Saturday, July 4, 2026
Home Blog Page 101

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग १२ मध्ये विकास काकडे यांची उमेदवारी दाखल – नागरिकांमध्ये उत्साहाची लाट

0
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग १२ मध्ये विकास काकडे यांची उमेदवारी दाखल – नागरिकांमध्ये उत्साहाची लाट

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे राजकीय वातावरण तापत असताना प्रभाग क्रमांक १२ (अनुसूचित जाती राखीव) या महत्वाच्या प्रभागातून विकास वसंतराव काकडे यांनी राजे गटाकडून शिवसेना (धनुष्यबाण) चिन्हावर अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर प्रभागातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अर्ज दाखल करण्याच्या वेळी प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.

आपल्या उमेदवारीविषयी बोलताना विकास काकडे म्हणाले,
“सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या कार्यातून मी प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे. प्रभागातील विकासाच्या दिशा ठरवण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करणार आहे.”

त्यांच्या कार्याचा, सामाजिक बांधिलकीचा आणि तळागाळातील जनसंपर्काचा उल्लेख आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वासमोरही नेहमीच होत आला आहे.

साहस क्रीडा मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले विकास काकडे हे सामाजिक, सांस्कृतिक व युवकांच्या उपक्रमांमध्ये सतत अग्रेसर असतात. त्यांच्या आयोजन कौशल्यामुळे तसेच लोकसंपर्कामुळे त्यांना युवकांमध्ये विशेष लोकप्रियता लाभली आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या या जनसमर्थनामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता आणि चर्चा अधिकच वाढली आहे. राजे गटाने त्यांना उमेदवारी दिल्याने सक्षम नेतृत्व मिळणार असून प्रभागात विजयाची मजबूत शक्यता असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला उत्साह पाहता प्रभाग क्रमांक १२ मधील निवडणूक यंदा अधिक रंगतदार आणि चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे. आता या उमेदवारीनंतर प्रभागातील राजकीय घडामोडींना वेग येणार असून सर्वांचे लक्ष आगामी प्रचार योजनांकडे लागले आहे.

सदाशिव खरात यांचे लोकहितवादी कार्य आदर्शवत – चंद्रकांत मोहिते

0
सदाशिव खरात यांचे लोकहितवादी कार्य आदर्शवत – चंद्रकांत मोहिते

फलटण : फलटण पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी, मालोजी नगर कोळकी (ता. फलटण) येथील किशोरसिंह गृह निर्माण सोसायटीचे चेअरमन आणि फलटण तालुका सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष सदाशिव यशवंत खरात (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अस्थि-संकलन व पुण्यानुमोदन कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेच्या फलटण तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव, समता सैनिक दलाचे प्रतिनिधी, बौद्धाचार्य यांच्यासह चंद्रकांत मोहिते बोलत होते.

मोठ्या आदराने त्यांनी सांगितले की, “स. य. खरात यांनी आयुष्यभर समाजासाठी कार्य करताना अनेक सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक उपक्रम उभे केले. पंचायतराज संस्थेतून त्यांनी शेकडो गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून दिले. बुद्ध–फुले–शाहू–आंबेडकर सभागृह, कोळकी (फलटण) यांच्या उभारणीतही त्यांचा मोलाचा सहभाग होता. समाजकार्यासाठी त्यांची निष्ठा आणि तळमळ ही पुढील पिढ्यांसाठी आदर्शवत आहे.”

मूळ गाव कलेढोण (ता. खटाव) असलेल्या खरात साहेबांचे स्थायिक वास्तव्य कोळकी येथे होते. सातारा, दहिवडी येथे सेवा बजावल्यानंतर ते फलटण पंचायत समितीत जवळपास पंचवीस वर्षे कार्यरत राहिले. निवृत्तीनंतरही त्यांनी संपूर्ण वेळ सेवानिवृत्त संघटनेच्या सेवा-कार्यास दिला. सेवानिवृत्तांचे प्रश्न, हक्क, मागण्या मांडणे व सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असत. त्यांच्या व्यापक जनसंपर्कामुळे अनेकांना मार्गदर्शनाचा आधार मिळत असे.

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्यावर फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे दीड वाजता त्यांनी शांतपणे देह ठेवला.

त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातू व मुली असा परिवार आहे.

अस्थि-संकलन, पूजन व पुण्यानुमोदन कार्यक्रम कोळकी येथील निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी भिकू भोसले, जयवंत काकडे, अॅड. मनोज जावळे, समाजसेविका कांताताई काकडे, जस्ट प्रवचनकार स्वामीना, जस्ट प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे, तसेच कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी स. य. खरात यांच्या धम्मनिष्ठ कार्याला, सामाजिक बांधिलकीला आणि जनसेवी जीवनाला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

त्यांच्या समर्पित सेवेला धम्मपर आदरांजली

मोठी बातमी, रामराजेंच्या मुलाच्या हाती धनुष्यबाण, नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून रिंगणात

0



सातारा (फलटण) :  नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या दिवशी सातारा जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक शिवसेनेकडून लढवणार आहेत. ते शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करतील. दुसरीकडे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऐनवेळी त्यांच्या भावाला नगराध्यपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. 

रामराजेंचे अखेर ठरलं, मुलगा शिवसेनेकडून लढणार

रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीत असतानाच त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेनेत धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहेत. ते थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. फलटण नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात लढाई होणार आहे. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं आता फलटणमध्ये होणार निंबाळकर विरुद्ध निंबाळकर लढाई होणार आहे. 

भाजपकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर रिंगणात  

भाजपकडून माढाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना फलटणच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. दिलीप सिंह भोसले यांचा पत्ता कट करून समशेर सिंह नाईक निंबाळकर यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली आहे. फलटणला भाजपच्या वतीने समशेर सिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवारी देण्यात आली आहे.

फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष यांच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  ते काही वेळेत फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणार असल्याचे दिलीपसिंह भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर सामना 

फलटणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. काही दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यात पुढं काही घडलं नाही. आता पुन्हा दोन्ही निंबाळकर आमने सामने आले आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

साताऱ्यात भाजपकडून शिवेंद्रराजेंचे समर्थक अमोल मोहितेंना उमेदवारी, उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

0



सातारा :  सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनं नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अमोल मोहिते यांचं नाव जाहीर केलं आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून भाजप म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर साताऱ्याच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कोणत्या गटाचा असणार याबाबत चर्चा सुरु होत्या. नगराध्यक्षपद कोणाकडे असावं यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आला होता.   

अमोल मोहितेंना उमेदवारी, उदयनराजे भोसलेंच्या भूमिकेकडे लक्ष

सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे.साताऱ्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे माजी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे नाव भाजप कडून जाहीर झाले आहे..सातारा नगराध्यक्ष पदावरून खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात रस्सीखेच सुरू होती. त्यामुळं भाजप वरिष्ठांकडे नगराध्यक्ष पदाचा चेंडू गेला होता. भाजप कडून अमोल मोहिते यांचे नाव जाहीर झाल्याने खा.उदयनराजे भोसले काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यापूर्वी उदयनराजेंच्या गटाला यश

सातारा नगरपालिकेच्या गेल्या 30 वर्षात दोन वेळा थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीनं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचा पराभव केला होता. सातारा विकास आघाडीच्या रंजना रावत एकदा थेट नगराध्यक्ष बनल्या होत्या.

2016 मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले मनोमिलन तुटल्यानंतर सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडी आमने सामने आले होते.  सातारा विकास आघाडी कडून उदयनराजे भोसले यांनी थेट नगराध्यक्ष म्हणून माधवी कदम यांना उमेदवारी दिली होती. तर, नगरविकास आघाडीकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले रिंगणात होत्या. या निवडणुकीत माधवी कदम यांनी वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव केला होता. 

आता दोन्ही राजे एकत्र, भाजप म्हणून रिंगणात

सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडी म्हणून निवडणूक न लढवता उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक भाजप म्हणून निवडणूक लढवणार आहेत. सातारा नगरपालिकेची सदस्यसंख्या 50 असून उदयनराजे भोसलेंच्या गटाला 22, शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाला 22 आणि मूळ भाजपला 6 जागा असा फॉर्म्युला चर्चेत होता. 

दरम्यान, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला जाणार आहे. त्यांच्याकडून कोणाला उमेदवारी मिळते ते पाहावं लागेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

फलटण नगरपरिषद निवडणूक: शेवटचा दिवस उरला असताना 30 उमेदवारी अर्ज दाखल

0
फलटण नगरपरिषद निवडणूक: शेवटचा दिवस उरला असताना 30 उमेदवारी अर्ज दाखल

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी  उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना आजपर्यंत एकूण 30 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी 3 आणि नगरसेवक पदासाठी 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

निवडणूक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग 1, 2, 3 व 11 मधून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे उद्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

आज दिनांक 16 नोव्हेंबरपर्यंत दाखल अर्जांचा तपशील

नगराध्यक्षपदासाठी – 3 अर्ज

  1. अशोक जयवंतराव जाधव
  2. प्रशांत सदानंद अहिवळे
  3. सचिन सूर्यवंशी बेडके

प्रभागनिहाय दाखल झालेले अर्ज

प्रभाग क्रमांक 4

  1. प्रभा चंद्रशेखर हेंद्रे (अ)

प्रभाग क्रमांक 5

  1. अशोक जयवंतराव जाधव (ब)
  2. प्रतापसिंह पृथ्वीराज नाईक निंबाळकर (ब)
  3. श्रद्धा राजेश गायकवाड (अ)
  4. रोहीत राजेंद्र नागटीळे (ब)

प्रभाग क्रमांक 6

  1. किरण देवदास राऊत (अ)
  2. मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर (ब)

प्रभाग क्रमांक 7

  1. अशोक जयवंतराव जाधव (ब)
  2. अमोल हरीश्चंद्र घाडगे (ब)
  3. राजेश्री विशाल राहीगुडे (अ)
  4. पूजा जोतीराम घनवट (अ)
  5. राजेंद्र प्रतापराव निंबाळकर (ब)

प्रभाग क्रमांक 9

  1. सचिन चंद्रकांत गानबोटे (ब)
  2. रझीया मेहबुब मेटकरी (अ)
  3. अमोल प्रकाश भोईटे (ब)

प्रभाग क्रमांक 10

  1. जयश्री रणजीत भुजबळ (अ)
  2. अमित अशोक भोईटे (ब)

प्रभाग क्रमांक 12

  1. प्रविण तुळशीराम आगवणे (अ)

प्रभाग क्रमांक 13

  1. सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके (क)
  2. विजया ज्ञानेश्वर कदम (ब)
  3. राहुल अशोक निंबाळकर (क)

रासायनिक रंग अन् दूषित पाण्याचा वापर, तुम्हीपण बाजारातून भाज्या-फळे घेताय? ‘अशी’ घ्या काळजी!

0
रासायनिक रंग अन् दूषित पाण्याचा वापर, तुम्हीपण बाजारातून भाज्या-फळे घेताय? ‘अशी’ घ्या काळजी!


Buying vegetables and fruits: मुंबईसारख्या मोठ्या शहरांच्या बाजारात भाज्या आणि फळे इतकी चमकदार दिसतात की, ग्राहक लगेच आकर्षित होतात. पण हा चमकदारपणा नैसर्गिक नसून, रासायनिक पदार्थ किंवा इंजेक्शनमुळे येत असतो. अशी उत्पादने आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. त्यामुळे खरेदी करताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून कुटुंब निरोगी राहील.

Add Zee News as a Preferred Source

चमकदार रंग टाळा

फळे-भाज्यांचा रंग जर अतिशय भडक आणि कृत्रिम वाटत असेल, तर ते रासायनिक प्रक्रियेने रंगवलेले असू शकतात. उदाहरणार्थ, टोमॅटो किंवा सफरचंदांना इंजेक्शन देऊन लालसर केले जाते. असे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, अतिसार होऊ शकतो. शिवाय, दीर्घकाळात रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. नैसर्गिक रंग असलेली, सौम्य चमक असलेली उत्पादने निवडा.

पोत आणि ताजेपणा तपासा

भाजी किंवा फळ हातात घेऊन दाबून पहा. ते खूप मऊ किंवा सडलेले वाटले तर टाळा. ताज्या भाज्या ठोस आणि कुरकुरीत असतात. मऊ झालेली फळे लवकर खराब होतात आणि त्यात जंतू वाढण्याची शक्यता असते. अशी खरेदी टाळल्याने पैशाची बचत तर होतेच, पण आरोग्यही सुरक्षित राहते.

वास आणि नैसर्गिक सुगंध ओळखा

चांगल्या फळांना त्यांचा स्वतःचा मधुर वास येतो, जसे आंब्याचा गोड सुगंध. जर वास नसेल किंवा रासायनिक गंध येत असेल, तर ते कृत्रिमरीत्या पिकवलेले असू शकतात. भाज्यांना ताज्या मातीचा वास यावा. असे निवडल्याने चव चांगली मिळते आणि आरोग्याला हानी होत नाही.

हंगामानुसार खरेदी करा

प्रत्येक फळ-भाजीचा स्वतःचा मोसम असतो. हंगामात मिळणाऱ्या गोष्टी स्वस्त, चविष्ट आणि निरोगी असतात. वर्षभर उपलब्ध असलेल्या वस्तूंमध्ये सुधारित बियाणे किंवा रसायने वापरली जातात. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात तरबूज, पावसाळ्यात भेंडी घ्या. यामुळे नैसर्गिक पोषण मिळते.

दूषित पाणी आणि बाहेरची चमक 

शहराजवळील शेतात सांडपाण्याने भाज्या पिकवल्या जातात. यात जीवाणू, विषाणू आणि भारी धातू असतात, ज्यामुळे कॉलरा, टायफॉईड, कावीळ सारखे रोग होतात. तसेच, फळांना मेणाचा थर देऊन चमकवले जाते, जो धुवूनही पूर्ण निघत नाही. अशी उत्पादने टाळा आणि पाण्याने नीट धुवा.
एकूणच, बाजारातून भाज्या-फळे घेताना डोळसपणे वागा. नैसर्गिक, हंगामी आणि ताज्या गोष्टी निवडल्याने आरोग्य उत्तम राहील आणि रासायनिक धोक्यापासून संरक्षण मिळेल.

FAQ 

प्रश्न: बाजारातून भाज्या आणि फळे घेताना चमकदार रंग का टाळावा?

उत्तर: चमकदार आणि भडक रंग बहुतेकदा रासायनिक पदार्थ किंवा इंजेक्शनमुळे येतो. अशी फळे-भाज्या खाल्ल्याने उलट्या, अतिसार होऊ शकतो आणि दीर्घकाळात रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन कर्करोगाचा धोका वाढतो. त्याऐवजी नैसर्गिक आणि सौम्य रंगाची उत्पादने निवडा.

प्रश्न: भाज्या-फळांची ताजेपणा कशी तपासावी?

उत्तर: फळ किंवा भाजी हातात घेऊन हलकेच दाबून पहा. ती ठोस आणि कुरकुरीत असावी, खूप मऊ किंवा सडलेली असू नये. ताज्या वस्तूंमध्ये जंतू वाढण्याची शक्यता कमी असते, ज्यामुळे आरोग्य सुरक्षित राहते आणि पैसेही वाचतात.

प्रश्न: हंगामी फळे-भाज्या निवडण्याचे फायदे काय?

उत्तर: हंगामातील उत्पादने स्वस्त, चविष्ट आणि पूर्णपणे नैसर्गिक असतात. वर्षभर मिळणाऱ्या गोष्टींमध्ये सुधारित बियाणे किंवा रसायने असू शकतात. हंगामानुसार खरेदी केल्याने चांगले पोषण मिळते आणि रासायनिक धोक्यापासून संरक्षण होते.





Source link

जगातील 3 मोठ्या शक्तिशाली देशांसोबत भारताची सर्वात मोठी डील! अमेरिकेला जबरदस्त झटका

0
जगातील 3 मोठ्या शक्तिशाली देशांसोबत भारताची सर्वात मोठी डील! अमेरिकेला जबरदस्त झटका


American Tariffs on India : अमेरिकेने ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय सीफूड आणि कोळंबीवर जवळजवळ 50 टक्के कर लादला, ज्यामुळे आंध्र प्रदेश सारख्या राज्यांना धक्का बसला. या राज्यातून भारताच्या एकूण कोळंबी निर्यातीपैकी 70 टक्के निर्यात होते. अशातच आता भारत सरकारने युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया सारख्या प्रमुख बाजारपेठांसोबत प्रलंबित समस्या सोडवून निर्यात क्षेत्रातीाल सर्वात मोठा करार केला आहे. यामुळे अमेरिकेला जबरदस्त झटका बसला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली.  गेल्या नऊ वर्षांपासून, युरोपियन युनियनने भारतीय सीफूडवर गुणवत्ता ऑर्डर बंदी लादली होती. सततच्या दबावामुळे, भारताने आता हा प्रश्न सोडवला आहे. 102 भारतीय मत्स्यपालन युरोपला निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. ही केवळ मान्यता नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्रणालींवरील वाढत्या विश्वासाचे लक्षण आहे. युरोपियन युनियन ही एक प्रीमियम बाजारपेठ आहे जिथे कोळंबी आणि मासे उच्च मूल्यांचे आहेत. यामुळे शेतकरी आणि निर्यातदार दोघांचेही उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

रशिया हा भारतासाठी दीर्घकाळापासून एक विश्वासार्ह बाजारपेठ आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा पाश्चात्य राजकारण रशियाला वेगळे करत आहे. गोयल म्हणाले की, रशिया लवकरच २५ भारतीय मत्स्यव्यवसायांना अंतिम मान्यता देईल. यामुळे चीन आणि व्हिएतनामसारख्या बाजारपेठांमध्ये निर्यात आणखी वाढेल आणि भारताला भू-राजकीय संतुलन राखण्यात फायदा होईल. रशियासोबत वाढत्या व्यापारामुळे ऊर्जा आणि तेल सहकार्य देखील मजबूत होते.

ऑस्ट्रेलियाने आठ वर्षांत प्रथमच आंध्र प्रदेशातून सोलून न काढलेल्या कोळंबीच्या आयातीला परवानगी दिली आहे. यापूर्वी, व्हाईट स्पॉट व्हायरसच्या प्रकरणामुळे हा दरवाजा बंद करण्यात आला होता. उच्च दर्जाचा निर्यातदार म्हणून भारताच्या सीफूड क्षेत्रात पुन्हा प्रवेश करण्याच्या दृष्टीने हे पाऊल एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे भारताची ब्रँड प्रतिमा सुधारेल आणि भविष्यात प्रक्रिया केलेल्या सीफूडसाठी संधी उपलब्ध होतील.

भारताच्या एकूण कोळंबी निर्यातीपैकी सुमारे 80 टक्के निर्यात आंध्र प्रदेशातून होते. अमेरिकेला 70 टक्के कोळंबी विकण्याचा मार्ग अचानक लक्षणीयरीत्या अरुंद झाला. याचा शेतकरी आणि मत्स्यपालनावर मोठा परिणाम होणार होता. तथापि, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया सारख्या बाजारपेठा उघडल्याने, आंध्रातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चांगले भाव मिळू लागतील. रशियाकडून तेल खरेदी करणे अधिक महाग होईल असे संकेत देऊन अमेरिकेने शुल्क लादले. परंतु भारताने त्याच्या व्यापारात विविधता आणून प्रतिसाद दिला.

FAQ

१. अमेरिकेने भारतीय कोळंबी आणि सीफूडवर किती टक्के कर लादला आणि तो कधी लागू झाला?
   ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेने भारतीय कोळंबी आणि सीफूडवर जवळजवळ ५० टक्के कर लादला.

२. या करामुळे सर्वाधिक फटका कोणत्या राज्याला बसला?
   आंध्र प्रदेशला. कारण भारताच्या एकूण कोळंबी निर्यातीपैकी सुमारे ७०-८० टक्के निर्यात आंध्रद्र प्रदेशातून होते आणि त्यातील मोठा वाटा अमेरिकेला जात होता.

३. भारताने अमेरिकेच्या या कराला कसा प्रतिसाद दिला?
   भारताने अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करून युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या प्रमुख बाजारपेठांसोबत प्रलंबित अडथळे दूर करून नवे दरवाजे उघडले. यामुळे अमेरिकेला मोठा आर्थिक आणि भू-राजकीय झटका बसला आहे.

 





Source link

दिवसातून कितीवेळा कॉफी प्यावी? जाणून घ्या नाहीतर…

0
दिवसातून कितीवेळा कॉफी प्यावी? जाणून घ्या नाहीतर…


दिवसातून कितीवेळा कॉफी प्यावी? जाणून घ्या नाहीतर…

Add Zee News as a Preferred Source

How many times a day should you drink coffee : साधारणपणे सगळेचजण थकवा घालवण्यासाठी किंवा फ्रेश वाटावं यासाठी दिवसातून कितीतरी वेळा कॉफी पित असतात. कॉफी पिण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. अयोग्य वेळेस आणि जास्त प्रमाणात कॉफी पिल्यास ती आरोग्यास हानिकारक ठरू शकते. आयुर्वेदानुसार कॉफीमुळे शरिरातील पित्त आणि वात वाढण्याची शक्यता असते. उपाशी पोटी कॉफीचे सेवन केल्याने शारिरीक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. शिवाय सगळ्यांच्या शरिरावर  वेगवेगळे परिणाम होतात. त्यामुळे कॉफीचे सेवन कोणी, कधी आणि कितीवेळा करावे हे माहित असणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार ज्यांना गॅस, पित्त, उच्च रक्तदाब आणि झोप न येणे अशा समस्या असतील त्यांनी कॉफीचे सेवन कधीच करू नये. याउलट ज्यांना कफ किंवा कामामध्ये लक्ष केंद्रित करण्यास समस्या जाणवत असतील तसेच सतत आळस जाणवत असेल त्यांनी कॉफीचे सेवन करण्यास हरकत नाही. 

कॉफी पिण्याचे फायदे : 

कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. काही अभ्यासानुसार कॅफिनयुक्त कॉफी प्यायल्याने नैराश्याचा धोका कमी करण्यास मदत होते. कॅफिन मेंदूला उत्तेजित करते, ज्यामुळे एकाग्रता, सतर्कता आणि स्मरणशक्ती सुधारते. काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की, कमी प्रमाणात कॉफी पिल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. शिवाय तोंड, घसा आणि पचनसंस्थेच्या कर्करोगापासून संरक्षण होते. कॉफीमधील कॅफिक अॅसिड नावाचे अँटिऑक्सिडंट त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते. एवढेच काय तर वजन कमी करण्यासही कॉफी फायदेशीर ठरते. 

कॉफी पिण्याचे तोटे :

योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास ती फायदेशीर ठरते. पण जास्त प्रमाणात कॉफी पिल्यास निद्रानाश होऊ शकतो किंवा झोपेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. कॉफीमध्ये असलेले आम्ल आणि कॅफिन पोटातील आम्लाचे उत्पादन वाढवतात. यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी, मळमळ आणि पोटात जळजळ होऊ शकते. शरिरात कॅफिनचे प्रमाण वाढल्याने अस्वस्थता आणि चिंता वाढते. हृदयाची गती वाढून रक्तदाबही वाढू शकतो. 

 

कॉफीचे सेवन करताना कोणती काळजी घ्यावी :

1. सकाळी उपाशी पोटी कॉफी पिऊ नये. 

2. संपूर्ण दिवसात फक्त एक कप कॉफी प्यावी.

3. कॉफी पिल्यानंतर थोडावेळ चालावे. 

4. कॉफीमध्ये कमी साखर घाला आणि चवीनुसार वेलची पूड घाला. 

5. कॉफी बनवण्यासाठी रोस्टेड कॉफी पावडरचा वापर करा. 

 

 

 

 

१. दिवसातून किती वेळा कॉफी प्यावी?
उत्तर:
संपूर्ण दिवसात फक्त एक कप कॉफी प्यावी. जास्त प्रमाणात पिल्यास निद्रानाश, अॅसिडिटी किंवा चिंता वाढू शकते.

२. कोणी कॉफीचे सेवन करू नये?
उत्तर:
आयुर्वेदानुसार ज्यांना गॅस, पित्त, उच्च रक्तदाब किंवा झोप न येणे अशा समस्या असतील त्यांनी कॉफी कधीच पिऊ नये.

३. कॉफी पिण्याचे मुख्य फायदे काय आहेत?
उत्तर:
कॉफीमुळे एकाग्रता वाढते, नैराश्याचा धोका कमी होतो, टाइप २ मधुमेहापासून संरक्षण मिळते, त्वचा निरोगी राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.





Source link

फलटण नगरपरिषद निवडणूक : महायुती उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याला मोठा प्रतिसाद

0
फलटण नगरपरिषद निवडणूक : महायुती उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याला मोठा प्रतिसाद

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज वेग आला असून महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यासाठी सभागृहात दाखल झाले. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (खासदार गट) यांच्या बहुतेक उमेदवारांनी दुपारी पालिका सभागृहात उपस्थित राहून आपले अर्ज सादर केले. अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या वेळेपुर्वीच पालिका आवारात राजकीय हालचालींना उधाण आले होते.

निवडणूक आयोगाने अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित केली होती. नियमांनुसार ३ वाजण्यापूर्वी सभागृहात प्रवेश केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची तरतूद असल्याने, महायुतीच्या सर्व इच्छुक उमेदवारांना वेळेतच प्रवेश देण्यात आला.

संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत होती. उमेदवारांची कागदपत्रे तपासणे, अर्ज स्वीकारणे आणि त्याची पोच देणे हे कामकाज अत्यंत काटेकोरपणे केले जात आहे. या कामात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव आणि मुख्याधिकारी निखील जाधव यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

महायुतीकडून कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता, वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक उमेदवारांनी अर्ज सादर केले. उमेदवारांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता.

दुपारी ३ नंतर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले असून, आत शिरलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या नियोजनामुळे कोणतीही गोंधळाची स्थिती उद्भवली नाही.

अर्ज दाखल झाल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होऊ लागले आहे. अर्ज छाननी आणि माघारीची मुदत पूर्ण झाल्यानंतरच अंतिम प्रतिस्पर्धी निश्चित होतील. दरम्यान, शहरात आणि पालिका आवारात राजकीय चर्चांना जोर आला आहे.

फलटण नगरपरिषद निवडणुकाआधी राजे गटाला मोठा धक्का; अनिल व संभाजी चोरमले शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये

0
फलटण नगरपरिषद निवडणुकाआधी राजे गटाला मोठा धक्का; अनिल व संभाजी चोरमले शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटातील गळतीचे सत्र सुरूच असून, आज पुन्हा दोन महत्त्वाच्या नेत्यांनी गटाला रामराम केला आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे माजी उपसंचालक अनिल मारुतराव चोरमले आणि स्थानिक राजकारण व समाजकारणात सक्रिय असलेले संभाजी साहेबराव चोरमले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष सोमशेठ जाधव प्रमुख उपस्थित होते. नाईक निंबाळकर यांनी दोन्ही नेत्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले.

अनिल चोरमले यांचा प्रशासकीय अनुभव, क्रीडा विभागातील कारकीर्द आणि सामाजिक क्षेत्रातील मजबूत जनसंपर्क महायुतीच्या ताकदीत भर घालणारा ठरत आहे. संभाजी चोरमले यांचाही स्थानिक राजकारणातील सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याने त्यांच्या प्रवेशाला विशेष वजन प्राप्त झाले आहे.

गेल्या काही दिवसांत राजे गटातील अनेक दिग्गज, माजी नगराध्यक्ष आणि सुकाणू समिती सदस्य महायुतीत सामील झाले आहेत. आता चोरमले बंधूंसह आणखी दोन प्रभावी नेते गट सोडून गेल्याने राजे गटासमोरील अडचणी वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

अनिल चोरमले यांनी विकासाच्या मुद्द्यावर आणि सक्षम नेतृत्वाच्या विश्वासावरून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. आगामी काळात पक्ष संघटन मजबुतीसाठी जोमाने काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या प्रवेशामुळे संबंधित प्रभागातील राजकीय समीकरणांत बदल होणार असून महायुतीला त्याचा फायदा मिळेल, असा विश्वास सोमशेठ जाधव यांनी व्यक्त केला. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे प्रवेश सोहळ्याला भव्य शक्तीप्रदर्शनाचे रूप आले होते.