Sunday, July 5, 2026
Home Blog Page 109

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: सक्रिय मन असलेला माणूस ‎शांत राहू शकत नाही‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  सक्रिय मन असलेला माणूस ‎शांत राहू शकत नाही‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, A Person With An Active Mind Cannot Remain Calm

18 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

तीन गोष्टी आपल्यावर नियंत्रण ठेवतात : निरोगी शरीर, निष्क्रिय मन‎आणि आत्म्याची जाणीव. जर आपण शरीराशी छेडछाड केली, त्याला‎आजारी पडू दिले, तर आपल्या सर्व कृती आपल्याला दुःख देतील.‎सक्रिय मन असलेला माणूस कधीही शांत राहू शकत नाही. अस्वस्थता‎दूर करण्यासाठी मन निष्क्रिय केले पाहिजे आणि आत्म्याची जाणीव‎आपले आचरण दिव्य बनवते. जेव्हा आपण मनाने प्रेरित असतो तेव्हा‎आपण प्रत्येक गोष्टीवर घाईघाईत प्रतिक्रिया देतो आणि त्वरित प्रतिक्रिया‎देण्याची ही सवय आपल्याला अस्वस्थ करते. जेव्हा आपण बुद्धीने‎प्रेरित असतो तेव्हा आपल्यात एक विचारशील प्रक्रिया असते. ही‎सचेत प्रतिक्रिया आपल्याला सर्वच बाबतीत खोली देते. या गोष्टी प्रभू‎श्रीरामांच्या आचरणात दिसून येतात.प्रभू श्रीरामांचे व्यक्तिमत्त्व इतके‎सखोल होते की त्यांनी आरामापेक्षा संघर्ष निवडला. त्यांनी नेहमीच‎वंचितांना प्राधान्य दिले. ते असहाय लोकांसाठी आधार बनले, म्हणूनच‎त्यांचे जीवन लोकशिक्षणाचे प्रतीक बनले.‎



Source link

पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का! विश्वासू मोहरा भाजपच्या गळाला, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

0



Satara : नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच साताऱ्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू सहकारी आणि मलकापूर नगर परिषदेचे काँग्रेसचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे भाजपाच्या गळाला लागले आहेत. मुंबईत आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट घेतली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्यासोबत मनोहर शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देणारे मनोहर शिंदे काँग्रेसचे साथ सोडणार?

काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देणारे मनोहर शिंदे काँग्रेसचे साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पुढील दोन दिवसात पक्षप्रवेश होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील एकमेव मलकापूर नगरपरिषद काँग्रेसकडे होती. 

महत्वाच्या बातम्या:

Kishor Patil: महायुतीच्या एक वर्षाच्या काळात फुटकी कवडीही मिळाली नाही; शिंदे गटाच्या आमदाराचा जाहीर सभेतच सरकारला घरचा आहेर

आणखी वाचा



Source link

एक महिना सलग मीठ न खाल्ल्यास काय होईल? शरीराला नुकसान होणार की फायदा

0
एक महिना सलग मीठ न खाल्ल्यास काय होईल? शरीराला नुकसान होणार की फायदा


हल्ली प्रत्येकजणच आपल्या आरोग्याच्याबाबतीत अतिशय सतर्क झाले आहेत. अगदी मीठ आणि साखरेवर अनेकांनी कंट्रोल करण्याचा विचार केला आहे. साखर किंवा गोड खाणं सोडणं ही गोष्ट अनेकजण करतात. पण तब्बल 30 दिवस सलग मीठ न खाणं हा मोठा निर्णय आहे. मीठ सोडल्यामुळे शरीरात काय बदल होतात. हे बदल सकारात्मक की नकारात्मक असतील हे समजून घेणं गरजेचं असतं. 

Add Zee News as a Preferred Source

बरेच लोक त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मीठाचे सेवन कमी करण्याचा किंवा पूर्णपणे सोडून देण्याचा विचार करतात. पण हे योग्य आहे का? 

मीठ शरीरासाठी आवश्यक आहे. ते सोडियम आणि क्लोराईडचा मुख्य स्रोत आहे, जे पेशींच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहेत. सोडियम रक्तदाब, स्नायूंचे आकुंचन आणि मज्जातंतूंच्या सिग्नलच्या प्रसारणात महत्त्वाची भूमिका बजावते. जास्त मीठ सेवन केल्याने उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

दिवसातून किती मीठ सेवन करावे?

बहुतेक आरोग्य तज्ञ शिफारस करतात की प्रौढ व्यक्तीने दिवसातून सुमारे 5 ग्रॅम सोडियम सेवन करावे, जे सुमारे एक चमचे मीठाइतके आहे. तथापि, बहुतेक लोक यापेक्षा खूप जास्त मीठ वापरतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

मीठ पूर्णपणे सोडून दिल्यावर काय परिणाम होतो? 

जर एखाद्याने महिनाभर मीठ पूर्णपणे सोडून दिले तर त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रथम, शरीरात सोडियमची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे हायपोनेट्रेमिया (कमी सोडियम) होऊ शकते. यामुळे स्नायू कमकुवत होणे, थकवा, डोकेदुखी आणि गोंधळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

शिवाय, शरीरात आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता जाणवू शकते, ज्यामुळे स्नायू पेटके आणि हृदयाच्या लयीत असामान्यता येऊ शकते. दीर्घकाळ मीठ नसणे हार्मोनल संतुलनावर देखील परिणाम करू शकते, ज्यामुळे थायरॉईड आणि अधिवृक्क ग्रंथींचे कार्य बिघडू शकते.

एकूणच मीठाचे सेवन मर्यादित करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु ते पूर्णपणे कमी करणे योग्य नाही. जर तुम्हाला मीठाचे सेवन कमी करायचे असेल तर हळूहळू ते करणे चांगले. संतुलित आहार घ्या आणि जर तुम्हाला मीठाच्या कमतरतेमुळे काही समस्या येत असतील तर वैद्यकीय सल्ला घ्या. म्हणून, मीठाशिवाय जीवन जगण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार करणे महत्वाचे आहे.

FAQ 

झिरो सॉल्ट डायट म्हणजे काय?

झिरो सॉल्ट डायट म्हणजे आहारात मीठ (सोडियम क्लोराईड) पूर्णपणे टाळणे किंवा अत्यंत मर्यादित प्रमाणात घेणे. या आहारात नैसर्गिकरित्या अन्नात असलेला सोडियम वगळता कोणतेही अतिरिक्त मीठ वापरले जात नाही.

 झिरो सॉल्ट डायट कोणासाठी उपयुक्त आहे?

हा आहार पुढील लोकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयुक्त ठरू शकतो:

उच्च रक्तदाब (High Blood Pressure) असलेले लोक

किडनीचे आजार (Kidney Disease) असलेले रुग्ण

हृदयविकार (Heart Disease) असलेले लोक

शरीरात सूज किंवा पाणी धरून ठेवण्याची समस्या असलेले लोक

पूर्णपणे मीठ बंद करणे सुरक्षित आहे का?

नाही, सर्वांसाठी ते सुरक्षित नाही. आपल्या शरीराला थोड्या प्रमाणात सोडियमची गरज असते – ते स्नायू, नर्व्ह आणि द्रव संतुलनासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे झिरो सॉल्ट डायट फक्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.





Source link

राजकीय शेवट नगराध्यक्षपदाने होऊ द्या, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नगरपालिका लढवणार

0



सातारा : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यामध्ये आता बडे बडे राजकीय हस्तीही त्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात फटलणच्या नगराध्यक्षपदापासून झाली, आता सांगताही नगराध्यक्षपदाने होऊ द्या असं वक्तव्य रामराजे निंबाळकरांनी केलं. रामराजे निंबाळकरांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.

आघाडी सरकारमध्ये पंधरा वर्षे आम्ही काम केलं. आताही जमेल तिथे युती, नाही जमणार तिथे स्वतंत्र लढा. चिन्हावर लढायचं असेल तर चिन्हावर लढा. मी सध्या घड्याळ चिन्हावर आहे, अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचे नियोजन करतील असं रामराजे निंबाळकरांनी म्हटलंय.

Ramraje Nimbalkar on Election: नगराध्यक्षपदासाठी इच्छुक

रामराजे निंबाळकर म्हणाले की, मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात फटलणच्या नगराध्यक्षपदाने केली होती. आता आयुष्याच्या शेवटीसुद्धा मी नगराध्यक्षपदासाठी उभा राहणार आहे. माझं कुटुंब किंवा माझा मुलगा माझ्या विरोधात जाणार नाही. पहिल्यांदा मी नगराध्यक्ष झालो, आता शेवटही माझा नगराध्यक्ष होऊ द्या.

रामराजे निंबाळकर हे आघाडी सरकारमध्ये असताना ते राज्याच्या मंत्रिमंडळात होते. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेचे सभापतीपदही भूषवलं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजितदादांसोबत जरी गेले असले तरी त्यांनी कधीही शरद पवारांना कधीही विरोध केला नाही.

Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: रणजितसिंह निंबाळकरांना थेट विरोध

फलटणच्या डॉक्टर आत्महत्येनंतर जुना राजकीय वाद पुन्हा उफाळून आल्याचं दिसून येतंय. भाजप नेते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध माजी सभापती रामराजे निंबाळकर वाद शिगेला पोहोचला आहे. रणजितसिंहाचे जुने हिशेब चुकते करणार असून 277 केसेस घेऊन हायकोर्टात जाण्याचं थेट आव्हान रामराजेंनी दिलं. तसंच पक्ष सोडावा लागला तरीही चालेल, मात्र रणजितसिंह निंबाळकांच्या पक्षासोबत आणि पॅनलमध्ये जाणार नाही अशी थेट घोषणा रामराजेंनी केली.

फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी उभं राहण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. आपल्यावरच्या सर्व आरोपांचे मास्टरमाईंड रामराजे असल्याचा आरोप आधीच्या पत्रकार परिषदेत रणजित सिंह निंबाळकरांनी केला होता. त्याला पत्रकार परिषदेतून रामराजेंनी सडेतोड उत्तरं दिली. रणजित सिंहांच्या दुग्धाभिषेकावरही त्यांनी सडकून टीका केली. त्यांनी अभिषेक केला मी तर गोमूत्र ओतून घेणार असल्याचं म्हणत रामराजेंनी टोला लगावला. त्यामुळे हा वाद नेमका कोणत्या पातळीला जाणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

Train Accident : प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची टक्कर; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
Train Accident : प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची टक्कर; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी


Bilaspur Train Accident : छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात एक मोठा रेल्वे अपघात झालाय. हावडा मार्गावर धावणारी कोरबा पॅसेंजर ट्रेन लालखदानजवळ एका मालगाडीला समोरासमोर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. ज्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

माहिती मिळताच, रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाचे पथक तातडीने अपघातस्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि मदतकार्य सुरू केले आहे. अपघातानंतर बिलासपूर-कटनी मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. 

हा अपघात बिलासपूर-कटनी रेल्वे मार्गावर घडला आहे, जो सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. हा अपघात का घडला यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. चौकशीनंतरच या अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल. अपघातात ओव्हरहेड वायर आणि सिग्नल सिस्टीमचेही नुकसान झाले आहे, ज्यामुळे ट्रॅक पुनर्संचयित करण्यास विलंब होऊ शकतो. हा परिसर अतिशय वर्दळीचा रेल्वे मार्ग मानला जातो, त्यामुळे दुरुस्तीचे काम जलद गतीने केले जात आहे. एवढी मोठी निष्काळजीपणा कशी घडली हे शोधण्यासाठी रेल्वेने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान AI च्या माध्यमातून हा अपघात कसा झाला असेल या व्हिडीओत दाखवण्यात आला आहे. 

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेमू ट्रेनच्या दोन डब्यांची एका मालगाडीशी टक्कर झाली. बिलासपूर स्टेशनजवळ दुपारी 4 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. 





Source link

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका तीन टप्प्यात; मतदान २ डिसेंबरला

0
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका तीन टप्प्यात; मतदान २ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात पार पडण्याची शक्यता असून, राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व कार्यक्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

📅 निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

  • अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ७ नोव्हेंबर २०२५
  • उमेदवारी अर्ज दाखल : १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५
  • अर्ज छाननी : १८ नोव्हेंबर २०२५
  • अर्ज माघारीची मुदत : २१ नोव्हेंबर २०२५
  • चिन्ह वाटप : २६ नोव्हेंबर २०२५
  • मतदान : २ डिसेंबर २०२५
  • मतमोजणी : ३ डिसेंबर २०२५

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हा पहिला टप्पा असणार असून, उर्वरित टप्प्यांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं

0



Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर रणजित नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांनी जाहीर सभा घेत आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे मास्टरमाईंडच्या सांगण्यावरुन करण्यात आले आहेत, मी नार्को टेस्टला तयार आहे, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तयार व्हावं नाहीतर निंबाळकर नाही असं जाहीर करावं, असं आव्हान त्यांनी रामराजे निंबाळकरांना (Ramraje Naik Nimbalkar) दिलं आहे. आता रामराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, उद्यापासून आचारसंहिता लागेल. काही गोष्टी बोलता येणार नाहीत. त्यामुळे आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. मागची 30 वर्ष आम्ही काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे, असे मी याआधीही बोललो आहे. त्यांनी आरोप केला की, हे रामराजे यांनी केलं. त्यांनी माझं टोपण नाव मास्टर माईंड ठेवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, ती रद्द व्हावी, असे सांगितले गेले. या संदर्भात माझा काहीही संबंध नाही. 

Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: मुलीच्या आत्महत्या प्रकरणी सखोल तपास करावा

ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या झाली त्याचा मास्टरमाईंड मीच आहे का? पोलिसांना जे सांगितले त्याचा ही मास्टरमाईंड मीच आहे का? त्यांनी माझ्यावर अब्रू नुकसान दावा लावावा. मुलीच्या आत्महत्या प्रकरणी सखोल तपास करावा. Dysp धस यांच्याकडे तक्रार केली, त्याचा तपास केला नाही.  या त्या गोष्टी आहेत त्यात माझा काय संबंध? धस साहेब कोणामुळे आले? धस यांची चौकशी व्हावी. यासाठी एसआयटीची मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत आहे, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले. 

Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: फलटण तालुक्याची बदनामी झाली की नाही? 

रामराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले की, विकास ही माझी संस्कृती आणि इथली लोकं ही माझी मुले आहेत. धस यांच्या काळात 277 केसेस झाल्यात. मग फलटण तालुक्याची बदनामी झाली की नाही? बाकी कारखान्याबाबत तक्रारी झाल्या नाहीत. मी या केसेस कोर्टात नेणार आणि त्या उच्च न्यायालयात नेऊन एसआयटीची मागणी करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. 

Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: हे असले धंदे करतात आणि मास्टरमाईंड मीच

आगवणे हा कोणाचा कार्यकर्ता आहे हे सगळ्यांना माहिती आहे. क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये रामराजे यांचे नाव घ्यायला सांगितले. मुलीला आत्महत्या करायला लावले, असे सांगितले. यातही मास्टर माईंड मीच आहे, असे सांगितले. हे असले धंदे करतात आणि मास्टरमाईंड मीच आहे असे सांगतात. हे जे सगळं चाललं आहे. त्यात फलटणची अब्रू कुठं राहिली? राजकारण कुठं राहिले? 2023 पासून माजी खासदारांचे नाव मी घेतलं नाही. त्यांना आरोपी करा हे कोण म्हणाले त्याची चौकशी करा, अशी आमची मागणी असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. 

Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?

जयकुमार गोरे प्रकरणात  माझे फोन झाले म्हणून माझी पोलिसांनी चार तास चौकशी झाली होती. 2022 साली मला गुंतवण्याचा प्रयत्न केला मी कधी तक्रार केली का? 2019 ला अजित पवार यांच्यावर पाणी चोरल्याचा आरोप केला. त्यांचा आमदार कशावर उभा राहिला? ननावरे केस झाली त्याला मी सांगितले का त्याचा मास्टरमाईंड मीच आहे का? दुधाचा अभिषेक केला हा इव्हेंट नाहीतर काय आहे. अभिषेक कोणाला घालतात देवाला, हा काय देव आहे का? प्रशासकीय दबावाने शेवटच्या माणसाला हैराण केलं त्याच्या विरोधात मी लढणार आहे. आमची लोक ही आमची मुले आहेत. त्यांना मी बरबाद होऊ देणार नाही. सत्तेतून पैसे कसे मिळवायचे हे या सद्गृहस्थाला माहीत आहे. माजी खासदारांनी सुषमा अंधारेंची माफी मागितली आणि मला टार्गेट केलं. हा माणूस या ठिकाणी जन्माला आला तीच फलटणची पुण्याई. त्यांनी अभिषेक केला मी तर गोमूत्र ओतून घेणार आहे, असा टोला त्यांनी यावेळी रणजित निंबाळकरांना लगावला.

आणखी वाचा 

Sushma Andhare on Ranjitsinh Naik Nimbalkar: रणजित निंबाळकर स्वतःला आरोपी का समजतात? सुषमा अंधारेंचा सवाल, म्हणाल्या, तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात ही…

आणखी वाचा



Source link

रणजितसिंह निंबाळकरांनी सादर केले धक्कादायी आव्हान; नार्को-टेस्टला तयार असल्याचे स्पष्ट विधान

0
रणजितसिंह निंबाळकरांनी सादर केले धक्कादायी आव्हान; नार्को-टेस्टला तयार असल्याचे स्पष्ट विधान

फलटण (प्रतिनिधी) — फलटण मध्ये नुकत्याच झालेल्या एका झळकलेल्या सभेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जोरदारपणे खंडित केले आणि सार्वजनिकपणे आव्हान दिले की ते नार्को-टेस्ट (नार्कोटिक्स-डिटेक्शन) करण्यास तयार आहेत. या प्रकरणात फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या मागे सुषमा अंधारे यांनी रणजितसिंहांवर आरोप केल्याचे म्हटले आहे; या आरोपांना रणजितसिंहांनी ‘मास्टरमाइंडच्या सांगण्यावरून’ सुरू झाल्याचे सांगितले.

सभेच्या वेळी उपस्थित महिला नेत्यांच्या प्रति श्रद्धाभाव व्यक्त करताना रणजितसिंह यांच्या पाय धुतले गेले, त्यांची दृष्ट काढली गेली आणि नंतर त्यांचा दुग्धाभिषेक केला. या परंपरागत संवेदनशील प्रसंगाने भावनिक झालेले रणजितसिंह अश्रूंनी भरलेले दिसले, असे उपस्थितांनी सांगितले.

रणजितसिंहांनी दिलेले मुख्य मत:

  • “माझ्यावर केलेले आरोप हे मास्टरमाइंडच्या सांगण्यावरून असून सत्य नसलेले आहेत. माझा खून झाला असता चालले असते, पण किती बदनामी करायची?” असे ते म्हणाले.
  • त्यांनी म्हटले की लोकसभेतील तिकीट मिळू नये म्हणून कुणीतरी योजना रचली असून आगवणे यांच्या मुलीच्या आत्महत्येचा प्रकार ‘नाटक’ करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयात दाखल करून दाखवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
  • रणजितसिंह म्हणाले की ते कोणत्याही अहवालासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि त्यावेळी कोणतीही वैयक्तिक मागणी केलेली नाही.
  • “आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. तालुक्यातील 60 टक्के जनता आपल्यासोबत आहे,” असे त्यांनी सभेत नमूद केले.
  • त्यांनी आमंत्रण देत प्रश्न उपस्थित केला: “मी नार्को-टेस्ट करायला तयार आहे. माझ्यावर आरोप करणारे तयार आहेत का?” तसेच त्यांनी म्हणाले की सगळ्यांची लाईव्ह डिटेक्टर चाचणी (पॉलीग्राफ/नार्को इ.) करायला त्यांचे पैसेसुद्धा आहेत आणि जर दोषी आढळले तर ते तुरुंगात जाण्यास तयार आहेत.

प्रकरणाचे सामाजिक व कायदेशीर पैलू:

  • रणजितसिंहांनी या प्रकरणातील काही दाखल केलेल्या गुन्ह्यांचे मेडिकल तपास काही वेगळ्या व्यक्तीने केले असल्याचेही ते म्हणाले; त्यानुसार ते आरोप करतात की काही बाबतीत चुकीची माहिती पसरवली जात आहे.
  • सभेत रणजितसिंहांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याची अपनी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आणि जर आरोप पापांची पुनरावृत्ती झाली तर त्यांनी कडक कारवाई करण्याची धमकी देखील दिली.
  • त्यांनी उपस्थितांना खुलेपणाने आव्हान दिले की जर आरोपी उपस्थित झाले नाहीत तर स्थानिक नायके म्हणून “नाईक निंबाळकर नाही” असा जाहीर करायचं काय, असे प्रश्न उपस्थित केले.

स्थानीय भावना आणि पुढील वाटचाल:

या सभेतून स्थानिक लोकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली. काहींनी रणजितसिंहांचे समर्थन केले तर काहींनी आरोपांचे निवारण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. राजकीय आणि कायदेशीर स्तरावर पुढे काय पावले उचलली जातील ते या प्रकरणाच्या अधिक तपासाअंतर्गत स्पष्ट होतील.


,,

थांबून थांबून लघवीला होते? किडनी खराब तर झाली नाही ना? डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा…

0
थांबून थांबून लघवीला होते? किडनी खराब तर झाली नाही ना? डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा…


मूत्रपिंडांचे काम शरीरातील कचरा काढून टाकून द्रवपदार्थांचे संतुलन राखणे आहे. शरीराचे संतुलन राखण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. मूत्रपिंडाचे योग्य कार्य दोन लहान मूत्रवाहिन्यांवर अवलंबून असते, जे मूत्रपिंडातून मूत्राशयाकडे मूत्र वाहून नेतात. जेव्हा हे मूत्रवाहिन्या ब्लॉक होतात तेव्हा मूत्रपिंडांना हळूहळू आणि शांत नुकसान होऊ लागते, ज्यामुळे त्यांची क्षमता कमी होते.

Add Zee News as a Preferred Source

डॉक्टरांच्या मते, शांतपणे वाढणारे आजार बहुतेकदा लक्षणे लगेच दिसून येणाऱ्या आजारांपेक्षा जास्त धोकादायक असतात. मूत्रमार्गात किरकोळ अडथळा देखील कालांतराने मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान करू शकतो. ज्यामुळे संसर्ग, जळजळ (हायड्रोनेफ्रोसिस) किंवा मूत्रपिंड निकामी होऊ शकते. चिंताजनक म्हणजे, बहुतेक लोकांना ते तेव्हाच लक्षात येते जेव्हा आधीच मोठे नुकसान झाले असते. मूत्रमार्गात अडथळा का येतो ते शोधूया. 

मूतखडे
मूतखडे खाली सरकू शकतात आणि मूत्रमार्गात अडकू शकतात, ज्यामुळे मूत्र प्रवाहात अडथळा येतो. यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात आणि संसर्ग देखील होऊ शकतो.

मागील संसर्ग किंवा शस्त्रक्रियेमुळे गाठी
वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे किंवा ओटीपोटाच्या प्रक्रियेमुळे मूत्रमार्गात ऊतींचे गाठी निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे मूत्रमार्ग अरुंद होतो. यामुळे लघवी करताना अडचण आणि वेदना होऊ शकतात.

जन्मजात दोष
काही मुले अरुंद किंवा असामान्यपणे जोडलेली मूत्रमार्ग (पेल्व्युरेटेरिक जंक्शन अडथळा/कंत्रणा) घेऊन जन्माला येतात, ज्यामुळे लघवीचा प्रवाह रोखला जातो. लक्षणे बहुतेकदा बालपणात दिसून येतात, म्हणून मुलाला लघवी करण्यास त्रास होत आहे याकडे दुर्लक्ष करू नका.

 लिम्फ नोड्स किंवा प्रोस्टेट आणि ट्यूमर
पुरुषांमध्ये, वाढलेले प्रोस्टेट किंवा पेल्विक लिम्फ नोड्स सूज येणे यामुळे मूत्रमार्ग अरुंद होऊ शकतो. ट्यूमर देखील हे होऊ शकतात. मूत्राशय, गर्भाशय, कोलन किंवा मूत्रमार्गाभोवती तयार होणारा ट्यूमर बाहेरून मूत्रमार्ग दाबू शकतो.

वेळेवर निदान न करणे 
मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे अनेकदा उशिरा दिसून येतात. पाठ किंवा कंबरदुखी, वारंवार संसर्ग, लघवीत रक्त येणे किंवा लघवी कमी होणे ही सामान्य लक्षणे आहेत. जर लक्षणे दुर्लक्षित केली तर मूत्रपिंड पूर्णपणे खराब होऊ शकतात, ज्यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते.





Source link

हिम्मत असेल तर नाव घ्या; मग बघतो, फलटणमध्ये कसा राहतोस” — आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोधकांवर घणाघात

0
हिम्मत असेल तर नाव घ्या; मग बघतो, फलटणमध्ये कसा राहतोस” — आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोधकांवर घणाघात

फलटण, प्रतिनिधी: “मला विविध प्रकरणात अडकवण्याचे प्रयत्न विरोधकांनी वारंवार केले. आजही महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मला मास्टरमाइंड म्हणत प्रश्न विचारले जात आहेत. हिंमत असेल तर नाव घ्या, मग बघतो, फलटणमध्ये कसे राहता ते!” असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.

फलटण येथील शानिनगर परिसरातील विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला जि.प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, “विरोधकांच्या पापांमुळे फलटणचे नाव बदनाम होत चालले आहे. कोणाला अडकवा, त्याला अडकवा — अशा कारवायांनी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मी सभापती असताना मला अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण विरोधकांचा डाव फसला. सूडबुद्धीचे राजकारण करणे एवढेच त्यांच्याकडे उरले आहे.”

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबद्दल ते म्हणाले, “त्या घटनेच्या वेळी मी पुण्यात होतो. ती घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण त्यामुळे फलटणची बदनामी झाली. यासाठी पूर्णपणे विरोधक जबाबदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी नेमल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”

सभेत त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता थेट टीकेची झोड उठवली. “हिम्मत असेल तर मास्टरमाइंडचे नाव घ्या. मग १९८५ पासूनचा सगळा इतिहास बाहेर काढतो. तुरुंगात टाका म्हणताय, टाका ना! मग बघतो, तू कसा फलटणमध्ये राहतोस. तुरुंगातूनही तुला थड लावीन,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना थेट ललकारले.

रामराजे पुढे म्हणाले, “आमच्या चुका झाल्या असतील, पण अशा लोकांना राजकारणात येऊ देऊ नका. फलटण तालुक्यात चार कारखाने आहेत, मग तिथे वाद झाले नाहीत, फक्त तुमच्याचकडे का झाले? बीड जिल्ह्यात तुमची जहागिरी होती, तिथे काय झाले? ती डॉक्टर व्यवस्थेची बळी होती, पण तुम्ही तिच्या मृत्यूचा वापर राजकारणासाठी करत आहात.”

त्यांनी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या चौकशीची मागणी केली. “इतका हलकट माणूस आपल्याला मिळाला, त्याचीही चौकशी व्हायला हवी. प्रांत अधिकारी मॅडम यांनाही सांगतो — तुमची वेळही राहुल धससारखी येऊ शकते,” असा इशारा देत त्यांनी प्रशासनालाही लक्ष्य केले.

रामराजे यांनी फलटण व साखरवाडी साखर कारखान्यांच्या कामकाजाबाबत चिंता व्यक्त केली. “फलटण तालुक्याची प्रतिमा मलिन झाली आहे. अशा वातावरणात नवीन उद्योग येतील का? मुकादम येतील का? हे तुम्हीच ठरवा,” असे ते म्हणाले.

सभेच्या शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले, “मी कोणाला घाबरत नाही. तुमच्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढणार आहे. गेल्या पाच वर्षांत विरोधकांनी सत्तेचा जो गैरवापर केला, तो आता थांबवणे आवश्यक आहे. जनता जागी झाली पाहिजे आणि सन्मानासाठी लढा दिला पाहिजे.”