Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण तालुक्याच्या विकासपर्वाला सुरुवात: कर्तुत्वान नेतृत्वाला साथ द्या!

फलटण तालुक्याच्या विकासपर्वाला सुरुवात: कर्तुत्वान नेतृत्वाला साथ द्या!

फलटण :- फलटण तालुक्याच्या राजकीय परिवर्तनाला नवा आयाम मिळाला आहे. विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सचिन कांबळे पाटील यांनी आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आणि फलटण तालुक्याच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले.

निवडणुकीचा निकाल लागल्यावरही आदरणीय रणजितदादांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. “जोपर्यंत फलटण तालुक्याच्या हक्काचे पाणी येथे येत नाही, बारामती रेल्वे मार्ग पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी हार-फुले स्वीकारणार नाही. जर सत्कार करायचा असेल तर शालेय साहित्य द्या, ती मी गरीब विद्यार्थ्यांना देईन,” असा निर्णय घेऊन त्यांनी सर्वसामान्यांच्या हिताची काळजी घेतली.

फलटण तालुक्याचा कायापालट सुरू
गेल्या तीन दशकांत फलटण-कोरेगाव मतदारसंघात विकासाबाबत अनेक वायदे करण्यात आले, परंतु प्रत्यक्षात त्याचा लाभ जनतेला झाला नाही. मात्र रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आता विकासाची नवी दारे उघडली गेली आहेत. पाणीप्रश्न, रेल्वे मार्ग आणि शिक्षणाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे.

केंद्र व राज्य सरकारचे पाठबळ
फलटण-कोरेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारचा पाठिंबा दादांना लाभत आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने रणजितदादांचे नेतृत्व अधिक भक्कम होत आहे.

जनतेला विनंती
फलटण तालुक्याच्या जनतेने जसे विधानसभेला पाठिंबा दिला, तसा पाठिंबा पुढेही कायम ठेवावा. विकासासाठी खंबीर पाठबळ आवश्यक आहे. फलटण तालुका सुजलाम-सुफलाम होण्यासाठी, हक्काचे पाणी मिळवण्यासाठी, आणि  विकास साधण्यासाठी या नेतृत्वाला साथ द्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments