Saturday, July 4, 2026
Home Blog Page 100

प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून मीना काकडे यांचा दमदार अर्ज दाखल! प्रभागात जल्लोष

0
प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून मीना काकडे यांचा दमदार अर्ज दाखल! प्रभागात जल्लोष

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठ परिसरात आज राजकीय वातावरण रंगतदार झाले. प्रभाग क्र. 2 (अनुसूचित जाती महिला) राखीव या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट (महायुती) यांच्या उमेदवार म्हणून सौ. मीना जीवन काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग दोन मधून काकडे कुटुंबाला संधी मिळावी अशी स्थानिकांची मागणी होती, आणि अखेर ती पूर्ण झाल्याने प्रभाग मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अर्ज दाखल करताना सौ. मीना काकडे यांनी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर उमेदवारी दाखल केली असून त्यावेळी कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. प्रभागातील नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधांचा अभाव आणि स्थानिक प्रश्न यावर प्रभावीपणे काम करून सक्षम नेतृत्व देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘या’ व्यक्तींनी आवळ्याचे सेवन केल्यास पडेल महागात! आत्ताच जाणून घ्या…

0
‘या’ व्यक्तींनी आवळ्याचे सेवन केल्यास पडेल महागात! आत्ताच जाणून घ्या…


Know Who can Eat Amla :  आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये  मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीॉक्सिडंट्स असतात. जे पचनसंस्था सुधारण्यास आणि  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. शिवाय त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही आवळा अधिक फायदेशीर ठरतो. डॉक्टर सुद्धा सरबत, आवळा पावडर अशा अनेक प्रकारात आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. पण तुम्हाला माहित आहे का आवळ्याचे सेवन सर्वांच्याच आरोग्यास फायदेशीर ठरत नाही. काही ठराविक व्यक्तींनी आवळ्याचे सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. याचे नेमके कारण काय? याबद्दल पुढे सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

एका रिसर्चमधून असे समोर आले आहे की,  आवळ्यामध्ये असे काही नैसर्गिक पदार्थ असतात ज्यामुळे नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींना अॅलर्जी, खाज किंवा सूज अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेत काहीवेळा गंभीर आजार उद्भवण्याचीही शक्यता असते. आवळ्याचे सेवन करणे आरोग्यदायी मानले जाते पण सर्वांसाठीच नाही. त्यामुळे कोणी कितीप्रमाणात आवळ्याचे सेवन करावे याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. 

अशा व्यक्तींनी आवळ्याचे सेवन करू नये:

आवळ्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे जर तुमच्याही रक्तातील साखरेची पातळी लवकर कमी होत असेल किंवा तुम्हाला सतत थकवा जाणवून चक्कर येणे यांसारख्या समस्या जाणवत असतील. तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आवळ्याचे सेवन करणे टाळावे. नाहीतर प्रकृती आणखी खराब होण्याची शक्यता असते. शिवाय ज्यांना सतत पोटाच्या समस्या असतात त्यांनी देखील आळ्याचे सेवन करणे टाळावे. कारण आवळा चवीला आंबट आणि  त्यात अॅसिडिक गुणधर्म असतात. जे अॅसिडिटी, छातीत जळजळ होणे, पोटात सूज येणे, गॅस होणे किंवा पोट दुखी यांसारख्या समस्यांचे कारण बनू शकते. तसेच तुम्हाला आधीपासून अल्सर, गॅस्ट्राइटिस किंवा एसिड रिफ्लक्स अशा समस्या असतील तर, रिकामी पोटी आवळा खाणे प्रकर्षाने टाळावे.

 

याशिवाय आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले व्हिटॅमिन सी शरिरात ऑक्सालेट तयार करण्याचे कार्य करते. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते. जर तुम्हाला सु्द्धा किडनी संबंधित समस्या असतील तर आवळ्याचे सेवन टाळावे. विशेष म्हणजे गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात आवळ्याचे सेवन केल्यास पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. 

तुम्हाला सुद्धा वरील समस्या जाणवत असतील तर, आवळ्याचे सेवन करताना किंवा आवळ्यापासून बनलेला कोणत्याही पदार्थाचे सेवन करताना आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच ही माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तींसह नक्की शेअर करा. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

 

 

 

 

१. प्रश्न: आवळा खाल्ल्याने कोणत्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी किंवा टाळावा?

उत्तर: आवळा खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होते, म्हणून हायपोग्लायसीमिया (साखर लवकर कमी होणे), सतत थकवा किंवा चक्कर येणाऱ्या व्यक्तींनी; तसेच अॅसिडिटी, छातीत जळजळ, गॅस, अल्सर, गॅस्ट्रायटिस किंवा एसिड रिफ्लक्सच्या रुग्णांनी आवळ्याचे सेवन टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

२. प्रश्न: आवळा खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता का वाढते?

उत्तर: आवळ्यात भरपूर व्हिटॅमिन सी असते, जे शरीरात ऑक्सालेट तयार करू शकते. हे ऑक्सालेट किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणून ज्यांना आधीपासून किडनी स्टोन किंवा किडनीची समस्या आहे त्यांनी आवळ्याचे जास्त सेवन टाळावे.

 

३. प्रश्न: गर्भवती महिलांनी आवळा जास्त प्रमाणात खावा का?

उत्तर: नाही. गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात आवळ्याचे सेवन केल्यास आंबटपणा व अॅसिडिक गुणधर्मामुळे पोटदुखी, अॅसिडिटी, गॅस अशा समस्या वाढू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मर्यादित प्रमाणात घ्यावे.





Source link

लग्नासाठी दागिने खरेदी करायचेत? आज इतक्या हजारांनी स्वस्त झालं सोनं, वाचा भाव

0
लग्नासाठी दागिने खरेदी करायचेत? आज इतक्या हजारांनी स्वस्त झालं सोनं, वाचा भाव


Gold Rate Today: लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. लग्न म्हटलं की दागिन्यांची खरेदी ही आलीच. दिवाळीआधी सोनं-चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता सोन्याचे दर काहीसे घसरले आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव कमी झाला आहे. काय आहे आजचा दर जाणून घेऊयात. 

Add Zee News as a Preferred Source

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसतेय. सोनं 9 हजारांनी तब्बल स्वस्त झालं आहे. तुम्हीदेखील लग्नसराईचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 2 हजारांइतकी घट झाली आहे. तर 1,68,900 हजार रुपये किलोवर चांदी स्थिरावली आहे. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,740 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा 1,23,660 रुपयांवर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,600 रुपयांची घट झाली असून 1,13,350 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,310 रुपयांनी घट झाली असून प्रतितोळा सोनं 92,740 रुपयांवर स्थिरावले आहे. 

आजचा सोन्याचा भाव काय?

– 10 ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,13,350 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,660 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,740 रुपये

– 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,335 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,366 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,274 रुपये

– 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 90,680 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 98,928 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 74,192 रुपये

– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,13,350 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,660 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,740 रुपये





Source link

फलटण नगरपरिषद निवडणूक रंगतदार! दोन्ही गटांची अधिकृत उमेदवार यादी जाहीर; प्रत्येक प्रभागातील लढती स्पष्ट

0
फलटण नगरपरिषद निवडणूक रंगतदार! दोन्ही गटांची अधिकृत उमेदवार यादी जाहीर; प्रत्येक प्रभागातील लढती स्पष्ट

फलटण प्रतिनिधी : शहरातील राजकीय वातावरण तापवणाऱ्या फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत अखेर दोन्ही प्रमुख गटांनी आपल्या अधिकृत उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर खासदार गट (महायुती) आणि राजे गटाने (शिवसेना/आघाडी) प्रभागनिहाय उमेदवारांची नावे जाहीर केली असून आता प्रत्येक प्रभागातील थेट सामना स्पष्ट झाला आहे.

खासदार गटाने प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हांवर उमेदवार उभे केले आहेत, तर राजे गट शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर रिंगणात उतरला आहे. काही प्रभागांत ‘आघाडी’ तसेच स्वतंत्र उमेदवारांची नोंदही आहे.

उमेदवारी अर्जांची छाननी आज (दि. १८) होत असून, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत चित्रात काही बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, जाहीर झालेल्या याद्यांमुळे शहरातील निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे आणि दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे.

खाली दोन्ही गटांची प्रभागनिहाय अधिकृत उमेदवार यादी 👇

प्रभागनिहाय उमेदवार यादी

१ अ

  • राजे गट : आवळे लक्ष्मी प्रमोद
  • महायुती : सौ. अस्मिता भीमराव लोंढे / सौ. नर्मदा किसन पवार

१ ब

  • राजे गट : पवार सुमन रमेश
  • महायुती : सोमाशेठ गंगाराम जाधव / देविदास किसन पवार

२ अ

  • राजे गट : रणदिवे आरती जयकुमार
  • महायुती : मीना जीवन काकडे (राष्ट्रवादी)

२ ब

  • राजे गट : अहिवळे अनिकेत राहुल
  • महायुती : सौ. सुपर्णा सनी अहिवळे (राष्ट्रवादी)

३ अ

  • राजे गट : भोसले पूनम सुनील
  • महायुती : सचिन रमेश अहिवळे (राष्ट्रवादी)

३ ब

  • राजे गट : ननावरे सुषमा हेमंत
  • महायुती : सौ. सुलक्षणा जितेंद्र सरगर

४ अ

  • राजे गट : जाधव रुपाली सुरज
  • महायुती : सौ. हेमलता चंद्रकांत नाईक (राष्ट्रवादी)

४ ब

  • राजे गट : पप्पू शेख
  • महायुती : राहुल जगन्नाथ निंबाळकर

५ अ

  • राजे गट : व्हटकर सुरेखा श्रीकांत
  • महायुती : सौ. कांचन दत्तराज व्हटकर

५ ब

  • राजे गट : पाटील विजय हरिभाऊ
  • महायुती : रोहित राजेंद्र नागटिळे

६ अ

  • राजे गट : कुंभार दीपक अशोक
  • महायुती : किरण देवदास राऊत

६ ब

  • राजे गट : जगदाळे अमिता सदाशिव
  • महायुती : मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर

७ अ

  • राजे गट : कर्णे श्रीदेवी गणेश
  • महायुती : सौ. स्वाती राजेंद्र भोसले

७ ब

  • राजे गट : गुंजवटे पांडुरंग मानसिंगराव
  • महायुती : अशोक जयवंत जाधव

८ अ

  • राजे गट : तेली विशाल उदय
  • महायुती : फिरोज शहनवाज आत्तार

८ ब

  • राजे गट : खानविलकर सुवर्णा अमरसिंह
  • महायुती : कु. सिद्धाली अनुप शहा

९ अ

  • राजे गट : मदने कविता श्रीराम (आघाडी)
  • महायुती : रजिया मेहबूब मेटकरी (राष्ट्रवादी)

९ ब

  • राजे गट : पवार पंकज चंद्रकांत (आघाडी)
  • महायुती : अमोल प्रकाश भोईटे (राष्ट्रवादी)

१० अ

  • राजे गट : तारळकर श्वेता किशोर
  • महायुती : सौ. रेहाना अमीर मोमीन

१० ब

  • राजे गट : पवार विशाल पांडुरंग (आघाडी)
  • महायुती : अमित अशोक भोईटे

११ अ

  • राजे गट : चोरमले कृष्णात मल्हारी (दादासाहेब)
  • महायुती : संदीप दौलतराव चोरमले

११ ब

  • राजे गट : निकम प्रियांका युवराज
  • महायुती : सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले

१२ अ

  • राजे गट : काकडे विकास वसंतराव
  • महायुती : अरुण हरिभाऊ खरात

१२ ब

  • राजे गट : शहा स्मिता संगम
  • महायुती : सौ. हेमंत फुले

१३ अ

  • राजे गट : बागवान सानिया फिरोज (आघाडी)
  • महायुती : मोहिनी मंगेश हेंद्रे

१३ ब

  • राजे गट : काकडे निर्मला शशिकांत (आघाडी)
  • महायुती : रुपाली अमोल सस्ते

१३ क

  • राजे गट : सूर्यवंशी (बेडके) सचिन सुभाषराव (आघाडी)
  • महायुती : राहुल अशोक निंबाळकर (राष्ट्रवादी)

फलटण नगरपरिषद निवडणूक रंगात! उमेदवारी अर्जांची धडाकेबाज नोंदणी संपली

0
फलटण नगरपरिषद निवडणूक रंगात! उमेदवारी अर्जांची धडाकेबाज नोंदणी संपली

फलटण प्रतिनिधी :  फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मोठ्या उत्साहात पार पडली. दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांनी केलेल्या गर्दीमुळे निवडणुकीचा रंग तापला असून नगराध्यक्षपदासाठी तब्बल ८ अर्ज, तर सर्व १३ प्रभागांतून शेकडो अर्ज दाखल झाले आहेत. आता १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या छाननीनंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

खाली प्रभागनिहाय दाखल झालेल्या सर्व उमेदवारांची सविस्तर यादी —

नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार

अशोक जयवंतराव जाधव • प्रशांत सदानंद अहिवळे • सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) • मनिषा समशेरसिंह नाईक निंबाळकर • समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर • श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर • दिलीपसिंह भोसले • संतोष बाळासाहेब बिचुकले

प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज

प्रभाग क्र. १

सुमन रमेश पवार • आवळे लक्ष्मी प्रमोद • सोमशेठ जाधव • गणेश अरुण पवार • अपूर्वा प्रथमेश चव्हाण • विक्रम जाधव • नर्मदा किसन पवार • देविदास किसन पवार • रणजितसिंह जाधव • करुणा प्रशांत गायकवाड • अस्मिता भिमराव लोंढे • रेणुका लखन खंडाळे • सुरज काकडे

प्रभाग क्र. २

अनिता प्रशांत काकडे • सनी संजय अहिवळे • सुपर्णा सनी अहिवळे • सचिन रमेश अहिवळे • आरती जयकुमार रणदिवे • विद्या रामकुमार काकडे • मिना काकडे • ऋतिका पांडुरंग अहिवळे • संजना सुनील अहिवळे • सोनाली संग्राम अहिवळे • विजय भगवान येवले • अनिकेत राहुल अहिवळे • कुणाल किशोर काकडे • उदय कीर्तिकुमार काकडे • पांडुरंग समुद्रलाल अहिवळे

प्रभाग क्र. ३

सचिन रमेश अहिवळे • पूनम मंगेश बेंद्रे • सुलक्षणा जिनेंद्र सरगर • आरती दिपक सरगर • दिपक लक्ष्मन सरगर • सुनिल बापु अहिवळे • सिध्दार्थ दत्ता अहिवळे • हर्षद जालिंदर पाळणे • उषा लालासो राऊत • पुनम सुनिल भोसले • सुषमा हेमंत ननावरे • आशय हणमंत अहिवळे • सुनिल जनार्दन निकुडे • सतीश लक्ष्मण अहिवळे

प्रभाग क्र. ४

प्रभा चंद्रशेखर हेंद्रे • रूपाली सुरज जाधव • ताजुद्दीन मोहमद बागवान • हिना वसीम मणेर • अनिल भाऊसाहेब जाधव • रुपाली विजय मायणे • राहुल जगन्नाथ निंबाळकर • हेमलता चंद्रकांत नाईक • अझरुद्दीन ताजुउद्दीन शेख • सुलभा नामीर आतार • विठ्ठल शंकरराव अंबोले • किशोरसिंह नाईक निंबाळकर • रुकसार जाकीर मणेर

प्रभाग क्र. ५

अशोक जयवंतराव जाधव • प्रतापसिंह पृथ्वीराज नाईक निंबाळकर • श्रद्धा राजेश गायकवाड • रोहीत राजेंद्र नागटिळे • कांचन दत्तराज व्हटकर • कविता राहुल कांबळे • योगेश्वरी मंगेश खंदारे • शालन रविंद्र कांबळे • विजय हरिभाऊ लोंढे • मनिषा समशेरसिंह नाईक निंबाळकर • सुरेखा श्रीकांत व्हटकर • शुभांगी मुकुंद गायकवाड

प्रभाग क्र. ६

किरण देवदास राऊत • मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर • सत्यशिल मारुतराव नाळे • सूर्यकांत मल्हारी आडसुळ • दिपक अशोक कुंभार • अमिना सदाशिव जगदाळे

प्रभाग क्र. ७

अशोक जयवंतराव जाधव • अमोल हरीश्चंद्र घाडगे • राजश्री विशाल राहिगुडे • पुजा जोतीराम घनवट • राजेंद्र प्रतापराव निंबाळकर • स्वाती राजेंद्र भोसले • पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे • लता विलास तावरे • श्रीदेवी गणेश कर्णे • मयूर बाळासाहेब गुंजवटे • आरती दिपक शिंदे • हसीना रियाज इनामदार

प्रभाग क्र. ८

सिद्धाली अनुप शहा • फिरोज आतार • मिनल महेश मांढरे • विकास विठ्ठल कर्वे • अजय दत्तात्रय माळवे • शीतल धनंजय निंबाळकर • सुवर्णा अमरसिंह खानविलकर • विशाल उदय तेली • श्रीकांत विजय पालकर

प्रभाग क्र. ९

सचिन चंद्रकांत गानबोटे • रझिया मेहबूब मेटकरी • अमोल प्रकाश भोईटे • युवराज महादेव पवार • तुषार गणपतराव पवार • पदमा राजु शिरतोडे • सुरज हिंदुराव कदम • पंकज चंद्रकांत पवार • परवीन अब्दुल मेटकरी • कविता श्रीराम मदने • निखील विद्याधर भोईटे • मंगल अशोक मोहळकर

प्रभाग क्र. १०

जयश्री रणजीत भुजबळ • अमित अशोक भोईटे • अजय अरुण भोईटे • मनिषा राजेंद्र काळे • रेहाना बशीर मोमीन • गणेश सूर्यकांत शिरतोडे • मोनिका महादेव गायकवाड • नाना शामराव चव्हाण • विशाल पांडुरंग पवार • श्वेता किशोर तारळकर • शेख पाकिजा अमीर

प्रभाग क्र. ११

सनी ताराचंद भोई • संदिप दौलतराव चोरमले • स्वाती संदिप चोरमले • दादासाहेब चोरमले • प्रियांका युवराज निकम • प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले • ज्योती अजयकुमार दोशी • अमिर गनिम शेख

प्रभाग क्र. १२

प्रवीण तुळशीराम आगवणे • प्रिती अतुल शहा • अरुण हरीभाऊ खरात • चंदा प्रकाश काळे • नताशा रोहन पवार • विकास वसंतराव काकडे • सुनंदा सुधीर शहा • ओम प्रकाश पाटोले • भारती राजेश भोसले • राजु नानु मारूडा • स्मिता संगम शहा • स्वाती हेमंत फुले

प्रभाग क्र. १३

सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) • विजया ज्ञानेश्वर कदम • राहुल अशोक निंबाळकर • मोहिनी मंगेश हेंद्रे • अमोल शिरीष सस्ते • रुपाली अमोल सस्ते • मनोज दत्तात्रय शेडगे • निर्मला शशिकांत काकडे • सानिया फिरोज बागवान • पाकिजा अमिर शेख • कदम स्नेहल आकाश

पुढील टप्पा

उमेदवारी अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच अंतिम निवडणूक चित्र समोर येणार आहे.

निंबाळकर घराण्यातील थेट मुकाबला : फलटण नगराध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूंची उमेदवारी दाखल

0
निंबाळकर घराण्यातील थेट मुकाबला : फलटण नगराध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूंची उमेदवारी दाखल

निंबाळकर घराण्यातील थेट मुकाबला : फलटण नगराध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूंची उमेदवारी दाखल

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये आज अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला. याचदरम्यान निंबाळकर घराण्यातील दोन तरुण नेत्यांनी थेट रिंगणात उतरत वातावरण तापवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्रीमंत . ४रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी दाखल केली आहे. दुसरीकडे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या मोठ्या भावाला, समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना ऐनवेळी रिंगणात उतरवून मोठा राजकीय उलटफेर केला.

शिवसेनेतून अनिकेतराजे यांच्या  उमेदवारीमुळे या निवडणुकीत युवा नेतृत्वाला चालना मिळाल्याचे बोलले जात आहे. रामराजे राष्ट्रवादीत असतानाही त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेनेच्या चिन्हावरून निवडणूक लढवत असल्याने फलटणच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. भाजपकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होताच शहरातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली. दिलीपसिंह भोसले यांची जागा कापून समशेरसिंह यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्येही नवी समीकरणे तयार झाली आहेत.

फलटणमध्ये अनेक वर्षांपासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष पाहायला मिळत आला आहे.  आज ही दोन्ही घराण्यातील पुढच्या पिढीचे प्रतिनिधी थेट आमनेसामने आले आहेत. अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने फलटणमध्ये ‘निंबाळकर विरुद्ध निंबाळकर’ अशी थरारक लढत रंगणार आहे.

मंगळवार पेठेत राजे गटाची दमदार एन्ट्री: सौ. आरती रणदिवे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

0
मंगळवार पेठेत राजे गटाची दमदार एन्ट्री: सौ. आरती रणदिवे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

फलटण प्रतिनिधी : फलटण नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठ परिसरात आज राजकीय वातावरण चांगलेच रंगतदार झाले. प्रभाग क्र. 2 (अनुसूचित जाती महिला) राखीव या प्रभागातून शिवसेना (एकनाथ शिंदे) राजे गटाच्या उमेदवार म्हणून सौ. आरती जयकुमार रणदिवे (काकडे) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग दोनमधून काकडे कुटुंबाला संधी मिळावी अशी स्थानिकांची मागणी होती, आणि अखेर ती पूर्ण झाल्याने काकडे भावकीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अर्ज दाखल करताना सौ. आरती रणदिवे यांनी धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवारी दिली असून त्यावेळी कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. प्रभागातील नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधांचा अभाव आणि स्थानिक प्रश्न यावर प्रभावीपणे काम करून सक्षम नेतृत्व देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक २ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या उमेदवारीसाठीयुवा तडफदार नेतृत्व कुणाल किशोर काकडे यांचा अर्ज दाखल

0
प्रभाग क्रमांक २ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या उमेदवारीसाठीयुवा तडफदार नेतृत्व कुणाल किशोर काकडे यांचा अर्ज दाखल

फलटण │ सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून जनमानसात भक्कम विश्वास निर्माण केलेले युवा तडफदार नेतृत्व कुणाल किशोर काकडे यांनी प्रभाग क्रमांक २ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

स्थानिक पातळीवर युवकांचे मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम, तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या भक्कम पाठपुराव्यामुळे कुणाल काकडे हे विकासाभिमुख व तळमळीचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांचा वाढता जनाधार लक्षात घेता त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अर्ज दाखल करताना काकडे यांनी “प्रभाग क्रमांक २ च्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकसहभागातून काम करणार” असा विश्वास व्यक्त केला.

पवारवाडीत ‘दर रविवारी – चला बुद्धविहारी’ अभियानांतर्गत सूत्रपठन व संविधान जनजागृती

0
पवारवाडीत ‘दर रविवारी – चला बुद्धविहारी’ अभियानांतर्गत सूत्रपठन व संविधान जनजागृती


फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने पवारवाडी येथे “दर रविवारी – चला बुद्धविहारी” आणि “आपले संविधान – आपले अधिकार” या अभियानांतर्गत सूत्रपठन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मंगल मैत्री फेरीने झाली. फेरीत पदाधिकारी व उपासक–उपासिकांनी धम्म, समता, बंधुभाव आणि संविधान जागरूकतेचा संदेश दिला.

यानंतर बुद्धविहारात सूत्रपठन करून उपस्थितांनी भारतीय संविधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्याचे रक्षण–संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांना सूत्रपठन पुस्तकेही प्रदान करण्यात आली.

या उपक्रमात तालुका अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, महासचिव आयु. बाबासाहेब जगताप, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, संघटक विजयकुमार जगताप, संस्कार सचिव अमोल भोसले आदी मान्यवर सहभागी झाले.

या वेळी बोलताना अध्यक्ष महावीर भालेराव म्हणाले,
“फलटण तालुक्यात धम्मप्रसाराची भक्कम सुरुवात झाली असून ‘दर रविवारी – चला बुद्धविहारी’ ही संकल्पना समाजपरिवर्तनाचा आधार ठरेल.”
तालुका सचिव आयु. बाबासाहेब जगताप यांनी सांगितले की,“भारतीय बौद्ध महासभेच्या २५ कलमी कार्यक्रमांतर्गत धम्मप्रसार, शिक्षण, महिला सबलीकरण आणि संविधान जनजागृती यासाठी फलटण तालुक्यात ५६ ग्राम शाखांमार्फत सातत्यपूर्ण कार्य सुरू आहे. संविधान समजून घ्यायचे असेल तर दर रविवारी बुद्धविहारात विचारमंथन आवश्यक आहे.”
संस्कार सचिव अमोल भोसले यांनी पुढे दर रविवारी बुद्धवंदना, सूत्रपठन आणि सभासद नोंदणी वाढवण्याचा संकल्प जाहीर केला.यावेळी मौजे पवारवाडी येथील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका, तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अमोल मोहितेंचा सातारा नगराध्यपदासाठी भाजपकडून अर्ज दाखल, उदयनराजे भोसलेंची अनुपस्थिती चर्चेत

0



सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक अमोल मोहिते यांना उमेदवारी जाहीर झाली.  अमोल मोहिते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समर्थकांसह अर्ज भरला. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. मात्र, दोन्ही राजेंचे मनोमिलन असताना देखील खासदार उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. अमोल मोहिते यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सुवर्णा पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अमोल मोहिते यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज अधिकृत त्यांनी सातारा नगरपालिकेमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नगराध्यक्षपदावरून खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे या दोघांच्यात रस्सीखेच सुरू होती. मात्र, आज सकाळी भाजपकडून अमोल मोहिते यांची उमेदवारी जाहीर झाली आज भाजपच्या वतीने अर्ज भरण्यासाठी  शिवेंद्रराजे उपस्थित होते. मात्र, दोन्ही राजेंचे मनोमिलन असताना देखील उदयनराजे आणि त्यांचे कार्यकर्ते अनुपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

उदयनराजे भोसले यांच्या भूमिककेड लक्ष

सातारा नगरपालिका निवडणुकीला उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजप म्हणून सामोरं जाणार आहेत. यापूर्वीच्या सातारा नगरपालिका निवडणुकीत एकाच पक्षात असलं तरी दोन्ही नेत्यांच्या स्वतंत्र आघाड्यांचं राजकारण असायचं. उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी नगरपालिका निवडणूक लढवायची. तर, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नगरविकास आघाडी साताऱ्यात निवडणुकीच्या रिंगणात होती. मात्र, यावेळी दोन्ही नेते भाजपमध्ये असल्यानं त्यांनी आघाडी ऐवजी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

उदयनराजे भोसले आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीच्या साताऱ्यात चर्चा

सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अमोल मोहिते यांचे नाव भाजपकडून पुढे आले मात्र यानंतर साताऱ्यात उदयनराजे भोसले  यांच्या गटामध्ये नाराजी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या झालेल्या निर्णयामुळे उदयनराजे सुद्धा नाराज आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा अमोल मोहिते यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरला तेव्हा उदयनराजे या ठिकाणी उपस्थित नव्हते. तसेच उदयनराजेंचा कोणताही कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित नव्हता याच्यामुळे या ठिकाणी उदयनराजे गटामध्ये मोठी नाराजी असल्याचे चित्र पाहायला मिळतंय.

सातारा नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून उदनयराजे भोसले यांचं वर्चस्व राहिलं आहे. उदयनराजे गटाकडून संग्राम बर्गे आणि काका धुमाळ यांची नावे चर्चेत होती. जेव्हा भाजपा अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी या चार नावांचा सर्वे झाला होता यामध्ये संग्राम बर्गे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी सर्वात आघाडीवर होतं अशी सूत्रांच्या कडून माहिती मिळत होती असं असताना सुद्धा अमोल मोहिते यांना उमेदवारी कशी गेली याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. या झालेल्या निर्णयावर उदयनराजे काय प्रतिक्रिया देतायेत ते नाराज आहेत की त्यांच्या सहमतीन हा निर्णय झालाय हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 साताऱ्यात जागा वाटपासंदर्भात एका फॉर्म्युल्याची चर्चा सुरु होती, त्यात 22 जागा उदयनराजे भोसले यांच्याकडे, 22 जागा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाकडे तर 6 जागा मूळ भाजपला मिळणार अशा चर्चा होत्या. मात्र, थेट नगराध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक अमोल मोहिते यांना उमेदवारी जाहीर झाली. याशिवाय कोणताही जागा वाटपाचा फॉर्म्युला चर्चेत नव्हता असं म्हणत जिथं ज्यांची ताकद जास्त तिथले उमेदवार दोघांचे असं सांगण्यात आल्याची चर्चा आहे.. सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल करताना उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती साताऱ्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link