Tuesday, August 18, 2026
Homeसाताराफलटणमध्ये विकासाच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी

फलटणमध्ये विकासाच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन रविवार दि. २ नोव्हेंबर रोजी

फलटण प्रतिनिधी : शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा रविवार, दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५ वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्र. २, पाचबत्ती चौक येथे नव्याने उभारलेल्या शाळा इमारतीचे उदघाटन तसेच सभापती निवास ते संतोष वेलणकर घर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

याचबरोबर नाबार्ड योजनेअंतर्गत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या बाणगंगा नदीवरील दत्तघाट बॉक्सपुल आणि रिटेनिंग वॉलचे उदघाटनही यावेळी होणार आहे.

या सर्व कामांचे उदघाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार दीपकराव चव्हाण भूषविणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि फलटण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रभाग क्रमांक ०६ चे माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी दिली.

उदघाटन आणि भूमिपूजन सोहळ्यानंतर शनिनगर बाग, फलटण येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून फलटण नगर परिषदेची सत्ता रामराजे यांच्या विचारधारेवर चालत आली असून, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ घातलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रामराजे काय भाष्य करणार याकडे फलटणवासीयांचे लक्ष लागले आहे.

या कार्यक्रमाला फलटण शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर आणि माजी नगरसेविका सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments