Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | आधी आमदारांची पळवापळवी व्हायची आता नगरसेवकही; 'इथं' भाजपच्या नगरसेवकांना...

Political News | आधी आमदारांची पळवापळवी व्हायची आता नगरसेवकही; ‘इथं’ भाजपच्या नगरसेवकांना हलवलं रिसॉर्टमध्ये | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आधी आमदारांची पळवापळवी व्हायची आता नगरसेवकही; ‘इथं’ भाजपच्या नगरसेवकांना हलवलं रिसॉर्टमध्ये

हरियाणा आणि पंजाबच्या राजधानीत होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या आधी भाजपने आपल्या नगरसेवकांना रिसॉर्टमध्ये हलवले आहे. कोणत्याही प्रकारची बंडखोरी होऊ नये, यासाठी भाजपने हे पाऊल उचलले आहे.

चंदीगड : हरियाणा आणि पंजाबच्या राजधानीत होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या आधी भाजपने आपल्या नगरसेवकांना रिसॉर्टमध्ये हलवले आहे. कोणत्याही प्रकारची बंडखोरी होऊ नये, यासाठी भाजपने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे भाजपचे नगरसेवक महेश इंदर सिंग सिद्धू यांचे शनिवारी लग्न होते. या विवाह सोहळ्यात पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी होती. लग्नसमारंभात सहभागी झाल्यानंतर त्यांना परत मोर्नीला नेण्यात आले.

चंदीगडच्या महापौरपदासाठी 27 जानेवारीला निवडणूक झाली होती. या ‘आप’चे वरिष्ठ नेते त्यांच्या पक्षातील तीन नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याने भाजपने हे पाऊल उचलले. सर्वोच्च न्यायालयाने आप-काँग्रेस आघाडीचे उमेदवार कलदीप कुमार यांना विजयी घोषित केले. आता आगामी पदांवर विजय निश्चित करण्यासाठी भाजप नेतृत्व कोणताही धोका पत्करणार नाही. याआधी भाजप नगरसेवकांना पंचकुलातील पीडब्ल्यूडी विश्रामगृह आणि किसान भवनमध्ये ठेवण्यात आले होते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments