Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | उत्तर प्रदेशात सपा-काँग्रेसचं अखेर ठरलं; 'इतक्या' जागा देण्यावर झालं...

Political News | उत्तर प्रदेशात सपा-काँग्रेसचं अखेर ठरलं; ‘इतक्या’ जागा देण्यावर झालं एकमत | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

उत्तर प्रदेशात सपा-काँग्रेसचं अखेर ठरलं; ‘इतक्या’ जागा देण्यावर झालं एकमत

समाजवादी पक्षाचे नेतृत्व आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात जागांच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशात 17 जागांवर निवडणूक लढवण्याचे मान्य केले. परंतु, लखीमपूर खेरी आणि श्रावस्ती या जागा त्यांना द्याव्यात, अशी काँग्रेसची इच्छा आहे.

लखनौ : समाजवादी पक्षाचे नेतृत्व आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात जागांच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशात 17 जागांवर निवडणूक लढवण्याचे मान्य केले. परंतु, लखीमपूर खेरी आणि श्रावस्ती या जागा त्यांना द्याव्यात, अशी काँग्रेसची इच्छा आहे. या बदल्यात ते पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहरची जागा सोडण्यास तयार आहेत.

समाजवादी पक्षाने या प्रस्तावावर विचार केला असून, अंतिम निर्णय लवकरच दिला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. दोन्ही पक्षांमधील जागांबाबतचा गोंधळ रात्रीपर्यंत सुरू होता. त्यामुळे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी घोषणा करूनही राहुल गांधींच्या रायबरेलीतील भारत जोडो न्याय यात्रेला हजेरी लावली नाही. न्याय यात्रा मंगळवारी अमेठी, रायबरेली मार्गे उन्नावकडे रवाना झाली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments