीचे स्थलांतर करावे लागले. या स्थलांतराने शहरीकरणाचा नवा गंभीर प्रश्न निर्माण झाला. स्थलांतरित किसानपुत्रांमुळे शहरी व्यवस्थांवर नवे ताण आले.

5) भ्रष्टाचाराचे गटार- हा कायदा भ्रष्टाचाराचे गटार मानला जातो. या कायद्याने सरकारी अधिकाऱ्यांना दिलेले अवाजवी अधिकार व लायसन्स, परमिट, कोटा या पद्धतीच्या वापरामुळे आपल्या देशात फार मोठ्या प्रमाणात प्रशासकीय भ्रष्टाचार माजला. लोकपाल नेमल्याने भ्रष्टाचार कमी होणार नाही पण आवश्यक वस्तू कायदा रद्द केला तर या देशातील 80 टक्के भ्रष्टाचार नक्की संपेल. ही गटारगंगा दिल्ली पासून गल्ली पर्यंत वाहात आली आहे.

6) सरकार पोषित कारखानदारी- आवश्यक वस्तू कायद्यातील लायसन्स, परमिट, कोटा या पद्धतीने सरकार पोषित कारखानदारी निर्माण केली. या पद्धतीने राजकर्त्यांनी आपल्या बगलबच्च्यांना पोसले. बगलबच्या कारखानदारांनी देश काबीज केला आहे. कालपर्यंत वाटत होते की राज्यकर्ते कारखानदारांना संरक्षण देतात, आज कारखानदार जणू देश चालवत आहेत असे चित्र निर्माण झाले आहे.

7) राजकारणी उच्छाद- आवश्यक वस्तू कायद्याचे लाभार्थी असलेल्या लोकांनी आज राजकारणात उच्छाद मांडला आहे. सरकारी लायसन्स कोटा परमीत यांचा लाभ न घेतलेला राजकारणी क्वचित दिसेल. या उच्छादाला आपल्या देशातील निवडणूक पद्धतीने हातभार लावला आहे.

एकंदरीत, शेतकरी पुन्हा पुन्हा कर्जबाजारी होण्याचे मूळ कारण सीलिंग, आवश्यक वस्तू या शेतकरीविरोधी कायद्यात आहे. आवश्यक वस्तू कायद्याने एका बाजूला अर्थव्यवस्था उद्धवस्त केली, शेतकाऱ्यांना उध्वस्त केले व त्याच बरोबर देशाचे मोठे नुकसानही केले. एवढे अनर्थ एका कायद्याने केले! असे कायदे कायम ठेवून तुम्ही कर्ज-बेबाकी केली तर शेतकरी पुन्हा पुन्हा कर्जबाजारी होणारच.



Source link

फलटण_महिला_डॉक्टर_आत्महत्या_प्रकरण : आरोपींवर कडक कारवाई व्हावी; विरोधकांचे घाणेरडे राजकारण बंद करावे – आमदार सचिन पाटील

0
फलटण_महिला_डॉक्टर_आत्महत्या_प्रकरण : आरोपींवर कडक कारवाई व्हावी; विरोधकांचे घाणेरडे राजकारण बंद करावे – आमदार सचिन पाटील

फलटण – उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात योग्य तपास सुरू असून यातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी, ही आमची ठाम भूमिका आहे. मात्र या प्रकरणावरून विरोधकांकडून सुरू असलेले घाणेरडे राजकारण थांबवावे, असा टोला आमदार सचिन पाटील यांनी लगावला.

माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, शिवसेनेचे विराज खराडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तसेच विजय मायने, भीमदेव बुरुगले, रामभाऊ ढेकळे, अभिजित नाईक-निंबाळकर, राहुल निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले की, “महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विशेष एसआयटी चौकशी नेमली असून, सत्य नक्कीच समोर येईल. मात्र विरोधक या दुर्दैवी घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमचे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर विनाकारण आरोप केले जात आहेत.”

या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गजानन चौकात जाहीर सभेत पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांना थेट उत्तर देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. “ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी या सभेला नक्की उपस्थित राहावे,” असेही त्यांनी आवाहन केले.

फलटणचा विकास हाच आमचा मुख्य अजेंडा असल्याचे सांगत आ. पाटील म्हणाले, “विरोधकांनी आरोप-प्रत्यारोप सोडून विकासाच्या मुद्यांवर चर्चा करावी. फलटण शहराचे रस्ते दर्जेदार बनवून संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा आमचा निर्धार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निरा-देवघर प्रकल्प, आरोग्य सुविधा आणि रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच फलटण तालुका शंभर टक्के ओलीता खाली येईल.”

आगामी पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणार असून, मित्र पक्षांसोबतची चर्चा सुरू आहे. “या निवडणुकीत शंभर टक्के विजय महायुतीचा होईल,” असा आत्मविश्वास आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केला.

कोंढव्यातील टोळीयुद्धात गणेश काळेची हत्या : आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल

0
कोंढव्यातील टोळीयुद्धात गणेश काळेची हत्या : आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल

पुणे – कोंढवा परिसरात झालेल्या गणेश किसन काळे (रा. येवलेवाडी) या रिक्षाचालक तरुणाच्या हत्येमागे टोळीयुद्ध असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आंदेकर टोळीकडून ही हत्या केल्याचे समोर आले असून, आतापर्यंत नऊ आरोपी निष्पन्न झाले आहेत. पोलिसांनी दोन अल्पवयीनांसह पाच जणांना अटक केली आहे, तर तुरुंगात असलेल्या बंडू आंदेकरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश काळे याची हत्या १ नोव्हेंबर रोजी दुपारी कोंढवा येथील खडी मशीन चौकात करण्यात आली. दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळीबार केला तसेच कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

पोलिसांनी रात्रीच या प्रकरणातील आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे अमन मेहबूब शेख (वय 23, रा. काकडे वस्ती, कोंढवा), अरबाज अहमद पटेल (वय 24, रा. काकडे वस्ती, कोंढवा), मयूर वाघमारे (वय 23) आणि दोन अल्पवयीन मुलगे असे आहेत.

१ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. त्यानंतर आंदेकर टोळीने बदला घेण्याची शपथ घेतली होती. पोलिसांनी त्या कटाचा पर्दाफाश केल्यानंतरही, ५ सप्टेंबर २०२५ रोजी आयुष कोमकर याची हत्या करून टोळीने पुन्हा दहशत माजवली. या प्रकरणात आंदेकर कुटुंब तुरुंगात आहे.

गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळेचा भाऊ आहे. समीरने त्या हत्येसाठी हत्यारे पुरवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे गणेशची हत्या ही बदला घेण्यासाठी आणि टोळीयुद्धातून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी कृष्णा आंदेकर (वय 28), बंडू आंदेकर (वय 69), स्वराज वाडेकर (वय 25), अमीर खान (वय 25), मयूर वाघमारे (वय 23), अमन मेहबूब शेख (वय 23), अरबाज अहमद पटेल (वय 24) आणि दोन अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गणेश काळे यांचे वडील किसन काळे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस जि.प गटाला दिपाली राहुल गव्हाणे यांच्या रुपाने मिळणार नवा चेहरा .!

0
तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस जि.प गटाला दिपाली राहुल गव्हाणे यांच्या रुपाने मिळणार नवा चेहरा .!

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस हा जिल्हा परिषद मतदारसंघ त्याच्या रचनेमुळे चर्चेत आला होता.या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असताना
आई प्रबोधिनी फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात असणारे भारतीय जनता पार्टी उत्तर पुणे जिल्ह्याचे पदवीधर आघाडीचे अध्यक्ष श्री. राहुल नरहरी गव्हाणे यांच्या पत्नी व डिंग्रजवाडी ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्य सौ. दिपाली राहुल गव्हाणे यांनी काल आपण ही निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले असून यामुळे या मतदारसंघातील राजकारणात नवा अध्याय सुरू होत आहे अशी चर्चा पंचक्रोशीत सुरू झाली .

आजवर आई प्रबोधिनी फाउंडेशन च्या माध्यमातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या भेटीस येणाऱ्या सौ. दीपाली गव्हाणे निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या असून यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

श्री.राहुल गव्हाणे यांचा असलेलला जनसंपर्क,भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध भारतीय जनता पक्षाचा असणारा पाठिंबा आणि गेल्या अनेक वर्षांपासून राबवलेले सामाजिक उपक्रम यामुळे सौ.दिपाली गव्हाणे यांचे पारडे जड मानले जात आहे.
गेली कित्येक दिवस विशेष चर्चेत असणाऱ्या या मतदारसंघात होणारी निवडणूक चुरशीची असेल, यात शंकाच नाही.मात्र या जि.प गटाला सौ.दिपाली राहुल गव्हाणे यांच्या रूपाने नवा चेहरा मिळणार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

“दर रविवारी – चला बुद्धविहारी, आपले संविधान – आपले अधिकार” अभियानाची समतानगर येथून प्रेरणादायी सुरुवात

0
“दर रविवारी – चला बुद्धविहारी, आपले संविधान – आपले अधिकार” अभियानाची समतानगर येथून प्रेरणादायी सुरुवात

फलटण (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने “दर रविवारी – चला बुद्धविहारी” आणि “आपले संविधान, आपले अधिकार” या जनजागृती अभियानाची प्रेरणादायी सुरुवात समतानगर (विडणी) येथून मोठ्या उत्साहात करण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे धम्मविचारांद्वारे समाजात बंधुभाव, समता आणि न्यायाची जाणीव निर्माण करणे तसेच भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची जाणीव जनमानसात पोहोचवणे हा आहे.
सुरुवातीला समतानगर परिसरात मंगल मैत्रीची फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, उपासक-उपासिका, माता-भगिनी आणि बालक-बालिका यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
फेरीदरम्यान “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ आणि भारतीय संविधानाची प्रत सोबत ठेवून जागृती करण्यात आली. “धम्म आणि संविधान” या दोन आधारस्तंभांच्या माध्यमातून समाजात मंगल मैत्री, जागरूक नागरिकत्व आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. यानंतर बुद्धविहारात सूत्र पठण करण्यात आले. उपासक-उपासिकांनी भारतीय संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली.

या वेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे महासचिव आयु. बाबासाहेब जगताप यांनी या अभियानाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की,
“भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्र व राज्यस्तरीय २५ कलमी कार्यक्रमांतर्गत धम्मप्रसार, शिक्षण, महिला सबलीकरण आणि संविधान जनजागृती हे प्रमुख उद्दिष्ट आहे. संपूर्ण तालुक्यात ५६ ग्राम शाखा स्थापन करून हे अभियान सातत्याने राबविण्यात येईल.”

त्याचाच एक भाग म्हणून “दर रविवारी चला बुद्धविहारी” या उपक्रमांतर्गत प्रत्येक रविवारी बुद्धविहारात एकत्र येऊन ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन, सूत्र पठण आणि विचारमंथन करण्यात येणार आहे. ग्राम शाखा स्थापनेसाठी उपस्थित उपासक-उपासिकांकडून अर्जही भरून घेण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले,
“धम्म आणि संविधान हे सामाजिक परिवर्तनाचे दोन पाय आहेत. प्रत्येक रविवारी बुद्धविहारात येऊन धम्मविचार, सूत्र पठण आणि संविधानाचे अध्ययन करा. पंचशीलाचे आचरण करून आपण समाज परिवर्तनाच्या कार्याला गती देऊ शकतो.”
त्यांनी पुढे पंचशील आचरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी धम्मगीत सादर केले.
‘पंचशीलानं पवित्र झालं जीवन माझं पुरं,बुद्धविहारानं नटलं माझं घरं’ यामुळे संपूर्ण वातावरण धम्ममय झाले.
या कार्यक्रमात आयु. बजरंग गायकवाड (संस्कार सचिव), अमोल भोसले, चंद्रकांत मोहिते (कार्यालयीन सचिव), विजयकुमार जगताप आयु. विठ्ठल निकाळजे सर( तालुका शाखा कोषाध्यक्ष) संघटक), तानाजी जगताप (साहित्यिक), प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे, आयु. चंद्रकांत भोसले, आयु. अविनाश मोरे, आयु. हनुमंत भोसले, आयु. नंदकुमार जगताप, आयु. जगन्नाथ मोरे, आयु. गोरख कांबळे, आयु. प्रणव जगताप तसेच महिला उपासिका व बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अभियानाच्या माध्यमातून धम्मविचार आणि भारतीय संविधान मूल्यांचा संगम घडवत, समाजात जागृती आणि बंधुभावाचा संदेश देण्याचा संकल्प फलटण तालुका शाखेने केला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे यांनी केले. समारोप त्रिशरण-पंचशील ग्रहण व धम्मपालन गाथेने करण्यात आला.

Winter special Kadha: खराब वातावरणात आवर्जून प्या काढा, सर्दी-खोकला होईल छुमंतर

0
Winter special Kadha: खराब वातावरणात आवर्जून प्या काढा, सर्दी-खोकला होईल छुमंतर



थंड हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवल्याने सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्या टाळता येतात.यासाठी काय कराल



Source link