Monday, September 21, 2026
Homeसातारापवारवाडीत ‘दर रविवारी – चला बुद्धविहारी’ अभियानांतर्गत सूत्रपठन व संविधान जनजागृती

पवारवाडीत ‘दर रविवारी – चला बुद्धविहारी’ अभियानांतर्गत सूत्रपठन व संविधान जनजागृती


फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने पवारवाडी येथे “दर रविवारी – चला बुद्धविहारी” आणि “आपले संविधान – आपले अधिकार” या अभियानांतर्गत सूत्रपठन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मंगल मैत्री फेरीने झाली. फेरीत पदाधिकारी व उपासक–उपासिकांनी धम्म, समता, बंधुभाव आणि संविधान जागरूकतेचा संदेश दिला.

यानंतर बुद्धविहारात सूत्रपठन करून उपस्थितांनी भारतीय संविधानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्याचे रक्षण–संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांना सूत्रपठन पुस्तकेही प्रदान करण्यात आली.

या उपक्रमात तालुका अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, महासचिव आयु. बाबासाहेब जगताप, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, संघटक विजयकुमार जगताप, संस्कार सचिव अमोल भोसले आदी मान्यवर सहभागी झाले.

या वेळी बोलताना अध्यक्ष महावीर भालेराव म्हणाले,
“फलटण तालुक्यात धम्मप्रसाराची भक्कम सुरुवात झाली असून ‘दर रविवारी – चला बुद्धविहारी’ ही संकल्पना समाजपरिवर्तनाचा आधार ठरेल.”
तालुका सचिव आयु. बाबासाहेब जगताप यांनी सांगितले की,“भारतीय बौद्ध महासभेच्या २५ कलमी कार्यक्रमांतर्गत धम्मप्रसार, शिक्षण, महिला सबलीकरण आणि संविधान जनजागृती यासाठी फलटण तालुक्यात ५६ ग्राम शाखांमार्फत सातत्यपूर्ण कार्य सुरू आहे. संविधान समजून घ्यायचे असेल तर दर रविवारी बुद्धविहारात विचारमंथन आवश्यक आहे.”
संस्कार सचिव अमोल भोसले यांनी पुढे दर रविवारी बुद्धवंदना, सूत्रपठन आणि सभासद नोंदणी वाढवण्याचा संकल्प जाहीर केला.यावेळी मौजे पवारवाडी येथील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका, तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments